अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बुवा, सँडर्सआजोबा एक चांगले कँडीडेट होते. मान्य. पण त्यांनी २०१५ च्या नोव्हेंबर मधे डेमोक्रॅटिक पक्षाचं सभासदत्व घेतलं होतं, हे माहित आहे ना? सँडर्स आजोबा स्वतःला नेहमीच इंडीपेंटंट म्हणून प्रेझेंट करत आले आहेत. जेव्हा निवडणूक लढवायची वेळ आली तेव्हा त्यांनी डे पक्षाचा पदर पकडला. त्यांची मतंही अतिडावी होती जी पक्षाच्या एकंदरीत धोरणांना align नव्हती. स्वतःला 'मी या पक्षाचा नाही' असं रीप्रेझेंट केल्यावर पक्षांर्तगत आणि पक्षाच्या नेत्यांकडून त्यांच्याबाजूनं कौल मिळणं अवघड होतं. याची सँडर्सअजोबांनाही कल्पना होती. त्यांना बहुमत मिळालं असतं याचीही श्वाश्वती नव्हती. हिलरीच्याजागी बाकी दुसरा कुठलाही उमेदवार असता तरीहीपक्षाकडून हेच पाऊल उचललं गेलं असतं. ते चुकीचं आहे हे, पण प्रेसिडेंटेशिअल निवडणुकीत ट्रंपला मिळणारा पाठिंबा बघता नोबडी वाँटस टू टेक एनी चांस.

आणि vox काय फॉक्स न्यूज पण नाही>> हो पण इट इज अ इंटरनेट ब्लॉग. त्यापेक्षा फायनानशिअल इंस्टीट्यूटने दिलेली माहिती जास्त वेटेज खाते. Vox मधेही मुद्दे वाचले तर २००८च्या क्रायसेस्चा एकंदरीत परीपाक आहे असं म्हणतायत. मुद्दे ४ आणि ५.

>>
इराक युद्द्याचा दोष हिलरीच्या डोक्यावर तोही रिपब्लिकन्स नी मांडणे ह्या पलीकडे हास्यास्पद प्रकार नसावा. ' त्या युद्धास पूरक असे खोटे पुरावे देणारे कोण होते ?' हे बघायलाही हरकत नसावी ना. दोन्ही पक्षांनी खर तर आपण मूर्खपणा केला असे मान्य करून तो प्रकार फाईल करायला हवा.
<<

१. तमाम ट्रंपसमर्थक हे पारंपारिक रिपब्लिकन आहेत हे गृहितक चुकीचे आहे. कितीतरी मुरलेले रिपब्लिकन हे ट्रंपच्या विरोधात आहेत. आणि ट्रंपच्या निमित्ताने कितीतरी बिगर रिपब्लिकन लोक ट्रंपकरता रिपब्लिकन बनलेले आहेत. ज्याने ह्या युद्धखोरीत सिंहाचा वाटा उचलला तो बुश ट्रंपचा कडवा विरोधक आहे. तेव्हा इराकच्या युद्धाचा उदोउदो करणारे रिपब्लिकन आणि ट्रंप समर्थक ह्यांच्यात गफलत करू नये.
२. खुद्द ट्रंपने इराक युद्धाला दुबळा का होईना पण विरोध दाखवला होता.
३. हिलरीने युद्धाला समर्थन दिलेले होते. आपल्या राजकारणातील प्रदीर्घ अनुभवाचा, आपण कसे जुने जाणते आहोत ह्याचा डंका हिलरी कायम पिटत असते. तेव्हा असा तथाकथित प्रदीर्घ अनुभव असूनही इराक युद्धाला पाठिंबा देणार्‍या हिलरीची जाण कितपत असेल हे लोकांना ठरवू द्या.
४. इराक युद्ध हे फाईल अँड फरगेट ह्या जातकुळीतले नाही. त्या युद्धाचे एक अपत्य म्हणजे आयसिस. ते आजही जगाची डोकेदुखी बनलेले आहे. त्याची अन्य काही अपत्ये म्हणजे इराणचे जास्त ताकदवान होणे, सिरियातली यादवी, कुर्द, तुर्क, इराकी ह्या गटांचा संघर्ष वगैरे वगैरे.

हो त्याप्रमाणेच फोरचून मध्येही गुड बॅड आणि अगली अशी तीनही वर्णने आहेत. माझा मुद्दा असा होता की, माध्यमांना या बातमीमुळे हिलरीवर आगपाखड करता आली असती, पण ट्रम्प नी स्वतः निर्माण केलेल्या स्केण्डल मुळे त्यांनी फोकस ट्रम्प वरच ठेवला

या मुद्द्यांचा हिलरीवर आगपाखड करण्यात किती उपयोग होईल? ओबामा अ‍ॅडमिनेस्ट्रेशननं घेतलेले निर्णय आहेत हे. फारतर डेमो पक्षानं असं म्हणता येईल पण त्याला तिच्याकडे उत्तर असणारच.
बाय द वे, फॉर्च्युनचं आर्टीकल जानेवारीतलं आहे. (मी परत जाऊन कन्फर्म केलं. मी फेब-मार्चच्या दरम्यान वाचलं होतं) अजून विश्लेषण करणारी नविन आर्टीकल्सही ढिगानं सापडतील. पण थेट ओबामा अ‍ॅडमिनेश्ट्रेशन्वरच आणि त्यांच्यामुळेच इकॉनॉमी खाली जातेय असं कोणी क्वचित म्हणतंय. आणि जरी हे खरं असलं तरी ट्रंप त्याला उत्तर नक्कीच नाही. आगीतून उठून प्रचंड मोठ्या आगीत पडण्यासारखं होईल.

अंजली, सँडर्स का आला आणि नंतर नॉमिनेशन का नाही मिळालं ह्याला तू म्हणतेयस तसे फॅक्ट्र्स असतील सुद्धा. मला स्वतःला सँडर्स आवडला होता. आणि मी आधीच म्हणलय, की मेबी हिलरी जिंकून आली असतीच नो मॅटर व्हॉट पण तरी अशी प्रोसेस रिग केली गेली हे अत्यंत वाईट झालं येवढाच माझा मुद्दा होता.

मी ट्रम्प स्पोर्टर नक्कीच नाही, फक्त मुद्दे देणे त्रयस्थ दृष्टीने हाच माझा उद्देश होता. उलट मीच राज ला इकॉनॉमी बद्दल विचारतो आहे

बुवा, ते नैतिकतेला धरून नव्हतं हे डे लोकपण मान्य करतायत. पण मी म्हटलं तसं प्रेसिडेंटशिअल निवडणुकांमधे नोबडी इज गोईंग टू टेक एनी चांस. त्यात हिलरीचा वैयक्तिक दोष कसा असू शकेल? तसं असेल तर मग २०००ची निवडणूकीवरही प्रश्न उठतात. २००० कृष्णवर्णीय लोकांची फ्लोरीमधे नोंदच नव्हती आणि त्यामुळे बुश जिंकला. त्यावरही अनेक प्रश्न उठले, बोंबाबोंब झाली. पण बॉटमलाईन तीच - नोबडी इज गोईंग टू टेक एनी चांस. इटस प्रेसिडेंटशिअल इलेक्शन.

बाय द वे आम्ही इडीपेंडंट म्हणून नोंद केलेली आहे :). त्यामुळे कँडीडेटला महत्व द्यायचा प्रयत्न करतो, पक्षाला नाही. री पक्षाची गन कंट्रोल, अ‍ॅबॉर्शन, गे राईटसवरची मतं वगैरेमुळे त्यापक्षाबाबत चीड निर्माण होते आहे. त्यात आमच्या राज्याच्या री गव्हर्नरने इकॉनॉमी, शिक्षण इत्यादीची व्यवस्थित वाट लावली आहे.

धनि, हो, मीपण मुद्देच मांडतीये, नो वरीज Happy

मलाही डी अन सी मध्ये त्या खान दांपत्याला बोलावणं हे मूव्ह आणि आर एन सी मध्ये वरती धनिने लिहिल्या प्रमाणे त्या बेनगाझी मधल्या विक्टिमच्या नातेवाइकांना बोलावण्याची मोव्ह अजिबातच पसंत नाही.

डेमोक्रॅटिक पक्षाची बरीच धोरणं माझ्या विचारांशी सुसंगत वाटतात
उदा.
गन कंट्रोल
प्रो चॉइस
अफोर्डेबल हेल्थकेयर
एल जी बीटी राइट्स

पण सँडर्स आजोबांची फ्री कॉलेज ही आयड्या अजिबातच पसंत नाही.

ट्रंप हा अजिबातच प्रेसिडेन्शियल नाही. तो अति व्होलाटाइल, संतापी, सारासार विवेक नसलेला , शून्य इंपल्स कंट्रोल असणारा , अनस्टेबल मनुष्य वाटतो आणि माझ्या देषाचा प्रेसिडेंट म्हणून अगदी अयोग्य.

