कोडैक्कानल सायकल प्रवास (सोलो) ........(तिसरा दिवस)

Submitted by jadhavmilind26 on 14 September, 2016 - 13:48

तिसरा दिवस मी खास कोडैमध्ये फिरण्यासाठी ठेवला आहे. bryant park, coaker’s walk,pillars rocks, guna caves,lake,bear shola falls,wax museum हे सारे विझिटिंग पॉईंटस.

दमदार पाऊसानेच आजच्या दिवसाला सुरवात झाली. पण मी आज जरा निश्चिन्त आहे कारण माझे मेन टार्गेट कालच पूर्ण झाले आहे. पण कोडैला येऊन कोडै फिरायच नाही म्हणजे थिएटर मध्ये जाऊन पिचर न बघता झोपून येण्या सारख मला वाटू लागल. काल पण मी भिजलोच होतो मग आज काय बिघडले!! म्हणून मी लगेच तयार झालो. नाष्टा केला आणि पाऊस थांबायची वाट बघत बसलो. साधारण 10 वाजता पाऊस थांबला.

हॉटेल मॅनेजर कडून विझिटिंग पॉईंटची माहिती घेण्यासाठी गेलो. दुसऱ्या काउंटर वर टुरिस्ट व्हॅन वाला बसला होता. तो मला बरेचशे पॉईंट सांगू लागला, नंतर मी त्याला सांगितलं "मी सायकल वर चालोय". मग मात्र त्याने सायकल वर जाण्यासारखे पॉईंट सांगितले. मी खरंच सायकल वर चाललोय का ते बाघण्यासाठी तो मला पॉईंटची माहिती सांगत सांगत पार्किंग पर्यंत आला. मग त्याने माझी सायकल बघितली, सायकलची किंमत विचारली. निघताना त्याने शॉर्टकट्स सुद्धा सांगितले ...

कोडै लेक पासूनच दुसऱ्या पॉईंटला जाता येत म्हणून पहिले कोडै लेकला निघायला सुरवात केली.IMG_20160517_103024-640x360.jpg कोडै lake हा सरोवर काही नैसर्गिक नाही . Sir Vere Henry Levinge 1863 मध्ये मदुराई (Madurai) चे कलेक्टर होते. त्यांनी हा सरोवर बांधला होता. हा सरोवर स्टार आकाराचा आहे.
Screenshot_2016-09-17-22-39-23-886-640x360.jpegसायकलिंग, हॉर्स राईडींग आणि बोटींगसाठी फेमस आहे. इथे सरोवरला फिरून येण्यासाठी सायकल भाड्याने मिळतात . म्हटलं बर झालं पैसे वाचले !!! सायकल तर आपलीच आहे. म्हणून राऊंड मारायला सुरवात केली.
IMG_20160517_104438-640x360.jpgIMG_20160517_104957-640x360.jpg

थोडेच पुढे गेल्यावर bryant park आहे. हे खर तर botinical गार्डनच. पण madurai चे फॉरेस्ट ऑफिसर H.D. Bryant यांनी हे पार्क 1908 मध्ये तयार केला होत.म्हणून त्याला Bryant पार्क म्हणतात.
IMG_20160517_104605-640x360.jpg_20160718_160758-600x659.JPG

पार्कमध्ये 750 प्रकारचे गुलाब, वेगवेळ्या प्रकारची फुले, झाडे, आणि वेलिंसाठी प्रसिध्द आहे. सायकल लॉक केली. एन्ट्री फी 30₹ भरून तिकीट घेतल.आत मध्ये गेलो. गुलाब आणि दुसऱ्या प्रकारच्या फुलांचे फोटो घेतले.
IMG_20160517_105512_1-640x480.jpgIMG_20160517_105425_1-640x480.jpg

तीथे हत्ती आणि डायनसौरच्या आकारांची झाडे आहेत. मग मी त्यांचे फोटो घेतले.

IMG_20160517_105409-640x360.jpg

पार्कलाच लागून Coaker's Walk आहे. 1872 ला Lt Coaker यांनी बहुदा मॉर्निंग walk साठी हा पायी एक किलोमीटरचा रोड बनवला असवा. इथून मदुराई सिटीचा टॉप व्हिव बघायला मिळतो. सायकल पार्किंगचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी काही गेलो नाही.

आता माझं नेक्स्ट टार्गेट piller rock view point. ह्या पॉइंट्सचे मी फोटो माझ्या रूम मेटसच्या मोबाइल मध्ये बघितले होते. मला हीच जागा जास्त आवडली होती. पाऊसामुळे मी सगळे पॉइंटस कव्हर करू शकणार नाही म्हणून मी piller rock view पॉइंटच्या रोड वर पडणारे पॉइंटच बघणार आहे.

