तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
खूप दिवसांनी दुपारी चक्क झोप
खूप दिवसांनी दुपारी चक्क झोप काढलीय. त्यामुळे आज रात्रीच्या झोपेचं खोबरंच आहे. नेमका आज इकडे शुकशुकाट दिसतोय..
अय्यो सपनाजी मी आता हेच
अय्यो सपनाजी मी आता हेच लिहिणार होते.
चला झिम्मा खेळू!
साती, तुम्ही दोघंही ग्रेट!
साती, तुम्ही दोघंही ग्रेट! चिडचिड न करता हे करताय हे अजूनच कौतुकास्पद.>>> मम.
दिनेशदा छान पोस्टस.
सॉरी बरं का सातीजी.झोपच लागली
सॉरी बरं का सातीजी.झोपच लागली नंतर. नाहीतर खेळले असते झिम्मा.. तुमची झाली का झोप ?
साती, तुम्ही दोघंही ग्रेट!
साती, तुम्ही दोघंही ग्रेट! चिडचिड न करता हे करताय हे अजूनच कौतुकास्पद.>>> +1
आज सकाळी आईला फोन केला होता.
आज सकाळी आईला फोन केला होता. तिने जस्ट १०००० रु. पेन्शन काढून आणले होते नोटा रद्द होण्या आधी. त्यामुळे १०० रु. च्या नोटा होत्या. सहकारी बँकेत खाते आहे तिथे इतर बँका इतका त्रास नाही.
तिला स्पेसिफिकली नोटा लायनीत उभी राहून बदलू नकोस असे सांगितले आहे. ती घरीच आहे. काही त्रास झालेला नाही. सिनीअर सिटिझन नेटवर्किंग रॉक्स.
मुलीकडे ४०० रु. आहेत. व एटी एम कार्ड नाही. मायनर टू मेजर प्रोसेस मध्ये आहे. व पॅन कार्ड इश्यू झालेले नाही. आजी कडून पैसे पाठवू का असे विचारल्यावर सध्या नको मी खर्चच करत नाही आहे. असे उत्तर आले. म्हणजे तिथे ही नो त्रास. हॉस्टेल मध्ये एक कॉफी डे आहे तिथे क्रेडिट कार्ड चालते.
शनिवारी विद्यार्थी पुण्यात डिनर ला गेले असताना दोन ठिकाणी कार्ड स्वाइप करण्याचे मशीन फेल गेले आहे असे सांगितले. तिसृया ठिकाणी जेवण मिळाले. लोच्या ह्या शब्दाशी मुलांचा परिचय झाला.
मी शनिवार र्॑विवार काही ही खर्च न करता घरीच काढला. रांगेत उभे राहायचे डेअरिंग नाही. दोन दिवस वाट बघेन. करंट बिल अजून हातात आलेले नाही. ते आले तर भरता येइल.
<<अनेक देशात ( कॅनडा /
<<अनेक देशात ( कॅनडा / ऑस्ट्रेलिया / न्यू झीलंड.. हे माझ्या माहितीतले ) जवळ जवळ एक त्रितियांश मिळकत कर रुपाने जाते. ती ते सहज देतात कारण त्या बदल्यात त्याना दृष्य स्वरुपात परतावा मिळतो ( नागरी सोयी, वृद्धापकाळातली काळजी वगैरे ) आणि सर्व व्यवहार कार्ड / बँक रुपात होत असल्याने, कर चुकवणे सोपेही नाही.>>
------ कॅनडात नोकरदार वर्ग असेल तर त्याच्या पगारातुन कर अगोदरच कापला जातो. माझी ३०-३५ % कर भरताना कुठलीच तक्रार नाही.
पण व्यावसाय करणारी "काही" लोक सर्व प्रकारचे फायदा घेतात (कायद्याने जेव्हढे ओरबडता येईल तेव्हढे...)... त्यान्ना ट्रम्पसारखे स्मार्ट समजायचे का कर चुकवणारे?
नवीन डेबीटकार्डाचा पिन
नवीन डेबीटकार्डाचा पिन टाकायचा आहे.पहिल्यांदा होम बँकेच्या एटीएममधून सुरुवात करा म्हणून सांगितले आहे.पण एटीएम मशीन्स चालू नाहीत.त्यामुळे आनंद आहे.आज परत जाऊन बघायचे आहे.
