खुलता कळी खुलेना - नवी मालिका - झी मराठी

Submitted by योकु on 26 June, 2016 - 11:55

तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी सगळे नानुमामा काही बोलले की उगाचच कानकोन्डे होतात .>>> नाही, विक्रान्तची आजी त्यान्ना बरोबर Handle करते.

आता विक्रान्तचे वडील आणि काका काही वेळेसाठी दुकान सोडून कुठे बाहेर नाही जाऊ शकत का? नानूमामाने उगाचच ह्या गोष्टीचा issue केला काल. त्याला स्वत:ला नाही का सान्भाळत येत दुकान? आजीने चान्गल सुनावल त्यान्ना काल.

विक्रांतने बाळाची जबाबदारी घ्यायची ठरवली आहे ना? मग घरच्यांपासून का लपवाछपवी चालू आहे? कधी डिक्लेअर करणार आहेत?

बर मॉनिकाला तीन महिने झालेत ना? बाकी काही सोडा, तिला खायलाही देत नाहीत बिचारीला. तिला भूक लागत नाही का?

विक्रांतने बाळाची जबाबदारी घ्यायची ठरवली आहे ना?>> नाही. असं काहीही दाखवलेलं नाही. तो तिला सांगतो की तुझं आणि माझं नातं फक्त एक डॉक्टर आणि एक पेशंट असं आहे आणि असंच राहिल. तुझ्यामाझ्यात नेहमीच एक भिंत असेल कायमची.
बाळाच्या जबाबदारीबद्दल त्याने काहीही म्हटलेलं आत्तापर्यंत मी तरी पाहिलेलं नाही.

बाकी काही सोडा, तिला खायलाही देत नाहीत बिचारीला. तिला भूक लागत नाही का?>> तो पोहे घेऊन आला होता की तिच्यासाठी, बेडसर्विस!! म्हणजे जेवायलाही देत असेलच.

अगं, सुरूवातीच्याच भागात होतं ना तसं- लग्न झालेलं आहे, त्यामुळे मॉ आणि बाळाची जबाबदारी मी घेईन असं तो म्हणतो, पण त्यांच्यात नवरा-बायकोचं नातं होऊ शकणार नाही असंही अ‍ॅड करतो.
बाळ अबॉर्ट करणार नाही, घटस्फोट देणार नाही, घरच्यांना सत्य काय ते सांगणार नाही... म्हणजे जबाबदारी घेणारच आहे तो. मग सांगायला वेळ का लावतायेत?

रच्याकने, मानसीची डायलॉग डिलिव्हरी अगदीच नाटकी आहे, तिचा चेहराही एक्स्प्रेशनलेस आहे. त्यापेक्षा मॉचा अभिनय बराच चांगला आहे.

लोकेश गुप्ते ( विक्रांत चा काका) खूपच चबी गोळा दिसतो. टू मच स्किन ऑन चीक्स अँड फेस ..आणि एकदम सफेद रंगरंगोटी! .... मैदा भिजवून ठेवल्या सारखा दिसत होता काल. .प्लीज त्याचे क्लोज अप्स दाखवू नका आणि त्याला जरा वजन कमी करायला सांगा.

मॉनिका कडे ते दोनच दोन - लाल व निळा - ड्रेसेस आहेत!
विक्रांत हे सगळ का लपवतो आहे आणी का स्वीकारतो आहे तेच कळत नाही!

लोकेश गुप्ते ( विक्रांत चा काका) खूपच चबी गोळा दिसतो. टू मच स्किन ऑन चीक्स अँड फेस ..आणि एकदम सफेद रंगरंगोटी! .... मैदा भिजवून ठेवल्या सारखा दिसत होता काल. .प्लीज त्याचे क्लोज अप्स दाखवू नका आणि त्याला जरा वजन कमी करायला सांगा.>>> मला आवडतो तो.

वादळवाट मधे इन्स्पेक्टर समर म्हणून छान दिसायचा लोकेश, जुयेरेगा मधे हिरोचा भाऊ ते इथे हिरोचा काका. पण डायलॉग सेम - तुझ्या आणि बायकोत काही प्रॉब्लेम आहे का Wink

हो न....समर अजिंक्य म्हणून किती छान दिसायचा...मलाही आवडतो तो....पण म्हणूनच म्हटलं की जरा सुधारणा हव्ये!

धन्सं अन्जु तै आणि सुलु!

मानसीची डायलॉग डिलिव्हरी अगदीच नाटकी आहे, तिचा चेहराही एक्स्प्रेशनलेस आहे. त्यापेक्षा मॉचा अभिनय बराच चांगला आहे.> सहमत

मानसी चे चे उच्चार सदोष आहेत......आणि ती विक्रांत च्या मानाने अगदीच लहान दिसत्ये!
पण मोनिका पेक्शषा ठीके.

