तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
डॉ सातींची हरकत असणार नाही
डॉ सातींची हरकत असणार नाही म्हणून त्यांचे उदाहरण घेतो.
त्यांनी आज रुग्णांवर मोफत उपचार करुन काय कमावले ? तर पुण्य ! आणि या पापपुण्यावर त्यांचाही विश्वास नसणार म्हणून प्रॅक्टीकल विचार करू.
तर तो रुग्ण या ना त्या स्वरुपात डॉ. सातींना देऊ असणारे पैसे चुकता करणारच. आता समजा तो शेतकरी असेल आणि वांगी पिकवत असेल तर तो दहा किलो वांगी त्यांना आणून देईल. म्हणजे त्याची जबाबदारी ( त्याच्या दृष्टीने )संपली. पण डॉ सातींचे काय ? त्यांना दहा किलो वांग्याची गरज नाही. वांगी सप्ताह करुनही ती संपणार नाहीत. म्हणजे त्या व्यवहारात त्यांचे नुकसानच झाले. पण समजा त्यांनी पैसे दिले तर डॉ. त्यातून काही वस्तू, औषधे खरेदी करतील किंवा काही सेवा विकत घेतील. म्हणजे विनिमयाचे साधन म्हणून वांगी नकोत तर केवळ पैसाच हवा. हवं तर त्यातून त्या वांगीही घेतील ( कारण वांगी खाता येतात, पैसा नाही ) !!!
" हितेश, अरे तुझा बँक
" हितेश, अरे तुझा बँक अकाउण्ट आहे ना ? मला नंबर कळव म्हणजे नेट बँकिंग ने तुला पैसे पाठवता येतील मला. "
" काही जरूर नाही दादा, मी आजींना रोजच्या खर्चाला जरूर तेव्हढ्या नोटा बदलून आणून दिल्यात अन मला नंतर द्या तुम्ही आरामात, हा काय थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, लवकरच सगळ सुरळीत होइल "
हितेश पाटील हे अलिबागला रुग्णवाहीका चालक आहेत. नेहमी सोबत असणारा त्यांचा मित्र उपलब्ध नसल्याने सध्या त्यांच्या अर्धांगिनी ला सोबत घेऊन आठवड्यात तीन वेळा ते माझ्या घरी येतात , माझ्या वडीलांना स्ट्रेचरवर घालून रुणवाहिकेतून डायलिसिस सेण्टर ला नेतात व चार पाच तासांनी परत घेउन येतात.
ब्रेकिंग न्यूज चा रतीब घालणार्या वृत्तवाहीन्या मीठ मिळेनासे झालेय अशी अफवा पसरल्याने २०० रु किलो ने विकले जातेय, सोनारांच्या दुकानात झुंबड, ए टी एम समोर रांगा, सरकारचा आदेश झुगारून रुग्णांना उपचार न करता हाकलून देणारी इस्पितळे वगैरे दृष्ये दाखवत आहेत. अशा वेळी हितेश यांच्या सारखी सामान्य माणसे असणे व या धाग्यावर ज्या लोकांनी अनेकांना आपण कशी मदत केली / अनेकांनी त्यांना कशी मदत केली हे लिहित आहेत ही फार धीर देणारी गोष्ट आहे. जनसामान्यांच्या सज्जनशक्तीमुळेच हा देश चालणार आहे यात संशय नाही. सहज आठवल म्हणून लिहितो. या देशाचे एक पूर्वीचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी देशाकरता म्हणून आवाहन केल आणि लाखो देशवासीयांनी एकवेळचे जेवण सोडले... इतकेच नव्हे नंतर परिस्थिती सुधारल्यावरही तर त्या पुण्यात्म्याचे स्मरण रहावे म्हणून आयुष्यभर एखाद धार्मिक व्रत आचराव तसा तो उपवास पाळला. जनसामान्य आज ही तो वारसा चालवीत आहेत. आपण सारेच त्याचा भाग आहोत.
थँक्स दिनेशदा आणि सोनू.
थँक्स दिनेशदा आणि सोनू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नोटटंचाईमुळे होणार्या
नोटटंचाईमुळे होणार्या गैरसोयीवर चहावाल्याने काढला उपाय
http://www.loksatta.com/trending-news/tea-stall-owner-in-rk-puram-now-ac...
दिनेशदा , मस्तं उदाहरण! पण
दिनेशदा , मस्तं उदाहरण!
पण आमच्या गावात, ' क्या दिया, बैंगन!' ह्या प्रश्नाला लईच घाणेरड्या अर्थाची शिवी समजतात!
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आत्ताच न्युज चॅनेल वर पाहिले
आत्ताच न्युज चॅनेल वर पाहिले रोजचा खर्च करायला पैसे नसल्याने स्कूल बस वाले बस सेवा बंद करणार आहेत म्हणे. .असे झाले तर अजून अवघड होऊन बसेल
पण आर्थिक सुधारणा घडवायच्या
पण आर्थिक सुधारणा घडवायच्या तर याहून कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ( म्हणजे १०० च्या वरच्या सर्व नोटा रद्द, सर्व कर रद्द करून फक्त बँक व्यवहारावर किमान कर.. वगैरे )
<<
दिनेशदा,
सहमत. सर्व कर रद्द, व बँक व्यवहारावर वाजवी कर घेतला, तर कुणीच कर चुकवायचा प्रयत्नही करणार नाही. इथे ४०-४०% डायरेक्ट टॅक्स बसतो. त्यापुढे इण्डायरेक्ट टॅक्स वेगळाच. का लोक १००% खुला व्यवहार करतील?
दुसरं, बँकेत लाईन लाऊन उभे असलेले किंवा खिशात ५००-१०००च्या नोटा असलेले सगळेच लोक चोर / काळा पैसा वाले आहेत का? तसं असेल तर मग गेले ४ दिवस सगळ्या हॉस्पिटलांत मिळून जो हजारो करोडोंचा पैसा (जबरदस्तीने) जुन्या नोटांत जमा झालाय, तो सगळा काळा पैसाच म्हणायचा. व हा देणारे सगळे पेशंट चोर, भ्रष्टाचारी.
बरोबर ना?
त्यामुळे त्या व्हॉट्सॅप फॉर्वर्ड्सचा व त्यातल्या बेगडी राष्ट्रभक्तीचा, सैनिक सरहद्दीवर मरण्याचा तर वीट आलाय अगदी.
दिनेशदा, मस्त समजावलत.
दिनेशदा,
मस्त समजावलत.
जे काल पर्यंत म्हणायचे की
जे काल पर्यंत म्हणायचे की 70000 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यावर(सिंचन घोटाळा )आम्ही कारवाई करू पण तेच आज ऐकाच मंचावर दिसत आहे. ...मग कसा काळा पैसा बाहेर येइल. ..?
(No subject)
झाडू.. आपल्याकडे
झाडू.. आपल्याकडे पहिल्यापासूनच कर चुकवणार्यांवर / बुडवणार्यांवर कडक कार्यवाही झाली नाही. कर वसुली करणार्या यंत्रणा अकार्यक्षम होत्या ( जे कर मिळतात त्यातला बहुतांशी पैसा या यंत्रणेवरच खर्च होतो, उत्पादन शुक्ल वगळता. ) कर कायदे किचकट होते... राज्यकर्तेच भ्रष्ट होते, मग निवडणूका जिंकण्यासाठी पैसा खर्च होत राहिला...( मी या क्षेत्रात होतो त्या काळात राजकीय पक्ष, ट्रेड युनियन काही प्रमाणात करमुक्त होत्या. ) सगळीच गणितं चुकत गेली... खुप कठोर कार्यवाही शिवाय आता हे बदलणे शक्य नाही.
( मनोरंजन क्षेत्रातील अनेक जण मोठ्या प्रमाणात कर भरतात पण या यादीत कधी कुठल्याच राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचे नाव का नसते ? )
अनेक देशात ( कॅनडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड.. हे माझ्या माहितीतले ) जवळ जवळ एक त्रितियांश मिळकत कर रुपाने जाते. ती ते सहज देतात कारण त्या बदल्यात त्याना दृष्य स्वरुपात परतावा मिळतो ( नागरी सोयी, वृद्धापकाळातली काळजी वगैरे ) आणि सर्व व्यवहार कार्ड / बँक रुपात होत असल्याने, कर चुकवणे सोपेही नाही.
