Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणखी एक गंमत बघा, कसोटी
आणखी एक गंमत बघा,
कसोटी गोलंदाजी
आश्विन - सरासरी - २४.९९, ईकोनॉमी - २.९५
जडेजा - सरासरी २४.२३, ईकोनॉमी २.२९
शेवटच्या डावात ४००चें लक्ष्य,
शेवटच्या डावात ४००चें लक्ष्य, 'अनइव्हन बाऊन्स' व फॉर्मात असलेल्या स्पिनर्सशीं मुकाबला, दीड दिवस बाकी........ इंग्लंडने हा सामना जिंकला [ वांचवणं त्याहूनही कठीण वाटतंय] तर इतिहासच घडेल !
इंग्लंड ६१-०; फलंदाजांच्या
इंग्लंड ६१-०; फलंदाजांच्या एकाग्रतेची व तंत्रशुद्धतेची कठीण परिक्षा घेणार्या पिचवर कुक व हमीद यांची कौतुकास्पद चिवट झुंज !
गेला एकदाचा हमीद!! तरी देखील
गेला एकदाचा हमीद!!
तरी देखील गोलंदाजी फारशी भेदक नव्हती वाटत ज्या पद्धतीने दोघे खेळत होते..
शामी ने कूक ला मस्त सेट-अप
शामी ने कूक ला मस्त सेट-अप करून आऊट केला. >> बर्याच दिवसांनी इथे आलो. फेरफटका - तुम्ही तो सेट अप चा उल्लेख केला आहे तो जबरी. आत्ताच बुवांनी शेअर केलेली क्लिप पाहिली. खतरनाक आहे.
तो स्टंप तोडण्याइतकाच तो सेटअप इंटरेस्टिंग असेल. पण तिन्ही बॉल्स दाखवणारी क्लिप शोधली पाहिजे. गावसकर कॉमेण्टरीत म्हणतो की पहिले दोन बॉल बाहेर काढले त्याने, व तिसरा 'निप बॅक' झाला. मला आधी वाटले स्विंग केला आहे पण क्लिप मधे बघून तो टप्पा पडल्यावर सीम मुळे आत आला आहे - ओल्मोस्ट इनकटर सारखा. मनोज प्रभाकर टाके तसा. भयानक अवघड असेल असा बॉल अचूक टाकणे.
वरकरणी बघताना असे वाटेल की कुक ने बॅट अशी रॅण्डम हँग कशी केली आहे. पण त्याचे कारण ते पहिले दोन बाहेर गेलेले बॉल्स आहेत. टोटल पोपट.
पण यातून तो बॉल त्या सीम पोझिशनला असा आत येण्याबद्दल माझे आधी झालेले कन्फ्युजन लिहीतो. नवा कोरा बॉल असताना तो स्विंग होण्याबद्दल मला अजूनही पूर्ण क्लॅरिटी नाही. इथल्या माहीतगारांकडून काही क्लू मिळतो का बघू.
पहिल्यांदा क्लिप पाहताना मला
पहिल्यांदा क्लिप पाहताना मला वाटले की हा बॉल स्विंग झाला. पण त्या सीम पोझिशन वर बॉल तसा स्विंग होणे कसे शक्य आहे असा प्रश्न पड्ला.
https://www.youtube.com/watch?v=cNQS3ShjMfA&t=8m38s
कारण राइट आर्म बोलर जेव्हा आउटस्विंग करतो (डावखुर्या बॅटसमन ला इन्स्विंग) - जी त्याची नॅचरल डिलिव्हरी असते सुरूवातीला - तेव्हा सीम पोझिशन उजव्या बॅट्समन च्य स्लिप्स कडे असते. इथे पाहिलेत तर ती सरळ ज्या दिशेने बॉल टाकला आहे त्याच दिशेने आहे (म्हणजे सरळ रेघेच्या थोडी कोनात). पण बॉल मात्र आत आला आहे. आजकाल एचडी मुळे हे सगळे क्लिअरली अॅनेलाइज करता येते.
