नमस्कार मित्रांनो!
कॅनडातला उन्हाळा संपत आला होता आणि दरवर्षी प्रमाणे पाऊस चालू व्हायच्या आधी एक सोपा क होईना पण शेवटचा हाईक (ट्रेक) करण्यासाठी अधीर झालो होतो. सप्टेंबर चालू झाला की इकडे डोंगरमाथ्यांवर, वाटांवर हवामान 'हीट ऑर मिस' असतं म्हणजे एकतर भाजणारं ऊन नाहीतर वेड्यासारखा पाऊस! त्यामुळे फार लांब नाही तर सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येईल असा 'एल्फिन लेक्स ट्रेल' (Elfin Lakes) करण्याचा बेत ठरला!
व्हॅन्कूवर (ब्रिटीश कोलंबिया, कॅनडा) पासून साधारण दीड- दोन तासांवर असलेल्या गॅरीबॉल्डी प्रोव्हीन्शियल पार्क
(Garibaldi Provincial Park) मध्ये असलेले एल्फिन लेक्स- छोटुकले २ तलाव साधारण ५,२५० फुटांवर आहेत आणि जायचा रस्ता एका बाजूनं ११ किमी. रविवारी सकाळी ६.३० च्या ठोक्याला व्हॅन्कूवरमधून निघालो खरं पण कोणाला शंका कोणाला चहा-कॉफी करता करता मधे-मधे थांबत शेवटच्या पार्कींगला पोहोचलो तोपर्यंत ८.३० वाजून गेले होते आणि गाडी लावायला एकच जागा कशीबशी मिळाली! जरी ८.३० वाजले तरी हवेत गारवा होता आणि थोडा पाऊस चालू होता. मनात म्हटलं, च्या SS यला गेला दिवस बहुतेक पावसात वाहून! पण इतक्या लांब येऊन परत जाण्याची नामुश्की केवळ असह्य होती!
पाऊस मधे मधे उघडत होता आणि समोर पसरलेल्या अतिशय अवाढव्य ग्लेशियर्सची झलक दाखवत होता! ह्या तलावांपर्यंत जाण्याचा पायी रस्ता हा पूर्वी जिथे जंगलकापणी व्हायची अश्या पर्जन्यवनातून ( temperate rain-forest) जात होता. ब्रिटीश कोलंबियाची खासियत असलेल्या अश्या हिरव्यागार वाटांमधून जाण्याचा अनुभव फार सुंदर आहे!
प्रचि १:
प्रचि १ : पर्जन्यवन.... ब्रिटीश कोलंबियाच्या पॅसिफिक समुद्राकाठच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात वर्षातले ६-७ महिने पाऊस पडतो त्यामुळे इथली वनं सतत हिरवीगार दिसतात!
प्रचि २
प्रचि २: इथले सगळे डोंगर ज्वालामुखीपासून बनलेले असल्यामुळे सगळीकडे डबर पडल्यासारखं दिसत होतं.
प्रचि ३
प्रचि ३ : आता अचानक ऊन पडायला चालू झालं आणि आत्तापर्यंत पावसात/ धुक्यात लपलेली समोरची पर्वतरांग दिसायला लागली! ह्या क्षणानंतर जो ऊन-पावसाचा खेळ चालू झाला अख्खा दिवस!
प्रचि ४
प्रचि ४: नंतर थोडं पुढे आलो आणि पाऊस चालू झाला. शिवाय धुक्यात गुरफटलेला माऊंट गॅरीबॉल्डी पण जेमतेम दिसला. हा म्हणजे ज्वालामुखीनं तयार झालेला एक कोन (cinder cone) आहे.
प्रचि ५
प्रचि ५: शेवटी एकदा एल्फिन लेक्स ला पोहोचलो! हे तलाव किंवा तळी अतिशय छोटी आहेत पण ह्यातलं एक पाणी पिण्यासाठी आणि दुसरं वापरण्यासाठी आहे. ह्या वेळी हवेत जाम गारवा आणि पाऊस होता आणि तलावाजवळ जाऊन पाहिलं तर काही आचरट लोक त्यात चक्क पोहत होते!