अशी मनोधारणा तयार करण्यासाठी आपल्या देशातील दोन्ही बाजूनी खुप प्रयत्न करायला हवे. आपण कर रुपाने जो पैसा भरतोय तो योग्य तर्हेने खर्च होतोय, हे दृष्य स्वरुपात लोकांना जाणवले पाहिजे ( रस्ते, आरोग्य सेवा वगैरे )
आणि तो कुठेही वाया जात नाही किंवा कुणाच्या छानछौकिसाठी खर्च होत नाही, याची खात्री पटली पाहिजे.
अनेक देशांत राजकारणी लोकांना आपल्या देशातल्या इतक्या सुविधा मिळत नाहीत, ते सामान्य नागरिकांप्रमाणेच
जगतात.. असे आपल्याकडेही होणे गरजेचे आहे.
अशी मनोधारणा तयार करण्यासाठी
अशी मनोधारणा तयार करण्यासाठी आपल्या देशातील दोन्ही बाजूनी खुप प्रयत्न करायला हवे. आपण कर रुपाने जो पैसा भरतोय तो योग्य तर्हेने खर्च होतोय, हे दृष्य स्वरुपात लोकांना जाणवले पाहिजे ( रस्ते, आरोग्य सेवा वगैरे )
आणि तो कुठेही वाया जात नाही किंवा कुणाच्या छानछौकिसाठी खर्च होत नाही, याची खात्री पटली पाहिजे.
<<
कळीचा मुद्दा.
कर वसुलीच्या अकार्यक्षमतेपोटी शासनाने अव्वाच्या सव्वा टॅक्स रेट्स ठेवून, शिवाय अप्रत्यक्ष करांतून सामान्य नागरिकांच्या खिशातून विकृत मार्गाने (उदा. पेट्रोलवरील वेगवेगळे टॅक्स. हे पैसे कोण देते? तुम्ही-आम्हीच, व यात सर्वाधिक दोषी सध्याचे सरकार आहे.) पैसे ओढणे सुरू केले.
टॅक्स भरण्याच्या बदल्यात नागरी सुविधा मिळणे दूरच. उलट रस्ते वापरायचे तर टोल भरा. (मग? अमेरिकेत नाही भरत का?! अहो, पण तिथले सगळे मिळून इतर टॅक्सेशन आपल्याइतके नाही..) लाईट बिलं भरलीत तरी लोड शेडिंग सहन करा. अव्वाच्यासव्वा दराने डिझेल विकत घेऊन जनरेटरवर तुमचा बिझिनेस करा. अशा अनेक गोष्टी.
अन हे होत असताना, आजूबाजूचे 'श्रीमंत' लोक टॅक्स चुकवताना दिसत असतात. सरकारी नोकर लाच खाताना दिसत असतात. तथाकथित गरीब आकडे टाकून मिटर न वापरताना दिसत असतात.
*
या सगळ्याला कंटाळूनच भरपूर लोकांनी 'अच्छे दिन'च्या सौदागराला मतं दिली होती.
परंतु, हे सभ्य गृहस्थ, याच लोकांना छळण्यासाठी पॉप्युलिस्ट मेझर्स वापरत आहेत. वरतून त्यात भरडले जाणार्या लोकांना ढोस देत, त्यांची पेड आर्मी देशप्रेमाचे ढोल बडवत भेसूरपणे नाचताना दिसते आहे.
नॉट अ नाईस पिक्चर फॉर मी.
या 'काळापैसाविरोधी' अभियानाला
या 'काळापैसाविरोधी' अभियानाला घाबरून / किंवा लालबहादूरांच्या आवाहनाला जागून जसे लोकांनी उपवास केले, तसे एका जरी सरकारी कुत्र्याने माझ्याकडे लाच मागणे बंद केले ना, तरी मी सुखी होईन.
पण काये नं, सगळेच सरकारी नोकर अँटी मोदी दिसताहेत. एकानेही लाच खाणे सोडण्याचा विचारही केलेला नाहिये.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तसेच ते बेपारी लोक. त्यांनीही
तसेच ते बेपारी लोक. त्यांनीही सेकंडचा व्यवहार बंद केलेला दिसत नाहीये.
शेवटी ही मतं देणारे नक्की होते कोण? असा प्रश्न पडायला लागलाय मला.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पुन्हा एकदा आकाशवाणीच्या
पुन्हा एकदा आकाशवाणीच्या अड्डा केंद्रावरून आपले स्वागत. आमच्या पुढच्या सभेत ऐका कार्यक्रम कॉपीपेस्टः
***
झाडू | 13 November, 2016 - 21:22
बरं.
