तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
देवकी, ९ तारखेला बँका बंद
देवकी, ९ तारखेला बँका बंद होत्या ना? आणि एकावेळी किती पैसे काढता येतील यावर मर्यादा आहे ना? ४०००? की माझ्या वाघण्यात चूक झाली आहे?>> हो ९ ला बॅंका बंद होत्या. ४००० ची लिमिट एक्सचेंज साठी आहे. चेक देवून किंवा विथड्रावल स्लीप भरून दहा हजार काढता येतात.
आज दीर जाणार आहे काढायला पैसे. ब्लॅंकेट ड्रायक्लिनींग ला दिलय त्याने आणि पैसे द्यायला नव्या- जुन्या कोणत्याच नोटा नाहीत. माझ्याकडे पण उरल्या नाहीत आता जुन्या नोटा.
चेकने एका आठवड्यात दहा हजारचे
चेकने एका आठवड्यात दहा हजारचे लिमिट आहे ना?
ओके. बदलायला ४००० , चेकने
ओके. बदलायला ४००० , चेकने दिवसाला १०.००० आठवड्याला २०,००० एटीएमने दिवसला २००० अशी लिमिट्स सध्या आहेत.
मला काल डिस्चार्ज झालेल्या
मला काल डिस्चार्ज झालेल्या एका पेशंटने इमानदारीत एकहजार रू. शंभराच्या दहा नोटा आणून दिल्या आत्ताच.
मी त्या हास्पिटलात न देता स्वतः वापरायला म्हणून घेतल्या.
हास्पिटलात ५०० च्या दोन माझ्याकडच्या दिल्या ज्या उद्या हॉस्पिटलच्या अकाऊण्टला भरता येतील.
देवकी, ९ तारखेला बँका बंद
देवकी, ९ तारखेला बँका बंद होत्या ना? आणि एकावेळी किती पैसे काढता येतील यावर मर्यादा आहे ना? ४०००? की माझ्या वाघण्यात चूक झाली आहे?>>>>>> हो भरत.९ तारखेला बँक्स बंद होत्या. १०,११ तारखेला चेकने पैसे काढले.धन्यवाद्,चूक लक्षात आणून दिल्याबाबत.प्रतिसादात दुरुस्ती करते.
चेकने काढले तर १०००० मिळतात.बदलायचे असतील तर ४००० मिळतात.आताची परिस्थिती प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे आहे.
आणि त्या दिवशी ए टी एम ही बंद
आणि त्या दिवशी ए टी एम ही बंद होते..
त्या अजय देवगणच्या २ ऑक्टोबरवाल्या सिनेमागत फसवू नका.
इथे लई हुशार लोक बसलेत.
चेकने एका आठवड्यात दहा हजारचे
चेकने एका आठवड्यात दहा हजारचे लिमिट आहे ना?>> नक्की माहित नाही. पण लोकांची एकापेक्षा जास्त बॅंकांमध्ये खाती असतिल तर ते जास्त काढू शकतिल पैसे.
पण बहूतेक डिपॉझीट करताना जास्त खाती असली तरी लिमिटपेक्षा जास्त डिपॉझीट झाले तर ( म्हणजे समजा एकाच व्यक्तीच्या३ अकाउंट मध्ये जर प्रत्येकी २ लाख ) तरी आयटी वाले कारवाई करतिल. .... त्यामूळे किमाब ज्यांच्याकडे पैसे डिपॉझीट करायलस माणसं नाहीत ( जे राजकारणी किंवा मोठे उद्योजक नाहीत ) ते काळा पैसा असणारे तरी अडकतीलच.
अजय देवगणच्या २ ऑक्टोबरवाल्या
अजय देवगणच्या २ ऑक्टोबरवाल्या सिनेमागत फसवू नका.>>.>>> फसवायचे काय त्यात.जे घडले ते सांगितले.लिहायच्या घाईत तारखांचा घोळ झाला,तोभरत यांना धन्यवाद देऊन निस्तरला.
