Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ईंग्लंडची मॅच बघता नाही आली,
ईंग्लंडची मॅच बघता नाही आली, पण स्कोअरबोर्ड क्लासिकल आहे.
ईंग्लंड - २९७
पाकिस्तान - ४००
ईंग्लंड (१०३ चा लीड अंगावर घेत) दुसर्या डावात - ४४५/६ डिक्लेअर
पाकिस्तान (अखेरच्या दिवशी, २०-२५ ओवर शिल्लक असताना) १४९/८
.. पहिल्या डावातील आघाडीनंतर पराभवाकडे
आता १५२/९ ... रीलेंटलेस
आता १५२/९ ... रीलेंटलेस बॉलिंगने फिफ्थ डे कोलॅप्स घडवून आणण्याचे क्लासिक उदाहरण. ऋ अगदी बरोबर.
जबरी इंटरेस्टिंग चालू आहे.
जबरी इंटरेस्टिंग चालू आहे.
१५१- ९ वरून पाकने २०१ पर्यंत
१५१- ९ वरून पाकने २०१ पर्यंत डाव खेंचूनही शेवटी इंग्लंड जिंकलंच !
असामी, मानलं << शिवाय हा पहिलाच सामना आहे. बहुतेक वेळा पहिला सामना टिपिकल इंग्लिश नसलेल्या पिचवर खेळवतात नि मग गाफिल झालेल्या समोरच्या संघाला धोबीपछाड घालतात > > यासाठी.
यादव, मिश्रा, पुजारा बाहेर.
यादव, मिश्रा, पुजारा बाहेर. नोहिट, जडेजा, भुवनेश आत. नॉट सो ईंप्रेस्ड विथ टीम सिलेक्शन.
बॉल स्विंग होत असेल, तर भुवनेश चालेल. जडेजा पार्ट टायमर आहे आणी टेस्ट मधे स्पेशलिस्ट खेळाडू हवेत असं माझं मत आहे. नोहिट तर तसंही टेस्ट टीम मधे बसत नाही, त्याला बसवावं लागतं. त्याच्यासाठी कोहली ३ रा आला (आणी गेला पण), रहाणे ४था आलाय.
वे..इंडिजने भारताला प्रथम
वे..इंडिजने भारताला प्रथम फलंदाजीला पाचारण करून वेगवान व चेंडूला उसळी देणार्या पीचचा लाभ उठवायला सुरवात केलीय . भारत ३८-२ [ ९षटकं]. धवन व कोहली बाद.
आज वे.इंडिजच्या वेगवान गोलंदाजानी पूर्वीच्या वे.इंडीजच्या झंझावाती तोफखान्याची आठवण [बरोबरी नाही] जुन्या- जाणत्याना करून दिली असेल !
<< .. मिश्रा, पुजारा बाहेर... . >> या दोघाना वगळणं तर खूपच आश्चर्यकारक !
'नॉट सो ईंप्रेस्ड विथ टीम
'नॉट सो ईंप्रेस्ड विथ टीम सिलेक्शन' नि '<< .. मिश्रा, पुजारा बाहेर... . >> या दोघाना वगळणं तर खूपच आश्चर्यकारक !' ह्या दोन्ही कमेंट्सना अनुमोदन. अतिशय विचित्र निर्णय. कोहली तीन वर येण्यासारखा मूर्खपणा नसावा. कमीत कमी राहाणे ला तरी वर सरकवायचे होते.
भाऊ इंग्लंडबद्दल ते फक्त एक ऑब्सर्व्हेशन होते. अर्थात मागचा सामना टिपिकल इंग्लिश पिचवर नव्हता पण इंग्लंडच्या स्ट्रेंग्थला अनुसरून असलेल्या पिचवर होता. शेवटच्या दिवशी बॉल रिव्हर्स स्विंग होउ लागल्यावर पाकिस्तानच्या विकेट्स क्लस्टरमधे पडल्या. अँडरसन, ब्रॉड नि विशेषतः फिन बॉल रिव्हर्स स्विंग करण्यामधे कदाचित पाकिस्तानी बॉलर्स पेक्षा अधिक प्रवीण असावेत. ज्या तर्हेने हा सामना इंग्लंडने जिंकला त्यावरून मला भारतीय दौर्याची काळजी वाटते आहे.