या क्षणाला माझी (एक) बहिण व मेहुणे एटीएमच्या लायनीत दिल्लीत उभे आहेत. गेल्या अडीच तासापासून. लाईन निम्म्यावर आली आहे. अजून तितकाच वेळ अपेक्षित आहे.
दोघे उभे आहेत कारण दोन कार्डं स्वाईप करायची आहेत. एका माणसाने दोन्ही कार्ड्स स्वाईप केली तर लोक मारामारी करतात, म्हणून हे दोघे उभे आहेत.
व्हॉट से यु गाईज?
त्यांचा नंबर येई पर्यंत एटीएममधे कॅश पुरेल का?
***
झाडू | 13 November, 2016 - 21:23
अरे हो. वसंत विहार की कुंज असा तो हायफाय एरिया आहे.
***
झाडू | 13 November, 2016 - 22:09 नवीन
ओके.
तर बहिणाबाईंचे अपडेट.
१. कुणीतरी त्या मशीनच्या मागचे शटर उघडले व बंद केले. पैसे संपले अशी कुजबूज सुरू होऊन बरेच लोक निघून गेले. यांचा नंबर अडीच ऐवजी एक तासात लागाला.
२. तिथला पैलवान सिक्युरिटीवाला एका माणसाला एकच कार्ड स्वाईप करायला देतो.
३. एका कार्डावर फक्त दोन हजार रुपये मिळतात. १० नाही
४. चॉइस वर्ड्स फॉर द भाषण गिव्हर.
च्याय्ला! मला मोदीचा गागु
च्याय्ला! मला मोदीचा गागु घ्यावा वाट्टोय. माझ्या आयायटी वाल्या इंटरनॅशल फेमस पावन्याला चक्क ३ तास उभा केला लायनीत![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
ते पण ४ हज्जार रुपड्यांपायी!!!
(विक्राळ घटोत्कची हास्य! हहहहहहहहहहहहहह्हाहाहाहाहाहाहा!)
(No subject)
आकाशवाणीचं अड्डा केंद्र
आकाशवाणीचं अड्डा केंद्र प्रायवेटऑडियन्ससाठी आहे हो काका.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
श्रोतेहो, आता वाचा पुढचे
श्रोतेहो, आता वाचा पुढचे कॉपीपेस्ट. याला लाइक केलंय झुमरितलैय्याहुन.....
***
...
अनेक बायका आफल्या दारुड्या नवर्यापासून पैसे लपवून बचत करतात. त्यांची बँक खाती नसतात.
यानिमित्त hoard केलेली cash बँकेत जमा होईल हा एक(च) फायदा दिसतो मला. बाकी गुन्हेगार कायद्याच्या दोन पावलं पुढेच असतात.
<<
भम,
हा सगळा पैसा कुठे जिरेल असं वाटतं तुम्हाला?
भिकार्याच्या जनधन अकाउंटात २ लाख आले होते, ते काढून गायबही झाले, हे सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशतल्या इन्कमटॅक्स डिपार्टमेंटाला समजून, त्याची कायदेशीर पडताळणी होऊन, त्याच्यावर कारवाई करायला येतील, तेव्हा काय घंट्याचा ४००% टॅक्स वसूल करणारेत? त्याची फाटकी चप्पल जप्त करणार की फुटके भांडे? त्याने कितीही सांगितलं, की उदा. श्री. फडणविसांनी मला हे पैसे दिले होते. व त्या ट्रँजॅक्शनच्या बदल्यात मला २००० रुपये दिले. ते मी दारू पिण्यात घालवले. व खाल्लं ते मटन छान होतं.
सरकार कुणाचं काय उत्पाटून घेणार त्यापुढे?
याबरोबरच आमचे आजच्या या सभेचे
याबरोबरच आमचे आजच्या या सभेचे कार्यक्रम संपले.
पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी याच वेळी याच ठिकाणी
एकुणपन्नास, नव्याण्णव व सहा मीटर बँड वर, हे आकाशवाणीचे अड्डा केंद्र आहे!
दिनेशजींचे प्रतिसाद आवडले.
दिनेशजींचे प्रतिसाद आवडले. ब-याच लोकांनी खूप छान लिहीलेलं आहे.
