तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
<या सगळ्या मुद्यांचा उहापोह
<या सगळ्या मुद्यांचा उहापोह वर झाला आहे.>
ऑटोमेटेड फोन कॉल आला तर तुम्ही त्या आवाजाशी बोलू शकता का?
छान लिहिलंयत भम! परखड एकदम!
छान लिहिलंयत भम!
परखड एकदम!
काही आयडींचा जवळ जवळ आठवडाभर
काही आयडींचा जवळ जवळ आठवडाभर इथल्या तीन चार धाग्यांवर (बाकीच्या संकेतस्थळांचं माहीत नाही) चाललेला थयथयाट पाहून वाटतयं की एव्हडी एनर्जी योग्य प्रकारे वापरली तर ऑलिंपिक नाही पण निदान एशियाडमध्ये तरी मेडल मिळू शकेल ह्यांना... तेव्हडीच देशसेवा!
अहो देशद्रोही असल्याचं
अहो देशद्रोही असल्याचं सर्टफुकट केव्हाच मिळालंय आम्हाला.. तुम्ही परत त्याचीच प्रत प्रमाणित करून देताय का? द्या द्या. फाइलला लावतो.
देशसेवेच्या उपलब्ध संधींबद्दल एक अत्यंत विखारी आणि व्यक्तिगत प्रतिसाद बोटांवर आलाय. पण जाऊ दे नाही लिहीत.
पराग, निर्णयाचे प्रत्येक
पराग,
निर्णयाचे प्रत्येक धाग्यावर हिरिरीने समर्थन करणारे पण काही ठराविक आयडी आहेत ही गंमत लक्षात आलीय का तुमच्या?
त्यांची एनर्जी योग्य प्रकारे वापरली तर 'मौजे उंबरणे, बुद्रुक' अशा गावच्या अंडरआर्म स्पर्धेत फिरती ट्रॉफी मिळेल नै!
भरत, तुम्ही का त्रास करून
भरत, तुम्ही का त्रास करून घेताय पण? तुम्ही थयथयाट करत आहात का?
असो!
हायला, मी सन्माननीय अपवादात
हायला, मी सन्माननीय अपवादात मोडत नाही हो. तुम्हाला सांगितलं नाही का त्यांनी?
आम्ही सगळे एकच म्हणतोय. कोणी एक थयथयाट करत. कोणी एक लाडेलाडे. माझं तुम्हाला तेवढं थयथयाटी वाटलं नाही याबद्दल आभार.
बरं, अवांतरात, ती मनात
बरं, अवांतरात, ती मनात गुंजणारी बंदिश एडिट झाली बरं का.
***
याबरोबरच आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम संपले.
हा मी निघालो बँकेच्या लायनीत उभा रहायला!
भरत. | 14 November, 2016 -
भरत. | 14 November, 2016 - 22:55
हा असा धागा का काढावा लागतो? लोकांचे हाल होताहेत हे का सांगावं लागतं? >>>> प्रतिसाद पटला़. सहमत आहे.
आत्ताच टीम मधल्या दोघांचा फोन
आत्ताच टीम मधल्या दोघांचा फोन आला की आज नाही येऊ शकत. आज पैसे काढायला नाही मिळाले तर उपाशी रहावं लागेल. किती वेळ उभं रहावं लागेल माहीत नाही आणि नंतर ऑफीसला यायची ताकद असणार नाही. काही अर्जंट असेल तर फोनवर असू म्हटले दोघंही! विकेंडला ते पण बिचारे ट्रेनिंगमधे होते १७००० वाचवायला आणि ३०० रूपये देऊन वडापवाल्यांबरोबर गेले होते पुण्याला.
काय खरं नाय. काल पण बरेच रजेवर होते ऑफिसात ज्यांनी विकेंडला काढूया पैसे म्हणून दोनतीन दिवस आहे त्यावर भागवलं नी विकेंडला सगळीकडे महागर्दी नी नोटा संपल्याचे फलक.
रांगांत उभं राहून आणि
रांगांत उभं राहून आणि राहिल्याने किती उत्पादक मनुष्यतास वाया गेले असतील हे विचारायचा अधिकार खरं तर मला नाही, कारण मी सर्ट्फाइड रिकामटेकडा आहे.
मी चालले बॅंकेत. आता १०,०००
मी चालले बॅंकेत. आता १०,००० मिळत आहेत (असं ऐकलं)
काल हॉटेल मध्ये ६७५ रु सुटे
काल हॉटेल मध्ये ६७५ रु सुटे दिले १००,५० आणि १० च्या नोटांमध्ये.
(घरात नातेवाईक आहेर बारसे डोहाळेजेवण इ. चे वर्षानुवर्षं पाकिटांत वगैरे असलेले पैसे.अजून एटीएम मधून काढलेले नाहीत.)
बाजूच्या टेबलावरील माणसं नोटांकडे चॉकलेट केक कडे बघावं तशी बघत होती हे पाहून गंमत वाटली.
बाकी जमेल त्या गरजू सर्व्हिस प्रोव्हायडरला ५०० चे सुट्टे ऑफर करते आहे.
गेल्या आठवड्याभरात फक्त एकदाच
गेल्या आठवड्याभरात फक्त एकदाच एटीमवर गेलो व दोन हजार रुपये मिळाले. तेही महाराष्ट्रापासून फार लांब असताना! त्यानंतर एटीमची गरज भासलेली नाही.
पण देशातील ऐंशी टक्के जनता कार्ड वापरत नाही. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणूनतरी नोटा न बदललेल्या बर्या! नुसती २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ काही कामाची नाही. ही सगळी प्रक्रियाच रिव्हर्स व्हायला हवी आहे. भले यू टर्न अशी खिल्ली उडवली गेली तरी चालेल.
सगळे सुरळीत चाललेले असताना हा काय गोंधळ घालून ठेवला उगाच!
खरं आहे बेफिकीर. शेवटी
खरं आहे बेफिकीर.
शेवटी सामान्यांच्या त्रासाबद्दल तुमच्या सार्कॅस्टीक मनाला तरी वाईट वाटलं बघून किंवा तुमच्या मनाला सार्कॅस्टीक का होईना वाईट वाटलं ते बघून डोळे पाणावले माझे!
काल फेसबुकवर एका अहमदाबादच्या
काल फेसबुकवर एका अहमदाबादच्या आमच्या एका फॅकल्टीची पोस्ट वाचली... त्यांचा एक मित्र पॉझिटिव्ह स्टोरीज सोशल मिडियावर पसरवण्याचे काम करतो. नुकतीच पसरवलेली बातमी सुरतच्या हिरे व्यापाऱ्याची आहे. बातमीत नाव खरं आहे फॅक्ट थोड्या प्रमाणात बदललेत म्हणे. सरेंडर केलेल्या पैश्याचा आकडा खोटा आहे असं त्यांनी लिहिलंय. तसेच अशा बऱ्याच बातम्या हळूहळू येतिल असं ही लिहिलंय.
कृपया ईतरांना देशद्रोही आणि
कृपया ईतरांना देशद्रोही आणि स्वतःला बाय डिफौल्ट देशप्रेमी सर्टिफिकेट वाटू नका.
हमाम मैं सब नंगे हैं. काही जण लाजत असतील तर गोष्ट वेगळी.
पण म ज्यांचं काम सर्टीफिकीटे
पण म ज्यांचं काम सर्टीफिकीटे वाटणं हेच आहे त्यांनी काय करायचं म्हणे?
आता बँकेत जावुन आले पैसे
आता बँकेत जावुन आले पैसे डिपॉझिट केले अन १५ मिनिटस मध्ये परत आले.. कॅशियर एक मुलगी होती पण तिला मदत करायला अजुन तिच्या बरोबर एक मुलगी आली अन पटापट सगळ्यांचे पैशे डिपॉझिट झाले.. पण विथड्रॉवल साठी बरीच जण बसली होती अन फक्त ५००० च काढु शकत होते पैसे बँकेतुन. एटीएम मध्ये लाईन होती पण फक्त ९-१० लोकं होती. काहि कुठे गडबड नाहि कि गोंधळ नाहि लोकं उगाच बडबडत बसतात.
भावना गोवेकर, निवृत्त बँक
भावना गोवेकर,
निवृत्त बँक कर्मचारीही फुकटात कामं करत आहेत बँकांमध्ये बसून असे ऐकले. केवळ जनसामान्यांचे हाल कमी व्हावेत म्हणून! पण मुळात हे केलंच नसतं तर एवढा घोळच झाला नसता.
भरत. , मुळात तुमच्याकडच्या
भरत. ,
मुळात तुमच्याकडच्या ५००-१००० च्या नोटा तुमच्या बँक खात्यातच जमा करा, अशी अट ठेवणं शक्य असताना, कोणत्याही ओळखपत्रावर कोणत्याही बँकेतून त्या नोटांच्या बदल्यात एका वेळी ४००० रुपये बदलता येतील अशी पळवाट सोयिस्करपणे का ठेवली असावी?>>>
यात सोय नाही का सामान्य माणसांची? बँकेत पैसे भरा, मग परत ते काढा, यात वेळ घालवण्यापेक्षा थेट नोटा बदलून मिळत असतील, तर काय वाईट आहे?
वावे, हा उपद्व्याप सोय व्हावी
वावे, हा उपद्व्याप सोय व्हावी म्हणून केलाय की काळा पैसा बाहेर यावा म्हणून?
अशी 'सोय' करून कुठला काळा
अशी 'सोय' करून कुठला काळा पैसा कसा बाहेर येईल?
भावनाताई मी सकाळी आठ पासून
भावनाताई मी सकाळी आठ पासून रांगेत उभी आहे पैसे काढायला. रांगेतूनच लिहितेय. रांग निम्म्यापेक्षा थोडी जास्त संपलिये. अजून तास- दिड तासात माझा नंबर येईल बहूतेक. पण इथे लोक म्हणताहेत की तोपर्यंत पैसे संपतिल.
भरायला गर्दी कमी आहे पण भरायला किंवा बदलायला नोटा नाहीत माझाकडे.
अल्पना, चांगल्या लोकांना
अल्पना, चांगल्या लोकांना चांगले अनुभव येतात.
असेल असेल..
असेल असेल..
ज्यांच्याकडे काळा पैसा नाही
ज्यांच्याकडे काळा पैसा नाही त्यांची गैरसोय होऊ नये, किंवा निदान कमी व्हावी म्हणून ही तरतूद केली आहे असं मला वाटतं. ' उपद्व्याप' काळा पैसा बाहेर यावा आणि रोखीचे व्यवहार कमी होण्याकडे वाटचाल व्हावी यासाठी आहे असं मला वाटतं.
ज्यांचे बॅंक अकाउंट नाहीत
ज्यांचे बॅंक अकाउंट नाहीत त्यांच्याकरता सोय होती ही जिचा लाभ बाकीचेच घेताना दिसत आहेत.
५० दिवस पुरेत की बँक अकाउंट
५० दिवस पुरेत की बँक अकाउंट उघडायला. त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळे बाकीच्यांना का ताप? मुळात ती पळवाट आहे हे मान्य नाही का? खआत्यात जमा केले तर ट्रेल सोपा होईल. लोक तेही करताहेतच. नोकरांचंना आणि नातलगांना तात्पुरतं लखपती करताहेत.
मला फेसबुक वर एक अलर्ट आला
मला फेसबुक वर एक अलर्ट आला आहे. चतुर लोक (बॅन्क अधिकार्यान्च्या मदतीने, इतरान्चे आय डीचे कागद वापरुन, कम्पनीच्या एच आर अनेकान्चे आय डी कागदपत्रे असतात) काळ्याचे पान्ढरे करत आहेत.
असे गैरप्रकार होणे शक्य आहे का ? काळा पैसा बाहेर काढायचा हाच उद्देश असेल तर असे प्रकार का टाळले जात नाहीत?
Pages