(सूचना: लिखाण केवळ विनोदनिर्मिती करिता केले गेले आहे. गंभीरपणे घेतल्यास व त्रास झाल्यास लेखक जबाबदार नाही. तसेच यातील घटना व पात्रे काल्पनिक असून <...वगैरे वगैरे नेहमीचेच. आणि शेवटी...>तो केवळ योगायोग समजावा)
"हेल्लो"
"हेलो. नमस्ते सर. गुड मॉर्निंग"
"झालं का तुझं?"
"सर डिजाईन झालंय. पण थोड़े इश्श्युज आहेत. आणि ट्रायल सुद्धा..."
"यार करून टाक ना पट्कन. अजून चार माणसं देऊ का तुला मदतीला? कुठं अडून राहिला आहेस तू अजून? भावा, दोन दिवसात करायचंय आपल्याला. मोठ्या सायबांना दिवसातून चार वेळा फोन येतोय पीएमओ मधून. ते परत मग मलाच विचारतात. काय उत्तर देऊ त्यांना रोज रोज तूच सांग?"
"सर वेळ तर लागणारच ना. जेवढा वेळ टेस्टिंग साठी आवश्यक आहे तेवढा तर द्यावाच लागेल ना... आणि सेक्युरिटीचं पण बघायला हवंय अजून..."
"हे बघ ह्या फालतू गोष्टी तू मला सांगू नकोस... कळलं ना? दोन दिवसात रेडी पायजेल. तुझी जबाबदारी आहे. मला दोन दिवसाच्या आत पायलट वर्जन पायजेल म्हणजे पायजेल. परवा प्रेस कॉन्फरन्स मध्ये दाखवायची आहे. आता कसं करायचं ते तुझा प्रोब्लेम आहे."
"आमच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत सर... रात्रंदिवस काम करतोय आम्ही. टीम मध्ये कोण नीट झोप पण घेतलेली नाही सर चार दिवसात..."
"अबे तुला झोपेची पडली आहे? इथं माझ्या आयुष्याची वाट लागायची वेळ आली आहे. माझा जॉब जाईल तुझ्यामुळे. दोन दिवसात रेडी झाली पायजेल. काय सांगू नकोस बाकीचं मला. चल फोन ठेवतो आता. बाय."
दोन दिवसानंतर...
"बोल, झाली का तयार? टेस्टिंग फेस्टिंग झालं करून?"
"झाली सर... तयार आहे. झालंय तसं सगळं पूर्ण. पण एक दोन इश्श्युज आहेत सर अजूनही..."
"आता अजून काय राहिलंय आणि?"
"टेस्टिंग केल्यावर लक्षात आलं... जरा कलरचा इश्श्यु आहे. आणि सर सिक्युरिटीचं पण बघायला हवंय अजून..."
"कलरचा काय इश्श्यु आहे? अजून किती वेळ पाहिजे तुला?"
"सर थोडा वापर केल्यानंतर कलर फेंट होतोय... अजून आठेक दिवस द्या सर. कॉम्प्लीकेटेड आहे. सिक्युरिटीचं पण बघितलं नाही अजून..."
"आजून आठ दिवस? काय येड बीड लागलंय का राव. आणि तू हे सगळं आत्ता सांगायला लागला आहेस मला?"
"......"
"ठीक आहे. जा. जे आहे ते घेऊन ये. बघूया. टाइम तर बिलकुल देता येणार नाही मला आता"
"पण सर कलर आणि सिक्युरिटीचं काय करायचं?"
"अरे काका... तू जेवढं सांगितलंय तेवढं कर ना. जा घेऊन ये जा आधी जेवढं केलं आहेस तेवढं. बाकीचं बघून घेतो आता मीच"
"जी सर"
---x---
"कोण आहे इथं रिसिप्शनला? अरे इकडं ये जरा. डेस्क सोडून कुठं जाता रे तुम्ही लोक? मैडम कुठे गेली? ओके ऐक. तू इथनं हलू नकोस. ते चॅनलवाले येतील आता इतक्यात. आल्या आल्या त्यांना आत पाठवून दे"
"जी सर"
थोड्या वेळानंतर...
"में आय कम इन सर?"
"अरे ये ये. तुम्हा लोकांचीच वाट बघतोय मघापासून"
"जी सर कहिये. केसे याद किया"
"आता प्रेस झाली मघाशीच. कळलं असेलच तुला?
"जी सर... सगळ्या देशात खळबळ माजली आहे...."
"अजून एक बातमी चालवायची आहे. आता लगेच..."
"सांगा सर. कोणती बातमी चालवायची आहे?"
"बातमी म्हणजे... प्रेसला दाखवायला रिलीज तर केली आहे मघाशी. पण थोडे कलर आणि सिक्युरिटीचे इश्श्यु आहेत त्यात अजून. जरा डोकं लावून कवरप कसं करता येईल हे बघा. आणि तुमच्या जबाबदारीवर सोडतो मी हे..."
"आले ध्यानात सर"
"काय ध्यानात आले?"
"सर हेच... म्हणजे... सिक्युरिटीचं आणि कलरचं..."
"हम्म्म्म... कसं करणार? कायतरी जोमदार लॉजिक शोधून काढ. लवकर सांग...."
"सर सिक्युरिटीचं... सांगून टाकू कि नॅनो चीप बसवली आहे आत ती जीपीएस द्वारे उपग्रहाला संदेश देते..."
"चालेल म्हणतोस?"
"पद्धतीने सांगतो सर. आरामात चालेल. आजकाल नॅनो टेक्नॉलॉजी, जीपीएस हे परवलीचे शब्द झालेत. त्यामुळे हे शब्द घातले कि काहीही पटते लोकांना. आणि काळा करणाऱ्यांना इतकी अक्कल नसते. लगेच घाबरतील. हेहेहे द्या टाळी ..."
"आणि कलरचं?"
"कलरचा सर काय प्रोब्लेम आहे?"
"वापरली कि फिका पडतो हळूहळू"
"ओह्ह..."
"ह्म्म्म.. मग काय सांगणार? आणि कसं? "
"उम्म्म्म..... हे कसं कवर करणार सर? आम्हाला तर काहीच सुचत नाहीये..."
"कायतरी आयडिया काढ ना राव"
"नाही सर... काहीच नै कळत"
"ठीक आहे.... कलरचे जे आहे ते सांगून टाक"
"म्हणजे सर?"
"हेच कि वापरल्यानंतर रंग फिका पडतो हळू हळू... आणि यावरूनच ती खरी आहे हे कळून येते... वगैरे असे काहीतरी बोल ना..."
"वा सर. मानले बाकी तुम्हाला"
"ठीक आहे. तुम्ही निघा आता. पण जे काही चालवाल ते जरा लक्ष देऊन आणि विचारपूर्वक चालवा. पब्लिक सेन्सिटीव झाले आहे. विरोधकांना उगीच आयतं कोलीत मिळायला नको. कायतरी शब्द इकडचा तिकडं कराल आणि तुमच्या बरोबर माझी पण लागेल"
"काळजीच करू नका सर. आमच्यावर सोपवून बिनधास्त रहा तुम्ही..."
"ओके. ऐक ना. जाता जाता एक काम कर. बाहेर सोशल मिडिया टीमची पोरं बसली असतील. जरा त्यांना आत पाठवून दे"
"ओके सर..."
लै भारी! प्रत्यक्ष घडलेली
लै भारी!
प्रत्यक्ष घडलेली घटना - १९८५ सालची गोष्ट.
तेंव्हा मोडेम कार्ड नसे पीसी मधे. दोन रबरी कप असलेल्या दुसर्या एका बॉक्स मधे फोन ठेवून मग मेन फ्रेम अॅक्सेस, नेटवर्क असले करायचे. बेल लॅब ने एक कार्ड काढले, ते आम्ही कस्टमरला दाखवले. पण ते कार्ड सतत टिक टिक असा आवाज करायचे. ते कस्टमरला आवडले नाही. म्हणून आम्ही बेल लॅबला सांगितले हे दुरुस्त करा - सहा महिने झाले, तरी बेल लॅब अजून काम करतच होते. इकडे कस्टमरला, म्हणून आम्हालाहि घाई. म्हणून विचारले काय अडचण आहे? ते म्हणाले - सारखा आवाज येत नाही पण कनेक्ट केले की परत टिक टिक. अजून सहा महिने तरी लागतील. "तुझ्या नानाची टांग, चल आण ते इकडे" असे काहीतरी म्हणून ते आणले, कस्टमरला बोलावले, दाखवले नि म्हंटले आम्ही यात एक नवीन फीचर अॅड केले आहे - PACT म्हणजे Positive Audio Confirmation Tone - कनेक्ट केल्यावर टिक टिक असा आवाज येतो म्हणजे कनेक्ट झाले आहे हे कळते! कस्टमर खूष - दोन मिलियन डॉलरची ऑर्डर! सगळ्ञांना बोनस!!
लई मज्जा राव अमेरिकेत, पैकाच पैका! आता मात्र नाही!!
"आमच्याकडून शर्थीचे प्रयत्न
"आमच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत सर... रात्रंदिवस काम करतोय आम्ही. टीम मध्ये कोण नीट झोप पण घेतलेली नाही सर चार दिवसात..."
"अबे तुला झोपेची पडली आहे? ''
>>
यापुढे 'सोल्जर्स आर डायिंग अॅट बॉर्डर' पाहिजे ना?
मस्तं चुरचुरीत लेख!
आमच्या चकली /कडबोळ्यांत तुमचा लेख एकदम चिवड्यासारखा!
छान लिहीला आहे. थोडा अजून
छान लिहीला आहे. थोडा अजून खुलवता आला असता.
( सरकारच्या विरोधात किंवा समर्थनात लिहीलं की समर्थक किंवा विरोधक तुटून पडतात यावर पण लिहा ना काहीतरी. कंपल्सरी एका बाजूला ढकलतात लोक ... )
@ नन्द्या४३, एकदम भारी किस्सा
@ नन्द्या४३, एकदम भारी किस्सा सांगितलाय. वाचून गंमत वाटली.
बरेच दुकानदारही आपणांस असेच फसवतात. "वो वैसाईच होता है। जानबुझ के दिएलाय" असं सांगून आपल्याला गंडवतात.
मस्तं, खुसखुशीत. नंद्या यांचा
मस्तं, खुसखुशीत.
नंद्या यांचा किस्सा पण भारीच!
मस्त लिहिलंय!!! नंद्या४३
मस्त लिहिलंय!!! नंद्या४३ यांचा किस्सा पण भारी
भारी. नंद्या यांची पोस्ट पण
भारी.
नंद्या यांची पोस्ट पण जबरी. नवीन फिचर
सर्वांना धन्यवाद. नन्द्या४३:
सर्वांना धन्यवाद.
नन्द्या४३: किस्सा पण लै भारी
साती: हो. सोल्जरचा उल्लेख चपलख बसला असता तिथे हा हा हा हा
सपना हरिनामे: एकाच ओघात सुचेल तसे लिहिले आहे. हो खुलवता आला असता अजून खूप. पण जास्त लांब लेख (लांबी बघूनच) अनेकांकडून वाचला जाणार नाही असे वाटले म्हणून आवरते घेतले.
पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद