३ मुलं जी वस्तीगृहात रहात असतात सकाळी उठून तयारीला लागतात. एक होता जाडा जो जरा जास्तच खादाड असतो. दुसरा होता लुकडा जो खूप खट्याळ असतो. आणि शेवटचा होता साधा भोळा जो त्या दोघांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा. सकाळी सकाळी त्यांची पार शर्यत लागत असे की पहीले आंघोळ कोण करणार. कसे बसे प्रत्येकजण आपापली आंघोळ आटपत तयारी करून कामाला जातात. दिवसभर काम केल्यावर संध्याकाळी थकून भागुन सगळे घरी परततात.
बराच वेळ इकड तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर सगळ्यांनाच जोरदार भुक लागते. तिघे ठरवतात की बाहेरून काही खायला मागवावे. भोळ्या फोन करुन एका चांगल्या हाँटेल मधुन ३ प्लेट चायनिस मागवतो. तिघेही चांगलेच भुकेले असतात. पँकेट खोलून काही खायच्या आत लुकड्याला करामत सुचते. तो दोघांना शर्यत लावायला सांगतो कि बघू कोण जास्त लवकर हे संपवू शकतो. लुकड्या खट्याळ असल्या कारणाने नेहमी अशा शर्यती लावत असे. त्यात काय ती मज्जा म्हणे लुकड्याला नेहमी सुचायची. त्याची गोष्ट ऐकून दोघेही तयार होतात. पँकेट मधलं चायनिस एका मोठ्या ताटात ठेवले जाते. लुकडा, भोळा आणि जाडा तोंडाला लाळ येई पर्यंत ताटाकडे पाहत होते. अचानक लुकड्याने हात खाली केला आणि तिघेही ताटावर तुटुन पडले. जाड्याने खाता खाता दोघांना असे दुर लोटले होते जसे आपण माशीला करतो. कितीही प्रयत्न करून सुध्दा ते ताटाजवळ जाऊ शकले नाही. जाड्याने बघता बघता तीन प्लेट चायनिस सुपडा मारून साफ केले आणि डेकर दिली.
लुकड्याला खुप राग आला होता. रागातच तो जाड्याशी भांडू लागला.
" काय रे बाबा कमी पडले की अजून देऊ..."
" तसं कमी तर पडलं....आणखिन मागवताय का? नाय म्हणजे तुम्हाला कमी पडलं असेल. " जाड्या तोंड पुसत म्हणाला.
" कमी नाय.... जरा जास्तच झालं आता तुझं....अरे राक्षसा आमचं दिवसभराच जेवण तु एका वेळेला खातोस...एवढं ठेवतोस कुठे? वर कमी पडलं असेल हे विचारतोस.. आता मला पण खा..." तनतनत लुकड्या बोलला.
" ए...एवढा का चिडतोयस मी एवढं कुठे खातो...थोडसं तर खाल्लं... आता ते माझ्या दोन चार घासात संपलं त्याला मी काय करू..." निरागस चेहरा करत जाडा म्हणाला.
डोक्याला हात मारत लुकडा स्वतःशीच म्हणाला...
" झक मारली आणि जेवण ऑर्डर केलं....बाहेरच जाऊन जेवलो असतो तर परवडलं असतं..."
जाडा खुश होत म्हणाला..." बाहेर जाणार आहे का? चल ना...मला अजून भूक लागलेय..."
भोळा म्हणाला..."झक मारली आणि ह्या लुकड्याचं ऐकुन शर्यत लावली...मरा आता ऊपाशीच..."
खुपच छान लिहलयं...हसुन हसुन
खुपच छान लिहलयं...हसुन हसुन पुरेवाट झाली...
नाही आवडलं।
नाही आवडलं।
नाही आवडलं।
नाही आवडलं।