मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.
सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?
अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.
युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.
खालील लिंका उपयुक्त आहेत.
http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx
http://www.vrg.org/nutshell/vegan.htm
http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com
http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...
https://m.facebook.com/Vegan-72085494764/
अमा, तुमचा निश्चय बघून खूप
अमा, तुमचा निश्चय बघून खूप मस्त वाटतंय. तुम्ही जी लेटेस्ट पोस्ट लिहिली आहे (पेट्रोल भरले.. वाली) तीही खूप संयत आहे, आणि तुमची सकारात्मक ऊर्जा त्यातून दिसतेय. इतके विरुद्ध, टोकाचे प्रतिसाद येऊनही तुम्ही खूप सहजपणे सगळ्यांना उत्तरं देताय, आणि नको त्या प्रतिसादांकडे तितक्याच सहजपणे दुर्लक्षही करताय हे खूप अवघ्ड असतं. तुम्हाला खूप शुभेच्छा! तब्येतीची काळजी घ्या.
सोया बदाम चीज दूध वापरलेच
सोया बदाम चीज दूध वापरलेच पाहिजे असे बंधन नाही.
@Nira भारतीय पोटाला याची सवय
@Nira भारतीय पोटाला याची सवय असेल का? नसेल तर एकदम असे सेवन केल्याने काही त्रास होवु शकतो का? >>>> चांगला मुद्दा मांडलात. +१
अमा, शुभेच्छा!!!
अमा, शुभेच्छा!!!
बस्केच्या दुसर्या
बस्केच्या दुसर्या परिच्छेदासाठी +१
>> गुपचाप एखादं फॅड आपल्या आपण सुरू करावं, प्रश्न विचारायच्या निमित्ताने त्याची पब्लिकली जाहिरात करू नये.>>
अमा, जाहिरात करत आहेत असे मला तरी वाटले नाही. त्यांना जे प्रश्न पडले ते त्यांनी इथे विचारले. इतर एवढ्या वेगवेगळ्या विषयावर इथे लोकं सल्ला मागतात. माबो हक्काची, आपली वाटते त्यामुळे त्यांनी इथे विचारले बस्स! अगदी तुमच्या मते ते फॅड असेल तरीही त्यांच्यासाठी जीवनशैली बदलायचा प्रामाणिक प्रयत्न असू शकतो ना. इतके जजमेंटल का व्हावे?
>>दया भाव आहे का? की आम्ही कोणि तरी वेगळे आहोत हे दाखवने आहे दया भाव असेल तर त्याची व्याप्ती एवढी पाहिजे की जी लोक अशी काम करतात (प्राण्यांना मारण्याची) त्या पासुन ते परावृत झाली पाहिजेत.>>
डेअरी/पोल्ट्री/मीट या व्यवसायाचे एक स्वतःचे अर्थकारण आहे. कुणी त्यावर उपजीविका करणार असेल तर किंवा डेअरी/पोल्ट्री/ मीटचा आहारात वापर करणार असेल तर त्याला रोखणे हे योग्य होणार नाही. मात्र व्यवसाय करताना फायद्याची टोकाची हाव ठेवणे होत असेल आणि त्याचा परीणाम जनावरांना क्रूरपणे वगवण्यावर होणार असेल तर ते गैर आहे. त्यात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे सुरुच असते. कायदे करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र सध्याची परिस्थिती बघून , त्याने दु:खी होवून, विटून एखाद्याला असे वाटले की मी या साखळीचा भाग होवून हातभार लावणे थांबवणार आहे तर त्यात गैर काय? व्याप्ती हळू हळू वाढते. एक मूठ मीठाने इतिहास घडवला.
बरेचदा ग्राहक अमुक एक पद्धत नाकारत आहेत म्हणूनही बदल घडायला सुरुवात होते. उदा. फ्री रेंज चिकन आणि अंडी, मक्या ऐवजी गवत खाऊ घातलेली गुरं !
आज आमच्या इथे हायवेवर १८चाकी ट्रक उलटला. एका ट्रकमधे ६० गुरं कोंबली होती. जीवो जीवस्य जीवनम हे खरे पण निव्वळ हाव म्हणून व्यवसाय करताना वाईट पद्धती वापरणे चालते त्याचा निषेध कुणी आपल्यापुरता असा करत असेल तर ठीक आहे ना!
