मला व्हेगन जीवन पद्धती बद्दल माहिती हवी आहे. भारतीय जीवन शैली तसेच आहार पद्धतीत हे कसे जमवावे ते अवगत करून घ्यायचे आहे. आपल्यापैकी कोणी आधीच ही जीवन पद्धती आचारत असल्यास आपले अनुभव लिहा. बरे वाइट काथ्याकूट करावा.
सर्व प्राणिजन्य उत्पादनांना आहारतून काढून टाकणे इतकीच मला माहिती आहे. तसेच चामड्याच्या वस्तू न वापरणे वगैरे. घरातले शेवटचे अंडे, तूप, चीज अमूल बटर दूधपावडर संपवून टाकत आहे. पण पुढे काय व कसे अंगिकारावे?
अधिक महत्वाचे म्हणजे आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत? काही आजार असल्यास ही जीवन पद्धती सूटेबल नसते का इत्यादी आपले अनुभव मते लिहा.
युट्यूब वर व्हेगन रेसीपीज चे बरेच व्हिडीओ आहेत.
खालील लिंका उपयुक्त आहेत.
http://www.nhs.uk/Livewell/Vegetarianhealth/Pages/Vegandiets.aspx
http://www.vrg.org/nutshell/vegan.htm
http://www.maayboli.com/node/13623
https://www.vegalyfe.com
http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...
https://m.facebook.com/Vegan-72085494764/
ईंटरेस्टींग आहे. मागेही ऐकून
ईंटरेस्टींग आहे. मागेही ऐकून होतो. आता डिटेल माहिती मिळेल अशी आशा.
पण एक गोष्ट अजूनही मला पुरेशी क्लीअर झाली नाही आतापर्यंतच्या पोस्टमध्ये, की हे का करतात?
म्हणजे स्वतासाठी फायद्याचे म्हणून की पर्यावरणासाठी फायद्याचे म्हणून? की दोन्ही?
चालताना किडे मुंग्या मरू नयेत
चालताना किडे मुंग्या मरू नयेत म्हणून काय करायचं
आजारी पडल्यावर बॅक्टेरिया किंवा विषाणू मारायला औषधे घेतली तर चालतात का?
आपण खाल्ल्या नसत्या तर भाज्या किंवा धान्य कुणा गरीब बिचाऱ्या प्राण्या-पक्षांनी खाल्लं असतं त्यांच्या तोंडचा घास हिरावलेला चालतो का?
घरात पेस्ट कंट्रोल करायचं की नाही?
मुळात घरात साफसफाई करायची की नाही?
तुमचा अभ्यास चांगला दिसतोय.
तुमचा अभ्यास चांगला दिसतोय. तुमच्या लेखातून तुम्हाला नक्की कशाकरता विगन डाएट पाहिजे आहे ते कळले नाही. जर प्राण्यंचा विचार करून असेल तर ठीक आहे. पण जर संपूर्ण पर्यावरणाचा विचार करणार असाल तर मात्र आपण करतो ते डेअरी पदार्थांचा वापर असलेले वेजिटेरियन डाएटच सगळ्यांत चांगले आहे असे सध्या संशोधक म्हणत आहेत.
http://qz.com/749443/being-vegan-isnt-as-environmentally-friendly-as-you...
मीही करणार आहे. रोज
मीही करणार आहे.
रोज क्याल्शियम , व्हिट्यामिन बी १२ व आयर्न घ्यावे लागेल... त्याची एक महिना सवय करुन मग दुधबंदी करणार आहे.
नाहीतरी दूध हे ओव्हर रेटेड प्रॉडक्ट आहे... पन्नास रुपये खर्चून जे दुधातून मिळते त्याच्यापएक्षा जास्त न्यूट्रिशन इतर पदार्थातून मिळते. तसेही दूध शुद्द रुपात कमी घेतले जाते. चहा , चमचा दोन चमचा दही , ताक यात असे किती न्युट्रिशन असते ?
जगातला कोणताच प्रौढ प्राणी दुसर्या praaNyaचे दूध पीत नाही.
जगातला कुठला दुसरा प्रौढ
जगातला कुठला दुसरा प्रौढ प्राणी फोडण्या देऊन, तळून , भाजून, बेक करून पदार्थ खातो?