आज इतवार है बाँगो में बहार है
आज इतवार है![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
बाँगो में बहार है
मला काल चार तास बँकेबाहेर उभे
मला काल चार तास बँकेबाहेर उभे रहावे लागले होते. त्यानंतरही टोकनच मिळाले. ते घेऊन आज पैसे काढता आले. एका ठिकाणी रोख पैसे भरणे आवश्यक होते म्हणून, एरवी सर्व व्यवहार कार्डानेच केले. ( एका ठिकाणी कार्ड स्वाईप
करुन रोख रक्कम मिळवली, अर्थात ते ओळखीतूनच झाले )
बरेचसे वाणी कार्ड स्विकारत आहेत. सहकारी भांडार पुर्वीपासून कार्ड स्वीकारत होतेच. आणि त्यांच्याकडे बाजार
भावानेच ( कधी कधी स्वस्तही ) सर्व सामान मिळते. त्यात दूध, भाजीपाला आणि फळेही असतात.
सरकारने ३० डीसेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे आणि जर किराणा सामान विकणारे योग्य तर्हेने बिल बनवत असतील तर त्यांना ५०० / १००० च्या नोटा घेण्यास काहीच हरकत नाही. चेंबूरला मनीस मधे आजही नोटा स्वीकारल्या.
पुर्वी ज्या हॉटेल्सनी आम्ही कार्ड स्वीकारत नाही, असे बोर्ड लावले होते, तेही आज कार्ड स्वीकारत होते. त्यांच्याकडे
मिनीमम अमाऊंट ची अट नाही. काही टॅक्सीचालकही कार्डने पैसे स्वीकारत आहेत.
एका नातेवाई़का साठी हॉस्पिटल मधे पैसे भरायचे होते, तिथे अर्थातच ५००/ १००० च्या नोटा स्वीकारल्या.
बँकेच्या लाईनमधे जे होते त्यापैकी अनेक जण नोटा बदलून घ्यायला आले होते. ते काही तांत्रिक कारणासाठी लगेच त्यांना काढून घेता येत नव्हते.
हे सगळे सामान्य नागरीक म्हणून आलेले अनुभव.
आता थोडेसे अर्थाशास्त्राचा विद्यार्थी म्हणून
२००० च्या नोटा तितक्या व्यवहार्य वाटत नाहीत. १००/२०० च्या खरेदीसाठी त्या वापरता येणे कठींण आहे कारण
विक्रेत्याकडे देण्यासाठी सुटे पैसे असणार नाहीत.
पण पैसा हे केवळ विनिमयाचे साधन असावे त्याला स्वतःचे मूल्य असू नये, हे तत्व म्हणून मला मान्य आहे.
पण आर्थिक सुधारणा घडवायच्या तर याहून कठोर उपाय योजणे गरजेचे आहे. ( म्हणजे १०० च्या वरच्या सर्व नोटा रद्द, सर्व कर रद्द करून फक्त बँक व्यवहारावर किमान कर.. वगैरे )
मी पण फुकट तपासले/अॅडमिट
मी पण फुकट तपासले/अॅडमिट केले काही पेशंटस.
पण न चिडता
माझ्या अहोंनी तर अक्षरशः आय सी यूत अॅडमिट पेशंट त्याने काय हजार रुपये अॅडवान्स भरले होते त्यावर सोडला. (खरे बील १२००० होते.) >>>
साती यु गायज आर माय हिरो _/\_
दिनेश दा, खलि लिहिलअल्या
दिनेश दा,
खलि लिहिलअल्या प्रकाराबद्दल कय मत आहे?
१०० च्या नोटा साठवाल्याने लोकांना त्रास
आज आठवड्याची भाजी घ्यायला गेलो होतो.
नेहमीच्या गिर्हाईकांना क्रेडीट मिळत होते.
