चित्रपटगृहांत राष्ट्रगीत अनिवार्य - सुप्रीम कोर्टाचा आदेश

Submitted by भास्कराचार्य on 1 December, 2016 - 04:21

काल सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अंतर्गत निर्देशांनुसार (Interim Order) आता देशातील सर्व चित्रपटगृहांत चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवणे, व अर्थातच नागरिकांनी त्यासाठी उभे राहणे, अनिवार्य आहे. येत्या १० दिवसांत ह्या निर्देशांचे पालन होईल, अशी व्यवस्था करण्याचे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

http://timesofindia.indiatimes.com/india/National-anthem-to-play-before-...

ह्या निर्णयावर काहींनी असहमती दर्शवली आहे, तर काहींनी त्याचे जोरदार समर्थन केले आहे. मला स्वतःला 'राष्ट्रगीताचा सन्मान झालाच पाहिजे' हे वाटतेच. शाळा किंवा महाविद्यालयांतही अगदी ते रोज वाजवले गेले पाहिजे, असे वाटते. कारण ह्या संस्थांतून देशाचे नागरिक घडत असतात. परंतु चित्रपटगृहासारख्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवून त्याचा सन्मान झाला पाहिजे, हा नियम काही कळत नाही. देशाच्या प्रतीकांप्रती आदर दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे संवैधानिक कर्तव्य आहे, व त्याने ते पाळलेच पाहिजे. परंतु ही प्रतीके अशी जनसामान्यांना चित्रपटगृहात दाखवून काही फरक पडेल का, हे कळत नाही. अर्थात, चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावल्यावर मी उभा राहतोच, व राहीनही. पण हा नियम खरेच काही करेल, ह्याबद्दल शंका वाटते. महाराष्ट्रात हा नियम आधीपासूनच होता, पण आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलेला असल्याने तो देशभर झाला आहे, व तो सुप्रीम कोर्टाचा असल्याने त्यात बदल करणे अशक्यप्राय आहे. ह्याबद्दल मायबोलीकरांतही मतांतरे असतील, ती जाणून घेण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळा कॉलेजे ठीक आहे, पण चित्रपटगृहात काही गरज नाहीये.
जाओ पहले सारे सरकारी संस्थांओमें रोज बजाओ, फिर तुम जिस चित्रपटगृहमे बोलोगे, उसमें (हम)लोग खडे रहेंगे.

जनगन हे इंग्लंडच्या राजाच्या स्तुतीसाठी लिहिल्रे गेले अशी हाकाटी ठोकणारे भाजपावाले जनगन सिनेमागृहातही गावे या यू टर्नवर येउन पोहोचले.

देशाच्या प्रतीकांप्रती आदर दाखवणे हे प्रत्येक नागरिकाचे संवैधानिक कर्तव्य आहे, व त्याने ते पाळलेच पाहिजे. >>> हे पटते आहे पण चित्रपटगृहात राष्ट्र्गीत दाखवणे अजिबात पटत नाही!!! चित्रपटगृह हे मनोरंजन करण्याची जागा आहे आणि राष्ट्र्गीत मनोरंजनासाठी नाही.

माफकरा, पण प्रतिसादकर्त्यांना एक सुचना द्याविशी वाटते की धाग्यातील विषय ज्या निर्णयाबाबत आहे, "तो निर्णय सुप्रिम कोर्टाचा आहे, मोदींचा नाही " हे लक्षात घेऊन, एरवीची "मोदींविरुद्धच्या टीकेची निरर्गल "भाषा" सवयीने इथे वापरली जाऊ नये".
सूचना समाप्त.

सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाला माझ्या "समर्थन वगैरेची" काहीच गरज नाहीये. तो निर्णय पाळला गेला पाहिजे इतकेच नागरिक म्हणून माझे कर्तव्य आहे.
रहाता राहिला प्रश्न हा निर्णय "आवडला वा नावडला", तर मला हा निर्णय अतिशय आवडला आहे. Happy

चित्रपट गृहात मूळात वाजवलेच का जाते हा एक प्रश्न आहे आणि याची सुरुवात का कधी केव्हा झाली हे जाणून घ्यायला आवडेल. कोणाला काही आयडीया? गूगल करायचा सल्ला देउ नका ते साईड बाय साईड करतोच..

लिंबूदा, अहो ती इन्टेरीम ऑर्डर आहे, म्हणजे बदलू शकते.
आणि तसेही राष्ट्रगीत चालू झाले की उभे राहतीलच लोक, पण मला तरी हा निर्णय नाही आवडला.