एटीएम बंद म्हणजे फक्त पैसे
एटीएम बंद म्हणजे फक्त पैसे देत नसतील बाकी कामे व्हायला हवीत.
काही मशिन्सची कनेक्टिविटी
काही मशिन्सची कनेक्टिविटी गेली आहे
बाकी कामे व्हायला
बाकी कामे व्हायला हवीत.>>>>>>> भरत., तसे नसावेच.कारण मी तिथे कार्ड insert केले तरीही स्क्रीनवर एटीएम मशिन आउट ऑफ ऑर्डेर असेच येत होते.
ATM मशिन्स सिस्टीम अपडेट साठी
ATM मशिन्स सिस्टीम अपडेट साठी बंद आहेत असे hdfc बँकेत कळले. दोन हजारच्या नोटेसाठी अपडेट आहे.
देवकी, काही लोक ह्या
देवकी, काही लोक ह्या प्रॉब्लेम मुळे पहिल्यांदाच डेबिट कार्ड वापरायला लागले आहेत. ते एंट्री करताना काही एरर करतात त्यामुळे सिस्टिम हँग होते. चुकीचा पिन टाइप करणे किवा तत्सम एरर. नॉर्मली अश्या एरर २% अस्तात. ऑफ ऑल ट्रान्जॅक्षन्स पण आता ते ११% वर गेले आहे कारण कस्टमर बिचकत बिचकत एंट्री करतात. त्यांना अनुभव नाही. असे दोन तीनदा झाले की फ्रॉड प्रोटेक्षन प्रणाली ओव्हर राइड करते व मशीन बंद होते. हे मी वाचले आज पेपर मध्ये थोड्या वेळाने ट्राय करा.
आली गुलाब्बो आली. ATM म्हणे
आली गुलाब्बो आली.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ATM म्हणे सिंक करत आहेत नव्या गुलाबोसाठी? विड्रोवेळी एका नोटे ऐवजी दोन नाही आल्या बाहेर म्हणजे मिळवली.
ए टी एम ला पैसे भरणारे लोक ,
ए टी एम ला पैसे भरणारे लोक , सॉफ्टवेअर लोड करणारे लोक , त्यांच्या गाड्या यांच्याच्साठी पैसा अजुन मिळाला नसेल तर मशीन सुरु कसे होणार ?
मी उल्लेख केलेल्या देशातही कर
मी उल्लेख केलेल्या देशातही कर चुकवेगिरी होतेच ( पण ती बहुतेक वेळा, नोकरीशिवाय इतर उत्पन्नचे साधन असणार्याकडून होते तसेच घरगुति स्वरुपातही होते ) अश्या करचुकवेगिरीचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर कितपत परिणाम होतो आणि ती पकडण्यासाठी तिथले सरकार काय करते, याची माहिती माझ्याकडे नाही.
आता परत भारताकडे वळू.. आपल्यापैकि अनेक जणांना कोण कर चुकवतात किंवा कोणाकडे अवैध मार्गानी मिळवलेला पैसा आहे याची नावासकट माहिती असते.. तरीही आपण ती माहिती कर यंत्रणेला देत नाही. याची मला
माहित / सुचत असलेली कारणे..
१) अनेकदा आपलेच काम अडलेले असते. असे पैसे भरण्याशिवाय पर्याय नसतो, ( असल्यास आपल्याला माहीत नसतो.)
२) तक्रार केल्यास ( त्वरीत ) कार्यवाही होईल, इतपत आपला यंत्रणेवर विश्वास नसतो.
३) तक्रार केल्यावर तिचा पाठपुरावा करण्याइतका वेळ आपल्याकडे नसतो आणि तपास यंत्रणा अत्यंत ढीसाळ
आणि वेळकाढू पद्धतीने काम करतात.
४) अशी तक्रार केल्यास आपल्यावर आकस धरून, पुढे आपल्यावरच सूड उगवला जाईल.. अशी आपल्याला खात्री
असते.
आता यावर कुठली सर्जिकल प्रक्रिया होतेय ते बघायचे आहे.
आमच्या लहानपणी म्युन्सीपाल्टी
आमच्या लहानपणी म्युन्सीपाल्टी शाळांमध्ये राजकारणी म्हणजे साधे कार्पोरेटर्स हो, तर ते ड्रेसवाटप करायचे. संपूर्ण गणवेश. मोजके दोन तीन लोक होते तिथले सुप्रसिद्ध. न चुकता दरवर्षीचा कार्यक्रम त्यांचा. आमची चंगळ. घरचे खुश.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एकदा एक शेट आले निवडून. त्यांनी डायरेक्ट ड्रेस कोडच बदलला. म्हणजे खाकी हाफ पॅन्ट शेवाळी रंगात आणि सफेद शर्ट निळीच्या रंगात रंगून पाठवलं.
नव्याची नवलाई. लोक खुश. पोरं खुश. दोन महिन्यांनी उन्हाळा आला. कॉटन नसलेला, सतत चुरगाळणारा ड्रेस अंगातला घामही शोषेना. मग काय शेटजी आपटले पुढच्याच निवडणुकीत.
फक्त ड्रेसकोड हे कारण नव्हतंच म्हणा
अजिबात त्रास झाला नाही. घरी
अजिबात त्रास झाला नाही. घरी येणार्या कामवाली बाईला, सोसायटीच्या वॉचमन ला सुद्धा काहीही अडचण नाहीये.
नातेवाईकात पण कोणाला काही त्रास झाल्याचे ऐकले नाही.
हायला , ब्यान्क नै , ए टी एन
हायला , ब्यान्क नै , ए टी एन नै , पैसे नै , खरेदी बंद , व्यवहार बंद ... तरी लोक सुखात आहेत.
मग काँग्रेसविरुद्ध का बोंबलत होते म्हणे ?
काल दोन गुलाबी नोटा हातात
काल दोन गुलाबी नोटा हातात आल्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नवर्याचं आयसीआयसीआय कार्ड घेऊन गेले कारण त्याला बरं वाटत नव्हतं तर "त्यांनाच यावं लागेल " म्हणून परत घरी येऊन त्याला आणि नाईलाजाने मुलीलाही घेऊन गेले. रांग होतीच म्हणून जाताना २ लाडू आणि पाणी पण नेलं.
त्याला तिथे सोडून मी माझ्या बँकेत गेले तिथे तासाभरात पैसे मिळाले. आयसीआयसीआय मधे मात्र सकाळी ११ ते दुपारी ४ इतका वेळ लागला. मधे कॅश संपली म्हणून नव्या कॅशची गाडी येईपर्यंत थांबावं लागलं. तिथे डिपॉझिट आणि विड्रॉवल असं दोन्ही आम्हाला करायचं होतं. माझ्या खात्यातून फक्त पैसे काढायचे होते. पण माझ्या रांगेतून ज्ये नां साठी वेगळी सोय होती. ज्ये ना असतील तर त्यांना लगेच आत पाठवत होते. स्वतः मॅनेजरसाहेब दाराशी येऊन लोकांशी बोलत होते. अगदी पूर्ण कोऑपरेट करत होते बँकेतले लोक.
आयसीआयसीआय च्या इथे मजा झाली. १२-१ च्या दरम्यान एक माणूस मोबाईलवर बोलत बरोबरच्या पोर्याला चहाचा स्टॉल लावायच्या सूचना देऊ लागला. लगेच बँकेतून कर्मचारी येऊन "इथे नको, बँकेच्या कंपाऊंडच्या बाहेर काय ते करा" म्हणून त्यांना रोखून गेला. कारण चहाचा स्टॉल ही पोलोटिकल खेळी होती आणि आधीच्या गोंधळात नवीन भर नको अशा सूचना होत्या. चहा-बिस्किट-पाणी काहीही द्या, पण बाहेर थांबा असं सांगित्लं. आमच्या भागात गुंठामंत्रीच खूप आहेत त्यामुळे राडेच झाले असते. मला त्या कर्मचार्याचं कौतुकही वाटलं आणि का माहिती नाही, वाईटही वाटलं.
बाकी मलापण त्या 'यिप्पी'
बाकी मलापण त्या 'यिप्पी' म्हणावंसं वाटतंय कारण आमची ओपिडी आज व्यवस्थित चालू आहे नेहमीप्रमाणे.
१२:३० पर्यंत तीनच पेशंट पाहून मला आजपण 'थंडाफराळ' करावा लागतोय की काय असे वाटत होते.
एका आजीबाईंनी हिशोब सांगितला.
गावात ५०० ची नोट बदलून ४५० मिळाले.
१०० रु वडापला जायला यायला, दिडशे रू तुला, ५०रू ची टेस्ट आणि १५० रू ची औषधे घेईन १५ दिवसांपुरती.
तर असा विचार करून सगळेच आलेले दिसतायत.
आता असा विचार करणार्या त्या आजीबाई काय सीए नाहीत, अर्थतज्ज्ञ नाहीत्,देशभक्त्/देशद्रोही नाहीत, देशाला लुबाडण्याची इच्छा करणार्यानाहीत तर आपला जीव वाचवायला बघणार्या एक शाळेतही न गेलेल्या वृद्धा आहेत.
त्या जर १० टक्के लॉस स्विकारून स्वतःचं कल्याण करून घेतायत तर या 'हुश्शार' लोकांचं काय नै!
काल २००० रू काढले ATM मधून,
काल २००० रू काढले ATM मधून, २० मि. रांगेत उभं रहावं लागलं. बाकी घरात ज्या ५-६ शंभरच्या नोटा होत्या त्यापैकी १ च खर्च झाली होती एवढ्या दिवसात, बाकी डेबिट कार्डवर काम भागलं. फक्त शनिवारी संध्याकाळी एका ठिकाणी १५०० रू द्यायचे होते पण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कुठलंच कार्ड चालत नव्हतं. मशीनचा किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. शेवटी ती खरेदी रद्द केली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घरात ज्या ५०० च्या नोटा आहेत त्या सावकाश १०-१५ दिवसांत बँकेत भरून येऊ.
मला इथल्या लोकांचे फार कौतुक
मला इथल्या लोकांचे फार कौतुक वाटते. इतके फटाफट इथे लिहिलेले वाचतात आणि त्यावर प्रतिक्रिया लिहितात. असो...
मला व्यक्तिश: काही त्रास झाला नाही.
मंगळवारी घोषणा झाल्यावर घराजवळच्या atm मधून ४ वेळा कार्ड swipe करून १६०० आणलेले. घरातल्या पिगी मधले आणि बाकीच्यांच्या खिशातले मिळून साधारण २२०० जमले. आईबाबा गावी गेलेत नाहीतर त्यांच्याकडे सहसा १०० आणि छोट्या नोटा असतात... १० तारखेला वहिनीच्या ऑफिसजवळच्या पोस्टऑफिसमध्ये सहज १५-२० मिनिटे रांगेत राहून १०००० काढता आले. पण त्यानंतर तिथली रांग वाढतेच आहे. घरी नोकर नसल्याने त्या सामाजिक स्तरातल्या लोकांची काय अवस्था आहे त्याचे अनुभव नाहीत. दुधवाल्याने महिन्याचे बिल चेकने घेतले. त्याला विचारल्यावर तो म्हणाला, त्याचे घेणेकरी चेक पेमेंटला तयार आहेत. दुधवाला ५००-१००० च्या जुन्या नोटा घ्यायला तयार होता. शेजाऱ्यांनी दिले. पण आता त्या कायदेशीर नाहीत आणि सगळे तज्ञ नोटविरहीत व्यवहार चांगले सांगतात म्हणून मी चेकच दिला. काल टीवीवर कुठल्याशा मासळीबाजारात कोळीण धंदा मंद आहे सांगत होती म्हणून बाजारात बघायला गेलो, तर काही फार फरक वाटला नाही. कोळणी जुन्या नोटा घेत होत्या. जिच्याकडून घेतले तिला विचारले तर ती म्हणाली त्यांच्या बँकेचे अधिकारी त्यांच्याकडे येऊन त्यांना पैसे बदलून देत आहेत (??)
पण म्हणून हा निर्णय चांगला आहे असे मी अजून ठामपणे मत बनवू शकत नाही. बातम्यांमध्ये बंगालातल्या मालदा मध्ये भिकारी लोक एक्ष्चेन्जच्या रांगेत उभे असलेले दाखवले. एक नवा सिझनल धंदा उदयाला आलेला दिसतोय... त्याशिवाय सरकारी कार्यालये सोडता खाजगी इस्पितळे, औषध दुकाने, पेट्रोल पंप मध्ये नोटा चालवण्याला परवानगी दिल्याने मोठ्ठा लूपहोल असल्यासारखे वाटते. जितके जास्त दिवस ही सवलत आहे, तितके दिवस संधी उपलब्ध असणार. जसे साती ह्यांनी पेशंटने दिलेल्या १० नोटा स्वत:कडे ठेवून स्वत:च्या दोन नोटा इस्पितळाच्या खात्यात टाकल्या (प्लीज त्या खूप चांगले काम करत आहेत. मी केवळ एक उपलब्ध मार्ग ह्या अर्थाने हे उदाहरण वापरत आहे) तसेच ईतर आस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. अगदी बँक कर्मचाऱ्यांकडे जनधन मध्ये उघडलेल्या मोठ्या प्रमाणावरील खात्यांचे KYC उपलब्ध असल्याने तिथून फेवरेबल पार्टीजना सुविधा पुरविली जाऊ शकते. मध्ये कुठेतरी वाचले, जवळपास २५% जनधन खात्यांचे पुरेसे KYC नाहीच आहे...
समजा वैध आणि अवैध (पाकिस्तान किवा अन्य समाजकंटकांनी छापलेल्या) नोटा मिळून बाजारात एकूण १०० रू असले तर त्यातले ८०-८५ म्हणे ५००-१००० च्या नोटात आहेत म्हणे. ह्यातले समजा ३५-४० काळ्या पैशांच्या स्वरुपात अचल स्वरुपात कुणाच्या घरी, कार्यालयात, इथे तिथे असतील. सगळ्यांनाच मान्य आहे की भारतातील माणसे वाटा शोधून काढण्यात पटाईत आहेत. तर वरती म्हटलेल्या आणि इतर मला न सुचलेल्या अनेक मार्गांनी ह्या ३५-४० मधले २०-२५ तरी नव्या नोटांच्या स्वरुपात परत अचल होतील असे मला वाटते. विरोधक किंवा काही अर्थतज्ञ म्हणतात त्याप्रमाणे जवळपास ६०-७०% जनतेला ह्या मोठ्या नोटांची म्हणे गरजच नाहीय. म्हणजे त्या उरलेल्या १५-२० साठी ६०% जनतेला उगीच त्रास सहन करावा लागत आहे. (त्या ६०-७०% मधल्या ३०-४०% कडे तेव्हढीही क्रयशक्ती नसेल पण ६०-७० व्यतिरिक्त उरलेल्या ३०-४०% मधल्या आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना पण ह्या रांगांत उभे राहावे लागेल) पेपरात आले त्याप्रमाणे पूर्वेच्या सात राज्यातल्या काही जिल्ह्यामध्ये म्हणे पूर्ण जिल्ह्यात १-२ बँक शाखा आहेत. लोकसंख्याही कमी असेल, पण अंतरे जास्त असतीलच ना... म्हणजे लोकांना पैसे बाळगण्याची सवय असेल आणि आता ते त्यांना बदलून घ्यावे लागतील. वरती माल्द्यामध्ये भिकारी रांगेत लागलेले म्हटले. त्या लोकांना नवा ऐच्छिक व्यवसाय मिळाला असेल कदाचित पण उत्तरेतल्या राज्यांत असलेली ऐकीव गुंडशाही पाहता, काही लोकांना बळजबरीने हे करावे लागू शकेल...
सगळ्यांचेच निरीक्षण आहे की रांगांमध्ये श्रीमंत लोक अगदीच विरळा आहेत. श्रीमंतातल्या काळ्या पैसावाल्यांनी मार्ग शोधले असावेत आणि काळा पैसा नसलेल्यांचे कार्डने काम चालत असेल.
२००० ची नवी नोट म्हणे खुपच तकलादू, नाजूक वाटते. मग एक मोठ्ठी शक्यता आहे नंतर ती नोट सुद्धा रद्द केली जाऊ शकते. पण मग एक विचार येतो, सपना हरिनामे यांनी २र्या पानावर म्हटल्यासारखे, जर १-१.५ वर्षापूर्वी २०००-५००० असे काही मोठे चलन बाजारात उपलब्ध केले असते, तर आता असलेल्या त्या ३५-४० काळ्या पैशातले, २५-३० मोठ्या नोटांमध्ये परिवर्तीत झाले असते. मग त्या नोटा बंद केल्या असत्या तर सामान्य माणसांना इतका त्रास झाला नसता (जसे मोरारजी देसाईंनी १०००० च्या नोटा बंद केलेल्या तेव्हा)
बँकांच्या एस एम एस नी वैताग
बँकांच्या एस एम एस नी वैताग आला आहे. प्लीज गो थ्रू कॅश डीटॉक्स. डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरा.