तरीही बरेच लोक १०० च्या नोटा घेउन्दिसात होतेत्या भाजीवाल्याकडे १०० च्या नोटांचा भला मोठा ढीग होता.
दुसर्याशी बोलताना तो म्हणाला, आता मी हे पैसे बँकेत भरले तर ते माझ्या खात्यात जाणार, आणी मला लूज कॅश म्हणून ४००० रुपये मिळणार ( ATM मध्ये पैसे नाही आहेत), मग मी धंदा कसा चालवू?
म्हणून मी हे पैसे माझ्या कडेच ठेवणार.
उघड आहे , उद्यापन त्याच्या कडे असाच ढीग जमणार आहे, आणी तो ते पैसे त्याच्याकडेच ठेवेल.
पैसे न मिळण्याच्या भीती पोटी छोटे व्यावसाईक लिक्विड कॅश त्यांच्या कडेच ठेऊन देत राहिलेतर लवकरच बँकेत जमा होणारे/ आणि मार्केट मध्ये फिरणाऱ्या १००/ ५०/२० च्या नोटा लक्षणीय रित्या कमी होतील, आणी सामान्य लोकांना अजून फटका बसेल असे मला वाटते
काही व्यावसायिकांनि असे पैसे साठवाल्याने (कायदेशी चल)/ कायदेशीर मार्गाने आलेले, मात्र बँकेत न जाता त्यांच्या कडेच राहणारे) तर बाकीच्या लोकांना याचा फरक पडू शकेल का?
आमच्या इथे रांगेत उभ्या
आमच्या इथे रांगेत उभ्या असलेल्या लोकांसाठी आमदार साहेबांनी चहा, बिस्किटं आणि पाण्याची सोय केली आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बँक फक्त पाणीच देतेय.
विशेष म्हणजे आमदार साहेब ही सोय मी स्वतः लक्ष देऊन केली आहे हे सांगायला पण आहे. सोबत कॅमेरामन पण होता.
बँक मॅनेजरवर डाफरुन आणि रांगेत उभ्या असलेल्या लोकांना हातजोडुन निघून गेले.
इथे एसबीआय समोर कुणीतरी मांडव
इथे एसबीआय समोर कुणीतरी मांडव घातलाय आज. थोड्या लोकांना तरी सावली!
इथे एसबीआय समोर कुणीतरी मांडव
इथे एसबीआय समोर कुणीतरी मांडव घातलाय आज. थोड्या लोकांना तरी सावली!
>>>
हे चांगले केले. काल शनिवारी मी जेवायला बाहेर गेलेलो तेव्हा रस्त्यातल्या दोन ब्यांकांच्या भल्यामोठ्या रांगा बघून हाच विचार मनात आलेला. यांच्या सावलीची सोय झाली पाहिजे. मला स्वताला उन्हाचा पित्ताचा प्रचंड त्रास असल्याने हा विचार पटकन मनात येतो.
सिम्बा, सरकारने सर्वाना बँकेत
सिम्बा, सरकारने सर्वाना बँकेत खाती उघडायचे आव्हान केले होते आणि बहुतेकांनी उघडलीही असतील.
पैसा ही काही चलन स्वरुपात साठवून ठेवायची वस्तू नाही, त्यामूळे ती तशीच ठेवूही नये. पैसा हे केवळ विनिमयाचे साधन आहे, ते फिरतेच राहिले पाहिजे. बँकेत ठेवलेला पैसा जरी आपल्या खात्यात जमा दिसत असला, तरी तो बेंकेत ठेवलेला नसतो, बँक तो फिरवतेच आणि त्यावर उत्पन्नही मिळवते.
फुटकळ विक्रेत्यानाही पेटीएम वगैरे पर्याय वापरता येतील. आज भारतातील अनेक अल्पशिक्षित लोकही सराईतपणे मोबाईल फोन वापरतात, त्यामूळे असे एखादे अॅप वापरणे फार कठिंण नाही.
मोबाईल द्वारे पैसे फिरवण्याची कल्पना, केनया मधे एम-पेसा ( किस्वाहीली भाषेत पेसा म्हणजे पैसा ) नावाने अत्यंत सुरक्षितपणे आणि सराईतपणे वापरली जातेय.
अर्थात यासाठी लोकांना त्या अर्थाने साक्षर करणे गरजेचे आहे.
या रांगा वगैरे शहर भागातच जास्त दिसताहेत, माझ्या ओळखीतल्या ग्रामीण भागातील मित्रांचा मते, तिथल्या बँकेत सुरळीतपणे व्यवहार झाले.
चलनाच्या बाबतीत तिचे
चलनाच्या बाबतीत तिचे सरकारच्या पाठिंब्यामूळे असणारे मूल्य आणि ते चलन निर्माण करण्यासाठी वापरण्यात आलेला धातू वा कागद यांचे मूल्य यात कमालीचा फरक असतो. १००० रुपयाच्या नोटेचा छपाईचा खर्च साधारण ३ रुपये होता पण त्या नोटेला असणार्या सरकारच्या पाठिंब्यामूळेच आपण ती ३ रुपयाची नोट वापरून १००० रुपयांच्या मूल्याएवढ्या वस्तू वा सेवा खरेदी करू शकत होतो. आता सरकारने त्या नोटेचा पाठिंबाच काढून घेतलेला आहे.
त्यामूळे हा ठरविक कालावधी संपल्यावर काहिही मूल्य राहणार नाही ( त्यानंतर कदाचित संग्राहक वस्तू म्हणून मूल्य असेल. जसजसा कालावधी जाईल तसे ते वाढतही जाईल, अर्थात त्यानंतर त्यांचा संग्रह सरकारने बेकायदेशीर ठरवला नाही तरच. )
जर त्या चलनाचे मूल्य त्यातल्या साहित्याच्या मुल्यापेक्षा कमी झाले कि ते चलन रहात नाही. लोक त्याचा ते साहित्य म्हणून उपयोग करतात. जून्या काळच्या चांदीच्या रुपयांबाबत असेच झाले. त्यातील चांदीचे धातू म्हणून मूल्य, १ रुपयापेक्षा जास्त झाल्यावर, लोकांनी ती नाणी चांदी म्हणून वापरली.
असा एक गैरसमज आहे कि जास्त
असा एक गैरसमज आहे कि जास्त पैसे जमा झाल्यास कार्यवाही होईल.. तो तितकासा बरोबर नाही. एवढे पैसे जर तूमच्याकडे वैध मार्गाने आले असतील, म्हणजेच तूम्ही त्या कमाईवर लागू असलेले कर भरले असतील किंवा ते पैसे तूमच्याकडे कुठून आले, याचा पटेल असा खुलासा करू शकलात तर अशी भिती बाळगायचे काही कारणच नाही.
समजा तूमचे किराणा मालाचे दुकान आहे, तूम्ही दुकानातल्या गल्ल्यावर जमा झालेली रोकड बँकेत भरत आला आहात. तर साधारण तेवढीच ( त्यात किंचीत भरही ) रक्कम अजूनही ५००/ १००० रुपयांच्या स्वरुपात बँकेत भरतील तर काळजी करण्याचे कारण नाही. मोठ्या प्रमाणावर रोकड जमा करायची असेल, तर बँका वेगळी व्यवस्था करताहेत. आता शहरात दिसणार्या रांगेत व्यापारी / दुकानदार अजिबात नाहीत.
प्लीज मला एक सांगा जरा.
प्लीज मला एक सांगा जरा. आपल्या कडे असणार्या 1000, 500 च्या जुन्या नोटा एकावेळी एकदमच बँकेत, पोस्टात जमा करायच्या. असा काही नियम आहे का??
जर काही नोटा उरल्या असतील तर पुन्हा त्याच अकाउंटमध्ये जमा केल्या तर चालतील का?
चालतील. सगळी टोटल २.५
चालतील. सगळी टोटल २.५ लाखापेक्षा जास्त झाली ८ नोव्हेंबर नंतरची तर प्रश्न विचारले जातील.
रांगेत उभे रहावे लागेल प्रत्येक वेळी.
निधी, एकाच वेळी जमा करा असा
निधी, एकाच वेळी जमा करा असा कुठलाही नियम नाही.. फक्त अश्या सर्व जमा रकमांची बेरीज अडीज लाखापेक्षा जास्त होत असेल तर कदाचित ती सरकारच्या लक्षात येईल !
काही काळानंतर फार मोठ्या
काही काळानंतर फार मोठ्या रांगा असणार नाहीत, त्यामूळे वाट बघायला काहीच हरकत नाही. ३० डिसेंबर पर्यंत वेळ आहे.
साती, तुम्ही दोघंही ग्रेट!
साती, तुम्ही दोघंही ग्रेट!
चिडचिड न करता हे करताय हे अजूनच कौतुकास्पद.
दिनेश दा, वही तो मै पुछ राहा
दिनेश दा, वही तो मै पुछ राहा हु,
जर ठीक ठिकाणी लोकल लेवेल ला अशी इन्वेन्त्री बनत राहिली, तर बँके कडे लोकांना द्यायला पैसे येतील कसे?
मी वर केनयामधल्या एम पेसा
मी वर केनयामधल्या एम पेसा योजनेचा उल्लेख केला ती जेव्हा सुरु झाली तेव्हा पूर्ण जगासाठी अभिनव होती. ती योजना वापरण्यासाठी स्मार्ट फोनची गरज नसते, अगदी साधा फोन वापरूनही तिथे पैसे पाठवता येतात.
केनयात अगदी १९९३ सालापासून प्रत्येक नागरीकाला ओळखपत्र दिले गेले आहे ( मी त्या साली बघितली, आधीपासूनच असणार )
तर असे ओळखपत्र आणि फोन दाखवून, पाठवलेले पैसे आपल्याला रोखीने मिळवता येतात किंवा तसे रोखीने काढेपर्यंत ते आपल्या एम-पेसा खात्यात जमा राहतात. रोखीने काढण्याची व्यवस्था अनेक छोट्या केंद्रांवर असते आणि अशी केंद्रे ठिकठिकाणी असतात.
सिंबा, अशी पैश्याची
सिंबा, अशी पैश्याची इनव्हेंटरी ठेवण्याची गरजच काय ? जर तूमचा पैसा हव्या त्या क्षणी, निव्वळ फोनद्वारे तूम्हाला काढता येत असेल, देता येत असेल, तर रोख रक्कम ठेवायची गरजच काय आहे ?
रच्याकने, तूमचे नाव सिम्बा हादेखील किस्वाहिली शब्द आहे.. त्याचा अर्थ सिंह !!
हो हि माझ्या मुलीची आवडती
हो हि माझ्या मुलीची आवडती व्यक्तिरेखा आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा प्रतिसाद, वर मी उल्लेखलेल्या भाजीवाल्या संबंधात होता
आजच्या तारखेला छोटे व्यावसाईक, लहान मूल्याच्या नोटांचा stock करून परिस्थिती बिघडण्यास हात भर लावत आहेत का?
इथे, ज्यांना बँकांचे व्यवहार
इथे, ज्यांना बँकांचे व्यवहार कुठल्या तत्वावर चालतात याची कल्पना नसलेल्यांसाठी काही सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करतोय.