प्रचि ६
प्रचि ६: तलावांच्या मागे एक झोपडी केली आहे ज्यात भटके मंडळी रात्रीचा मुक्काम करू शकतात. ही झोपडी म्हणजे एकावेळी ३०-४० लोकांची सोय होईल एवढी होती. त्याच्याच मागून काढलेला हा अजून एक फोटो
प्रचि ७
प्रचि ७: तलावांचं अजून एकदा दर्शन!
प्रचि ८
प्रचि ८: आणि आता ज्यामुळे संपूर्ण ट्रीप वसूल झाली असं म्हणता येईल असं कँपग्राऊंडमधून दिसणारं दृष्य! नुकत्याच पावसामुळे ओलं झालेलं हिरवं गवत, रंगीबेरंगी तंबू, हवेतला गारवा, ऊंच ऊंच पर्वतरांगा, समोर दिसणारं ग्लेशियर आणि त्यावर रेंगाळणारे ढग! अक्षरशः आवाक करणारं होतं!
प्रचि ९
प्रचि ९: अजून एक छोटं तळं आणि तळ्यात दिसणारं ढगांचं प्रतिबिंब
प्रचि १०
प्रचि १०: परतीच्या वाटेवर थोडं ऊन आल्यावर अजुन एक फोटो
प्रचि ११
प्रचि ११: एका ठिकाणी दरड कोसळली होती तिथून खाली दिसणारे दगड, मागचं जंगल आणि अर्ध्या भागात पाऊस! नंतर पावसानं झोडपून काढलं, ते इतकं की पार्कींगमध्ये पोहोचेपर्यंत पुन्हा फोन बाहेर काढायला वेळंच मिळाला नाही !
प्रचि १२
प्रचि १२: आता संध्याकाळ झाल्यामुळे उन्हं तिरकी पडत होती आणि सकाळी धुक्यात दिसणार्या झाडांची टोकं सोनेरी दिसायला लागली होती!
संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद! प्रतिक्रिया जरूर कळवा!
खूप सुंदर ... वर्णन आणि फोटो
खूप सुंदर ... वर्णन आणि फोटो तर अप्रतीम.
प्रचि...५ व ९ ...लहानपणी दिवाळीतल्या किल्ल्याबरोबर एखादं शेत(बहुतेक मोहोरी पेरून) आणि त्यातच दगड धोंडे माती इ.ची मांडणी करून त्यात घरातलाच फुटका आरसा ठेऊन अगदी असंच दृश्य दिसायचं ...त्याची आठवण झाली.
आवडला लेख आणि प्रचित्रं
आवडला लेख आणि प्रचित्रं
छान वर्णन, सर्व फोटोदेखील छान
छान वर्णन, सर्व फोटोदेखील छान आहेत.
आवडले.
मस्त लिखाण आणि फोटो ही छानच !
मस्त लिखाण आणि फोटो ही छानच !
छान वर्णन आणि फोटो! आवडले!
छान वर्णन आणि फोटो! आवडले!
वाह! मस्त.
वाह! मस्त.
धन्यवाद! @ मानुषी,हर्पेन,
धन्यवाद!
@ मानुषी,हर्पेन, प्रसाद, मनीमोहोर, निर्मल, पद्मावति
मस्त... अगदी या सर्व फोटोंचे
मस्त... अगदी या सर्व फोटोंचे कॅलेंडर करुन ठेवावेसे वाटतेय.
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
वाह ब्यूटिफुल!!!!!!
वाह ब्यूटिफुल!!!!!!
फोटो अफलातून आहेत.
फोटो अफलातून आहेत.
फोटो मस्त काढले आहेत
फोटो मस्त काढले आहेत
सुंदर फोटोज
सुंदर फोटोज
अफाट सुंदर फोटोज...तो
अफाट सुंदर फोटोज...तो टेंटसवाला तर अप्रतिम!
मस्त फोटोज!
मस्त फोटोज!
सुंदर फोटो. ९ नंबरचा अशक्य
सुंदर फोटो.
९ नंबरचा अशक्य आवडला. आणि खाली लिहिलेली बारीकशी माहितीही आवडली.
मस्त
मस्त !
मस्त !
मस्त आहे. तिकडे आले की करायला
मस्त आहे. तिकडे आले की करायला पाहिजे हा ट्रेक !