मायबोली मास्टरशेफ - साक्षी - ब्रोकोली मश्रूम सुप

Submitted by साक्षी on 14 September, 2016 - 12:32

इतके स्टार्टर्स झाले. स्टार्टर्स म्हणलं की बरोबर गरमागरम सुप हवच! Happy

साहित्य : ब्रोकोली - १/२ कप
श्रूम : मोठे ५-६
लोणी : १/२ चमचा
कांदा : १ मध्यम
मिरपूड : चवीनुसार
मीठ : चवीनुसार
दूध : १/४ कप
क्याचे पीठ : १/२ चमचा

कृती :
१. ब्रोकोली वाफवून प्युरी करून घ्या.
मश्रूम पातळ काप करून घ्या.मश्रूम थोडे वाफवून प्युरी करून घ्या.
कांदा बारीक चिरून घ्या.
२. ब्रोकोलीचे ४-५ तुरे आणि मश्रूमचे थोडे काप सजावटीसाठी बाजूला ठेवा.
३. पॅनमधे लोणी गरम करा. फार गरम होण्याआधी़ कांदा घालून परता.
४. कांदा पारदर्शक झाला की त्यात दूध, मक्याचे पीठ पाण्यात कालवून घाला.
५. ब्रोकोलीची प्युरी घाला. उकळी येउ द्या. घट्ट वाटल्यास पाणी घाला.
६. मश्रूम घाला. मश्रूम घातल्यावर फार उकळू नका.
७. चवीप्रमाणे मीठ व मिरपूड घाला.
८. ब्रोकोलीचे ४-५ तुरे व मश्रूमचे काप घालून गरम वाढा.

BroccoliMashroomSoup.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मश्रूमला मराठीत ओळंबी म्हणतात माहित आहे. पण मीठ आणि मिरपूड आहे मदतीला! Wink

बाकी सगळ्यांच्या पाककृती एकापेक्षा एक आहेत. तरीही म्हणलं आपण कमीत कमी परिक्षेला बसू तरी. म्हणून हा प्रयत्न. Happy

आयत्या वेळी जाग आल्यामुळे साहित्याचे फोटो वगैरे लाड जमले नाहीत.

~साक्षी

वॉव, चविष्ट आहे रेसिपी.. गार्लिक ब्रेड आणी हे सूप.. आहाहा..
मक्याचं पीठ घालून ट्राय नाही केलं कधी.. करून पाहीन आता