विक्रान्त मोनिकाला म्हणतो की आपल्यात फक्त Doctor-पेशन्टचेच नाते असेल कायमचे. आपल्यात नवरा बायकोचे नाते कधीच नसेल. विक्रान्तला जर असेच वागायचे होते तर मग तिच्याशी लग्नच का केले? सरळ मोडायचेच होते ना मन्डपात. मग बस तिला ट्रिट करत पेशन्ट म्हणून,

हे बर आहे, विक्रान्त बायकोकडे फक्त एक पेशन्ट म्हणून बघणार आणि पुढे बायकोच्या बहिणीच्या प्रेमात पडणार. It's not fair! हे मला पटत नाही.

विक्रान्त बायकोकडे फक्त एक पेशन्ट म्हणून बघणार आणि पुढे बायकोच्या बहिणीच्या प्रेमात पडणार >>> संपली की ष्टोरीच मग! आणा फुडली शिरेल Wink

संपली की ष्टोरीच मग! आणा फुडली शिरेल डोळा मारा >>>
होसुमीयाघ मध्येसुध्दा जानूचे श्रीशी लग्न झाल्यावर अश्याच 'मालिका संपली' म्हणुन पोस्ट आल्या होत्या. त्यानंतर त्या मालिकेचे अनेक धागे आले.
खुकखु चा हा पहिलाच धागा आहे. इतक्यात मालिका संपवली तर मग आपण सगळे पिसं कशाची काढणार?
बाकी, हि मालिका आल्यापासुन कादिप मागे पडली.

मानसीचा एक ड्वायलाक ऐकला - "मेला तुजी कायजी वाट्ते, तैऽऽ"

ती ताई म्हणतच नाही, तै असंच ऐकू येतं. Proud

टॉम & जेरीची मानवी आवृत्ती बघायला मजा येतेय. मी फार मराठी मालिका पाहिलेल्या नाहीत, त्यामुळे हे बरोबर असेल का माहीत नाही, पण खलनायिका मालिकेच्या थेट केंद्रस्थानी असलेली आणखी एखादी मालिका आहे का?

बॅकग्राउंड म्युझिक, स्पेशली त्यातले रडके आलाप बंद केले तर आणखी मजा येईल.

अवांतर -
१२ ऑगस्टच्या 'आफ्टरनून' या सायंदैनिकात ओमप्रकाश शिंदे [विक्रांत] याचा फोटू व मुलाखत पाहिली. शीर्षक आहे - सुपर शिंदे ! मला त्यातलं एक उत्तर भावलं - " मराठी सिनेमाच्या मला कांहीं ऑफर्स आहेत पण मीं सध्यां या सिरीयलमधे [ खुलता कळी...] इतका बिझी आहे !" [ कॉलेजमधे असताना मी मित्राना सांगायचो, 'खूप पोरी मागे लागतात रे...पण मीं सध्यां अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करतोय '. त्याची आठवण झाली. Wink ].

<< तरी जान्हवीची आई ईथेही असल्याने ती काही हे सहजासहजी होऊ देणार नाही. >> काल मोनिकाला तिच्या माहेरीं पाठवण्याचा निर्णय परस्पर आपणच घेवून व अंमलात आणून विक्रांतच्या आत्याबाई मोकळ्या ! 'जान्हवीची आई' आतां आपल्या साच्यातल्या रोलमधे इथंही फॉर्मात आलीच !! Wink

खुशाल येवूं दे तुमची आई तीन-चार महिन्यांकरतां ; नंतर मात्र फक्त आठच दिवस
माझीही आई यईल. 'जान्हवीची आई'च म्हणतात तिला आमच्या कॉलनीत !
apaij2.JPG

खरे तर जान्हवीच्या आईचा स्टँड एकदम बरोबर आहे. पण हा येडा विक्रांत तिला काही साथच देत नाहीये. काय कारण त्याल मॉनिका ला इतकं भिऊन वागायचं? तो इतका भिडस्त आणि दबून का वागतो तिच्या समोर?

आणि निर्मला आत्याने तरी...तिच्या माहेरच्या घरासमोर नेलंन..तर आत का नाही नेऊन सोड्लं ? सगळे इतके भितात हिला? कमाले!

तो इतका भिडस्त आणि दबून का वागतो तिच्या समोर?>>>

बहुतेक इक्रांतचे काही तरी गुपीत मोनिकाला ठाव असणार! Wink

बहुतेक इक्रांतचे काही तरी गुपीत मोनिकाला ठाव असणार!>>> ते मूल विक्रान्तचे तर नसेल ना? सिरीयल आहे तेव्हा काहीही दाखवू शकतात.

मूल विकीचं नैचै पण विकीके अंदर का डॉक्टर लैच जागा आहे नं म्हणून प्रॉब्लेम आहे (भावनेपेक्षा कर्तव्य मोठे वैगरे), मोनीला टेन्शन नको, बाळाला त्रास व्हायला नको, गर्भार्पणात घ्यावयाची काळजी इ.इ. Proud

Pages