लोक थोडेसे बायस्बाअसणे हे नैसर्गिक असते. अगदी तटस्थपणे पाहणे व्यवहारात अशक्य असते. तरी सुद्धा काल मला ज्या प्रकारे भक्त समजून अर्वाच्च भाषा वापरली गेली ती वेदनादायी होती. भक्त असते तर त्रास झाला असं लिहीलं असतं का ?
बोकीलजीं च्या थिअरीबाबत प्रश्न विचारले असते का ? भक्त असते तर असे प्रश्न पडले तरी असते का ? लोक असे का मत बनवत असतील ? या धाग्याच्या विषयाशी संबंधित नसला तरी एकूण चर्चा पाहून एक पोस्ट इथे पेस्ट करतेय. फेसबुकवरची लिंक कशी द्यावी हे माहीत नसल्याने लेखकाचे नाव पण देतेय.
मोदीजींबद्दल समर्थक किंवा
मोदीजींबद्दल समर्थक किंवा विरोधकांचे मत बदलेल का ? या माझ्या प्रश्नाचे उत्तर एका ठिकाणी सापडले. मायबोलीच्या वाचकांसाठी कॉपी पेस्ट करतेय.
सध्या नोटांच्या सुरु असलेल्या सर्कसमुळे अनेकांना वाटेल की या वादळामुळे आता लोकांच्या मतांमध्ये फार मोठा बदल येईल, आणि कदाचित असं घडेल सुद्धा. पण असं नाही झालं आणि सगळं काही पूर्वीसारखच सुरु राहिलं, म्हणजे कि बहुतांश विरोधक ते विरोधकचं राहिले आणि बहुतांश समर्थक ते समर्थक, तर आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नाही. विज्ञानाकडे याचे उत्तर आहे, त्यासाठी 2 (दो किंवा दोन, जे पाहिजे ते घ्या) कन्सेप्ट सांगतो.
पहिला आहे 1959 मध्ये फेस्टिनजर आणि कार्लस्मिथ यांनी पब्लिश केलेले 'Cognitive Dissonance' वरील प्रबंध, ज्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग हे मानसशास्त्रामध्ये अजरामर आहेत. फेस्टिनजरने अगोदरच मांडले होते की जेव्हा केव्हा असं काही घडते कि आपल्या विचारांमध्ये काही विरोधी निरीक्षणे येतात तेव्हा आपले मन आपोआप स्वतःला एडजस्ट करून स्वतःला खोटे समजावून तो विरोधाभास कमी करते, जेणेकरून त्या विरोधाभासाने होणारा मानसिक त्रास कमी होईल. म्हणजे कसे?
तर त्यांनी आपल्या प्रयोगामध्ये काही व्होलंटियर्सना दोन गटांमध्ये विभागून, एक अतिशय कंटाळवाणे काम तासभर करायला सांगितले (गळत्या मडक्यात पाणी भरत राहणे इतके कंटाळवाणे समजा). हा प्रयोग मी थोडा सोपा करून सांगतोय, नेटवर सविस्तर वाचता येईल.
यानंतर त्यांना असे सांगितले की (खोटेखोटे) त्यांचा एक कर्मचारी आज रजेवर आहे, आणि त्याचं काम होतं की पुढच्या येणाऱ्या ग्रुपला ते कंटाळवाणे काम कसे करायचे ते समजावून सांगणे, आणि (आता खरा "मास्टरस्ट्रोक" आहे) हे सुद्धा सांगायचे कि ते काम किती जास्त मजेशीर आहे (म्हणजे खोटे बोलावे). एवढं बोलण्यासाठी त्यांना पैशे सुद्धा दिले जातील. आणि एवढं करून झालं की मग फक्त काही प्रश्नांची उत्तरे देऊन ते घरी जायला मोकळे. या प्रश्नांमध्ये एक प्रश्न असा होता की "तुम्हाला काम कसे वाटले ते खरे सांगा?" (इथे शेवटी त्यांना खोटं नाही तर एकदम मनातले सांगायचे होते)
पण इथं खरी मजा आहे, त्यांनी एका गटाला काम करून झाल्यावर पुढच्या येणाऱ्या गटाला खोटं बोलायचे 1 डॉलर दिले, आणि दुसऱ्या गटाला 20 डॉलर दिले. यानंतर त्यांच्याकडून त्या प्रश्नांची उत्तरे घेतली (की काम खरंच कसं आहे, बोरिंग कि मजेशीर).