Bryant पार्क पासून उजव्या बाजूचा रोड pillar rock view point ला जातो. हे मला एका गार्डने सांगितले. अती त्रिव चढचा रोड. त्या गार्ड ने माझ्या कडे बघितलं परत सायकल कडे बघितलं आणि परत चढाकडे बघुन म्हणाला “ मोठा चढ आहे सायकल काय चढणार नाही , सायकल ढकलत न्हे’. त्याला वाटले बाकीचे येतात तसाच मी पण आलोय आणि ह्याला काही चढ चढवता येणार नाही. पण हिथे माझा सुद्धा इगो जागा झाला. मी पण सायकल लोवर गियर(1:1) वर सेट केली आणि त्याच्या कडे बघून मी सायकल चालवायला चालू केली. सुरवातीला तर सायकल थोडी स्मूथ गेली. मी सहज मागे बघितलं तर तो मला बघतच होता. खर तर आधीच त्याचच ऐकायला पाहिजे होत अस आता मला वाटू लागलं. आता मात्र चढ चढण्याशिवाय उपाय नाही. आखिर इज्जत का सवाल था!!! शेवटी शेवटी मला वाटल की माझी सायकल रिव्हर्स मध्ये जातीय कि काय!! पण नशिबाने चढ चढला. इज्जत वाचली!!!

टुरिस्ट अॅट्रॅक्शनसाठी होम मेड चॉकलेट, निलगिरी ऑइल, मसाले यांची दुकाने कोडैला आहेत. पाऊसाची रीमझीम चालू झाली. मला पण होम मेड चॉकलेट घ्यायचे होते. म्हणून दुकानात गेलो. तो मला चॉकलेटचे रेट सांगायला लागला. त्याला वाटल मी पहिल्यांदा चॉकलेट घेत आहे. Munaar आणि ooty मध्ये चॉकलेट घेतल्यामुळे मला रेट माहित होते. मी भावतोल करायला चालू केला ते पण तमिळ मध्ये !! तस कुंजम कुंजम येत मला तमिळ!!! दुकानदाराला सांगितल कि मी महाराष्ट्राचा आहे. त्याला सुद्धा बर वाटल, महाराष्ट्राचा असून तमिळ मध्ये बोलतोय. मग लगेच आमचं बोलणं चालू झालं , कुठून आला, कसा आला ...इत्यादी. दीड केलो चॉकलेट विकत घेतले. दुकानादाराला तमिळ मध्ये विचारल "चॉकलेट माघारी जाताना घेऊन जातो तू दुकानातच ठेवशील का?"
IMG_20160517_125520-600x1067.jpg
बाहेर पाऊसाची रिमझिम चालू असल्याने तो सुद्धा तयार झाला. तसा त्याला काहीही लॉस नव्हता. मी पण डेरिंग करून त्याच्यावर विश्वास ठेवला.
नेक्स्ट टार्गेट Wax museum. मेन रोड पासून आत wax museum आहे. आणि तो रोड चिखलाने भरला होता. म्हणून मी जाण्याच टाळल.
IMG_20160517_115055-640x360.jpg

मी Gulf ग्राउंड पाशी पोहोचलो. ग्राउंड बघून मी फॉरेन मध्ये आहे कि काय अस वाटू लागल. आपल्या भारतात काय नाही आहे !!, सुंदर गावे, नद्या, किल्ले, डोंगर, नयनरम्य निसर्ग. सर्व गुण संपन्न असा आपला भारत बघायचा सोडून इतर देशाना आपण का प्राधान्य देतो. ज्या गोष्टींचा कधी विचार केला नाही त्या आज सुचत होत्या. एका मुलाला माझा फोटो काढायला सांगितला.
IMG_20160517_115204-600x1067.jpg

त्याने सुद्धा 3 ते 4 फोटो काढले … फोटो मध्ये गौल्फ ग्राउंड आलं.
IMG_20160517_115506-640x360.jpgIMG_20160517_115559_1-640x480.jpg

आत मी pillar rock view point ला निघालो. कालच्या पाऊसाने एक झाड रस्त्यावरच पडलं होत, ते झाड रोड वरून हटवायच काम चालू आहे. त्या झाडामुळे ट्राफिक एवढ झालं कि जवळ जवळ चाळीस पन्नास कार एका पाटोपाट एक उभ्या राहिल्या. सायकल असल्यामुळे मी रोडच्या साईडने तर कधी दोन्ही कारच्या मधून, जिथून रोड मोकळा दिसेल तिथून सायकल ट्राफिक मधून बाहेर काढली. कार मधले मंडळी माझ्याकडे बघायला लागली. मी ट्राफिक मधून भाहेर आलो. ट्राफिक कडे बघितले तर अजून एक सुद्धा गाडी पुढे आली नाही.मी पूर्ण ट्राफिक पार करून आलो आणि सगळ्या कार माझ्या मागे राहिल्या म्हणून मनाला उगाच कुठलीतरी रेस जिंकल्यासारखर वाटू लागले .....