या फक्त अन्न बनवण्याच्या
या फक्त अन्न बनवण्याच्या पद्धती आहेत.
खरे तर धान्य नुसतेच उकडुन थोडेसे मीठ लावून खावे. सोबत सॅलड , फळे खावीत...
माझे स्वप्न आहे हे !
कॅल्शियमच्या गोळ्या कशापासून
कॅल्शियमच्या गोळ्या कशापासून बनतात?
पूर्वी शंपल्यापासून
पूर्वी शंपल्यापासून बनवायच्या. नवीन मॉलेक्युलबाबत ज्ञान नाही
कुठे रहाता आपण.? पुणे
कुठे रहाता आपण.? पुणे मुम्बै येथे बरेच लोक आहेत वेगन . महाग आहे हे नक्की. पण आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये एकूण जेवणात अशा किती पदार्थामध्ये दुध दही मध असते.रोजचे जेवण जेवतांना काही येत नाही प्रष्ण.पुणे मुंबई येथे त्यांचे ग्रुप्स भेटतात .हवा असल्यास मी कोणाचा नंबर मिळवून देऊ शकते.माझी नातेवाईक ,तिचा नवरा,,त्याचे कुटूम्बीय वेगन आहेत.जावयाचे आई वडिलांचे वय ६८ व ७२ साधारण .ते गेल्या काही वर्षात झाले वेगन .पण पुण्यात त्यांना काही प्रश्न नाही येत आहे.या दोघांच्या लग्नात पण सारे जेवण वेगन बनवले होते .तसा केटरर पण मिळाला होता . हे लोक घरी यायचे असले कि आपल्याला मेनू नीटच ठरवायला लागतो हे नक्की.नारळाचे दुध,सोय मिल्क,व काजूचे दुध तयार करायची तयारी ठेवायला लागते.केक पासून सारे काही तेलात करायला लागते.(मस्त होतो केक तेलातला).बहुतेक वेळेस ते त्यांचे दुध बिस्किटे घेऊनच येतात.
प्रसाधने ..मला वाटते व्हि एल
प्रसाधने ..मला वाटते व्हि एल सि सी ची चालतात.सध्या मी ब्रझिल मध्ये आहे.तर या रविवारी एक जण वेगन चीज कसे बनवायचे ते शिकवणार आहे.या मांसाहारी देशात पन वेगन लोक वाढताहेत . लव्हिंग हट, नावची मला वाटते अमेरिकिन चेन आहे.त्यांची अनेक ठिकाणी आहेत हौटेल.
नविन लाईफस्टाईलकरिता
नविन लाईफस्टाईलकरिता शुभेच्छा!
https://m.facebook.com/Vegan-
https://m.facebook.com/Vegan-72085494764/
https://m.facebook.com/therealgreencafe/
फेसबुक वर बऱ्याच व्हेगन रेसिपी पण मिळतील.काजू बदाम किंवा नारळ दूध ही एकदम सोपी रेसिपी आहे.
हा एक कोरेगाव पार्क मधला व्हेगन कॅफे आहे, महाग आहे पण या पानावरील रेसिपीज ने आयडीया मिळू शकेल.त्यातल्या त्यात बदामाचे दूध चहा कॉफीत वापरायला जवळ जाईल प्राणिज दुधाच्या, सोया मिल्क ला मी काही फ्लेवर टाकल्याशिवाय पियू शकले नाही.
मुळात दूध चहा कॉफी गरज कमी करून एकदाच घेऊन बाकी लिक्विड गरज आईस टी नारळ पाणी लिंबू पाणी ग्रीन टी ने भागवता येईल.आहारात मिल्क प्रोटीन नसल्याने कडधान्ये शिजवलेली रोज असायला हवी.एखादा बदाम आणि अर्धा आक्रोड यांचा खाण्यात समावेश.दह्यातल्या घटकांची कमी होममेड व्होल व्हीट यीस्ट ब्रेड ने भरता येईल, त्यात जवस भोपळा बी तीळ घालून, हे सर्व असलेला ब्रेड स्टार डेली किंवा रिलायन्स ला विकत मिळतो तो घटक वाचून घेतला तरी चालेल.