समजा तूमचे बँकेत १००० रुपये जमा आहेत ( जास्तही असतील हो, पण समजा ) तर त्यापैकी कुठल्याही दिलेल्या दिवशी तूम्ही बेंकेत जाऊन किती रक्कम काढाल, याचे एक गणित असते ( जे बँकाना अनुभवाने माहीत असते ) तर समजा या गणिताने केवळ १० टक्के असे उत्तर येत असेल, तर तूमचे १०० रुपये बँक बाजूला ठेवून, उरलेले ९०० रुपये बँक वापरते. हे गणित सर्व खातेदारांसाठी असते. समजा तूम्ही सर्वच्या सर्व पैसे काढून घेतलेत तरी इतर अनेक ग्राहक तसे करत नाहीत. त्यामूळे बाजूला ठेवलेली १० टक्के रक्कम हि कुठल्याही दिवशी पुरेशी असते.
आपण बँकेत पैसे का ठेवतो, कारण तिथे ते सुरक्षित आहेत, आपल्याला हवे त्या वेळी ते मिळतील असा आपला विश्वास असतो. आणि बँका या विश्वासावरच चालतात. म्हणजेच बँकात सर्व खात्यावरील, जमा रक्कमेच्या बेरजेवढी रोख रक्कम कधीच ठेवली जात नाही. आणि हे फक्त रोख रक्कम काढून घेणार्यांसाठीच. चेकने वा इतर मार्गाने पैसे दिलेत.. तर काहीच प्रश्न नाही.
छोट्या नोटात राखून ठेवलेला
छोट्या नोटात राखून ठेवलेला पैसा हा फार मोठ्या किमतीचा असणार नाही.. आणि सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागल्यावर त्याचीही गरज राहणार नाही.
ही रोख रकमेची गरज कमीत कमी असावी.. हाच सरकारचा प्रयत्न असणार !
मोठ्या किमतीच्या नोटांच्या रुपात जी रक्कम साठवून ठेवली जाते ते मोठ्या किमतीची असते आणि ती अर्थव्यवस्थेतून बाहेर गेलेली असते. म्हणजे तेवढ्या नोटा छापून काहीच उपयोग झालेला नसतो. चलनात तुटवडा असतोच आणि तो भरुन काढण्यासाठी सरकारला आणखी नोटा छापाव्या लागतात.
हा पैसा वा चलन खेळते राहणे
हा पैसा वा चलन खेळते राहणे अत्यंत गरजेचे असते. आज तूम्ही श्रम केलेत आणि त्याचा मोबदला मिळाला तर तूम्ही त्या पैश्यातून आणखी सेवा वा वस्तू विकत घेणार. त्यातून आणखी रोजगार आणखी उत्पन्न निर्माण होणार. मग ती व्यक्ती पण आणखी काही विकत घेणार. अर्थात यापैकी काही बचत होणार हे ओघाने आलेच पण ती बचतही गुंतवणे महत्वाचे आहे. म्हणजे मग तो पैसाही असाच वापरला ( खेळता ) जातो. पण जर ती बचत किंवा ते उत्पन्न जर चलनाच्या रुपात घरी ( वा गोदामात, जमिनीखाली कुठेही ) ठेवलेत तर त्याचा काहिही उपयोग नाही.
सोन्याचे उदाहरण दिले तर आणखी स्पष्ट होईल. आपण जे दागिने करतो त्यापैकी किती रोज वापरतो ? तर अगदी कमी. आपण सोने घेतो ते अडीअडचणीला उपयोगी यावे म्हणून पण तसेही सहसा आपण करत नाही.. म्हणजे देशात एवढे सोने असून त्याचा उपयोग ना नागरीकांना ना सरकारला.
पण सोन्याची किम्मत कधीच कमी होणार नाही किंवा हवे त्यावेळी ते सहज विकले जाईल, किंवा तारण म्हणून ठेवता येईल असा जो आपला समज किंवा विश्वास असतो, तोच विश्वास आपल्याला एखाद्या गुंतवणुकीवर ठेवता आला, किंवा अशी गुंतवणूक उपलब्ध झाली, तर सोन्याचे महत्व कमी होईल.
Pages