Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 12:06
प्रवेशिका ५ : गुलमोहोर
मूळ गझल : रंग नभाचे - कवी वैभव जोशी
रुप माबोचे वर्षावर्षाला बदलत होते
कुणीतरी जुने असावे, नवे असे हे समजत होते
आज अचानक इथे मिळेना प्रतिसाद जनाचा
ह्याच चित्राला काल तिथे पण भरगोस होते
कशास होती सुरु तिथे ती चर्चा नक्की
बघाता बघता सगळेच काही(तरी) बरळत होते
मी काही ठरवून कंपूंना जूडत नाही
जे होते ते उपेक्षितांचे अंतरंग होते
प्रतिसादाचा रोख टिकेचा असेल तर मग
'वा, वा छान छान'चेही बहरात शिकरण होते
असेच हळवे उत्कट होते काव्य कालचे
जुळवत होते, पाडत होते.. पण यमकत नव्हते
अजूनही तो देव कुणाचा, समजत नव्हते
बुप्रांचे ते तर्कट घोडे नाचत होते
अलगद पानावरती बसले फुलपाखरू
मनात माझ्या मी गड्डा झब्बू सजवित होते
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारी आहे की !
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !