क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

४१७ मध्ये आटोपला डाव!

आता इन्ग्रजांवर १३४ धावांचे ओझे!

बिनबाद -१३४ अश्या धावफलकासह दुसर्‍या डावाची सुरवात!

भा, पोस्ट लंच सेशन नि लंचच्या आधी थोडे. इथे आकाश चोप्रा नि माझे मत एकदम जुळते बघ Wink
http://www.espncricinfo.com/india-v-england-2016-17/content/story/106925...
हे मला तरी एकदम विचित्र वाटले "कुक असा डिफेंसिव्ह का झाला एकदम" असे.

उद्या आटोपायला हरकत नाही. टी च्या आधी की तिसर्‍या सेशनला सामना नेताहेत हे बघणे रोचक. जर लंच नंतर तासाभरात गुंडाळले तर उरलेल्या तासाभरात जे काही पाचपन्नास टारगेट असेल ते चेस होईल. पण सामना लांबावा अशी ईच्छा आहे, कारण मला उद्या तिसरे सेशन लाईव्ह बघायचे नशीबात आहे. त्यामुळे अंग्रेज तिथपर्यंत खेळून आपल्याला १२५ चे टारगेट द्यावे अशी ईच्छा आहे.. तेवढेच जिंकताना लाईव्ह बघता येईल.. एक आठवण म्हणून..

अश्विन, जडेजा, जयंत यादव आणी (थोडासा उमेश यादव सुद्धा) मस्त खेळले. ईंग्लंड ची बॅटींग अनपेक्षितपणे कोसळली. वर ईंग्लंड च्या डिफेन्सीव्ह माईंडसेट चा उल्लेख आलाय. तो मला मागच्या मॅच पासून जाणवतोय. विशाखापट्टणम ची मॅच जिंकणं जरी त्यांना अवघड होतं, तरी त्या पीच वर दीड दिवस खेळून काढण्याचे डावपेच फारच महत्वाकांक्षी होते. शेवटी ते ना मॅच वाचवण्यासाठी खेळू शकले, ना जिंकण्यासाठी.

"देशासाठी थोडा त्याग कर" - ह्या वाक्याची मी 'आज काय आहे हे लक्षात आहे ना?" ह्या वाक्यापेक्षा जास्त धास्ती घेतली आहे. Wink

जिंकली एकदाची अजुन मॅच!

पावणेचार दिवसात संपविली! पार्थिव पटेलने गोलंदाजाना कुरुवाळत बसण्यापेक्षा फटकेबाजी करुन संपविली!

Patel seemed like a good problem to have for next test Wink

भाऊ तुम्हाला हे फार interesting वाटेल
17-1 India's win-loss record in Tests at home when they have lost the toss since the start of 2006 - by far the best for any team during this period. The next-best in this list are Australia who have a 16-5 record in 26 Tests at home when they have lost the toss. During the same period, India's record when they win the toss at home is 14-4.

शमीने वोकसला टाकलेला स्पेल जबरदस्त होता. दोन्ही बाऊन्सर खतरनाक होते, मजा आली. वोकस ला टाकल्यामूळे अधिक मजा आली.

विजय मागचे काहि डाव शॉर्ट बॉल वर (mind you not bouncer) वर बाद झालाय. पुढच्या मॅचमधे नि Aus series मधे त्याला फार कमी फूल पिच्ड बॉलिंग मिळेल असे वाटतेय. He better watch out.

फे.फे. तू गेल्या आठवड्यामधे spinners in tandem बद्दल विचारत होतास. कालची अश्विनचे मुलाखत ऐकलीस तर त्यात त्याने जाडेजा दुसर्‍या बा़जूने असल्याचा त्याला काय फायदा होतोय ते सांगितलय. पूर्ण मुलाखत ऐक.

spinners in tandem चा मुद्दा घेत जडेजाची पाठराखण मी केलेली मागच्या पोस्ट्समध्ये.
कालची आश्विनची मुलाखत तर नाही पाहिली, पण आश्विनच्या कालच्या विकेट्स नंतर स्पेशली मोईन अलीला घेतल्यानंतर मला तेच आठवलेले आणि ईथे येऊन पोस्ट टाकायचा मोह झालेला..

पण तसेही मी जडेजाचे बरेच बोलके आकडे मागच्या काही पोस्टमध्ये दिले आहेत..
आणि आता तर काय आज म्यान ऑफ द म्याचच मिळाली ..

म्यान ऑफ द म्याचच मिळाली >> थांब रे एव्हढी घाई नको. spinners in tandem हे फक्त जडेजाला लागू आहे असे नाही. मला वाटते जयंत यादव नि अश्व्नि हे पण मस्त कॉम्बो होउ शकेल.

जडेजा ह्या मॅच मधे छान खेळला. बरेच बॉलर्स in tandem छान बॉलिंग करतात. त्यात २ फस्ट बॉलर्स, २ स्पिनर्स, किंवा १ फास्ट बॉलर आणी १ स्पिनर अशा अनेक जोड्या आहेत. अश्विन सध्या परपल पॅच मधे आहे. त्याला दुसर्या बाजूने प्रेशर मेंटेन करणारा साथीदार हवा आहे.

याला दुसर्या बाजूने प्रेशर मेंटेन करणारा साथीदार हवा आहे. >> हो अश्विनने तेच म्हटलय कि दुसर्‍या बाजूने जाडेजा -
१. धावा न देता अचूक टप्पा ठेवून प्रेशर मेंटेन करतोय. मोहालीमधे त्याने सतत एकाच एरियामधे बॉलिंग करून बॅत्समनना फारसा वाव दिला नाही. कोहलीने सुद्धा हा मुद्दा अधोरेखित केला होता.
२. ओव्हर्स फटाफट संपवतोय त्यामूळे बॅट्समनला एकाग्रतेवर अधिक लक्ष द्यावे लागतेय नि असे दीर्घ काळ करणे हे कसोटीचे काम आहे. जडेजाची ओव्हर ४ मिनीटांमधे वगैरे संपतेय तर अश्विन सात मिनिटे घेतोय.

हा मुद्दा बेअरस्ट्रोने मांडलाय about breathing space when Jadejaa and Ashwin operate in tandem.

ह्या सिरीजपुरते म्हणायचे तर अजून तरी मिश्रा वगळता प्रत्येक बॉलरने चांगली बॉलिंग केली आहे. गेल्या मॅचमधे उमेश नि शमीने पण टँडम operate करताना कुठेही प्रेशर रीलीज केले नाही.

"Patel seemed like a good problem to have for next test " - सहमत.

दोन गोष्टी मला गेल्या तीन मॅचेस मधे जाणवल्या आहेतः मुरली विजय ची शॉर्ट बॉल खेळताना उडणारी तारांबळ आणी रहाणे चा स्पिन बॉलिंग खेळताना बॉल पिच वरून रीड करण्याचा (बॉलर च्या हातातून नाही) प्रयत्न. ह्या दोन्ही टेक्निकल बाजू आहेत आणी त्या लवकर सुधारायला हव्या, कारण हे दोघही महत्वाचे खेळाडू आहेत.

जडेजाची ओव्हर ४ मिनीटांमधे वगैरे संपतेय तर अश्विन सात मिनिटे घेतोय.
>>>
मिनिटांचा हिशोब काहीतरी चुकलाय. सात मिनिटे म्हणजे शोएब अख्तर झाला.
चार मिनिटांत नॉर्मल स्पिनरही संपवतात, जडेजा सुपरफास्ट आहे, तीन मिनिटात काढतो तो सहज..