अहो मध्यंतरी जनगण मन बँक्ग्राउंडला घेउन त्यावर वेगळी व्हिज्युअल्स फिल्म्स बनवून दाखवत असत.

एक मूक बधिर लोकांची, एक सियाचेनच्या सेनेची, एक कॉमन लोक दाखवले आहेत. ती. तसे न करता फक्त झेंडा दाखवावा असे सांगितले आहे. गीताची एक स्टँडर्ड टेप आहे तीच वाजवायची. त्यात नुसतीच वाद्ये, साइन लँग्वेज असे आणू नये.

रुणम्या अरे माझ्या लहान पणा पासून हा रूल आहे. का ते माहीत नाही. पूर्वी न्यूजरील पण दाखवत.

उभे राहिले की मागे सीट फोल्ड होते. ते सर्वांनी लक्षात ठेवावे. हातातील पर्स किंवा पॉपकॉर्न नंतर बसताना पडायची शक्यता आहे. बसताना सीट नीट उघडून बसावे. २०० रु. पॉप कॉर्न ह्या जमान्यात.

उभे राहिले की मागे सीट फोल्ड होते. ते सर्वांनी लक्षात ठेवावे. हातातील पर्स किंवा पॉपकॉर्न नंतर बसताना पडायची शक्यता आहे. बसताना सीट नीट उघडून बसावे. २०० रु. पॉप कॉर्न ह्या जमान्यात. >> अमा Happy तुमचा फारच युनिक पर्स्पेक्टिव्ह असतो बघा.

उभे राहिले की मागे सीट फोल्ड होते. ते सर्वांनी लक्षात ठेवावे. हातातील पर्स किंवा पॉपकॉर्न नंतर बसताना पडायची शक्यता आहे. बसताना सीट नीट उघडून बसावे. २०० रु. पॉप कॉर्न ह्या जमान्यात.>>>>>>>>>>>> अमा Lol
खरंय.

बाकी र जनगण मन हे कंपल्शन का असावं?

उभे राहिले की मागे सीट फोल्ड होते. ते सर्वांनी लक्षात ठेवावे. हातातील पर्स किंवा पॉपकॉर्न नंतर बसताना पडायची शक्यता आहे. बसताना सीट नीट उघडून बसावे. २०० रु. पॉप कॉर्न ह्या जमान्यात.>>

हे भारी आहे!

अमा >> Proud
नशीब माझी गर्लफ्रेंड माबोवर नाही, अन्यथा म्हणाली असती बघ बघ, लोकं पिक्चर सुरू व्हायच्या आधीच पॉपकॉर्न घेऊन बसतात आणि तू ईंटरवलची वाट बघतोस.. उगाच डबल खर्चा व्हायचा

भास्कराचार्य चेकतो लिंक , धन्यवाद. .. आणि शाहरूख नकोच धाग्यावर, मलाच बोर होते, जिथे चर्चा पुढे जात नसेल तिथेच मी त्याला आणतो. तो ब्राण्ड आहे, त्याला योग्य प्रकारे वापरावा Happy

उभे राहिले की मागे सीट फोल्ड होते. ते सर्वांनी लक्षात ठेवावे. हातातील पर्स किंवा पॉपकॉर्न नंतर बसताना पडायची शक्यता आहे. बसताना सीट नीट उघडून बसावे. २०० रु. पॉप कॉर्न ह्या जमान्यात.>>>> मस्त आहे हे. आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग Happy

>>> रुणम्या अरे माझ्या लहान पणा पासून हा रूल आहे. <<<<
मामे, आपल्या लहानपणी आपल्याला शिकवणच अशी होती घरादारातुन शालेतुन की तेव्हा उभे रहायला लागणे म्हणजे आमच्या "व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा" वगैरे आली असे वाटायचे३ नाही व सिनेमा सारख्या "पब्लिक अ‍ॅड्रेसिंग" जागी जनगणमन कशाला असे प्रश्नही आपल्याला पडायचे नाहीत.
आपण "कलियुगाला " रिप्रेझेण्ट करत नव्हतो ना... Wink

जिथे चर्चा पुढे जात नसेल तिथेच मी त्याला आणतो. >> हे 'ट्रेड सिक्रेट' मी लक्षात ठेवीन. Lol