थोडे संदर्भाकरता - बॉल काही (८-१०) ओव्हर्स जुना होतो तेव्हा एक बाजू रफ असल्याने स्विंग होतो. पण अगदी सुरूवातीला दोन्ही बाजू सारख्याच चकचकीत असतात, त्यामुळे प्रामुख्याने सीम पोझिशन वर स्विंग होतो. राइट आर्म बोलर चा नॅचरल स्विंग अशा वेळेस आउटस्विंग असतो (उजव्या बॅट्समनच्या रेफरन्स ने) - जो इथे एक्जॅक्टली तसाच आहे. पण त्याकरता सीम पोझिशन अशी नसते. त्यामुळे असा बॉल डावखुर्या बॅट्समन ला आत येणे हे कट होउनच शक्य आहे.
४ गेले .. आता रुट गेला की झाड
४ गेले .. आता रुट गेला की झाड कोसळेल
गंभीर ला डच्चू. हा त्याच्या
गंभीर ला डच्चू. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा शेवट असू शकतो. भुवनेश आला ते छान झालं.
यंदाच्या रणजी मधे रिषभ पंत कन्सिस्टंटली चांगल्या ईनिंग्ज खेळतोय.
गंभीर ला जरा मिळायला हवी होती
गंभीर ला जरा मिळायला हवी होती सलग पाच टेस्ट संधी. तो आउट ऑफ फॉर्म दिसतोय पण.
राहुल सुद्धा टेस्ट मधे फार इम्प्रेसिव्ह वाटला नाही. जास्तच इम्प्रोवाइज करायला जातोय जरा उगाचच. विजय आणि गंभीर अशी जोडी सर्व टेस्ट मधे खेळवून बघायला हवी होती.
सलग पाच टेस्ट संधी नंतर "तो
सलग पाच टेस्ट संधी नंतर "तो आउट ऑफ फॉर्म दिसतोय पण." हे लिहिलेस ? गंभीर रणजीमधे पण फारसा खेळला नाही दुसर्या टेस्टच्या दरम्यान.
एकंदर यादव लंबे रेस का घोडा वाटला. बघूया काय होते ते.
हो पण असे लोक कॉन्फिडन्स दिला
हो पण असे लोक कॉन्फिडन्स दिला की येतात ना फॉर्म मधे. सेहवाग ला कुंबळे ने अचानक आउट ऑफ द ब्लू नव्हता का आणला २००७ च्या सिरीज मधे ऑस्ट्रेलियात. गांगुलीचे जे लॉजिक होते की एकदा संधी म्हणजे सलग काही मॅचेस द्यायचे, ते बरोबर होते.
अरे पण राहुल आधीपासून पहिली
अरे पण राहुल आधीपासून पहिली चॉईस आहे असे कोहली नि कुंबळेने सांगितले आहे. तो नि धवन injured होता म्हणून गंभीर आत येऊ शकला. राहूलने फीट होताच रणजीमधे जाऊन शतक ठोकले. आता त्याला न घेता गंभीरलाच ठेवले असते तर त्याच्या कॉन्फिडन्स चे काय असा प्रश्न येतो. तो विचित्र बाद झाला हेही खरय. अशाच लंकेमधे उडाला पहिल्या सामन्यामधे नि मग पुढच्या दोन मधे दणकून खेळला. मग वेस्ट इंडीजमधे जाऊन खेळला. तेंव्हा त्यालाही दीर्घ संधी देणे जरूरी ठरतेय. पुढच्या ड्रुष्टीने विचार केलेली मूव्ह वाटतेय.
मग बरोबर आहे. राहुलची रिसेण्ट
मग बरोबर आहे. राहुलची रिसेण्ट हिस्टरी माहीत नव्हती. मी त्याला जितका बघितला आहे त्यात तो मला कसोटीला सुटेबल वाटला नाही. म्हणजे अगदी गया गुजरा आहे असे नाही, पण अनावश्यक इम्प्रोवाइज करायला जातो असे वाटले.
<< एकदा संधी म्हणजे सलग काही
<< एकदा संधी म्हणजे सलग काही मॅचेस द्यायचे, ते बरोबर होते.>> मलाही असंच वाटतं. निवडसमिती एखाद्या जुन्या,अनुभवी खेळाडूला पाचारण करते, तेंव्हां त्याच्या कुवतीवर खास विश्वास आहे म्हणूनच. मग तो विश्वास सार्थ ठरवायला त्याला किमान दोन-तीन सामने खेळवणं हें अपरिहार्य ठरतं. << गंभीरला आणखी एक संधी न देणं त्याचा अनुभव पहातां व तो पुनरागमन करतो आहे हें लक्षांत घेतां त्याच्यासाठी अन्यायकारक व निवडसमितीसाठी दूरदृष्टीचा अभाव ठरेल. प्रत्येक सामन्याच्या कामगिरीवरून खेळाडूना पुढच्या सामन्यात खेळवायचं कीं नाहीं , हें ठरवणं मला तरी घातक वाटतं. >> यावर मीं अजूनही ठाम आहे.