Pillar rock view point पाशी 12:30 ला पोहोचलो. तीथे मला सायकल कुठे पार्क करायची प्रश्न पडला. टुरिस्ट अॅट्रॅक्शनसाठी तिथे खूप दुकाने आहेत.

एका चहाच्या दुकाना शेजारी मोकळी जागा दिसली. म्हणून मी त्या दुकानात आधी चहा घेतला. नंतर मी ब्रेड आम्लेट घेतल. दुकानदाराशी बोलता बोलता त्याने सांगितल की तो सुद्धा त्रिचीचाच आहे. ओळख वाढल्यामुळे सायकल पार्किंगचा प्रश्न सुटला. तो स्वतः म्हटला "सायकल हितेच पार्क कर मी लक्ष ठेवतो".

आज मी फिरायला आलो ते ह्याच पॉईंटसाठी.एन्ट्री फी 5₹ भरून गेलो. पण आज नशिबाने काही साथ दिलीच नाही. ढगांमुळे pillar rocks तर दिसलेच नाहीत ….
IMG_20160517_122459_1-640x480.jpg

मग नावा पुरते फोटो घेतले आणि निराश होऊन मी चहाच्या दुकानात आलो. दुकानदाराला विचारले "guna cave किती अंतरावर आहे?" तो म्हणाला " एक किलोमीटर , पण आता जाऊ नकोस. जाण्यात काही फायदा नाही. तो पॉईंट सुद्धा ढगांमुळे दिसणार नाही". माझ्या समोर प्रश्न होता जाऊ का नको. मी अजून जेवण केलं नाही म्हणून मी हॉटेलला माघारी जाण्याच ठरवलं. माघारी जाताना चहा आणि आम्लेटचे पैसे दिले, पण त्याने 10₹ कमी घेतले. शेवटी तमिळ बोलण्याचा फायदा झाला!!! त्यांना राम राम करून रिटर्न प्रवासाला लागलो.

मला परत तेच ट्राफिक लागल. परत मी सायकल रोडच्या बाजूने, दोन्ही कारच्या मधून जिथून मला जागा मिळाली तिथून चालवत ट्राफिक मधून भाहेर आलो.

मी परत चॉकलेटच्या दुकानात गेलो. चॉकलेट घेतली, त्या दुकानदाराने माझा मोबाइल नंबर घेतला आणि म्हणाला "दुसऱ्यांदा कधी येण झालंच तर आधी मला फोन कर मी रूमची सोय करून ठेवतो". त्याला नंबर देऊन मी कोडै लेकपाशी आलो. सरोवरा भोवतीचा सायकलचा अजून राऊंड पूर्ण झाला नव्हता, तो पूर्ण करू लागलो. राऊंड पूर्ण करत असताना मी एका ठिकाणी थांबलो आणि फोटो काढु लागलो. त्यावेळी एक सातवी आठवीतला मुलगा आला मी त्याला फोटो काढायला सांगितला(तमिळ मध्ये बोललो) बहुधा माझे तमिळ यावेळी चुकले असावे, तो फोटोसाठी पोझ देऊ लागला.
IMG_20160517_103121-480x853.jpg

मग मी सुद्धा त्याचा फोटो काढला आणि परत त्याला माझा फोटो काढायला सांगितला. ह्या वेळी मात्र मी तमिळ वापरली नाही, नाहीतर त्याने अजून पोझ दिल्या असत्या!!! पण त्यानेच सर्वात मस्त फोटो काढला.
IMG_20160517_103134-640x360.jpg

मी 2 वाजता हॉटेलवर परत आलो, जेवण केल. अजून वेळ आहे म्हणून परत फिरायला जायचे मन करू लागले. पण नेमका पाऊसने दमदार हजेरी लावली. आज माझ्याकडे उपाय आहे म्हणून मी हॉटेललाच राहण्याच ठरवल. Wifi फ्री आहे म्हणून मी whatsapp वर सगळ्यांना फोटो सेंड करायला बसलो. फक्त घरच्यांना सोडून ठरवल्याप्रमाणे रूम वर पोहचल्याशिवाय मी घरी सांगणार नाही.
IMG_20160517_081026_1-480x640.jpg

5 वाजता, कॉफी घेत बालकणीत बसून पाऊसचा आनंद घेत बसलो. कोडैचा पाऊसच वेगळा!!! ढग अगदी जवळून जात आहेत, अस वाटतय की मी ढगात बसून चहा पितोय!! का नाही वाटणार?? शेवटी सात हजा~~र फुटावर आहे मी !!!