पे टीएम वगैरे वापरा. अॅप डाउनलोड करा. सर्वात सोपी स्ट्रॅटेजी. काही दिवस चुप्प बसणे, आहे त्यात भागवणे. व भर ओसरला की बँकेचा रस्ता पकडणे ही आहे. अर्थात इमर्जन्सी किंवा लग्न कार्य प्रॉपर्टी पर्चेस, आजार पणे असे काही नसेल तरच. मेजर खरेदीचा भर दिवाळीत ओसरून गेल्यानंतर हे केले आहे हे बरे. नाहीतर अजूनच जास्त त्रास झाला असता. मध्यमवर्गीय वृत्ती म्हणजे लक्ष्मी पूजनात आपण हजार पाचशेचीच नोट ठेवतो. मोठी जास्त मानाची म्हणून. आता त्याचे काय?!
जर १-१.५ वर्षापूर्वी
जर १-१.५ वर्षापूर्वी २०००-५००० असे काही मोठे चलन बाजारात उपलब्ध केले असते, तर आता असलेल्या त्या ३५-४० काळ्या पैशातले, २५-३० मोठ्या नोटांमध्ये परिवर्तीत झाले असते. मग त्या नोटा बंद केल्या असत्या तर सामान्य माणसांना इतका त्रास झाला नसता (जसे मोरारजी देसाईंनी १०००० च्या नोटा बंद केलेल्या तेव्हा) >>
vt220, याच धाग्यावर दुस-या पानावर मी हे लिहीले आहे.
vt220, याच धाग्यावर दुस-या
vt220, याच धाग्यावर दुस-या पानावर मी हे लिहीले आहे. >>> हो की!!! मी एकदमच विसरुन गेले. माझा इथले सगळे वाचण्याचा वेग खुपच कमी आहे, त्यामुळे असे झाले असेल आणि सबकाँशीअस माईंडमधे कुठेतरी रजिस्टर झालेले विचार आपलेच असे वाटून वर आले असतील. धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल.
अहा! पिन नंबर टाकला.मशिनमधे
अहा! पिन नंबर टाकला.मशिनमधे पैसे नव्हते,पण चालू होते.आता कसं गारगार वाटलं.कारण डेंस्टीटला चांगलीच अमाउंट द्यायची आहे.
My experience, 10 min ago. I
My experience, 10 min ago.
I was near goregaon station, with no money and hungry.
Yday had read alot about how common vendors have started accepting money thru paytm.
So downloaded d app
It has a feature called nearby. Registered vendors appear under that tab.
Nearest food joint that accept paytm was 2.3 km away.
Just to try my luck asked few decent sized stalls if the take paytm.
They don't.
So gupchup train pakdun ghari jatoy.
If this is the condition in mumbai, i really doubt who accepts online wallet in tire 3 cities and villages.
मीच वाईट असेन, म्हणून मला
मीच वाईट असेन, म्हणून मला वाईट अनुभव येत आहेत![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
>>मीच वाईट असेन, म्हणून मला
>>मीच वाईट असेन, म्हणून मला वाईट अनुभव येत आहेत <<
नजरीया बदलो, लगता है निगेटिविटी आपमें कुटकुट के भरी है...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुशिक्शीत, स्मार्ट फोन वापरणारेच आल्टरनेटिव पेमेंट्स चा उपयोग करण्यावर भर देत नाहि तर इतर सामान्यांची काय कथा? जसजसे जास्त लोक याचा वापर करायला लागतील तसतसे फुटकळ वेंडर्स हि टेक्नाॅलाॅजी ॲडाॅप्ट करतील. केवळ स्मार्टफोन आणि बॅंक अकाउंट हिच प्रिरेक्विसीट असताना कॅशलेस ट्रांझॅक्शन्स लोकप्रिय होण्यास काहिच अडचण नसावि...
Pages