काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतर्गत निर्देशांनुसार (Interim Order) आता देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवणे, व अर्थातच नागरिकांनी त्यासाठी उभे राहणे, अनिवार्य आहे. येत्या १० दिवसांत ह्या निर्देशांचे पालन होईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.
http://timesofindia.indiatimes.com/india/National-anthem-to-play-before-...
ह्या निर्णयावर काहींनी असहमती दर्शवली आहे, तर काहींनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे. मला स्वतःला 'राष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे' हे वाटतेच. शाळा किंवा महाविद्यालयांतही अगदी ते रोज वाजवले गेले पाहिजे, असे वाटते. कारण ह्या संस्थांतून देशाचे नागरिक घडत असतात. परंतु चित्रपटगृहासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवून त्याचा सन्मान झाला पाहिजे, हा नियम काही कळत नाही. देशाच्या प्रतीकांप्रती आदर दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे संवैधानिक कर्तव्य आहे, व त्याने ते पाळलेच पाहिजे. परंतु ही प्रतीके अशी जनसामान्यांना चित्रपटगृहात दाखवून काही फरक पडेल का, हे कळत नाही. अर्थात, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावल्यावर मी उभा राहतोच, व राहीनही. पण हा नियम खरेच काही करेल, ह्याबद्दल शंका वाटते. महाराष्ट्रात हा नियम आधीपासूनच होता, पण आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला असल्याने तो देशभर झाला आहे, व तो सुप्रीम कोर्टाचा असल्याने त्यात बदल करणे अशक्यप्राय आहे. ह्याबद्दल मायबोलीकरांतही मतांतरे असतील, ती जाणून घेण्यासाठी हा धागा.
मी शिस्तीत उभा राहतो. सगळेच
मी शिस्तीत उभा राहतो. सगळेच कायम उभे राहतात. पण मला त्याचा त्रास होतो. नंतरच्या भारतमाता की जयच्या आरोळ्यांचाही त्रास होतो. चित्रपटगृहच का, या प्रश्नाचं उत्तर नाही आणि राष्ट्रगीतावरून माझी देशभक्ती ठरते, याचा मला विलक्षण त्रास होतो. घटनेनं, कोर्टानं मला उभं न राहण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असताना देशभक्त पब्लिक उभं न राहिल्यास कायदा हाती घेणार. हे कसलं स्वातंत्र्य?
आतातर पडद्यावर ध्वज फक्त आणि राष्ट्रगीताचे साधे स्वर. ते सियाचीन नाही, नामवंत गायक-वादक नाहीत की ती गोड मुलंमुली नाहीत. त्रास वाढणार.
सगळ्यांत त्रास कोर्टानं 'चला आता राष्ट्रभक्ती पाजायची वेळ झाली' असं म्हणण्याचा आहे.
या बाफवरच्या पोस्ट्स वाचून
या बाफवरच्या पोस्ट्स वाचून गोंधळात पडायला झालेय. आधी निर्णय वाचला तेव्हा काय हे ! असं वाटलेलं. आता इथे नताशा आणि अगोची पोस्ट वाचून होय , असाही व्ह्यू पॉईंट असू शकेल असं वाटतंय. थोडक्यात लंबक दुसऱ्या बाजूकडे झुकला नसला तरीही दुसरी बाजू थोडी पटू लागलीये .
मला व्यक्तिश: हा निर्णय
मला व्यक्तिश: हा निर्णय चुकीचा वाटतो .
नक्की कुठे आणि कितीवेळा
नक्की कुठे आणि कितीवेळा राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितल्यावर ती सक्ती वाटेल, हे मला जाणून घ्यायला आवडेल.
Chinoox, you know what? The
Chinoox, you know what? The first thought which came to my mind when i read your above comments was "thank goodness he is not an indian woman. Otherwise, How many other things he'd have got frustrated from? like the SC's epic verdict of allowing divorce on the ground of separating husband from his parents".. :eyeroll:
नताशा, मुद्द्याला धरून चर्चा
नताशा, मुद्द्याला धरून चर्चा केल्यास आवडेल.
अरे पण समजा काहीजणांना हे
अरे पण समजा काहीजणांना हे नसेल जाचक वाटलं तर त्यांना ते तसं वाटलंच पाहीजे ही सक्ती का? त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर हा घाला नाही का?
rmd, मग त्यांनी राहावं उभं.
rmd,
मग त्यांनी राहावं उभं. सगळ्यांनी का उभं राहायचं? त्यांना त्यांच्या देशभक्तीसाठी चित्रपटगृह एवढं एकच ठिकाण आहे का?
१. ज्यांना जाचक वाटत नाही, ते नाटक, सर्कस, गाण्याच्या मैफिली, कोर्ट, ऑफिस अशा ठिकाणी राष्ञ्रगीताचा आग्रह का धरत नाहीत?
२. ज्यांना आवडतं, त्यांना नक्की कितीदा राष्ट्रगीत म्हणण्यास सांगितलं म्हणजे सक्ती वाटेल?
या दोन प्रश्नांची उत्तरं देशील का? मी हे प्रश्न आधीही विचारले आहेत.
मला पण व्यक्तिशः हा निर्णय
मला पण व्यक्तिशः हा निर्णय चुकीचा वाटतो.
माझं माझ्या आई वडिलांवर प्रेम आहे. मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. पण दर मदर्स/ फादर्स डे ला मी त्यांना प्रणाम केलाच पाहिजे त्यांच्या स्तुतिप्रित्यर्थ जे काही कवन आहे ते म्हणलेच पाहिजे, त्याचा सन्मान केलाच पाहिजे असे नाही ना? हे सगळे केल्याने काय सिद्ध/ साध्य होईल?
हे केले काय आणि न केले काय त्याने माझ्या माता पित्यांवरील प्रेम, आदर कसा काय सिद्ध किंवा अधोरेखित होतो? ह्याची सक्ती का केली जावी ?
हे चोक्सीसाहेबांचं म्हणणं आहे
हे चोक्सीसाहेबांचं म्हणणं आहे -
And if someone doesn't stand up?
Then that person is an anti-national. If a person is healthy and of sound mind, but deliberately avoids standing up, it's clear he/she is disrespecting the National Anthem and the National Flag.
But as per the existing laws, one cannot be punished for not standing up or singing national anthem?
The Supreme Court's order is just an interim order. I expect there'll be a punishment clause in the final order. The fear of punishment will ensure that the directions are followed in letter and spirit.
**
सक्ती, भीती यांनी देशभक्ती रुजवता येत नसते.
व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला
व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला कसा काय हे कळलं नाही अजून. राष्ट्रगीत चालू असताना उभं राहतात ते त्याला मान द्यायला ना? मग त्याचा जाच का वाटावा? जी वयस्कर, फिजिकली चॅलेंज्ड मंडळी असतील ज्यांना चालता, उभं राहता येत नाही त्यांना ह्या सक्तीतून सूट मिळायलाच हवी ह्याबद्दल दुमत नाही.
ऑलिंपिक्समध्येही (चित्रपटगृहापेक्षा वेगळी जागा आहे हे माहिती आहे) जेव्हा एखाद्या देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं तेव्हा सगळ्यांनी उभं रहा हे आवाहन केलं जातं. तेव्हा दुसर्या देशाचे लोकं म्हणतात का की आमच्या देशाचं राष्ट्रगीत नाही तर आम्ही का उभं रहावं?
हे तेच सेम न्यायाधिश आहेत का?
हे तेच सेम न्यायाधिश आहेत का? डिव्होर्स ग्राउंड्सवाला निक्काल लावणारे?ते तर बाबा कायपण सक्तीचं करु शकतात. बायकांनी पिच्चरला जाण्याआधी सासूकडून/नवर्याकडून 'हिने घरातली सर्व कामं केली आहेत व माझी परवानगी घेतली आहे' अशी सही तिकिटासोबत दाखवावी असं पण म्हणू शकतील.
माझ्यापरीने आणि फक्त
माझ्यापरीने आणि फक्त माझ्यापुरती याची उत्तरं देते.
१. सिनेमागृहात जाचक वाटत नाही म्हणून मी लगेच सर्वत्र याचा आग्रह धरणार असा अर्थ होत नाही. सिनेमागृहात राष्ट्रगीत लागणं हे माझ्यासाठी नवीन नाही म्हणून मला ते सवयीचं झालं असेल कदाचित. मला पर्सनली ते तिथे अजूनतरी जाचक वाटत नाही हे खरं.