मग तुम्हाला काय वाटतं की ते पैशे देऊन खोटं बोलावून घेतल्यामुळे, त्या लोकांच्या मतांमध्ये (कि हे काम खरोखर बोरिंग आहे की मजेशीर) आतून काही बदल झाला असावा का? आणि झाला तर त्यामध्ये पैश्यांचा रोल होता का?
तर ज्यांना 20 डॉलर मिळाले, यांनी त्या कामाबद्दल नंतर जातांना नकारार्थी उत्तर दिले, कि त्यांना असे वाटते की ते काम खरोखच बोरिंग आहे. पण ज्यांना 1 डॉलर दिला गेला त्यांना हे काम मनातून खरोखर 'मजेशीर' वाटले.
असे का?
काम सगळ्यांसाठीच कंटाळवाणे होते यात कुठेच शंका नाही. पण जेव्हा यांना दुसर्यांना खोटं बोलायला लावलं तेव्हा मनात त्यांच्या नकळत विरोधाभास तयार झाला.
कारण ज्यांना 1 डॉलर मिळाले, त्यांच्या मनात आले कि "यार काम तर खरंच फार बोर आहे, आणि त्याबद्दल खोटं सांगायला मला फक्त 1 डॉलर दिलाय, हे काही ठीक नाही" (हे नकळत होते मनात) मग ते स्वतःला तसंच नकळतपणे समजवतात कि "नाही नाही, काम मला वाटलं तसं कंटाळवाणे नसेल कदाचित, त्यामध्ये थोडी मजा येत होती"
आणि ज्यांना 20 डॉलर मिळाले त्यांच्या मनात असा कोणता विरोधाभास तयार झालाच नाही कारण त्यांना वाटले की "पुढच्या गटाला तसे खोटे सांगण्यासाठी 20 डॉलर हि किंमत छान आहे, चला ते घेऊन बाहेर पडुया"
म्हणजे कि ज्यांना नकळत जो मानसिक त्रास झाला आणि ज्यांना या त्रासाचा मोबदला मिळाला नाही (फक्त 1 डॉलर वाले), त्यांनी स्वतःला समजावून घेतले की हा त्रास खरंतर इतका मोठा वगैरे नाही.
असं आपण स्वतःला कितीतरी वेळा समजवतोच की... म्हणून झालेला त्रास आणि त्यामुळे होणारे मतपरिवर्तन यामध्ये वाटेल तितके सोपे समीकरण नाहीच, खासकरून तेव्हा जेव्हा आपली मतं फार खोलवर रुजलेली असतात.
दुसरा प्रयोग हा थोडा लेटेस्ट म्हणावा लागेल. येल युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॅन कहान (Dan Kahan) यांनी 2013 साली प्रकाशित केलेल्या आपल्या प्रबंधामध्ये असे सिद्ध करून दाखवले कि राजनैतिक आणि सामाजिक मतं जर फार खोलवर रुजली असतील तर ती तुमचे आकडेवारीकडे बघायचे दृष्टीकोन सुद्धा बदलते, म्हणजे कि तुम्ही चक्क गणित पण चुकवाल! हे गणित केव्हा चुकवाल? जर का समोर दिल्या गेलेल्या गणिताच्या प्रश्नात असे उदाहरण दिले आहे कि ज्याचे उत्तर तुमच्या मतांविरुद्ध जाते, तर तुम्ही सरळ-सरळ आकडे मोजण्यामध्ये सुद्धा चूक कराल, आणि हे सगळं नकळतच होईल. याची लिंक कॉमेंट मध्ये टाकतोय.
म्हणून काही मोठा बदल जर घडवायचा असेल तर अश्या अधून-मधून होणाऱ्या घडामोडिंकडून अपेक्षा ठेऊ नये, त्यासाठी तुम्हाला लोकांच्या मनात जाऊन त्यांना पूर्णपणे समजून घेऊन त्यांना समजावून सांगितले तर काही होईल. आणि असे करतांना स्वतःच्या मनाकडे सुद्धा लक्ष द्यावेच, कि आपण कुठे स्वतःला खोटं बोलून घेत आहोत, आणि कुठे कुठे आपली मतं आपल्याला सत्यापासून दूर ठेवत आहेत.