"कोहली तीन वर येण्यासारखा
"कोहली तीन वर येण्यासारखा मूर्खपणा नसावा." - सहमत. सद्यस्थितीत टेस्ट मॅच मधे कोहली आणी रहाणे ह्यांना अजिबात धक्का लावू नये असं मला वाटतं. शर्मा जर पुजारा ला रिप्लेस करणार असेल, तर त्यानेच तिसर्या क्रमांकावर बॅटींग ला यावं. नाहीतर त्या रिप्लेसमेंट ला अर्थच नाही. लवकर विकेट पडल्यावर, टेस्टींग कंडीशन्स असताना, ३र्या क्रमांकावर बॅटींग करणं आणी ६ व्या क्रमांकावर, बॉलर्स दमलेले असताना, बॉल जुना असताना आणी थोड्या रन्स चं बॅकिंग असताना बॅटींग करणं ह्यात बरच अंतर आहे.
पुजाराला रिप्लेसच करायचं होतं
पुजाराला रिप्लेसच करायचं होतं तर मुरली विजयला घ्यायला हवे होते आणि राहूलला ३ नंबर वर बोलवायला हवे होते असे मला वाटते. गेल्या १० टेस्ट मच्येस मध्ये ४८ चे अॅव्हरेज असतानाही तो बाहेर आहे हा त्याच्यावर अन्याय आहे.
<< नॉट सो ईंप्रेस्ड विथ टीम
<< नॉट सो ईंप्रेस्ड विथ टीम सिलेक्शन. >> वे. इंडीजला लिंबूटिंबू संघ समजून प्रयोग कारायची चूक तर कोहली आणि कं करत नाहीय ना ! वे.इंडीजचा हा नवोदीत संघ नि:संशय प्रतिभावान आहे व अनुभव, संधी मिळाल्यास वरचढ होण्याचीही दाट शक्यता आहे, असं मला वाटतं. शिवाय, त्याना मार्गदर्शन करायला वे.इंडीजची विव्ह रिचर्डस, जोएल गार्नर इ.इ. दादा मंडळी तिथं आहेच, हेंही महत्वाचं.
<< भाऊ इंग्लंडबद्दल ते फक्त एक ऑब्सर्व्हेशन होते. >> असामी, पण तें एका जाणकाराचं ऑब्सर्व्हेशन होतं, हें सिद्ध तर झालं ना !
मुरली विजयला घ्यायला हवे होते
मुरली विजयला घ्यायला हवे होते >> अरे तो पूर्ण फिट नाहिये म्हणून नाहिये.
वे. इंडीजला लिंबूटिंबू संघ समजून प्रयोग कारायची चूक >> शक्य आहे. आज राहुल ने ५० काढले तरी अजिबात convincing वाटला नाही खरा.
रोहित सुंदर खेळतोय म्हणून त्याला घेतलाय (We feel that Rohit has been playing very well. Rohit Sharma can change sessions in a Test match. Taking nothing away from Pujara; he has been solid. Everybody needs to get chances. ) बघू आता काय होते ते ....
भाऊ टुक्का लागला अस समजायचे
पहिल्या इनिंगपुरता तरी रोहित
पहिल्या इनिंगपुरता तरी रोहित experiment fail गेला. "Everybody needs to get chances" चा अर्थ रोहितने वेगळाच घेतला कि काय
बाकी जडेचाच्या दोन ३०० नंतरही
बाकी जडेचाच्या दोन ३०० नंतरही अश्विन त्या आधी येतो ह्यातच जडेज्याच्या बॅटिंगवरील विश्वास दिसून येतो.