२. सक्ती वाटेल पेक्षाही जाचक/आक्षेपार्ह वाटेल असं तुला म्हणायचं असावं. एनीवे, याबद्दल मला खरंच माहिती नाही. कदाचित प्रत्येक सिग्नलला थांबवून आधी राष्ट्रगीत वाजवलं आणि मग सिग्नल लाल केला तर जाचक वाटेल. गमतीचा भाग सोडून देऊ पण नक्की कधी जाचक वाटेल असा विचार नाही केला. आणि आत्ता विचार सुरू केला तरी लगेच उत्तर सापडेल असं काही नाही. म्हणून उत्तर दिलं नव्हतं. पण तू इतकं जीव तोडून विचारतोयस म्हणून जे खरोखर वाटतंय ते आणि तसंच लिहीतेय.
कंपल्शन अजिबात आवडलं नाही. वर
कंपल्शन अजिबात आवडलं नाही. वर नताशा अगो म्हणतं आहेत तसं फिलिंग राष्ट्रगीत वाजताना नेहेमी येतं, कधी मधी मोठ्याने म्हणावसं वाटलं तर मी मोठ्याने म्हणतो. पण... आज विचार केला तर ते देशभक्ती किंवा इतर कशाहीमुळे वाटत नसून एक सवय, हळवेपणा इत्यादीचं फिलिंग आहे असं लक्षात आलं.
कुठे आरती चालू असेल की जसं टाळ्या वाजवून घालीन लोटांगण संपेपर्यंत पाय निघत नाही किंवा अथर्वशीर्ष पठण चालू असेल तर एखादं आवर्तन तरी करावं वाटतं त्यात देव किंवा भाव (माझ्या मनात) अजिबात नसतो पण एक सवय, लहान पणाची आठवण, आजीला आरती सुरु झाली की सगळ्यानी यावं असं वाटायचं, आज मी गेलो तर तिला छान वाटेल असा एक वेडा विचार अनेकदा त्या निमित्ताने होणारं स्मरणरंजन आवडतं. मशिदीची बांग ऐकू आली की पण जुने दिवस आठवून हळवं व्हायला होतं कारण इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाहेर मशीद होती आणि दिवसात ३ -४ वेळा ते ठराविक सूर कानावर पडत असतं. ते एकदम आठवतं. थोडक्यात राष्ट्रगीत हे देश/ देशभक्ती इ, नाही तर सवय क्लिशे शब्द वापरायचा तर संस्कार असल्याने आपसूक उभं राहावं वाटतं.
भाचा, मला राष्ट्रगीताचा सन्मान झाला पाहिजे वाटतं पण 'च' वगळून. कुणाला नसेल करायचा तर तो गुन्हा असता कामा नये. प्रतीकाबाबत आदर हे कर्तव्य आहे, पण तो दाखवला नाही तर दंडनीय अपराध आहे का? असेल तर ते ही आजच्या घडीला आवडत नाही.
अमेरिकेचं फ्रीडम ऑफ स्पीच खाली राष्ट्रध्वज जाळणे किंवा इतर कसाही वापरण्याची मुभा असणे रादर तो गुन्हा नसणे मला जास्त आवडतं. त्याच वेळी तो शाळेत रोज फडकावणे, प्लेज म्हणणे आणि त्याबाबत माहिती सांगणे इ. द्वारे मुलांना शिकवता येतं. पण गुन्हा इज बिग नो.
सक्ती, भीती यांनी देशभक्ती
सक्ती, भीती यांनी देशभक्ती रुजवता येत नसते. >> +१ म्हणून मास्तरांना अनुमोदन. बातमी वाचल्यावर नाटके किंवा सभा वगैरे का सोडल्या असा प्रश्न डोक्यात आला होता.
सायो, वर उत्तरं दिली आहेत.
सायो,
वर उत्तरं दिली आहेत. तरी पुन्हा लिहितो. खेळ आणि चित्रपट या वेगळ्या गोष्टी आहेत. चित्रपटगृहात मी माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करत नसतो.