लिंबु, तुम्हाला प्रश्न पडत नव्हते ह्यात अभिमानाने सांगण्यासारखे काय आहे?! प्रश्न पडावेत. तुमच्या-आमच्या लाडक्या भारतीय ज्ञानाची परंपराच ती आहे. आमच्या ऋ ला कसे छान प्रश्न पडत असतात नेहमी. Happy

स्त आहे हे. आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग
>> हो मी बॉक्स मध्ये जायचे प्रयत्न सोडून दिले आहेत. ( तिथे मांजर असते ना. )

आपण "कलियुगाला " रिप्रेझेण्ट करत नव्हतो ना... >> हो बरोबर. मी तर द्वापार युगा पासून उभी राहत आली आहे. पुढे करमणूक आहे तर त्या आधी देशाला नमन केले तर त्यात काय चुकीचे? मी तर जन गण मन म्हणते सुद्धा. आणि ते मूक बधीर मुलांचे फिल्म वाले यायचे तेव्हा रडायचे सुद्धा. भारत माझा देश आणि ते माझे राष्ट्रगीत. वन टू वन रिलेशन शिप आहे. व्यक्तिस्वातंत्र्य मला वेगळे दाखवावे लागत नाही.
पण हा सर्वस्वी माझा विचार आहे. पीपुल ह्याव अ रैट्टू तिंक डिफ्फरंटली. ( तेलुगु इंग्रजी)

मी तर द्वापार युगा पासून उभी राहत आली आहे. >>> हे मी एक स्त्री अगदी द्वापारयुगापासून हे सहन करत आलीय च्या चालीवर वाचले गेले Happy

लिंबूजी, अहो राष्ट्रगीत कुठेही वाजवणे हे देखील राष्ट्रगीताचा अपमानच असते. त्यामुळे ते कुठे आणि कसे वाजवावे वा का वाजवले जाते हे प्रश्न पडायलाच हवेत. नव्हे त्यांची उत्तरेही शोधायलाच हवीत.

आम्ही थेटरात पोचेपर्यंत तसाही सिनेमा सुरू झालेला असतो.
त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडत नाही.

पण असा जुलमाचा रामराम घालावा लागणं बरोबर वाटत नाही.
हे असलं सुचविताना कोर्टाने कुठले रॅशनल वापरलेय ते ही कळत नाही

देशभक्ती केवळ सिनेमागृहांतच दाखवावी असा अट्टहास का?
तो काही राष्ट्रीत प्रकल्प नाही.

शाळेत असेपर्यंत राष्ट्रगीत नेहमी वाजायचे, कॉलेजात आल्यावर दररोज राष्ट्रगीताला उभे रहावे लागले नाहि.
म्हणजे जिथे शिकतो/संस्कार होतात तिथे दररोज राष्ट्रगीत वाजत नसताना जिथे करमणुकीकरता जायचंय तिथे राष्ट्रगीताचे रॅशनल काय?

उद्या प्रत्येक ऑफिस्/कंपनीची शिफ्ट असे सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवा म्हणाले तर?

>>उद्या प्रत्येक ऑफिस्/कंपनीची शिफ्ट असे सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवा म्हणाले तर?
अगदी अगदी, म्हणुन तर पहिल्याच प्रतिसादात मी लिहिले आहे की सर्व सरकारी हापिसात का नाही वाजवित आणि सर्व कर्मचार्‍यांनी त्या वेळेस हजर राहिले पाहिजे असा दंडक का नाही ?

भास्कराचार्य, शाळा-कॉलेजातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रगीताशी (आणि पर्यायाने ते ज्या कारणासाठी / परिणामासाठी अस्तित्त्वात असते त्याच्याशी) सर्वसामान्यांचा संबंध १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी व्यतिरिक्त फारसा कुठे येत नाही. चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवण्याने ही कमतरता थोड्याफार प्रमाणात भरून निघत असावी म्हणून हा निर्णय घेतला असावा. 'चित्रपटगृहांतच का?' याला माझ्याकडेतरी यावर 'पण चित्रपटगृहांत का नको?' या प्रतिप्रश्नापलीकडे काही उत्तर नाही.

पण हा नियम खरेच काही करेल, ह्याबद्दल शंका वाटते <<< म्हणजे काय ते कळले नाही. एरवी राष्ट्रगीताला हजर राहिल्याने जे साध्य होते ते होईलच ना.

