पाणी 'कपात' आहे. (प्रकाशचित्रांचा झब्बू - ३) - समाप्त!

Submitted by संयोजक on 11 September, 2016 - 11:55

टपरीवरचा चहा म्हणजे त्या छोट्याश्या पारदर्शक काचेच्या पेल्यातला, उडप्याकडचा चहा म्हणजे स्टीलच्या वाटीवर उपडा केलेला पेल्याताला. बीअरच्या ग्लासमध्ये वाईन नाही आणि वाफाळत्या कॉफीच्या कपात पाणी नाही. अर्थात काही विशिष्ट ठिकाणी चहा मुद्दाम पाण्याच्या ग्लासातून दिवसाच्या ठरावीक वेळी मिळतो, आणि तो प्यायला मिळावा म्हणून आपण गर्दीही करतो.
आपण विविध द्रव पदार्थांचे सेवन करतो आणि ते करण्यासाठी अनेकविध पदार्थांपासून (मटेरिअल) बनवलेल्या विविध आकाराच्या वस्तू वापरतो. या झब्बूमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या खास वस्तूंचा संग्रह करणार आहोत. प्रकाशाचित्रांबरोबर काही खास गोष्ट, टिपा असतील तर त्यासुद्धा वाचायला आम्हाला आवडतील. ज्या भांड्याचं प्रकाशचित्र तुम्ही टाकाल, त्यात मुख्यत्वे काय प्यायलं जातं, हे लिहायला विसरू नका.

हे लक्षात ठेवा -

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. येथे तुमच्याकडे असलेल्या विविध प्रकारच्या भांड्यांची (ज्यांतून द्रव पदार्थांचे सेवन केले जाते) प्रकाशचित्रे टाकायची आहेत.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
7. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदा.

kapaat.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन मस्त कप, लडाख मधली रन म्हणजे मस्तच असणार ! मागे एक भूतान मधली पण ऐकली होती.

आमचा सकाळी " मोका मोका " Wink

Moca.jpg

मस्त आहेत सगळे फोटो.
हर्पेन, तुम्हाला त्या मॅरेथॉनचा योग परत जुळून येण्यासाठी शुभेच्छा! तो मग मस्त आहे.

हे वरचं स्पाईस्ड गावा पंच फार भारी दिसतंय. चव इमॅजिन करता येतीये थोडी. ही रेस्पी मिळाली. बघितलं पाहिजे करून.

सगळे फोटोज मस्त, पण सिंडरेलाच्या फोटोला १० पैकी १०. ( My favorite chili Vodka.... कि दुसरंच काही आहे? )

Caipirinha - याला Mojito's Brazilian Cousin म्हणतात. पण हे मला Mojito पेक्षा जास्त स्ट्राँग आणि म्हणुन जास्त आवडलं.

perfect.jpg

K7.jpg

Pages