एकंदरीत या इंडस्ट्री बद्दल माहिती झाल्यावर नॉशिया येवूनही बरेच लोक जीवनशैली बदलतात. इंडस्ट्री कशाला माझ्या नात्यातच घरी कोंबडी कापताना बघून वेजिटेरिअन झालेली मंडळी आहेत. आजकाल साफसुफ केलेले चिकन मिळते म्हणून पण जिवंत कोबडी विकत घेवुन स्वत: घरी कापायची असेल तर किती लोकं चिकन खातील? मटण, बीफ, पोर्क वगैरे दुरची बात!
स्वाती२ तुमच्या मताशी मी सहमत
स्वाती२ तुमच्या मताशी मी सहमत आहे .
मला तरी असे वाट्ते की प्रत्येक मानसाने एवढे संवेदनशिल व्हावे की दुसर्याच्या संवेदना जाणिवा समजुन त्याने आचरण करावे .
माझ्या प्रतिसादाचा टोन
माझ्या प्रतिसादाचा टोन बुलीइंग सारखा वाटला असेल तर अचंबित व दिलगीर आहे. इथे हा विषय सुरु करताना प्रोज आणी कॉन्स दोन्ही अपेक्षित आहेत असे मूळ लेखावरून दिसते. "मी व्हीगन होणार आहे, माझे कौतुक करा !" असा लेख नाहीये. लेखिकेलाही आपली गृहितके तपासून पहायची आहेत. थोडेसे कॉन्स आले तर बुलिंग कसे ? अमूक एक घटक व्हीगन आहारातून मिळत नाही मग पर्यायी व्यवस्था करावी लागेल हे सांगणे बुलिंग ?
व्हीगन लोक आणी त्यांची ती कल्ट सदृष्य चळवळ जवळून पाहिल्याने असेल कदाचित पण थोडेसे निगेटिव्ह मत बनले आहे. तारतम्य महत्वाचे ! एखाद्या ठिकाणी यजमानांनी पन्नास कप दूध घातलेला चहा तयार ठेवलेला असेल तर एक कप चहा घेणे किंवा स्किप करणे योग्य आहे ना? की मला बिनदुधाचा चहा करून द्या, तो चहा स्वच्छ धुतलेल्या भंड्यातच करा, एकही कण दूध असता कामा नये, गाळणे पुन्हा पुन्हा धुवून घ्या, असा बालिश हट्ट का ?
यावर बरेच लिहिण्यासारखे आहे. "तुझे आहे तुजपाशी" मधले गुरुजी आठवा. लेखनसीमा.
स्वाती२, अतिशय मुद्देसूद
स्वाती२, अतिशय मुद्देसूद प्रतिसाद लिहिलायस.
विकु, माझा तरी तुमच्या
विकु, माझा तरी तुमच्या प्रतिसादावर स्पेसिफिक रोख नव्हता. एखाद्या गोष्टीचे फॅड होण्याबद्दल निगेटिव मत माझेही आहे.
मला वाटते सगळे व्हेगन्स
मला वाटते सगळे व्हेगन्स पाहुणे म्हणून गेल्यावर असा किचकटपणा करत नसावेत.आणि जे करत असतील त्यांचा मूळ स्वभाव किचकट्पणा करण्याचा असेल तर ते व्हेगन नसतानाही तितकीच खुसपटे काढत असतील.
इतक्या लोकांच्या "बुलिंग"
इतक्या लोकांच्या "बुलिंग" बाबत प्रतिक्रिया बघून जे विचार मनात आले ते लिहिते.
१. धागा काढताना लेखिकेला फक्त "व्हीगन डाएट कसा बेस्ट आहे" किंवा "गुड जॉब" अशा टाइपचे प्रतिसाद अपेक्षित होते का? नसावेत. कारण त्यांनी धाग्यात तसे लिहिलेही नाही आणि त्याअर्थाची प्रतिक्रियाही दिलेली नाही.
२. यापुढे अशी मतं द्यायच्या आधी मी विचारुन घेईन की तुम्हाला फक्त गुडी-गुडी, मोटिव्हेशनल प्रतिसाद हवेत की दुसरी बाजू माहीत करुन घेण्यात इंटरेस्ट आहे. त्यानुसार प्रतिक्रिया देईन. माझे चुकलेच. त्यांना दुसरी बाजू माहीत करुन घेण्यात इंटरेस्ट असेल असं मी अझ्युम केलं.