All is good भाऊ. फक्त
All is good भाऊ. फक्त राहुलला तो इंजर्ड झाला म्हणून गेलेली जागा परत न देणे हे कसं जस्टीफाय केले गेले असते हा मूळ प्रश्न आहेच. गंभीर हि निव्वळ स्टॉप गॅप अॅरेंजमेंट होती (जशी पार्थीव पटेल तिसर्या सामन्यासाठी आहे) धवन पण त्याच वेळी फीट नसल्यामूळे गंभीर आत आला नाहितरी सध्या तरी तिसरा ओपनर म्हणून धवनला ईयर मार्क केलेले आहे. त्यामूळे गंभीरर्च्या केसमधे हे मुद्दे लागू होत नाहीत. परत गंभीर दोन सामने खेळला नि एक इनिंग वगळता फारसा प्रभावी ठरला नाही त्यामूळे त्याला अजून एक टेस्ट देण्यामागजूअडथळा येणे साहजिकच होते.
आता गंभीर ह्या दोघांपेक्षा चांगला ओपनर आहे कि नाही हा मुद्दा अलहिदा. माझ्यामते आहे पण निवडसमिती नि कप्तान ह्यांना तसे वाटत नाही हे उघड आहे.
पार्थिव पटेल ऐवजी पंट ला संधी द्यायला हवी होती त्याला स्वतःला सुधारण्यासाठी उपयोग झाला असता.
<< गंभीर हि निव्वळ स्टॉप गॅप
<< गंभीर हि निव्वळ स्टॉप गॅप अॅरेंजमेंट होती >> असामीजी, ह्यासाठी एखादा उदयोन्मुख खेळाडू निवडूनत्याला 'एक्सपोझर' देण्याचा मानस असता, तर त्याला असं बसवणं सर्वार्थाने समजण्यासारखं आहे; पण एखाद्या अनुभवी, जुन्या खेळाडूला पुनरागमन करायला लावून मग असं बसवणं मला खटकलं. राहुल दुखापतीतून बरा होवून संघात येण्यासाठी कांहीं काळ थांबू शकतो पण गंभीरला दिलेल्या अर्धवट संधीमुळे त्याची कारकिर्दच संपुष्टात येते ! असो, 'अॅग्री टू डिसअॅग्री' आहेच !
राहुल दुखापतीतून बरा होवून
राहुल दुखापतीतून बरा होवून संघात येण्यासाठी कांहीं काळ थांबू शकतो पण गंभीरला दिलेल्या अर्धवट संधीमुळे त्याची कारकिर्दच संपुष्टात येते .>> ह्यात दोन मुद्दे आहेत भाऊ असे मला वाटते. पहिला मुद्दा राहुलच्या दुखापतीचा. तर तो त्यातून बरा होऊन सध्याच्या मॅडेटप्रमाणे दोन डोमेस्टीक सामने खेळून आपला फिटनेस सिद्ध करून, (वर परत त्याने त्या सामन्यांमधे चांगला खेळ केला हेही मह्त्वाचे आहे) जागेवरच मूळचा हक्क परत मागीतला. सिरीज सुरू होण्या अगोदर विजय नि राहुल हे फर्स्ट चॉइस ओपनर असतील असे जाहीर केले होते.
दुसरा मुद्दा गंभीरला मिळालेल्या संधीचा. माझ्या मते मिळालेल्या संधीचा सदुपयोग गंभीरला करता आला नाही. त्याचा शॉर्ट बॉल खेळण्यामधल्या issue ला परत highlight केले गेले. त्याने ओपन स्टान्स करून त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला ते जमत नाहीये हे उघड झाले. तुम्ही first choice नाहि हे माहित असताना धावा न काढू शकणे त्याच्या विरोधात गेलय. परत पहिल्या सामन्याच्या दुसर्या डावात त्याने वेळ खाणे मह्त्वाचे होते तेही त्याला करता आले नाही.
