खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोनिका एम बी ए ऐवजी बालिस्टर का नाही झाली?
आरोपीला बाइज्जत बरी करेल; वर फिर्यादीलाच चांगली शिक्षा ठोठावून देईल.

मानसीचे उच्चार अगदीच सदोष आहेत..... "अत्त्या, तुमी तै च्या बोलण्याचं जस्ती टेंशन घेऊ नका. अशाने तुमच्या कामावं परिणाम होईल आणि तुमची तब्बेतही बिगडेल... " अशा टाईप!! लिपस्टिक मोडू नये म्हणून असं बोलते असं वाटतं... Happy
शशिकला बाई उगीचच तावातावाने बोलतात, करत मात्र काहीच नाहीत. मॉनिका ने इतका पाण उतारा केला त्यांचा काल तर चरफडण्यापलिकडे काय केलं?

झी मराठीच्या इतिहासातली सगळ्यात भंगार सिरीयल आहे ही
कास्टिंग पण एकदम थर्ड क्लास ...
पहिले दोन एपिसोड बघितल्यानंतर डब्यात टाकली ............

आता तर ह्या सिरीयल चे टायटल साँग कानावर पडताच डोक्यात तिडीक जाते ..............

टायटल साँग मध्ये ही खटकणार्‍या चुका आहेत.

श्रेया एका ठिकाणी कात्री ऐवजी कातरी असे नीटच उच्चारते...

जरा अख्खं गाणं माहित असेल तर टाका बघू इथे.

टायटल साँग >> माझी ८ महिन्याची मुलगी हे गाणं लागलं की आपला जो काही उद्योग चालू असेल तो सोडून टीव्ही कडे पाहते एक टक. आणि गाणं संपलं की पुन्हा आपला खेळ सुरू :)))

बाकी सिरियल महा-भंगार आहे हे मान्य!

सध्या फक्त एकच मालिका बरी आहे त्यामुळे अमूल्य वेळ वाया जात नसल्याचा आनंद आहे - ८ ला बन मस्का बघते. बाकी इथे येउन अपडेट वाचूनच मन भरतं Wink

मी पहावे तू दिसावे, पारणे या मनाचे फिटेना
अंतरीची अंतरे ही, का तरीही सारी मिटेना

हीच प्रीती, हीच भीती, वीण दोघांतली ही तुटेना
हेच कोडे रोज थोडे, सोडवावे तरीही सुटेना

आस मुकल्या जीवनाची, आज खुलता कळी ही खुलेना
वाट चुकल्या या मनाची, आज खुलता कळी ही खुलेना

पारणे डोळ्याचे फिटते ना? Uhoh
सर्वात मोठा प्रश्न की हे टायटल साँग विसंगत आहे असं तुम्हाला वाटतं का? Uhoh

नक्की कोण म्हणतय हे गाणं?

होसुमियाघ, रेशिमगाठी इ. टायटल साँग्स कितीतरी सुसंगत वाटली...

माझ्या मैत्रिणीची (श्रध्दा) एक वर्षाची चिंटुकली (स्वरा) अगदी ताल स्वरात (तिच्या अँटेनाला आता कुठे विविध भाषिक (अनाकलनीय) चॅनेल पकडायला लागलेत) टीव्ही स्क्रिनवर बोटे फिरवीत हे गीत गात असते. व्हिडीओ सुद्धा काढलाय तिने या अविस्मरणीय क्षणाचा. हा हा हा हा .....

मंजूडी | 17 October, 2016 - 18:26 नवीन

शीर्षकगीतात कात्री कुठे आहे दक्शे? हाहा

>>>>>>>>
अंतरीची अंतरे ही, का तरीही सारी मिटेना..... इथे वाटते

पारणे डोळ्याचे फिटते ना? >+१
या मालीकेतील पार्श्वसंगितच एवढे डिप्रेसिंग आहे की वैताग येतो.>+१

मन्जे टिपी करू नको उगिच. शिर्षक गीत माहित नसल्याने आणि गीत लिहिणारा लेखक हा दिव्य असल्याने (पारणे डोळ्याऐवजी मनाचे फेडतोय म्हणून म्हटलं) की कातरी ही मिटेना... असं काही लिहिलंय की काय. (नात्याची कात्री उघडलीये खरी पण आता मिटत नाहिये :फिदी:)
म्हणून म्हणलं ज्याना गीत माहिताय त्यांनी लिहावं, म्हणजे माझी चूक कळेल काही असेल तर

नात्याची कात्री उघडलीये खरी पण आता मिटत नाहिये )>>> Rofl मी इमॅजिन केलं! उघडलेली कात्री आणि एका पात्यावर विक्रांत आणि एकावर मॉनिका... विक्रांतचा चेहरा कॉन्स्टिपेटेड, मॉनिकाचा कृद्ध... पाती जिथे जुळलेली असतात तिथे मानसी!

नात्याची कात्री उघडलीये खरी पण आता मिटत नाहिये )>>> Lol

मी इमॅजिन केलं! उघडलेली कात्री आणि एका पात्यावर विक्रांत आणि एकावर मॉनिका... विक्रांतचा चेहरा कॉन्स्टिपेटेड, मॉनिकाचा कृद्ध... पाती जिथे जुळलेली असतात तिथे मानसी!>> Proud

Pages