जडेजाचा विषय आला पुन्हा
जडेजाचा विषय आला पुन्हा
जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू आहे म्हणून तर नाही ना रोहीत शर्माला खेळवायचा धाडसी निर्णय घेतला
टीममधील एवढे गरज नसलेले बदल खरेच अनाकलनीय, आपल्याला एक दिवस काय खराब गेला आपण लगेच पर्याय शोधू लागलो. एक प्रकारची नकारात्मक सोच.
बाकी रहाणे मॅच्युअर इनिंग खेळतोय. त्याच्याकडून किमान दिडशतकाची अपेक्षा आहे ईथे मला..
कुछ ज्यादा तो नही बोल दिला..
जडेजाचा विषय आला पुन्हा
जडेजाचा विषय आला पुन्हा
जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू आहे म्हणून तर नाही ना रोहीत शर्माला खेळवायचा धाडसी निर्णय घेतला
टीममधील एवढे गरज नसलेले बदल खरेच अनाकलनीय, आपल्याला एक दिवस काय खराब गेला आपण लगेच पर्याय शोधू लागलो. एक प्रकारची नकारात्मक सोच.
बाकी रहाणे मॅच्युअर इनिंग खेळतोय. त्याच्याकडून किमान दिडशतकाची अपेक्षा आहे ईथे मला..
कुछ ज्यादा तो नही बोल दिला..
जिंक्स केलंस जिंक्सला
जिंक्स केलंस जिंक्सला रुन्म्या ... आउट झाला ३५ वरच.
ऑलिंपिक की क्रिकेट? फार गोंधळ
ऑलिंपिक की क्रिकेट? फार गोंधळ उडालाय. अगदी अधाशीपणा चालू आहे.
टिममधले बद्दल निश्चितच हितावह नाहीत मात्र.
हिंदी कॉमेंटेटरने राहुलला
हिंदी कॉमेंटेटरने राहुलला असेच बाद केले त्याचा बदला घेतला.
ये जब भी बीस के उपर बनाते है सीधे सौ बनाते है, बीच मे आऊटही नही होते....... आणि वाक्य पुर्ण होते न होते तोच आऊट
गेल्या कसोटीमुळे आत्मविश्वास
गेल्या कसोटीमुळे आत्मविश्वास वाढलेल्या वे. इंडीजच्या या तरूण संघाला खूप गंभीरपणे घेणं आवश्यक व शहाणपणाचं होतं. 'प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे' म्हणून संघात बदलव करायला व फलंदाजीचा अनुक्रम बदलायला हे काय गल्ली क्रिकेट आहे ? आज जर वे.इंडीजकडे सोलकर सारखा क्षेत्ररक्षक 'फॉर्वर्ड शॉर्ट-लेग'ला असता तर आपली परिएस्थिती अधिकच दारुण झाली असती. आपल्या संघ निवडीत, त्यासंबधीच्या धोरणात, खेळपट्टीचा अंदाज घेण्यात व या वे.इंडीजच्या संघाचं 'पोटेंशियल' अजमावण्यात कांहीतरी घोळ झालाय, हें नक्की !
"Rohit Sharma can change
"Rohit Sharma can change sessions in a Test match." - हे बर्याच वेळा त्यानं करून दाखवलय. सेशन च्या तोंडावर (सुरूवातीला किंवा शेवटी) आऊट होऊन दाखवण्यात कन्सिस्टंट आहे.
"जडेजासारखा अष्टपैलू खेळाडू आहे म्हणून तर नाही ना रोहीत शर्माला खेळवायचा धाडसी निर्णय घेतला" - कोहली होल्डर ला ट्रीक करतोय. 'सौराष्ट्राचा गॅरी सोबर्स' सातव्या क्रमांकावर येणार आहे.
"'प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे' म्हणून संघात बदलव करायला व फलंदाजीचा अनुक्रम बदलायला हे काय गल्ली क्रिकेट आहे ?" - सहमत!
मी तात्याच्या कमेंटची वाट
मी तात्याच्या कमेंटची वाट पाहत होतो अजून कसा नाहि बोलला जडेजाबद्दल ...