३. अभ्यास न करणार्या मुलाला अभ्यास न करण्याचे दुष्परिणाम सांगणारे लोक चांगले की "बेटा अभ्यास करायची अजिबात गरज नाही. यु आर डुइंग अ ग्रेट जॉब" असं सांगणाररे ? बहुतेक आजकाल दुसर्या प्रकाराला चांगले समजल्या जात असावे.
अमा, तुमहाला डिमोटिव्हेट केल्याबद्दल माफी.
मी परवापासून हा धागा वाचतीये,
मी परवापासून हा धागा वाचतीये, लिहावं का नाही ह्या विचारात होते. पण बस्केनी मुद्दा मांडला त्यावरून लिहितेच.
एकूणच अश्या प्रकारचे काही चेंजेस करायचे असतील, आणि त्याबाबत तुम्ही ठाम असाल की मला ट्राय करायचेच आहे कोणी काही म्हणले तरी, तर मला वाटतं आधी स्वतः छोट्या छोट्या प्रमाणात सुरुवात करावी. ४ महिने प्रयोग करून पहावा कोणासमोर मांडण्याच्या आधी. आणि मग 'मी आत्त्तापर्यंत हे हे ट्राय केलंय, आता पुढे अजून काय करता येईल' असा अॅप्रोच ठेवला की थोडी व्हॅलीडीटी येते आणि कदाचित तो विचार वाचणार्यांकडूनही थोडा अधिक सीरीयसली घेतला जातो असं मला वाटतं.
हे लाईफस्टाईल चेंजेस आहेत. त्यातलं सगळं जमलं नाही तरी त्याला डायरेक्टली फॅड आहे असं समोरच्याने म्हणून धुडकाऊ नये इतका डाटा आधी एक्परीमेंटल बेसीस वर स्वतः जमवणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
@rar, त्यातलं सगळं जमलं नाही
@rar, त्यातलं सगळं जमलं नाही तरी त्याला डायरेक्टली फॅड आहे असं समोरच्याने म्हणून धुडकाऊ नये इतका डाटा आधी एक्परीमेंटल बेसीस वर स्वतः जमवणं आवश्यक आहे असं मला वाटतं. >>> +१
व्हेगन डाएट फार अवघड नसेल
व्हेगन डाएट फार अवघड नसेल असे वाटते.
दूध , थोडे दही , ताक , लोणी व तूप - अगदी लिमिटेड .... वेगन नसणारे लोकही प्रामुख्याने हेच व इतकेच खातात.
पनीर , चीज ही सगळी फ्याडं नवीन आहेत.. आणि तसेही यांच्याऐवजी दूध दहीच जास्ती न्ञुट्रिशस वाटते... पनीर चीज चक्का बासुंदी इ इ सगळे चवीसाठी खातात , पोषक म्हणुन नव्हे.
पण हे अन्नपदार्थ कमी करायचे असतील तर काही पर्याय ....
व्हिट्यामिन ए .... पपई
व्हिट्यामिन बी १२ .... याला कॅप्सूलच लागेल
क्याल्शियम .... गोळी ? अजून काही ?
बाकी कार्बो , प्रोटिन्स व पाणी कुठूनही मिळेल.... हो . पाणीही ... दुधात ९० - ९५ % पाणीच असतं ... उरलेलं सोल्युट पार्ट दोन चार % ही नसेल.
पण हा गुंता सोडवावा लागेल. त्याशिवाय वेगन डाएट यशस्वी होणार नाही.
हे सर्व विवेचन धडधाकट प्रौढ माणसासाठी आहे. लहाम मुले , प्रेग्नंन्सी , आजारी , अॅथलेट इ नी दूध आनंदाने प्यावे
Yup anilchembur. Experimental
Yup anilchembur. Experimental data on the way mam.
जामोप्या, फार चांगली
जामोप्या, फार चांगली व्यवस्थित माहिती दिलीत.
अमा, छान सुरुवात झालेली
अमा, छान सुरुवात झालेली दिसतेय! तुम्हाला शुभेच्छा!
छान माहिती मिळाली
छान माहिती मिळाली धाग्यावर.
एकूणच अन्नपदार्थातून मिळणार्या घटकांचे, पोषकतत्वांचे, फायदे-तोटे या निमित्ताने समजले.
"तुझे आहे तुजपाशी" मधले
"तुझे आहे तुजपाशी" मधले गुरुजी आठवा.
>>>
हे काय हय ? रेशिपीचे गुरुजींचे पुस्तक हय का?
सातींच्या पोष्टींमध्ये एक
सातींच्या पोष्टींमध्ये एक सुप्त अॅरोगन्स आढळतो हल्ली. कदाचित कट्ट्यावरच्या लोकांना 'सुनावता सुनावता " अंगवळणी पडले असावे.
३अ, असं असेल तर सुधारायचा
३अ, असं असेल तर सुधारायचा प्रयत्न करते.
धन्यवाद!
धन्यवाद ३अ!
धन्यवाद ३अ!
पहिल्यांदीच ऐकतेय .
पहिल्यांदीच ऐकतेय . बाकीच्यांच्या प्रतिक्रिया वाचल्या नाहीत तरी आधीच विचारते. व्हेगन जीवन पद्धती का सुरु करायची आहे किव्वा असते ? जी जीवन पद्धती आहे त्यात काही प्रॉब्लेम आहे का ? कशाला गोष्टी लक्षात ठेवायचा त्रास घ्यायचा ? . हे खायच का ? ते खायचं का किव्वा चालत का ? कशाला? जे आवडत ते खावं कि . स्वतःच्या मेंदूला इतका त्रास द्यावाच कशाला ?
अमा प्रोग्रेस टाकाल का इथे
अमा प्रोग्रेस टाकाल का इथे कृपया?
काय काय सुरू केलंत, काय करणं थांबवलत? ओवरऑल लाईफस्टाईल मधे काय फरक पडलाय इ.
Sure . Thane police took away
Sure . Thane police took away scooter. While I was buying phone. So there goes fossil fuel usage. Walking everywhere. Yesterday climbed up three floors at a stretch while talking to a young colleague.!! I was offered a silk paithani a as a lagnacha aaher. Which I refused. Asked for a cotton blouse piece or hanky e. Love and kindness is more than enough. Dairy usage is minimised. I had one liter of extra milk.
Which I made into basundi and
Which I made into basundi and gave to neighbours. Doing step aerobics when I feel like. Mostly after morning dog walking. There is mutton and chicken in fridge for birds and animals who are carnivores. And visiting students. Planning to buy cycle but afraid of Mumbai traffic and potholes. Health check planned this week. For basic numbers. Will then try to improve on it. Read article that excess calcium through supplements can thicken arteries. So sticking to plant based sources.
I really like tropikana
I really like tropikana orange juice. But it has added sugar. So switching to narial pani. I don't really like to make rotis every day. So gluten free out of laziness.
अमा, ट्रॉपिकाना १००% असं
अमा, ट्रॉपिकाना १००% असं ज्यूस येतं ना? ते साखर विरहीत असावं. फळातली साखर असेलच पण एक्स्टृऑ नसावी.
http://www.amazon.in/Tropicana-Orange-100-Juice-1000ml/dp/B00QPS8KW6
अमा छान:) पण ठाणे पोलिसांना
अमा छान:)
पण ठाणे पोलिसांना अशी स्कूटर देऊन नका हो टाकू. विकून तरी टाका की.
@ अमा, I was offered a silk
@ अमा, I was offered a silk paithani a as a lagnacha aaher. Which I refused. Asked for a cotton blouse piece or hanky>>> अरेरे!!! हे वाचून मला वाईट वाटले, तर आहेर देणाऱ्या व्यक्तीचे मन किती दुखावले असेल? त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी त्यावर असे विरजण घालणे योग्य नव्हे.
मला वाटतं जोपर्यंत तुमच्या व्हेगन जीवन पद्धतीविषयी इतर लोकांना माहित पडत नाही, तोपर्यंत आपण आलेल्या भेटी स्विकाराव्यात. मग भले नंतर त्या देणाऱ्याच्या अपरोक्ष दुसऱ्या एखाद्या गरजवंताला देऊन टाकाव्या. आपल्या व्हेगन जीवन पद्धतीविषयी लोकांना हळूहळू माहित पडल्यावर ते अशा भेटी तुम्हाला देणं स्वतःच बंद करतील.
Pages