युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहाहा! काय सुरेख दिसतायत वड्या. टिनची आयडीया मस्तच.
माझे कोथिंबीरीच्या वड्याचे मिश्रण नेहमीच थोडे सरसरीत होते त्यामुळे उंडा केला तर तो चपटा होतो म्हणुन मी सरळ कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावुन त्यात मिश्रण घालुन वाफवते. आता टिनमध्ये ट्राय करते.

रेसीपीच लिहायची होती ना दिनेशदा नविन धागा काढुन.
वाटणात काय काय घेतले आहे. डाळ कच्चीच आहे का?

रश्मी, धन्यवाद! ही रेसीपी मी पाहिलेली आहे आधी, दिनेशदांनी यावेळेस वेगळे जिन्नस वापरलेले दिसतायत : )
जिरे, सुक्या मिरच्या, बडिसोप समजले पण ती डाळ कोणती आहे ते नाही समजत आणि मलातर ती कच्चीच वाटते आहे.
कोथिंबीरचा सिझन सुरु आहे सध्या त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या ट्राय करता येतील Happy

निल्सन, वेलकम.

ती चणा / हरबरा डाळच आहे. आणी डाळच काय बाकी सारे साहित्य त्यांनी कच्चेच ठवले आहे नमुन्यासाठी.

आयत्या वेळी वड्या करायचे ठरले ( कोथिंबीर मिळाली म्हणून ) डाळ भिजवली नव्हती. म्हणून कच्ची चणा डाळ, लाल मिरच्या, जिरे आणि बडीशेप असे वाटले. त्यात थोडी तुरीची डाळ पण घेतली.

मग आले लसूण वाटण, मीठ, हळद, हिंग, तेल व कोथिंबीर घालून भिजवले.

पालक ,आळू ,मेथी,को.वडी करता ना बेसना ऐवजी चणा डाळ भिजवुन पाणी न घालता आले मिरची ग्यालुन जादसर वा यची त्या त को थिं बी र लिंबाचा रस घालुन दिनेश दा च्या प्रमाणे वड्या करायच्या वेगळी चव येते तसेच वा ट लेल्या डाळीचे पि ठले जास्त खमंग लाग ते.

वा ट लेल्या डाळीचे पि ठले जास्त खमंग लाग ते.>>>

वाटल्य डाळीच्या पिठल्या साठी ह. डाळ भिजवताना त्यात वाटीमागे चिमूट भर शेंगदाणे भिजत घाला व डाळी सोबत वाटून मग त्याचे पिठले बनवा स्वाद खूपच अप्रतिम येतो!

आज घरी सांगावे करायला डाळदाण्याचे पिठले!
Happy

डाळ भिजवताना त्यात वाटीमागे चिमूट भर शेंगदाणे भिजत घाला>> मग एकच दाणा घालावा लागेल, चिमटित एकच दाणा मावेल की

को वड्या अप्रतिम दिसतायत.
वाटल्या डाळीचं पिठलं माहित नव्हतं , मी पिठल्याची फॅन आहे त्यामुळे हे नक्की करून बघणार.

मैदा न वापरता (कणिक वापरून) केलेली पुरणपोळी दिसायला एका बाजुने साध्या पोळीसारखीच दिसत होती (रंगाने). बाकी चांगली झाली होती. तसच लाटलेल्या पोळीवरची तां. पिठी तशीच रहात होती थोडी. त्यासाठी ( आणि एकुणातच सुरेख पु.पो. जमण्यासाठी ) काही युक्त्या आहेत का?

चिमटित एकच दाणा मावेल की>>.

शब्दशः घेऊ नको हो.. आवडी नुसार घाला आता मूठ भर म्हटले असते तर कुणाची मूठ? हे ही प्रश्न आले असते.

आणि चिमूट दोन बोटांची ५ बोटांची अश्या आपपल्या सवयीने आणि आवडीने असू शकतात! Happy

साधारण २५० ग्राम डाळीला ४७३५७ मिलिग्राम शेंगदाणे घाला असे लिहायला हवे होते का? Wink

लाटून झाल्यानंतर पुरणपोळीवर राहिलेली पिठी हलक्या हाताने साफ करून कदाचित जाईल.

>> दिसायला एका बाजुने साध्या पोळीसारखीच दिसत होती (रंगाने)

कणिक वापरण्यात हेच तोटे असतात. ती अजून चांगली तिंबून शक्य तेव्हढी/कमीत कमी वापरायला लागेल म्हणजे कव्हर अगदी पातळ होईल आणि आतल्या पुरणाचा सोनेरी रंग येईल पोळीला पण मैदा वापरून हे जास्त सोपम होतं किंवा अर्धी कणिक अर्धा मैदा इत्यादी.