साहा, राहाणे नि अश्विन चा आजचा स्ट्राईक रेट बघून पुजारा पुढच्या सामन्यासाठी आत येईल अशी आशा वाटू लागलीये.
आज कोहली नि रोहित जातीने
आज कोहली नि रोहित जातीने अनुक्रमे साहा नि अश्विन चे पाय दाबून देतील
बाकी जडेचाच्या दोन ३०० नंतरही
बाकी जडेचाच्या दोन ३०० नंतरही अश्विन त्या आधी येतो ह्यातच जडेज्याच्या बॅटिंगवरील विश्वास दिसून येतो. >>>
आज कोहली नि रोहित जातीने अनुक्रमे साहा नि अश्विन चे पाय दाबून देतील >>>
बरं सर्व दादा फॅन्स करता ही एक क्लिप सापडली
https://www.youtube.com/watch?v=WlmtCHl4AV0
<< साहा, राहाणे नि अश्विन चा
<< साहा, राहाणे नि अश्विन चा आजचा स्ट्राईक रेट बघून पुजारा पुढच्या सामन्यासाठी आत येईल अशी आशा वाटू लागलीये.>> आज वे.इंडीजचे गोलंदाज खेळपट्टीला अनुसरून नेमकी गोलंदाजी करत होते. मधूनच छातीपर्यंत उसळणारे आंखूड टप्प्याचे चेंडू अचूक टाकत होते व ते खेळणं फलंदाजाना खूपच अवघड जात होतं. अशा चेंडूंवर उडालेले तीन तरी संभाव्य झेल फॉर्वर्ड शॉर्ट-लेगला चांगल्या रिफ्लेक्सेस असलेल्या क्षेत्ररक्षकाने निश्चित घेतले असते. त्यामुळे, पुजारा असता तरीही त्याचा स्ट्राईक-रेट फार वेगळा नसता , असं मला वाटतं. अर्थात, पुजाराला वगळणं समर्थनीय मात्र नव्हतंच.
फारएण्डजी, क्लिपसाठी धन्यवाद
[ << सर्व दादा फॅन्स करता ही एक क्लिप >> इथल्या 'दादा फॅन्स' क्लबचा मीं आजीव सभासद नसलो, तरी त्याच्या खेळाचा चाहता म्हणून क्लिप पहायला तुमची हरकत नसावी, असं गृहीत धरलं. ]
विश्वनाथची स्क्वेअर कट, .सुनीलचा स्ट्रेट ड्राईव्ह, अझरुद्दीन व सचिनचे मनगटी फ्लिक्स, युवराजच्या मिड-विकेटवरून मारलेल्या सिक्सर्स, कपिलचा पुल, द्रविडचा कव्हर ड्राईव्ह , सौरवच्या ऑफ-साईड कटस व ड्राईव्हज..इ.इ... हें जणूं जन्मतःच त्यांच्या सिस्टीममधे लोड करून ठेवल्यासारखंच ! ज्यांचं नशीब, त्यानी पहावं व परत परत पहात रहावं !!