आणि अमेरिका किंवा भारत या दोन्ही देशांची घटना किंवा कोर्ट राष्ट्रगीताच्या वेळी उभं राहण्याची सक्ती करत नाही. किंबहुना भारतात आजवर सक्ती नव्ह्ती, ती आता आहे. मजा म्हणजे कोर्टाने आजच्या आदेशात फक्त चित्रपटगृहात उभं राहण्याची सक्ती केली आहे. म्हणजे इतरत्र मी बसून राहिलो तर चालणार आहे का? २७ तारखेला ही बाब स्पष्ट व्हावी.
सक्ती, भीती यांनी देशभक्ती
सक्ती, भीती यांनी देशभक्ती रुजवता येत नसते >>> या मुद्द्यावर सहमत. शिक्षा देणं किंवा डायरेक्ट देशद्रोही ठरवणं योग्य नाही हे मान्य. पण व्यक्तिशः केवळ राष्ट्रगीत वाजवण्याला माझी हरकत नाही. आणि तेव्हा त्याचा आदर करणं यालाही.
चिनूक्स आपल्या पोस्ट फार कडक
चिनूक्स आपल्या पोस्ट फार कडक आहेत. आपली ती पहिली पॉईंटवाईज लिहिलेली पोस्ट व्हॉटसपवर शेअर करू शकतो का? आपल्या नावासह? किंवा आपल्या नाव न टाकता शेअर करायची असेल तर तसे सांगा, नाहीतर उद्या काही तथाकथित देशभक्त कोण हा चिनूक्स म्हणत मायबोलीवर आपल्याला शोधत भांडायला येतील
प्लीज जरा खालचा पॉईंट ईलॅबोरेट करून समजवाल का?
९. राष्ट्रवाद ही संकल्पना आपल्याकडे युरोपातून आली. भारतातल्या बहुविधतेला ही संकल्पना छेद देते. बाकी सगळ्या पाश्चात्त्य संकल्पनांना तुच्छ लेखणारे आपण, हीच संकल्पना कवटाळून का बसतो?
काय आहे राष्ट्रवाद आणि बहुविधता संकल्पना?
ऋन्मेष, कृपया ती पोस्ट इथेच
ऋन्मेष,
कृपया ती पोस्ट इथेच राहू द्या. भीती म्हणून नाही, आज संघाच्या प्रवक्त्याशी जाहीर पंगा घेतला आहे पण ती इथल्या चर्चेसाठी लिहिली आहे, त्यामुळे इथेच बरी.
राष्ट्रवादाबद्दल थोडक्यात लिहिणं शक्य नाही. पण याबद्दल रवीन्द्रनाथांनी आणि इतर अनेकांनी लिहिलं आहे. रवीन्द्रनाथांचे निबंध आणि कविता ऑनलाइन आहेत. डॉ. सुधाकर देशमुख यांचं पुस्तक उत्तम आहे. इतर काही पुस्तकांची नावं थोड्या वेळाने देतो.
Punishment clause is
Punishment clause is ridiculous. Why force everyone to stand up? I missed it earlier.
Frankly speaking, i often cant relate much with the "mera bharat mahan" feeling. I mean, i dont think that you must consider a country to be the best just because you are born in it. It is as childish as considering your caste or religion to be the best just because you are born in it. But that doesnt change the fact that i have a great liking for our national anthem and have got used to it being played before a m9vie and i like the feeling. So i assumed that everyone else must be liking it ( considering most other ppl to be more patriotic than i am, atleast in words).
मजा म्हणजे कोर्टाने आजच्या
मजा म्हणजे कोर्टाने आजच्या आदेशात फक्त चित्रपटगृहात उभं राहण्याची सक्ती केली आहे.>> त्या PIL वरचा निकाल आहे ना हा? PIL फक्त चित्रपटगृहाबाबत असू शकेल. कायदा केला असता तर सर्वांगीण विचार का नाही केला गेला यावर उहापोह होऊ शकला असता.
मलाहीही सक्ती , दरवाजे बंद
मलाहीही सक्ती , दरवाजे बंद करून घेणे इ. प्रकार झेपले नाहीत ! हे कम्पल्शन स्केरी वाटले. तसेही सिनेमागृहात ती करण्याचे प्रयोजन पण कळले नाही.