मी कणीकच वापरते पुपोला , कणीक नेहमिच्या पोळ्याना भिजवतो तशिच भिजवावी , चान्गली १-२ तास भिजली पाहिजे मग एका वाटित पाणि आणि दुसरी तेल घेवुन कणीक तिबायला घ्यावी , पालथ्या मुठिने चान्गली तिबायची तेल पाणि लावायच अस करत कणिक एकदम मस्त मउसुत आणि लाबट झाली की झाली, पुपो लाटायला मात्र मैदा घ्यावा.

>>>>मैदा न वापरता (कणिक वापरून) केलेली पुरणपोळी दिसायला एका बाजुने साध्या पोळीसारखीच दिसत होती (रंगाने). बाकी चांगली झाली हो<<<
मलाही असाच प्रॉबलेम झालेला. आणि अशी एका कुसकट काकूकडून ( काहीच काम न करता सुचना देण्यात पटाईत) कमेंट मिळालेली की, त्या चपात्या कशाला केल्यास? (अगदी कुसकट आवाजात मोठ्याने)

पण एकंदरीत त्यांचा स्वभाव हा कुणाचेर्ही तारीफ करण्ञाचा नसल्याने मी मनावर घेतले नाही.

मी कणकेच्याच करते.
खर्‍या एक्सपर्ट पुरणपोळ्यावाल्या मैद्याची अत्यंत पातळ तेलात १ दिवस भिजवलेली कणीक वापरतात.
पण तितक्या प्लॅनिंग ने पुपो केलीच नाही कधी Happy

मी पण कणिकच वापरते , फक्त कणिक मैद्याच्या चाळणीने चाळून घेते. पोळी लाटल्यावर जर जास्तीची पिठी राहीलीच तर मऊ सुती रुमालाने हलक्या हाताने झटकून टाकते आणि नंतर पोळी तव्यावर टाकते.

मी पूर्ण कणकेच्याच करते. मीपण स्निग्धाने म्हटलंय तसं कणीक सपीटाच्या चाळणीने चाळून घेते. नीट भिजली आणि मुरली की तिंबून घेते. अगदी जीव खाऊन पालथ्या मुठीने तिंबायची Wink आणि तांदळाच्या पिठीवर लाटते. लाटताना (गरज वाटली तर) पोळपाटाला सुती फडका बांधते. मग पोळी तव्यावर गेली की सुती रुमालाने हळूच झटकते. पोळी फुटू नये म्हणून मी गूळ आणि साखर दोन्ही अर्धं अर्धं घेते.

काल रात्री घारगे केले होते. पहिल्यांदाच. अंदाज न आल्याने खुपच जास्त झालं आहे पीठ. परत घारगे च करावे लागतील का? की अजुन काही करता येईल त्या पीठाचं?

कणकेत भोपळा, गूळ घातलाय ना? मग कणीक गोडसर चवीची झाली असेल. छोटी पुरी लाटून तव्यावर तेल / तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून बघा. चव फार बदलेल असं वाटत नाही.

घारग्याच्या पिठाच्या गोड पोळ्या छान होतात. आमच्याकडे पथ्य असलेल्या मंडळींसाठी तळण नको म्हणून आम्ही पोळ्या करतो. ते पीठ खूप घट्ट असेल तर पाण्याचा हात लावत (आणि गोडपण कमी करायचा नसेल तर पिठीसाखर घोळवत) मळून घ्या. तव्यावर तूप सोडून पोळ्या भाजा. नक्की चांगल्या होतात.

कणीक मळून घ्यायची स्टेप करताना थोडी सँपल कणीक करून बघा कारण पहिल्यांदाच घारग्याचं पीठ केलंय असं तुम्ही लिहिलंयत, त्यामुळे पुन्हा अंदाज घ्यायला थोड्याशाच पिठावर प्रयोग करा.

मी अर्धा लिटर दूध घेते, त्यात फक्त ३ चहा होतात दिवसभरात. मी रात्री एखादा कप दूध पिते. बाकी सगळं दूध उरतं. सारखी खीर तरी कुठे करणार ?

मला रोज ताक हव असेल तर त्या दूधाला विरजण लावत जाऊ का ? पण मग त्या लोण्याचं तूप करावं लागेल का काय ?

साय ढकलत नसशील तर लोणी-टूप होणारच नाही. ताज्या ताकासाठी दुध रोज जरूर विरजावे. अर्धा लिटर मधले एखादा कप उरत असेल.

साय मी वेगळी काढते तूपासाठी. दूध उरतं अगं बर्‍यापैकी. दूधाला विरजण म्हणजे दही मिक्स करू रात्री , बरोबर ? सकाळी ताक झालेलं असेल का दही ?

Pages