आय अ‍ॅम विथ हर Happy

मी त्या उदाहरणात हिलरीला वैयक्तिक दोष देत नव्हतो. डेम साईडनी झालेल्या घोर पापाला कोणी फूटेज देइनात इतकं ह्याबाबत आश्चर्य आणि खेद व्यक्त करत होतो. Happy
नोबडी इज गोईंग टु टेक अ चन्स म्हणजे लोकं असल्या गोष्टी करतीलच असं म्हणत आहेस का? मला कळलं नाही नेमकं.

धनि, वरच्या एका प्रतिसादात मी संक्शिप्त उल्लेख केला होता, डिटेल मध्ये नाहि. जाॅब क्रिएशन, टॅक्स रिफाॅर्म्स वगैरे इकानामी बुस्ट करण्याचे एजंट्स आहेत. ट्रंप डिटेल प्लॅन लवकरच जाहिर करेल, अजुन ३ महिने आहेत. आणि आता तर ग्रोथ रेट १.२% झाला आहे, ओबामाच्या क्रुपेने; नो वन कॅन गो बिलो दॅट... Happy

डार्क पास्ट - गाय्ज, आॅल आय कॅन से इज यु हॅव टु लर्न ए लाॅट अबाउट दि क्लिंटन्स. ॲंड इट्स ओन्ली इन काॅंटेक्स्ट विथ ए पब्लिक आॅफिस...

करतीलच असं नाही तर वेळ आली तर करण्याचं सोडत नाहीत असं म्हणत होते. ते रीपब्लीकन असो वा डेमो. ट्रंपच्या फाटक्या तोंडामुळे मिडीयाला एक शुअर टीआरपी मिळण्याचा विषय मिळाला आहे. सहाजिक हिलरीसारख्या बोअरींग पर्सनॅलिटीकडे मिडीया कशाला लक्ष देतो?

राज, ट्रंपचा डार्क पास्ट का नाही विचारलं तर क्लिंटनचा पास्टपण कसा डार्क आहे हे का सांगताय?
>>हिलरीसारख्या बोअरींग पर्सनॅलिटीकडे मिडीया कशाला लक्ष देतो?>> टोटली. ट्रंपला इतकी प्रचंड पब्लिसिटी मिळत्येय, हिलरीला नाही. आणि एनी पब्लिसिटी इज.. प्रमाणे नाव रोज रोज मनात कानात राहतंय.

झालं परत बोलले तुम्ही. Lol आता मिस्डीड्स पण सांगा असं अंजली म्हणेल.

अंजली, मिडीया बाबत म्हणत होतीस होय. आत्ता आलं लक्षात. गाट इट. खरय. तीच तर शोकांतिका आहे. सनसनीखेज ला महत्व, येवढ्या मोठ्या वायोलेशन्ला नाही.

१. तमाम ट्रंपसमर्थक हे पारंपारिक रिपब्लिकन आहेत हे गृहितक चुकीचे आहे. कितीतरी मुरलेले रिपब्लिकन हे ट्रंपच्या विरोधात आहेत. आणि ट्रंपच्या निमित्ताने कितीतरी बिगर रिपब्लिकन लोक ट्रंपकरता रिपब्लिकन बनलेले आहेत. ज्याने ह्या युद्धखोरीत सिंहाचा वाटा उचलला तो बुश ट्रंपचा कडवा विरोधक आहे. तेव्हा इराकच्या युद्धाचा उदोउदो करणारे रिपब्लिकन आणि ट्रंप समर्थक ह्यांच्यात गफलत करू नये. >> माझा काहि गोंधळ होत नसेल तर गिंगरिच पासून प्रिबस पर्यंत सगळे ट्रंपच्या बाजूने किल्ला लढवणारे इराक युद्धाच्या वेळी Dem नव्हते. रबर स्टँप बुश , कर्ता करविता चेनी हे रिपब्लिकन नव्हते ? माझा मुद्दा साधा सरळ आहे. रिपब्लिकन पक्षाच्या core group नी त्या वेळी खोटे ( किंवा अपुरे) पुरावे निर्माण करून सगळ्यांचीच दिशाभूल केली , तेंव्हा त्याचा नि त्यातून निर्माण झालेल्या प्रत्येक complexity चा दोष हिलरीवर कसा ढकलला जातो ? इराक युद्धच झाले नसते तर बेंगाझी होण्याची शक्यता तरी किती होती ? तेंव्हा selective दोषारोप कशाला ? " तेव्हा असा तथाकथित प्रदीर्घ अनुभव असूनही इराक युद्धाला पाठिंबा देणार्‍या हिलरीची जाण कितपत असेल हे लोकांना ठरवू द्या." हे म्हणताना ती त्यावेळी सत्तेमधे नव्हती हे लक्षात असू दे. समोर आलेल्या पुराव्यावर सगळ्यांनी मत दिलेले आहे. ( तीचे सोडा त्यावेळी आपली स्वतःची भूमिका काय होती ? हा प्रश्न स्वतःला विचारून पाहणे जरुरी आहे) २००१ नंतर ह्या देशात जे वातावरण होते त्या वेळेस असे कोण 'माय का लाल' असणार होते जे समोर आलेल्या सरकारी पुराव्यांना 'नाहि हे खोटे आहेत' असे म्हणून बोंबाबोंब करणार होते ? " इराक युद्ध हे फाईल अँड फरगेट ह्या जातकुळीतले नाही." हे मान्य आहे पण त्याचा दोषारोप एकमेकांवर करण्यापेक्षा त्याचा दोष एका वर ढकलण्यापासून पुढे सरका असे 'ते फाईल करा' म्हणण्यामधे सांगायचे होते.