>>>> उद्या प्रत्येक ऑफिस्/कंपनीची शिफ्ट असे सुरू करण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवा म्हणाले तर? <<<<<
कम्युनिझमची लालेलाल पहाट उगवली आहे असे समजुन खुष व्हावे की.... हा.का.ना.का. Proud

शाळेत असेपर्यंत राष्ट्रगीत नेहमी वाजायचे, कॉलेजात आल्यावर दररोज राष्ट्रगीताला उभे रहावे लागले नाहि.
>>>
मगाशी जेवायला जायच्या आधी मी हेच लिहिणार होतो, जेवायच्या घाईत राहिलेले.
शाळेत वाजते तर कॉलेजमध्ये का नाही हाच प्रश्न पडलेला. कॉलेजच्या मुलांना ते बंधन वाटेल. ते झुगारून लावू शकतात ही भिती असावी का या मागे?

भास्कराचार्य, लिंक वाचली, पण थिएटरच का याचे समाधानकारक उत्तर नाही मिळाले. लोकं एकत्र जमतात, आपली सीट सोडून कोणी पळणार नाही, शिस्तीत उभे राहणारच तर मग त्यांच्याकडून राष्ट्रगीताचा सन्मान करवून घ्या या पठडीतले ते उत्तर वाटले. मला काहीतरी राष्ट्रगीत आणि सिनेमा यांच्यातील कनेक्शन अपेक्षित होते. जे अर्थात तसे काही नाहीये हे समजले.

बाकी मी स्वत: थिएटरात राष्ट्रगीत झाल्यावर आवर्जून भारतमाता की जय ओरडतोच आणि ते फार उत्स्फुर्तपणे येते. जसे गणपतीचा आरती झाल्यावर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि ऊंदीरमामाकी जय जितक्या सहजपणे येते तितक्याच.

>>> अगदी अगदी, म्हणुन तर पहिल्याच प्रतिसादात मी लिहिले आहे की सर्व सरकारी हापिसात का नाही वाजवित आणि सर्व कर्मचार्‍यांनी त्या वेळेस हजर राहिले पाहिजे असा दंडक का नाही ? <<<<
हा धागा "संबंधित सरकारी यंत्रणा" वाचित असतीलच, अन तुमच्या या मताची दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील अशी आशा बाळगायला कुणाची हरकत नसावी.... Wink

शाहरूखचा संबंध म्हणजे कभी खुशी कभी गम ना. त्यात त्या राष्ट्रगीतासोबत वंदेमातरम गाण्यावर हृतिकचा सुंदर नाचही होता. दोन्ही सीन माझ्या फार आवडीचे. पिक्चर म्हणून पाहता ते छान वाटलेले. मात्र तेव्हाही माझ्या मनात हा प्रश्न आलेलाच की राष्ट्रगीत असे चुकलेले चित्रित करणे नियमात बसते का. आज त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

आता अश्या दृष्यांवर आक्षेप घेणे चूक की बरोबर हा देखील एक चर्चेचा विषय होईल. पण त्यात ते राष्ट्रगीत चालू असताना जेव्हा ते फॉरेनर उभे राहतात, काजोलशी भांडणारी बाई देखील उभी राहते, तसेच ती व्हील चेअरवर बसलेली मुलगी आपला हात उंचावते तेव्हा मनात ज्या भावना दाटतात त्या राष्ट्रप्रेमाच्याच असतात.

या निकालाने फक्त राष्ट्रगीत वाजत असताना काय केलेलं चालतं आणि काय केलेलं चालत नाही ही संदिग्धता दूर झाली. राष्ट्रगीत वाजायला लागलं की उभं राहणं बंधनकारक आहे ते नक्की झालं. एवढा एकच फायदा.
आता उभं राहिल्यानेच राष्ट्रगीताचा व पर्यायाने देशाचा मान राखला का, बसून तो मनातल्या मनात राखता येत नसे का? हे प्रश्न अलाहिदा.
तसंच चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवायचं , तर ते ऑफिसांत का नको? नाट्यगृहांत का नको? असे पुढले प्रश्न.

की थेटरात चित्रपट पाहायला जाणारे लोक तेवढे, राष्ट्राप्रती पुरेसा आदर दाखवणारे नसतात; असं काही एखाद्या सर्व्हेतून समोर आलंय?

लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषदा स्थानिक स्वराज्य संस्था यांपैकी किती ठिकाणी राष्ट्रगीत वाजते दररोज कामकाज सुरू होण्यापूर्वी?
किंवा कोर्टाततरी?

Pages