ओटस आप्पे, तेलातला केक, ढोकळा इ.आंबलेले पदार्थ खाऊन उपयुक्त बॅक्टेरिया गरज भागवता येईल.
सोया मिल्क आवडत नसल्यास ५ किलो कणिक दळायला देताना त्यात १०० ग्राम सोया चे पाकीट उपडे करणे हा मालती कारवारकर लिखित उपाय करणे.
सुरुवातीला स्वतःची लॉंग टर्म कमिटमेंट न देता १ महिना पाळून पाहणे.त्वचा, केस गळणे, किंवा गुडघेदुखी इ. काही लक्षणे नव्याने आली नाहीत ना हे बघणे.मग वाढवणे.
डेअरी कमी करण्याचा वेट लॉस आणि कोलेस्टेरॉल ला चांगला फायदा असावा.
बाकी नैतिक बाजू जाऊदे, एक बदल म्हणून काही काळ करायला हरकत नाही.
रोजच्या आणि सामान्यांच्या
रोजच्या आणि सामान्यांच्या आहारात डेअरी कमीच असते भारतात.
एक ग्लासतरी दूध प्या हे मला गरोदर आणि दूध पाजणार्या बायका, सगळे मेगॅलोब्लास्टीक अॅनेमियाचे पेशंटस, सगळे तापातून उठलेले पेशंटस, सगळे टीबीचे पेशंटस आणि सगळे मधुमेहाचे पेशंटस यांना ओरडून ओरडून सांगावे लागते.
ज्या ज्या वनस्पतीज पदार्थात व्हीटॅ बी १२ असल्याचा दावा केला जातो, त्यातल्या बी १२ ची बायोअॅवेलेबिलिटी फार कमी असते.
म्हणजे त्या पदार्थाचे विघटन करून प्रयिगशाळेत तुम्हाला बी १२ दाखविता येईल पण खाल्ल्यावर ते पदार्थ शरीराला बी १२ पुरेश्या प्रमाणात देऊ शकणार नाहीत.
किंवा चयापचयाच्या ज्या प्रक्रियांत ब१२ गरजेचे आहे त्यात त्यांना ते व्हीटॅ शरीरात असूनही काहिही उपयोग होणार नाही.
एक ग्लास दूधातून मिळणारे व्हिटॅ मिळवायला तुम्हाला १५००-३०० मि ग्रॅ चे सप्लिमेंटस खावे लागतील.
हे सगळं करायचंय ते नेमकं कशाकरिता?
साती सांगितले ना? काही
साती सांगितले ना? काही कंपन्यांना त्यांची अनावश्यक उत्पादने कोणीतरी विकत घ्यायला हवी आहेत. मग आता अनावश्यक गोस्।टींना आवश्यक बनवणं आलं. मग असले नवनवीन फॅड डाएट्स काढायचे. ते करुन लोकांची शरीरे खिळ्खिळी झाली की मग ह्याच कंपन्या त्यावर उपायही विकतात
जगभर सगळीकडे लो फॅट मिल्क प्या असं फॅड आणायचं. मग लो फॅट दूध मार्केटमध्ये आणायचं. ते बनवायचं म्हणजे त्यातलं फॅट काढायला हवं. मग त्या उरलेल्या फॅटला दुसर्या एखाद्या प्रोडक्ट रुपात आणायचं किंवा दुसर्या इंडस्ट्रीला कच्चा माल म्हणून पुरवायचं.
तसलंच ते केलॉग्स चं "अनाज का नाश्ता" म्हनून कुठल्याशा जेनेटिकली मॉडिफाइड कॉर्नचे फ्लेक्स विकायचे. त्यात बेदम कॉर्न सिरप शुगर वगैरे. पण लोकांना आपण एकदम मॉडर्न आणि डाएट कॉन्शस असल्यासारखं वाटू लागतं. आपण पिढ्यानपिढ्या अनाजचाच नाश्ता करत होतो हे सोयिस्करपणे विसरुन जायचं.
कॅल्शियम अन डाएटरी सप्लीमेंट्स वगैरे बनवणार्या कंपन्यांनी हे खुळ काढले असणार याची खात्रीच आहे मला.
हेच त्या इंटरमिटंट आणि LCHF वरही लागू पडतं. पण जौदे. सगळीकडे काय निगेटिव्हिटी फैलवायची
खरंय!
खरंय!
वर धनि म्हणतोय त्याला
वर धनि म्हणतोय त्याला अनुमोदन.
विगन डाएटमध्ये फक्त खाण्याचे बदल करावे लागतात असंच वाटत होतं. सिल्क न वापरणं वगैरे इथेच कळलं. अपने को नै जमेगा. कधीकधी वेजिटेरियन असण्यानेही खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स होतात. त्यात आणि विगन म्हणजे झालंच कल्याण का काय ते.
वर नताशा म्हणतेय त्यालाही मम. नसती फॅडं वाटतात एकेक.
टोटली इनडीफरं आहे खरतर. पण
टोटली इनडीफरं आहे खरतर.
पण घरातलं संपलं की सुरु करणार वाचून या महिन्याचा सिगारेट स्टोक आणलेला आहे. त्या ओढणार, आणि मग सोडणार सारखं वाटलं.
फॅडं करायला काही हरकत नाही, फक्त ते फॅडं आहे हे माहित असलं की झालं.
व्हिगन जीवनपद्धती आणि व्हिगन
व्हिगन जीवनपद्धती आणि व्हिगन डाएट या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत का (ना)? इथे काही मैत्रिणी आरोग्यविषयक तक्रारी असल्यानं व्हिगन डाएट (नविन प्रचलित शब्दः प्लांट बेस्ड डाएट) फॉलो करतात. पण सिल्कचे कपडे, भारी इटालिअन लेदरच्या पर्सेस वापरतात.
व्हिगन डाएटसाठी http://www.forksoverknives.com/ हे बघा. त्यांची फिल्म इंटरेस्टींग आहे. काही रेसेपीज ट्राय केल्या होत्या, त्या आवडल्या. मी त्या व्यवस्थित चीज, बटर वगैरे घालून फॉलो केल्या. पण तिथे अनेक रेसेपीज मधे कॅन फूड वापरायला सांगितलं आहे, ते खटकतं. म्हणजे हेल्थ कॉन्शन्स आहात तर कॅन फूड ऐवजी ताजे पदार्थ वापरायला सांगावेत. तयारीचा वेळ वाढेल पण अन्न जास्त सकस असेल.
पण व्हिगन हे फक्त हेल्थ या
पण व्हिगन हे फक्त हेल्थ या कारणासाठी व्हायचं आहे की आपल्यामुळे प्राण्यांचं नुकसान होऊ नये म्हणून? दुसरं कारण असेल तर कॅन फूड चालायला हवं.
फोर्कस ओवर नाईव्हस प्रमाणे
फोर्कस ओवर नाईव्हस प्रमाणे हेल्थ हे(च) कारण आहे. प्राण्यांचं नुकसान होऊ नये हा उद्देश नाही. त्यामुळे कॅन फूड वापरणं पटत नाही. तसंही एकंदरीतच कॅन फूड चांगलं नाही वारेमाप सोडीअम आणि प्रिझर्व्हेटीव्हजमुळे.
सुरळीत चाललेलं आयुष्य
सुरळीत चाललेलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड कस बनवायचं ह्याच उदाहरण म्हणजे ही फॅड.
आहारातून मिळणारे नैसर्गिक स्रोत टाळायचे आणि मग नताशाने म्हणलं तस सप्लिमेंट्स घेत बसायचं .
असो.
आपली रोजच्या जगण्यातील
आपली रोजच्या जगण्यातील जीवनपद्धती सोडून दुसरी (वेगन) पद्धत अंगीकारताना मी एका धोक्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. तो म्हणजे रोजच्या दिनचर्येत आपणांस सतत सावध रहावं लागेल, कि अरे! हे जे मी काही खातोय आणि वापरतोय ते वेगनच आहे ना. हे वेगनला (जसं आपण उपासाला म्हणतो) चालतंय ना? चालण्याकरिता मी काय बदल करू? कसं करू? कुठे मिळेल? कोण सांगेल? चुकून वापरलं, खाल्लं तर? वगैरे! वगैरे!
आता हे सर्व प्रश्न, विचार उपासाच्या दिवशीसुद्धा आपल्या मनात येत असतात. पण रोज नाही.
