तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
मिलिंद जाधव, काळा पैसा असलेले
मिलिंद जाधव,
काळा पैसा असलेले लोक म्हणजे नक्की कोण? व्यापारी, उद्योजक, लघुउद्योजक, सेल्फ एम्प्लॉयीड लोक, बिल्डर्स, राजकारणी, सरकारी बाबू वगैरे ना? यातले बहुसंख्य हे भाजपच्या मतदारवर्गात मोडतात ना? भाजपचे कित्येक खासदार/आमदार हे बडे बिल्डर्स, उद्योजक आहेत. बराचसा नवश्रीमंत वर्ग हा भाजपचा आश्रयदाता आहे. सरकारे म्हटली तर सर्वत्र भाजपचीच आहेत. अनेक संस्थांवर भाजपने समविचारी लोकांची नेमणूक केली आहे. उदा. फिल्म इन्स्टिट्यूट आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू (नक्की मराठी शब्द कोणता? कुलगुरू की उपकुलगुरू? मला वाटते कुलपती आणि कुलगुरू अशा संज्ञा आहेत.) अनेक आहेत.
शिवाय हा वर्षांनुवर्षांचा काळा पैसा नाही. कारण काळा पैसा हटवण्याच्या घोषणा, अॅम्नेस्टी स्कीम्स मधून मधून होतच असतात. १९४७ सालापासूनचा काळा पैसा लोकांकडे अजून शिल्लक असेल हे म्हणणे बालिश आहे. त्या काळी पैसा इतक्या मोठ्या प्रमाणावर मुळी चलनातच नव्हता. माला सिंह या अभिनेत्रीकडे सतरा लाख रुपयांची रोकड मिळाली ही बातमी तेव्हा किती सनसनाटी ठरली होती. राजीव गांधींवर बोफोर्स प्रकरणातल्या ८४ किंवा तत्सम कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांची सत्ता गेली. ही रक्कम आजच्या काळात अक्षरशः कणभर इतकी आहे. त्या काळची रोकड आज अस्तित्वात असणे शक्य नाही. ही रक्कम तेव्हाच गुंतवून इतर अॅसेट्स निर्माण केलेले असू शकतात. अर्थतज्ज्ञ तेच तर सांगत आहेत. काळा पैसा नोटांमध्ये फारसा नाही. आणि ५००/१००० रुपयांच्या नोटा ह्या त्या मानाने अलीकडे चलनात आल्या. जुन्या नोटा एक दोन वेळा चलनातून काढून घेतल्या गेलेल्या आहेत.
आता समजा असा तर्क कुणी लढवला, की आपल्या आश्रयदात्यांची सोय व्हावी म्हणूनच नोटा रद्द केल्याचा आदेश काढूनही त्या काही प्रमाणात चलनात राखल्या आहेत; तर?
माझे unbiased अनुभव.
माझे unbiased अनुभव. Documentation म्हणून लिहून ठेवतेय.
घोषणा कळल्याक्षणी पैसे काढूया असा विचार चाललेला. गरज नाही असं नवऱ्याचं मत पडल. त्यामुळे + कुणी जायचं ह्या मुद्द्यामुळे नाही काढले. पेटीएम चार्ज करायला प्रोब्लेम होतोय.
घरात जवळपास ६०० रुपये होते. तीस खर्च केले पहिल्या तीन दिवसात. भाजी गावावरून येताना आणली होती.
परत गावाला गेलो. कार असल्यानं cash चा त्रास झाला नाही.
गावाला जाण्यापूर्वी बाईना १५० दिले त्यांच्याकडे नव्हते म्हणून.
सातारला २० मिनिटस च्या लाईन मधे थांबून नवऱ्याने अन मी ४००० काढले. त्यातले २७०० खर्च झाले. Gas आणि नातातल्या आजीना cab ने नेले आणले + बाईंना ११०० दिले ते धरून.
भाजी आणून ठेवली भरपूर सातारहून. बहीण आणि बाईसाठीही.
कडधान्य आहेतच. मोअर आहे समोर. गरज पडली तर बाईना मला तिथून सामान भरून घेईन कार्डवर.
सातारला मंडई मधे विक्रेत्यांकडे भरपूर cash दिसली.
ओळखीवर उधारीही हूओ शकते छोट्या गावात.
पुण्यामुंबईसारख्या शहरात जास्त प्रोब्लेम असावा असं जाणवलं.
शाई वापरण्याची पद्धत आत्ता
शाई वापरण्याची पद्धत आत्ता वापरणार. इतके दिवस या परत परत नोटा बदलायला येणारांनी गर्दी केली होती ते पाहून. म्हणजे असे होऊ शकते याचा कोणी विचारच नव्हता केला?
आम्ही छोट्या कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापनावाले पण कोणतीही गोष्ट नवीन सुरू करताना आधी टेबलटॉप एक्झरसाईझ करतो. सगळ्या महत्त्वाच्या खात्यातल्या एकाएकाला घेऊन टेबलाभोवती बसून - हे झाले तर काय कराल - असा प्रश्न विचारतो. मग तासभर वेगवेगळ्या संभावित घटना व त्यातून नुकसान होऊ नये म्हणून असणारी आपली तयारी पाहिली जाते. या सगळ्याचा व्यवस्थित रिपोर्ट बनतो. त्यावर परत आमची टीम काम करते. जर एखादी त्रुटी राहत असेल तर त्यावर काम होते व महीनाभरात परत मिटींग होते अपडेट द्यायला.
असं कितपत काम झालं असावं या निर्णयाबाबत याबद्दल साशंक. झालं असणार हे नक्की, पण ज्याप्रमाणे नवीन नवीन निर्णय रोज घेतले जात आहेत, पूर्ण तयारी अजिबात दिसत नाहीय. पूर्णच काय खूपच कमी तयारी दिसतेय.
यांनी चांगलं लिहीलय
यांनी चांगलं लिहीलय :
http://indianexpress.com/article/business/banking-and-finance/demonetisa...
सुप्रिम कोर्टाने रीपोर्ट
सुप्रिम कोर्टाने रीपोर्ट मागवलाय सरकारकडुन की लोकांची गैर्सोय होऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्यात.
माझ्या बॅकच्या ब्रान्चमधे ज्यांची खाती आहेत त्यांनाच पैसे भरायला प्राधान्य आहे. त्यामुळे ज्यांना इथुन गावी पैसे पाठवायचे आहेत त्यांची अस्वस्था बिकट झाली आहे. कारण व्हेरीफिकेशन्साठी सर्व्हरला कनेक्ट केलं की लगेच हॅन्ग होतो आहे टर्मिनल
कँडी रेस्टॉरंट , लीलावती
कँडी रेस्टॉरंट , लीलावती हॉस्पिटल जवळ,
हे फक्त कॅश घेतात, सुरवाती पासूनच.
हॉटेल मधली उपस्थिती रोडावली आहे
पण अजूनही ते पद्धत बदलायला तयार नाहीत.
फायनली एका हॉस्पिटल च्या आत असलेली ATM मधून 100 च्या नोटांमध्ये 2500 रु मिळाले,
हमी तो अमीर बन गये भय्या
आता मला कळल की छोट्या नोटांची
आता मला कळल की छोट्या नोटांची इतकी कमतरता का आलीय.
कोणालाही १०० आणी त्या खालील किमतीच्या नोटा मिळाल्या की ते सरळ मोदींकडे जावुन त्यांना ५००/१००० मधे बदलुन स्वतःजवळ ठेवत होते........(आता त्या लहान नोटा मोदींकडे जमा असुन ते जनतेला अडचण करावी म्हणुन थोड्या थोड्या बँकांना देत आहेत.)
आल्या लहान नोटा....बदल मोठ्या नोटांमधे नी ठेव स्वतःजवळ,
आल्या लहान नोटा....बदल मोठ्या नोटांमधे, नी ठेव स्वतःजवळ.
तर झालं अस की सगळ्यांकडे आता फक्त आणी फक्त ५०० व १००० च्याच नोटा शिल्लक आहेत.
हा घोर अन्याय केलाय मोदींनी भारताच्या जनतेवर, जनता त्यांना पुढच्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही.
बाद्वे, मी अजुनही माझ्याजवळच्या ५००/ १००० च्या नोटा बदलुन आणल्या नाहीत आणी आणणारही नाही.
राहुलजींना अध्यक्ष बनवणार आहेत. पुढच्या निवडणुकी नंतर ते पंतप्रधान झाले की हा निर्णय फिरवुन पुन्हा ह्याच नोटा जिवीत केल्या जातील म्हणुन जपुन ठेव्तोय.
मीपण माझ्या नोटा २ फक्त तशाच
मीपण माझ्या नोटा २ फक्त तशाच ठेवणार आहे. पन्नास वर्षानी त्या अँटिक पीस म्हणून विकणार आहे.
लोकांना रिऍलिटी शो च्या
लोकांना रिऍलिटी शो च्या रांगेत उभे राहायला आवडते ज्यात यश कमी अपयश जास्त पदरात पडते, डिपार्टमेंट स्टोर मध्ये लागलेल्या सेल साठी रांगा लावतील त्यात ओरिजिनल कमी नकली जास्त मिळते, जिओ च्या सिम साठी लाईन लावतील त्यात डेटा जास्त मिळतो पण अनिश्चितताची टांगती तलवार आहे. आणि इथे ATM / बँकेत स्वतःचे पैसे डिपॉजिट / काढण्यासाठी लोकांना लाईन लावायला कंटाळा येतोय किंवा त्याचा त्रास होतोय...कमाल आहे.
अपर्णा, अगदी अगदी.... पण असेच
अपर्णा, अगदी अगदी....
पण असेच अस्ते/आहे असे नाही.... लोकांना महामूर त्रास होतोय, त्यांचा छळ होतोय ही पिरपिर लाले/कॉन्गी-केजर्यांन्नी लावलेली आहे....!
>>> हा घोर अन्याय केलाय मोदींनी भारताच्या जनतेवर, जनता त्यांना पुढच्या निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही. <<<<<
अहो कितिकांना तितकाही धीर नाहीये हो.... ते आत्ताच धडा शिकवायला निघालेत.... त्या करता पब्लिकला ओरडुन ओरडुन सांगताहेत सर्व मिडियातुन, की "तुमच्यावर अन्न्याव" होतोय.... !
अपर्णा. ताई तुम्ही पण
अपर्णा. ताई तुम्ही पण नां.
एकदा बोल्लेत ना वर सगळे अडचण आहे तर आहे.
होना, वात्रट कुठले लोक
होना,
वात्रट कुठले लोक सगळे!
आमच्या ओपिडीत आलेली ७० वर्षांची आजीबाई मोदींच्या नावाने बोटं मोडत होती तेव्हा मी तेच सांगितलं,
' आज्जे, सारेगमच्या लायनीत उभी राहिलीस, आमच्या गावातच नसलेल्या मोठ्ठ्या सुपरमार्केटच्या लायनीत उभी राहिलीस, जिओसिमच्या लायनीत उभी राहिलीस तेव्हा करवादली नाहीस. आता कशाला कीरकीर करतेस? मोदींची तर ९६ वर्षांची आईपण लायनीत उभी राहिली.'
म्हाताती म्हणाली, ' निम्म हेण्णा होग ग्वाडीमॅग कुडले'
डॉक हा फाउल आहे. त्याबद्दल
डॉक हा फाउल आहे.
त्याबद्दल नाही म्हणत, तुम्ही मोदींची इनडायरेक्ट भलामण केलीत आजींजवळ म्हणुन म्हणालो फाउल आहे असं![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'मुडदा बश्शीवला तुझा
'मुडदा बश्शीवला तुझा भित्ताडाला टेकून!'
आमच्या लोकल कानडीतलं
आमच्या लोकल कानडीतलं केवलप्रयोगी अव्यय आहे.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आजीबाईंनी मला उद्देशून शिव्या दिल्या हो.
अपर्णा, तुम्ही म्हणताय
अपर्णा, तुम्ही म्हणताय त्यापकी कोणत्याही रागेत मी कधीही उभा नव्हतो. आणि बँकांपुढच्या रांगांतल्या लोकांना विचारा ते यातल्या कोणत्या रांगांत कधी उभे होते ते.
>>> भाजीवाल्याकडे जाऊन
>>> भाजीवाल्याकडे जाऊन म्हणायचे माझे बिटकॉईनसारखे अशीर्वाद कॉईन आहेत ,देतो का भाजी? भाजी दिली तर सांगा ,आम्हीही नमोरुग्ण व्ह्यायला तयार आहोत. <<<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बिटकॉईन? कशाला? चिंचोकेही शोधायला नाय लागले आम्हाला......
आमचा भाजीवाला "क्रेडिटवर" देतोय भाजी...... लिहुन ठेवतो, सावकाश महिन्याभराने द्या पैसे जमतील तेव्हा म्हणाला...... ! बरे, एक भाजीवाला नाही, मंडईतले चारपाच भाजीवाले आहेत... त्यात एक मुस्लिमही आहे
दुधवाला दुध देतोय, औषधेवाला औषधे देतोय, लागतय काय अजुन जगायला?
आठ तारखेपासुन मी केवळ सहाशे रुपयांवर सातारा ट्रीपही करुन आलो, त्यातले ३०० रुपये रुद्राक्षांच्या माळा वगैरे खरेदीकरता वापरले, शेसव्वाशे खाण्याकरता, आता फक्त शंभर रुपये आहेत खिशात......
अजुन पंधरा दिवस तरी मला काहि फरक पडत नाही...! आज वाढदिवस माझा, तरीही खिशात पैका नाही याचा मला काही फरक पडला नाहीये....! पडणारही नाही.
तसेही ब्यांकेतुन काढायला तिकडे ब्यालन्स हवा ना! किंवा ब्यान्केत भरायला हजारपाचशेच्या थप्प्या हव्या ना....
त्या नाहीत आमच्याकडे, त्यामुळे आम्ही सर्वसामान्य/अतिसामान्य जन अतिसुखी आहोत...
त्यांचा छळ होतोय ही पिरपिर
त्यांचा छळ होतोय ही पिरपिर लाले/कॉन्गी-केजर्यांन्नी लावलेली आहे....! >> लाईनीत सगळे लाले आणि काँग्रेस्वालेच आहेत की. नाहीतरी ३२% लोकांनीच मोदीकाकांना निवडुन दिलं होतं म्हणा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
भरत. | 15 November, 2016 -
भरत. | 15 November, 2016 - 18:41 नवीन
अपर्णा, तुम्ही म्हणताय त्यापकी कोणत्याही रागेत मी कधीही उभा नव्हतो. आणि बँकांपुढच्या रांगांतल्या लोकांना विचारा ते यातल्या कोणत्या रांगांत कधी उभे होते ते.
>>>>>>>>>>>>>
इथे मायबोलीकर जसे इन जनरल बोलत आहेत किंवा लोकांचे/स्वतःचे किस्से सांगतात तसेच मीही इंन जनरल बोलत आहे हो ..........
अपर्णांच्या अऑटोमेटेड कॉलवर
अपर्णांच्या अऑटोमेटेड कॉलवर बोलायचा प्रयत्न केल्याबद्दल क्षमा करा.
अर्थ नाही काळाला
अर्थ नाही काळाला सर.............
अपर्णा. | 15 November, 2016 -
अपर्णा. | 15 November, 2016 - 16:57
लोकांना रिऍलिटी शो च्या रांगेत उभे राहायला आवडते ज्यात यश कमी अपयश जास्त पदरात पडते, डिपार्टमेंट स्टोर मध्ये लागलेल्या सेल साठी रांगा लावतील त्यात ओरिजिनल कमी नकली जास्त मिळते, जिओ च्या सिम साठी लाईन लावतील त्यात डेटा जास्त मिळतो पण अनिश्चितताची टांगती तलवार आहे. आणि इथे ATM / बँकेत स्वतःचे पैसे डिपॉजिट / काढण्यासाठी लोकांना लाईन लावायला कंटाळा येतोय किंवा त्याचा त्रास होतोय...कमाल आहे.
>>
मी नाही राहिलो यापैकी एकाही रांगेत, पण आता बँँक आणि ATM च्या रांगेत उभे राहतोय.
अनेक लोकांना उभे राहावे लागतेय, कारण रियलिटी शो, सेल, जिओ सिम काही मूलभूत गरजा नव्हत्या पण रोकड मात्र मुलभूत गरज आहे.
राहुलजी, ऑटोमॅटेड कॉल आहे
राहुलजी,
ऑटोमॅटेड कॉल आहे तो.
प्रत्येक धाग्याला लागला.
नका बोलू.
नातेवाईकांकडे लग्न कार्य आहे,
नातेवाईकांकडे लग्न कार्य आहे, भटजींना दक्षिणा कशी द्यावी हा प्रश्न पडलाय त्यांना.
पेटीएमवर द्या, चेक द्या,
पेटीएमवर द्या, चेक द्या, बिटकॉईन्स द्या(म्हणजे काय असतं मला माहित नाही.)
राहुलजी काय , राहुल
राहुलजी काय :इश्श:, राहुल म्हणा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
डोळा नाही मारला तरी चालेल.
अय्यो, आता माझ्या लिखाणात बाय
अय्यो,
आता माझ्या लिखाणात बाय डिफॉल्ट डोमा स्मायली दिसतोय का?
मी नाही मारला हो डोळा!
काहीही म्हणा पण अक्खा भारत आज
काहीही म्हणा पण अक्खा भारत आज ब्यांकांसमोर "रांग"तोय हे नक्की
एवढे प्रतिसाद वाचल्यानंतर एक
एवढे प्रतिसाद वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली , इथले बरेचसे लोक आहे त्या परिस्थितीत जुळवुन घ्यायचा प्रयत्न करताहेत , फक्त एक ठरावीक ग्रुप ठणाणा करतोय.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
नै तर काय! वात्रट मेले!
नै तर काय!
वात्रट मेले!
Pages