नताशा शेवटच्या वाक्यातलं
नताशा शेवटच्या वाक्यातलं मस्टवालं एक्स्ट्रापोलेशन पटलं नाही. सगळ्यांना आवडलं'च' पाहिजे ही सक्ती का?
आणि हे कोर्ट का सांगणार?
कोर्टाला ती PIL परत पाठवता आली असती, की सरकारला कायदा करायला सांगा म्हणून.
चिनूक्स ओके पण ते राष्ट्रवाद
चिनूक्स ओके
पण ते राष्ट्रवाद विरुद्ध बहुविधता की काय यात एका वाक्यात फरक तर सांगा.
सविस्तर लिंक पुरवल्यात तर ते उत्तमच
अमित, सध्या मी वाचनमात्रच
अमित, सध्या मी वाचनमात्रच राहू शकतो, तसंही चिनूक्स मला म्हणायचं असलेलं बरंच काही म्हणाला आहे. पण मला स्पेसिफिकली म्हणालास, आणि मुद्दा हरवेल, म्हणून म्हणतो. माझ्या माहितीप्रमाणे भारताच्या संविधानात राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे हे मूळ कर्तव्यांपैकी एक असून तो न करणे हे पनिशेबल आहे. म्हणून ते तसे लिहिले. ते बदलण्यासाठी संविधानदुरुस्ती व्हावी लागेल.
Amit, " mala ( ji faarshi
Amit, " mala ( ji faarshi patriotic nahi tila)aawadte tar itar sagalya na hi aawadat ch asaave ase majhe assumption hote." Aawadle pahije, ase mhanayche navhate.
ओह्ह ओक. विकीवर मोर, आंबा,
ओह्ह ओक. विकीवर मोर, आंबा, पिंपळ, गंगा, कमळ, शकसंवत ही सुद्धा झेंडा अशोकचक्र राष्ट्रगीताबरोबर आढळली. https://en.wikipedia.org/wiki/National_symbols_of_India
ती कदाचित सेकंडरी असू शकतील.
Section 3 of the Prevention
Section 3 of the Prevention of Insults to National Honour Act, 1971 - “whoever intentionally prevents the singing of the Indian National Anthem or causes disturbances to any assembly engaged in such singing shall be punished with imprisonment for a term, which may extend to three years, or with fine, or with both.”
उभं न राहणं हा गुन्हा आहे, असं कायद्यात म्हटलेलं नाही.
समीर,
नाही. याचिका चित्रपटगृहापुरती मर्यादित नव्हती. एकंदर राष्ट्रगीताचा अवमान होतो, असं याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. शाळा, मदरसे, कॉन्व्हेंट्स यांबद्दलही याचिकेत उल्लेख आहे.
समस्त इंटेलेक्च्युकलांची
समस्त इंटेलेक्च्युकलांची क्षमा मागून -
पंजाब सिंध गुजरात मराठा पासून विंध्य हिमाचल जमुना गंगा पर्यंत आपल्या देशात काय काय व्हरायटी आहे ते सांगणं म्हणजे बहुविधता (असावी बहुधा) आणि या बहुविधतेचा उल्लेख असलेलं राष्ट्रगीत चित्रपटागृहात म्हणण्याची सक्ती म्हणजे राष्ट्रवाद (असावा बहुधा!). म्हणजे बहुविधतेचं प्रमोशन सक्तीने करणं म्हणजे राष्ट्रवाद!
नक्कि इशु काय आहे? १.
नक्कि इशु काय आहे?
१. सिनेमाहाॅल मध्ये राष्ट्रगीताची सक्ती कि
२. राष्ट्रगीताला उभं राहण्याची सक्ती, जी मॅंडेटोरी नाहि (चुभुद्याघ्या)
हा #१ चा इशु परत वर आला कारण कोणितरी लोकशाहि मार्गाने पटिशन देऊन ते मंजुर करुन घेतलं. आता हा निर्णय काहिंना जाचक वाटत असेल तर लोकशाहि मार्गानेच तो फिरवला जावा याकरता प्रयत्न करायला काय हरकत आहे?..
Pages