त्याची टेस्ट कारकीर्द मला वाटते मागच्या इंग्लंड दौर्यानंतर जवळजवळ संपल्यातच जमा होती. त्यानंतरच्या तीन चार वर्षांमधे त्याला त्याच्या त्याच उणिवांवर मात करता आली नाही (not for the lack of efforts at least) हे हायलाईट झाले त्यामूळे त्याच्यापासून इतर ठिकाणी फोकस जाणे उघड आहे. राहुल हे उत्तर असेल का हे माहित नाही पण त्याने जेंव्हा जेंव्हा odds त्याच्या विरुद्ध आहेत तेंव्हा जिगरबाज खेळ केलाय हे नाकारता येत नाही. त्यामूळे सध्या तरी त्याला संधी मिळणे उचित वाटते. तो long term prospect आहे का ह्याचे उत्तर सांगणे कठीण आहे. अरमान जाफर ह्या नावावर लक्ष ठेवा.
एखादा उदयोन्मुख खेळाडू का निवडला नाही ह्याचे कारण तसा कोणी नसावा असे असू शकेल. सध्याची निवड समिती उदयोन्मुख खेळाडूंना एकदम आत ढकलण्याबद्दल थोडी साशंक वाटते (उदा. पंत) पण त्याच्बरोबर पांड्या टेस्ट टीम मधे आहे हेही आहेच.
असामीजी, राहुलला संघात स्थान
असामीजी, राहुलला संघात स्थान देणं न्याय्य असलं तरीही गंभीरला वगळून त्याला घेणं याबद्दलच फक्त मतभेद आहे. निवडसमिती फक्त आंकडेवारीवरून निवड करणारी नसते तर खेळाडूच्या कुवतीची व त्याच्या खेळातील कच्च्या दुव्यांची जाण ठेवूनच त्याची उपयुक्तता जोखणारी असते- निदान असावीच. त्यामुळे गंभीरची निवड << त्यानंतरच्या तीन चार वर्षांमधे त्याला त्याच्या त्याच उणिवांवर मात करता आली नाही (not for the lack of at least) हे हायलाईट झाले त्यामूळे त्याच्यापासून इतर ठिकाणी फोकस जाणे उघड आहे >> हें सगळं माहित असूनही जर झाली होती तर त्याला उपयुक्तता सिद्ध करायला वाजवी संधी मिळणं उचित होतं. केवळ ' स्टॉप गॅप'साठी तात्पुरती व्यवस्था म्हणून अशा अनुभवी खेळाडूला निवडसमिती पुनरागमन करायला लावत असेल, तर तें हास्यास्पदच आहे, हें माझं मत.
भाऊ ह्या लॉजिकमधे काहीच अर्थ
भाऊ ह्या लॉजिकमधे काहीच अर्थ नाही . "राहुलला संघात स्थान देणं न्याय्य असलं तरीही गंभीरला वगळून त्याला घेणं " ह्या वाक्यामधे तरिही येऊच शकत नाही. "तरीही" च्या दोन्ही बाजू हातात हात घालून जाणार्या आहेत.
असे समजा तुम्ही निवड समिती मधे आहात, तुमचे पहिले दोन्ही पर्याय अन फिट आहेत नि एकही उदयोन्मुख खेळाडू दिसत नाहि आहे. तुम्हाला गंभीरच्या उणीवा माहित आहेत नि त्या तो झाकू शकत नाही हेही कळले आहे. अशा वेळी तुम्ही काय केले असते ? त्याला घेताना ही स्टॉप गॅप आहे ह्याची कल्पना पब्लिकली घेऊन देणे योग्य होते नि तेच केलेले आहे.
साहाच्या जागी पार्थीवला आणतानाही हाच प्रकार केलेला आहे. कार्थिक चा विचार का केला नाही हे ही स्पष्ट केलेले आहे. ह्याहून अधिक पारदर्शक व्यवहार कठीण आहे. निव्वळ गंभीर अनुभवी खेळाडू आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक देण्याची गरज नाही.
<< अशा वेळी तुम्ही काय केले
<< अशा वेळी तुम्ही काय केले असते ? >> मला जर << तुम्हाला गंभीरच्या उणीवा माहित आहेत नि त्या तो झाकू शकत नाही >> याची खात्री असती तर मीं नवोदित खेळाडूला खेळवण्यालाच अग्रक्रम दिला असता . व या देशात << एकही उदयोन्मुख खेळाडू दिसत नाहि आहे >> हेंही पटणं कठीण आहे.
एकही उदयोन्मुख खेळाडू दिसत
एकही उदयोन्मुख खेळाडू दिसत नाहि आहे >> निवड समितीला दिसत नाहिये सलामीचा उदयोन्मुख खेळाडू. अरमान जाफरचे नाव एक दोनदा आल होते पण तो खूपच यंग आहे.
असो. तुम्ही तुमच्या
असो. तुम्ही तुमच्या निवडसमितीत तरी मला तात्पुरता घेतलात व मलाही खर्याच निवडसमितीत असल्याचा आव आणतां आला; माझ्याकरतां, हेंही नसे थोडके !
चहाच्या जागी दारू पिऊन आले
चहाच्या जागी दारू पिऊन आले बहुतेक.. ४ ओवरमध्ये सामनाच पलटवला.. पुन्हा आश्विनला कोहलीच्या साथीने उभे राहायची जबाबदारी.. चौथा डाव आपल्याला खेळायचा असल्याने आता फारच ईंटरेस्टींग झालाय सामना
आज जाडेजाने मला फलंदाजी करता
आज जाडेजाने मला फलंदाजी करता येते हे दाखवलेलं पाहून डोळे भरून आले.
उद्या साधारण किती धावांची आघाडी आपण घेऊ यावर सामन्याचे भवितव्य थोडेफार असेल असे मला वाटते.
इंग्लंडचे आठव्या नि नवव्या
इंग्लंडचे आठव्या नि नवव्या स्टंपवर बॉल टाकण्याचे प्रयत्न निगेटिव्ह वाटले नाहि का कोणाला ? पिचमधे काहीच नाहि असे धरून बॅट्समनचा पेशन्स बघण्याचे तंत्र वाटले.
कुठल्या सेशनमध्ये म्हणतो आहेस
कुठल्या सेशनमध्ये म्हणतो आहेस असामी?
प्रत्येक सिरीज मधे होम टीम
प्रत्येक सिरीज मधे होम टीम च्या शेपटाचे बॅटिंग कौशल्य टेस्ट करणारी एक मॅच असते. ही ते मॅच दिसते
इंग्लंडचे आठव्या नि नवव्या स्टंपवर बॉल टाकण्याचे प्रयत्न निगेटिव्ह वाटले नाहि का कोणाला >> सिरीयसली? त्यांची टीम ३०० च्या आत गुंडाळली गेली, आपलीही बर्यापैकी पडझड झालेली आहे. अशा सिच्युएशन मधे अशी बोलिंग?
मला तरी बोलिंग
मला तरी बोलिंग पाचव्या/सहाव्या स्टंपवर वाटली. पण मी लंचआधी बघत नव्हतो, म्हणून सेशनबद्दल विचारले.
अश्विन ७२ वर आऊट झाला. मेड द डिफरन्स बीटवीन ६० रन्स ऑफ डेफिसिट अॅण्ड अॅट लीस्ट ४० रन्स इन लीड. व्हॉट अ प्लेयर!
आश्विनने ५०० धावा आणि ५० बळी
आश्विनने ५०० धावा आणि ५० बळी एकाच वर्षात घेण्याची अष्टपैलू कामगिरी आज पूर्ण केली. ह्या यादीत मिचेल जॉन्सन, डॅनियल व्हेटोरी, अॅन्ड्र्यू फ्लिंटॉफ, शॉन पोलॉक, कपिल देव, इयान बोथम ही नावे आहेत. (आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इम्रान खान, रिचर्ड हॅडली, किंवा जॅक कॅलिस, ही नावे ह्या यादीत नाहीत!) तेव्हा आश्विनचे ह्या कामगिरीसाठी अभिनंदन!
आज सरांनी चक्क बर्यापैकी
आज सरांनी चक्क बर्यापैकी फलंदाजी केली ती देखिल ८ व्या क्रमांकावर येऊन!
जयंत देखिल टिच्चून खेळतोय!
ह्या परिस्थितीत इंग्रजांना दुरापास्त होणार सामना वाचविणे! भारताने कलकत्त्यात ऑस्ट्रेलियाला लोळविलेले 'लक्ष्मण मॅच' तसे इन्ग्रजांना करावे लागेल काहीतरी!
Pages