तळतीप: व्याकरणातील चुकांकडे प्लीज दुर्लक्ष करावे.
~ गौरव सोमवंशी
संदर्भ
https://papers.ssrn.com/sol3/papers.cfm?abstract_id=2319992
https://poseidon01.ssrn.com/delivery.php?ID=2290870981050670660090181170...
छान . सहमत
छान . सहमत
ट्रंप जिंकूच शकणार नाही
ट्रंप जिंकूच शकणार नाही म्हणणारे लोक जसे सोशल मिडियामधे होते तसे नोटा बंद झाल्याचा काहीच त्रास होत नाहीय म्हणणारे आहेत. ट्रंपला मतं देऊन निवडून देणाऱ्यांसारखे त्रास झालेले आहेत.
मोदींजींनी चांगले काहीच केले
मोदींजींनी चांगले काहीच केले नाही आणि मोदीजींचे काही चुकतच नाही .. यात काही केल्या बदल होणार नाही असे वाटतेय.
काळ्या धनाविरुद्ध लढणे आवश्यक होते त्या दृष्टीने घेतल्या गेलेल्या पावलांना पाठिंबा देणं हे विरोधकांकडून दिसत नाही. काहींनी काळ्याचे गोरे केलेही असेल पण काळे धन बाळगणा-यांना त्रास झाला हे नाकारणे नको व्हायला.
तसेच काळ्याचे गोरे झालेच नाही किंवा लोकांना अजिबात त्रास झालेला नाही... एटीम मशीन्स मधे आवश्यक बदल करण्याचा प्लान सपशेल फेल गेला किंवा या यंत्रणेसंबंधी सरकारी यंत्रणा संपूर्ण अनभिज्ञ होती हे मान्यच करायचे नाही अशी दोन टोकं इथे आहेत तसेच अमेरिकेत पण होतंय.
जर राज ठाकरेंची बिहारी लोंढ्यांबद्दलची मतं आपल्याला पटत असतील तर हेच अमेरिकेत ट्रंपजी म्हणतात तेव्हां त्यांना विरोध कसा काय करणार ? सगळीकडेच हे चालू आहे. अमेरिकेत ट्ंपजी पहिल्यांदा बोललेत असंही नाही. इतके दिवस पोलरायझेशन झाल्याचे दिसले नसल्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज पडली नाही इतकेच.
( ब्राऊझर मुळे किंवा आणखी काही कारणांमुळे टायपिंग च्या चुका होताहेत. क्षमस्व ! )
एक सांगा, कुणी कुणी किती पैसे
एक सांगा, कुणी कुणी किती पैसे एटीएममधून काढले/ब्यांकेने दिले, अन कुणाला टोटल किती २००० च्या नोटा हातात मिळाल्या?
आय मीन इतके करोड रुपये या नव्या नोटांत बाहेर आलेत, तर ते अजून हाताला का लागत नाहियेत? माझ्यासारख्या दिवसाला क्ष्क्ष्क्ष्क्ष रुपयांत उलाढाल असलेल्याला किमान ३-४ नोटा दिसायला हव्यात नव्यातल्या.
ट्रजीजी!? मंजे? एकदा जी
ट्रजीजी!?
मंजे?
एकदा जी ठीकेय. दोनदा जी म्हंजे अजीजी झाली की!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
:हहगलोलो: हायला! ब्रावजर मेलं
:हहगलोलो:
हायला! ब्रावजर मेलं की काय? स्मायली का येईना?
एक सांगा, कुणी कुणी किती पैसे
एक सांगा, कुणी कुणी किती पैसे एटीएममधून काढले/ब्यांकेने दिले, अन कुणाला टोटल किती २००० च्या नोटा हातात मिळाल्या?
आय मीन इतके करोड रुपये या नव्या नोटांत बाहेर आलेत, तर ते अजून हाताला का लागत नाहियेत?
>>>>
२००० च्या नोटा कमीच छापल्या जाणार आहेत,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण ती फक्त पर्यायी व्यवस्था आहे.
काही काळाने त्या बंद होतील
बघा, मला आणि ऋबाळालाच माहित
बघा,
मला आणि ऋबाळालाच माहित आहे हे.
Pages