रूम मध्ये माझे कपडे अस्थवेस्थ पडले होते. उद्या सकाळी घाई होऊ नये म्हणून बॅग पॅक करून ठेवली. चॉकलेटमुळे बॅगच वजन वाढल. दोन वॉटर बॉटल भरून ठेवल्या.

उद्यासाठी माझ्या साईडने मी पूर्णपणे तयार झालो. माझ्या सायकलला मडगार्ड नव्हत. कोडैचा घाट चढताना सायकलच स्पीड कमी होत, पण घाट उतरताना स्पीड जास्त होणार आहे. त्यामुळे चिखल अंगावर उडणार, हे नक्की. म्हणून उद्या पाऊस नकोय, असं वाटतंय पण निसर्गा समोर कोणाचं काय चालणार.

मला आता टेन्शन आहे ते रिटर्न जर्नीच. रिटर्न जर्नी 80km ची आहे . दहा वाजता kodai road station ला त्रिचीची ट्रेन आहे. पण मला तिथे 9 वाजता पोहोचणे भाग आहे कारण स्टेशन मास्टर ने मला पहिल्याच दिवशी ताकीद दिली होती , 9 नंतर सायकल पार्सल करणार नाही. आणि जर मी वेळेत पोहोचलो नाही तर मला मग आजून 150km सायकल चालवून त्रिची गाठावे लागणार. पण ते माझ्या मनाला पटत नव्हत. नाहीतर दुसऱ्या दिवशीची ट्रेन पकडून जायचे, मग माझी 4:30 ची नाईट शिफ्ट सुद्धा बुडणार आणि एक दिवस वेस्ट जाणार म्हणून मी लवकर उठून जायचे ठरवल. मग मी हिशोब करायला चालू केल, किती वाजता सायकल चालवायला सुरवात केली पाहिजे. 48km चा घाट आणि 32km चा प्लेन रोड आहे. घाट जरी असला तरी मी जास्त स्पीड मध्ये जाऊ शकत नाही. कारण मला माझी सेफ्टी महत्वाची आहे. 80km साठी मला 4 तास लागणार आहेत. आणि त्यासाठी मला सकाळी 5 वाजता सायकल चालवायला सुरवात करावी लागणार. नियोजन एकदम काटोकाठ आहे. पंधरा ते वीस मिनिट जर उशीर झाला तर उद्याची ट्रेन आणि ड्युटी चुकणार हे नक्की.

माझा मित्र नित्यानंद, तो तमिळ नाडूचाच. तो मला आधीच म्हटला होता, “तू ट्रेन त्याच दिवशी नाही पकडू शकत, तू दुसऱ्या दिवसाची ट्रेन पकडून ये”. त्यामुळे मी तसा टेन्शन मध्ये आलोय. पण मी केलेल्या हिशोबावर, माझा विश्वास आहे!!!

7:30 लाच जेवण करून बिल मागितल. त्यात हॉटेल मध्ये स्वयप मशीन नव्हती. एवढ मोठे हॉटेल आणि हे हार्ड कॅश मागतात!!! मग मी रात्री साडेआठला atm मधून पैसे कढून बिल पे केल. मला चेक आऊटच्या वेळी काही गडबड नको होती म्हणून मी बिल आधीच पे केल आणि मॅनेजरला सांगितल सकाली 4:45 ला चेक आऊट करणार आहे.

4 चा अलार्म लावला. आणि उद्या मी वेळेत पोहोचतोय की नाही? या विचाराने झोपी गेलो. …

कर्मश…

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोरदार चाललंय. आदले दिवशी इतके दमल्यावरही सायकलेनेच फिरायचा उत्साह सॉलिड आहे.
फोटोच काहीतरी करा राव.

क्या बात है... फोटोही मस्त.... तू दिसतोसही स्मार्ट हं... Happy
(साला आम्ही कितिहि कशाही पोझ द्या, फोटु कुणाला दाखवण्यालायक येतच नाही Proud
अगदीच उपयोग झाला तर लहान मुलांना घाबरवण्याकरता होत असेल ... Lol )

Back to top