पण जेव्हा हि दुसरी (वेगन) पद्धत कायम अंगीकारयची असेल तर वरील सर्व विचार रोज दिवसभर, उठता बसता आपल्या डोक्यात सतत फिरत रहातील. आणि जेव्हा एकच विचार मानवाच्या मेंदूत फिरत रहातात. तेव्हा तो मानसिक रोगाला अगदी सहजी बळी पडू शकतो.
पण जेव्हा हि दुसरी (वेगन)
पण जेव्हा हि दुसरी (वेगन) पद्धत कायम अंगीकारयची असेल तर वरील सर्व विचार रोज दिवसभर, उठता बसता आपल्या डोक्यात सतत फिरत रहातील. आणि जेव्हा एकच विचार मानवाच्या मेंदूत फिरत रहातात. तेव्हा तो मानसिक रोगाला अगदी सहजी बळी पडू शकतात>>
खिळ्याच्या डोक्यावर ठोकलंत!
शुभ प्रभात. विश्व हृदय
शुभ प्रभात. विश्व हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा अपडेटः
काल फेसबुक वर इंडिअन व्हेगन( हे कॉपिरायटेड नाव आहे) गॄपचे सदस्यत्व घेतले आहे.
तिथे भरपूर रेसीपीज दिसल्या . आज बघते एक एक.
सिल्क साड्या ऑलरेडी नीट बांधून तयार आहेत. ऑफिस मध्ये डोनेशन वीक आहे तेव्हा सिल्क कपडे व
साधी पुस्तके देउन टाकीन . सर्व सुस्थितीतच आहे म्हणजे कोणालाही वापरता येइल
कॉर्क बेस असलेल्या चपला घेउन ठेवल्या होत्या. त्याचे आज उद्घाटन केले आहे.
चहा वर लेमन टी हा पर्याय सापडला आहे. ( मध फ्लेवर किंवा घातलेला नव्हे.) किंवा मग चहा बंदच करून ग्रीन स्मूदी घेता येइल.
सर्व प्रकारची फळे भाज्या व ग्रेन्स खायला परवानगी आहे. त्याप्रमाणे, या आठवड्यापासून खरेदी करणार.
कोपर्यावरच्या भाजीवाल्याकडून. ऑनलाइन किंवा बिग बझार मधून / गोदरेज नेचर्स बास्केट मधून नाही.
सुरळीत चाललेलं आयुष्य
सुरळीत चाललेलं आयुष्य कॉम्प्लिकेटेड कस बनवायचं ह्याच उदाहरण म्हणजे ही फॅड.> +१
हे सगळं करायचंय ते नेमकं
हे सगळं करायचंय ते नेमकं कशाकरिता?>>>>>>>>>>>>>>>>.
varache sagale vaachun nemakaa haach prashn padalaay..
अमा ऑल द बेस्ट. या जीवन
अमा ऑल द बेस्ट.
या जीवन पद्धती बद्दल अनेक शंका/वाद विवाद असले तरी तुम्हाला पाळायची आहे आणि तुम्ही व्यवस्थित पाळाल याची खात्री आहे.
फक्त न्युट्रिशन कडे नीट लक्ष आणि वाचन असूदे.
आवश्यक ती पोषण मूल्ये कशी
आवश्यक ती पोषण मूल्ये कशी मिळवावीत?
<<
तंबाकू-चुना मधला चूना कॅल्शिअमचा चांगला सोर्स असतो म्हणे. हा चुना शिंपल्यांपासून बनवत नसल्याने व्हेगन डाएटमधे मोडायला हरकत नाही. तंबाकू प्लांट प्रॉडक्ट आहे. त्यामुळे चालेल बहुतेक. पण व्यसन लागायची भीती असते. नुसतं पान पण खाता येईल चुना लावून.
होप धिस हेल्प्स अबाऊट कॅल्शिअम.
डाळीच्या दाण्याएवढा खायचा
डाळीच्या दाण्याएवढा खायचा चुना वरण करताना त्यात घाल असे बहुदा मालतीबाईंनी लिहिले आहे.
त्यांना कॅल्शियम हवय तर नुसता
त्यांना कॅल्शियम हवय तर नुसता चुना खातील. तंबाखू वनस्पती उत्पाद असले तरी कॅल्शियम खायला तंबाखू का खावा?
Pages