"Patel seemed like a good problem to have for next test " - सहमत.
>>>
पटेलने कीपींग गचाळ केली. बरेच कॅचेस सोडल्या आणि बॉल रापले.. एक लो कॅच सुद्धा मस्त पकडली ती गोष्ट वेगळी.. पण ओवरऑल कीपींग जे पहिला हवे त्यात तो तितका सरस नाहीयेच..

ऋ ते आकडे बेअरस्ट्रोने दिले आहेत.

रहाणे चा स्पिन बॉलिंग खेळताना बॉल पिच वरून रीड करण्याचा (बॉलर च्या हातातून नाही) प्रयत्न. >> +१ काहितरी गोच आहे. तो एरवी जसा रिलॅक्स असतो तसा न वाटता फोर्स करतोय कदाचित धाव होत नसल्यामूळे असे वाटतेय.

Ravi Jadeja's Test economy rate of 2.24 is the lowest of the 191 bowlers who have taken 50 wickets in the last 30 years Happy

<< Tendulkar suggests Ranji games can be played on two different pitches >> सचिन हें कां सुचवतोय हें महत्वाचं = १] कोणत्याही संघाला 'टॉस'चा, खेळपट्टीचा अवाजवी लाभ [ १०%हून अधिक] मिळाला तर सामन्याचा, दौर्‍याचा निकाल न्याय्य ठरत नाही व २] आपल्या तेज गोलंदाजाना 'स्पीनींग ट्रॅक'वर व फिरकी गोलंदाजाना 'ग्रीन-टॉप' पीचवर कसब दाखवण्याची संधी देशातच मि़ळावी.
सचिनला आत्तांच हें सुचवावसं कां वाटावं, हें प्रत्येकाने विचारपूर्वक ठरवावं. माझ्या मतें ' He also suggested that bilateral Test series could be made more engaging by having back-to-back home-and-away rubbers so that the strength of two teams remains mostly constant but the varying conditions pose a bigger challenge. ' , यांत त्याचं उत्तर असावं.

भाऊ सचिनच्याच मुलाखतीमधे ही वाक्ये मह्त्वाची आहेत

"We have been too focused on playing pace in overseas conditions but we should not forget how to play spin bowling. A captain would start thinking that winning the toss will give him only 10 percent advantage that is his right to choose first," he said. "But if he chooses to bowl on greentop he should remember that he would need to bat on a turner in the fourth innings"

<< मी असामी आणि भाऊंना खाद्य देतोय याची मला कल्पना आलेली >> ऋन्मेषजी, आपल्या कल्पकतेबदल शंका घेण्याची माबोवर कोणाची प्राज्ञा आहे ! Wink

काल पहिल्यांदा बायकांचे क्रिकेट पुर्ण सामना पाहिला. भारत-पाक आशिया कप २०-२० फायनल. भारताने सहाच्या सहा आशिया कप जिंकलेत हे विशेष. मिताली राजने फलंदाजीत जवळपास एकहाती स्कोअर टाकला. ईतरांच्या तुलनेत तिची धावा बनवायची सहजता कमालीची होती.

दे टाळी ऋन्म्या ... मीसुद्धा पाहिला. मस्तच झाली मॅच.

एक लक्षात आलेली गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूंची लाईन आणि लेंग्थ अ‍ॅक्युरसी अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. एकदा तर मिताली राजला बोलिंग करताना त्यांच्या स्पिनरच्या हातातून बॉल एकदम बीमरसारखा अधांतरीच तिच्या हेल्मेटकडे भिरकावला गेला. तिने तो वरचेवर फुलटॉस घेऊन हूक करून फोर मारली.

ऋन्मेष, तुझ्या लिंकच्या निमित्ताने भाऊ बर्याच दिवसांनी ह्या धाग्यावर आले, ह्याबद्दल तुला धन्यवाद.

सचिन ने सुचवलेला उपाय कितपत आचरणात आणण्यासारखा आहे, हे माहीत नाही, पण त्याचा उद्देश मस्त आहे.

Pages

Back to top