भाऊ - जबरी . अशी लिस्ट
भाऊ - जबरी :). अशी लिस्ट करायला मजा येइल. माझी लिस्टः
गावसकर - स्ट्रेट ड्राइव्ह
विश्वनाथ - स्क्वेअर कट (मात्र हा दूरदर्शनच्या लांबच्या कॅमेर्याने पाहिल्याने, इमेज पेक्षा वर्णन जास्त लक्षात आहे. म्हणे होल्डिंग च्या बोलिंग वर दोन "थर्ड मॅन" लावत आणि त्यातूनही हा मारत असे)
वेंगसरकर - स्टान्स
कपिल - नटराज पुल. तसेच फ्रण्ट फूट कव्हर ड्राइव्ह
सचिन - बॅक फुट पंच, स्ट्रेट ड्राइव्ह, "व्ही" मधले सगळे शॉट्स, फास्ट बोलर्स ना मारलेले हुक्स, पुल्स आणि कट्स
द्रविड - कव्हर ड्राइव्ह, तो बॅट पूर्ण आर्क फिरवून मारलेला
दादा - कव्हर ड्राइव्ह, ऑफ ड्राइव्ह
सेहवाग - जागेवर उभा राहून मारलेला आणि पुढच्याच क्षणाला फिल्डर्स चे पुतळे करून बाउण्ड्रीबाहेर गेलेला कट
अझर - बॅक फुट वर चवड्यांवर उभे राहून बॅट पिसासारखी फिरवून मारलेला ऑफ/कव्हर ड्राइव्ह
लक्ष्मण - फ्लिक
युवी - फास्ट बोलर ला डीफ फाईन लेग ला मारलेले फोर्स्/सिक्सेस
धोनी - हेलिकॉप्टर
कोहली - ऑफ साईडला पंच सारखे मारलेले ड्राइव्ज
द्रविड - कव्हर ड्राइव्ह,>>
द्रविड - कव्हर ड्राइव्ह,>> त्यापेक्षा तो जे पुल कम ऑन ड्राईव्ह मारत असे ते मला जास्त सरस वाटायचे. म्हणजे अझर किंवा व्हीव्हीएस सारखे Out of the world नसले तरी पर्फेक्ट कव्हर बुक.
वेंगरसरकर नि कोहलीचे कव्हर ड्राइव्ह क्लासिकल असत्/असतात. वेंगरसरकर तर दादा मानला जात असे त्यातला (इती षटकार)
त्यामुळे, पुजारा असता तरीही त्याचा स्ट्राईक-रेट फार वेगळा नसता >> तसे नव्हे भाऊ. तुम्ही मी वर दिलेला कोहलीचा कमेंट वाचलात का ? स्ट्राईक-रेट ला एका लिमिटपुढे किम्मत दिली जाऊ नये असे सुचवत होतो. रोहित ला मुख्यत्वे आत आणण्याचे कारण पुजाराचा स्ट्राईक रेट आहे हे त्यातून ध्वनित होत आहे. (हे गोष्ट सोडा कि पुजाराचा स्ट्रा. रे. नेहमीच सुरूवातीला अतिशय कमी असतो नि तो नंतर एखादी कळ दाबल्यासारखी शैली बदलून बर्यापैकी फास्ट होतो. जेव्हढे conversion मोठे तेव्हढा strike rate catch up अधिक होत जातो नि त्यामूळे मग सुरूवातीचे स्लोव खेळणे तितकासे खपत नसे. गेले काहि सामने मोठ्या लांब इनिंग्स न खेळल्यामूळे हे स्लो खेळणे अधिक लक्षात येत आहे. असे असताना कोहलीने त्यावर कमेंट करणे विचित्र वाटतेय. पुजाराने त्याची एकंदर स्टाईल, जी त्याला आत्तापर्यंत - लक्षात घ्या तो रणजीमधेही असाच खेळून धावांचे डोंगर उभारत आलाय, यशस्वी ठरवत आली आहे ती बदलायला हवी असे सुचवले जात आहे का त्याला ? ह्यामागचे कारण बॉलर्स न अधिक वेळ मिळावा २० विकेट्स घेण्यासाठी ? पाच पाच बॉलर्स घेऊन (मागच्या सामन्यामधे वेदर न बघण्याचा मूर्ख पणा कोणाचा होता कोण जाणे ?) २० विकेट्स वेळेत घेता येत नसतील तर कमी बॉलर्स मधे आहे हे मान्य करून त्यावर उपाययोजना करणे अधिक योग्य ठरणार नाही का ?
असामी, पुजारा, स्ट्राईक रेट,
असामी, पुजारा, स्ट्राईक रेट, ५ बॉलर्स विषयीच्या तुझ्या प्रतिसादाशी सहमत.
फारएण्ड, वरची लिस्ट बनवताना सचिन पुढे ब्लँक ठेवली असतीस तरी चालली असती. त्याचा मैदानावरचा वावरच जणु क्रिकेट personify करायचा. शास्त्रीय संगीतातले उस्ताद वगैरे जसं नेहेमीच्या बंदीशीत एखाद्या जागेवर एखादा वेगळाच सूर लावतात किंवा थोडी वेगळी जागा घेऊन त्या बंदीशीचा परिणामच बदलून टाकतात, तसं सचिन नेहेमीच्याच शॉट्स मधे स्वतःचं असं काहीतरी घालून, किंवा अर्ध्या-पाव सेकंदाचा डिले आणून त्या शॉट चं रंगरूप च बदलून टाकायचा. आत्ता लिहीता लिहिता आठवलेले दोन शॉट्स म्हणहे, २००३ च्या वर्ल्ड कप मधे पाकिस्तान च्या विरुद्ध अक्रम विरुद्ध सुरुवातीला मारलेला बॅकफूट पंच (कव्हर मधून गेलेली फोर) आणी नंतर शोएब च्या त्या सिक्स नंतर च्या बॉल ला नुसती पुढे आणून ठेवलेली बॅट आणी लाँग-ऑन ला गेलेली फोर.
द्रविड बॅटींगला उतरला की ईतका विश्वास असायचा की आता धावांची भिंत उभी रहाणार आहे. सहजता, त्यातून येणारं सौंदर्य आणी तु उल्लेख केलेला पूर्ण बॅट फिरवून मारलेला, किंवा करियर च्या सुरूवातीला गुढघ्यावर बसून मारलेला कव्हर ड्राईव्ह किंवा असामी ने उल्लेखलेला पुल शॉट, ऑस्ट्रेलियात मारलेले स्क्वेअर कट्स... केवळ लाजवाब.
लक्ष्मण, कोहली ह्यांच्या मनगटात मसल्स ऐवजी स्टील च्या वायर्स असाव्यात अशी मला शंका आहे.
युवराज च्या डीप फाईन लेग च्या सिक्सेस चा उल्लेख झालेला आहेच. मला त्याचे ऑफ ड्राईव्ह्स पण आवडायचे.
सेहवाग च्या अप्पर कट (ज्याला तो उपर कट म्हणतो) च्या ईतकाच तो सरळ लाँग ऑफ वरून जे बॉल प्रेक्षकात भिरकावून द्यायचा, ते कमाल असायचं. 'भिरकावून द्यायचा' हाच वाक्प्रचार सेहवाग च्या बॅटींग ला शोभतो. सेहवाग च्या बाबतीत जेन्टल पुश वगैरे म्हटलं की मला अरनॉल्ड श्वारझेनेगर च्या सिनेमात बागेतली रोमँटीक गाणी घातल्यासारखं वाटतं.
अजिंक्य रहाणे, फास्ट बॉलर्स ना पुढे नाचत येऊन (डान्सिंग डाऊन द विकेट चं भाषांतर), निव्वळ टायमिंग वर एक्स्ट्रा कव्हर च्या डोक्यावरून सिक्स मारतो, ती बघायला मजा येते. हा एव्हढासा बॅट्समन असं काही करेल अशी अपेक्षाच नसताना एकदम तो शॉट येतो. त्याचा सुद्धा पुल बघायला मजा येते.
छान लिहीले आहे फेरफटका. सहमत
छान लिहीले आहे फेरफटका. सहमत आहे. २००३ च्या त्या मॅच मधला बहुधा अक्रम ला दोनदा आणि वकार ला एकदा चांगल्या बॉल्स वर मारलेले कव्हर ड्राइव्ह्ज मला त्या फेमस सिक्स पेक्षा जास्त आवडतात. व्ही मधला सचिन फार जबरी होता.
साहा मुर्ख आहे का? 1 रन
साहा मुर्ख आहे का?
1 रन अश्विनला काढून दिली नाही तेवढे अश्विन वरचे प्रेशर कमी झाले असते आणि लंच नंतर आरामात खेळला असता
सिक्स मारून अश्विनचे शतक!
सिक्स मारून अश्विनचे शतक! शाबास पठ्ठे!
Pages