आय डोंट हेट हिलरी. माय काॅंशंस जस्ट डोंट लेट मी ओवरलुक हर होरीफिक मिसडिड्स... >> I think that is fair enough राज पण तुम्ही मग ट्रंपला justify का करताय ? Wink

राज त्या दिवशी तुम्ही ट्रंप च्या रशियन वक्तव्याबद्दल म्हणताना Damage is already done. म्हणालात. त्याबद्दल लिहायचे राहून गेले होते. हो damage is already done. हिलरी अमेरिकन आहे ह्याबद्दल ट्रंपला तरी शंका नसावी (अजून ओबामा किम्वा क्रूजच्या बापासारखे अजून बर्थर controversy चे पिलू सोडलेले नसल्यामूळे ग्रुहित धरतो), किंबहुना democratic party च्या बर्‍या जणांच्या अमेरिकन असण्याबद्दल शंका नसावी. असे असताना 'Let's make America great again' म्हणणार्‍या उमेदवाराला एक foreign state तुझ्या sovereign देशाच्या democratic process मधे बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करतेय ह्याबद्दल निषेध करावा असे वाटू नये ? केवळ तेव्हढेच नाहि तर त्याला अजून उत्तेजन देणारे वक्तव्य केले जाते. त्याच्या पाठीराख्यांना हे मान्य आहे ? उद्या जर एखाद्या हॅकरने ट्रंपचे Tax Returns असे उघड केले तर त्याचा हाच response असेल का ?

राज हे तर हिलरी पण करेल ना? आणि टॅक्स वाढवायचा प्लॅन सांगूनही बरेच बिझनेस लिडर्स तिला पाठिंबा देत आहेत कारण तिच्याकडे बरोबर प्लॅन आहे असे त्यांना वाटते !

,

,

,

आता मिस्डीड्स पण सांगा असं अंजली म्हणेल. >>> म्हणेल नाही, म्हणणारच Wink
गंमत म्हणजे हिलरी हेटर्स, क्लिंटन्सने बर्‍याच वाईट गोष्टी केल्या आहेत म्हणणारे खूप आहेत पण काय काय केल्यात सांगा म्हटलं तर मिळणार्‍या डोनेशन व्यतिरीक्त अजून कुठला मुद्दा नसतो Uhoh
ती ट्रस्टवर्दी नाही म्हणतात, पण का नाही याचं विश्लेषण देता येत नाही.
ती मासेसपासून डिस्कनेक्टेड आहे, उच्चभ्रू, श्रीमंत लोकांशी(च) तिचे जास्त सबंध आहेत. हे मुद्दे तर मलापण मान्य आहेत. आणि यावर तिनं प्रयत्नपूर्वक काम करायला हवं हे माझंही मत. यापलीकडे अजून काय? तिच्या सिनेटर असतानाच्या कारकिर्दीविषयी लोकांना किती माहिती आहे? ती SOS असतानाची? तेव्हा तिनं केलेल्या कामाची? त्याविषयाबद्दल न बोलता फक्त 'मिस्डीडस'? Uhoh
बेनगाझी प्रकरण झालं, त्यात तिची चूक असेलही. असेलही एवढ्यासाठीच म्हणते आहे की खरं काय आणि का घडलं हे कधीही लोकांसमोर येणार नाही. पण SOS म्हणून या घटनेची जबाबदारी तिच्याकडे येते, जी तिनं कधीही अमान्य केली नाही. पण त्यावरून तिची ट्रस्टवर्दी असण्याबद्दल शंका उपस्थित केली जाते. अरे पण तिच्या कामाबद्दलही बोला ना.

माझा मुद्दा साधा सरळ आहे. रिपब्लिकन पक्षाच्या core candidates नी त्या वेळी खोटे ( किंवा अपुरे) पुरावे निर्माण करून दिशाभूल केली त्यामूळे त्याचा नि त्यातून निर्माण झालेल्या प्रत्येक complexity चा दोष हिलरीवर कशा ढकलतात ? " तेव्हा असा तथाकथित प्रदीर्घ अनुभव असूनही इराक युद्धाला पाठिंबा देणार्‍या हिलरीची जाण कितपत असेल हे लोकांना ठरवू द्या." हे म्हणताना ती त्यावेळी सत्तेमधे नव्हती हे लक्षात असू दे. समोर आलेल्या पुराव्यावर सगळ्यांनी मत दिलेले आहे>>> असामी +१०००

२००१ नंतर ह्या देशात जे वातावरण होते त्या वेळेस असे कोण 'माय का लाल' असणार होते जे समोर आलेल्या सरकारी पुराव्यांना 'नाहि हे खोटे आहेत' असे म्हणून बोंबाबोंब करणार होते ?

ओबामा ?

अंजली +1

बऱ्याच वेळा मला असे वाटते की डेम जाहिरात आणि पब्लिसिटी करण्यात कमी पडतात आणि त्यामुळे त्यांची चांगली कामेही कळत नाहीत

Time च्या गेल्या वेळच्या हिलरी च्या ऑप अ‍ॅद पीस मधे तिच्या सुरूवातीचा काळाचा सुरेख आढावा घेतला आहे. तिचा approach ती first lady असताना health care च्या वेळी रिपब्लिकनंनी घातलेल्या घोळानंतर कसा बदलत गेला नि त्या नंतर कशी अलूफ वाटत गेली हा प्रवास आरामात पटतो. अगदी थिक स्किन असलेला कोणीही मनुष्य असता तरी तेच झाले असते असे वाटते.

>>राज पण तुम्ही मग ट्रंपला justify का करताय ?<<

लेसर आॅफ टु इविल्स, माझ्या मते. आणि पुढची चार वर्षं हिलरी आॅफिसमध्ये म्हणजे निष्क्रिय कारभाराची तीसरी टर्म. जस्ट कॅंट ड्रिंक दॅट कुल-एड...

डेमो लोक नाही, हिलरी स्वतः.
ती ओबामासारखी उत्तम वक्ता नाही. लोकांशी कनेक्ट कसं व्हायचं याची नस अजून तिला सापडलेली नाही. She needs to work on that. Big time.

'अमेरीकन प्रेसिडेंट' मूव्हीमधे मायकल डग्लस म्हणतो तसं 'यू बेटर कम विथ मोर दॅन बेनगाझी अँड इराक वॉर सपोर्ट' Wink

लेसर आॅफ टु इविल्स, माझ्या मते.>> शेवटचे दोन शब्द लिहिल्यामूळे fair enough असे म्हणायला हरकत नसावी Happy

सँडर्स मलाही आवडत होता. तो बिल माहेर वर दोन-तीनदा आला होता. तिथे बिल माहेरने त्याला 'तू हे सगळे कसे काय करणार ?" हे विचारल्यावर प्रामाणिकपणे 'अजून सगळे डीटेल्स आय्रन आऊट केलेले नाही पण मला विश्वास वाटतो कि हे करता येईल' असे दिलेले उत्तरही आवडलेले. पण त्याच बरोबर जेंव्हा system मधे एव्हढ्या घाऊक प्रमाणात drastic बदल सुचवले जातात नि त्या आधारे आपल्या निवडण्याची बोली लावली जाते तेंव्हा हे उत्तर माझ्यासाठी पुरेसे होत नाही. फक्त भरवशाचा आधारावर ह्या गोष्टी होतील असे मला वाटत नाही त्यानंतर माझा स्वतःचा सँडरस वरचा भरवसा उडाला.

निष्क्रिय कारभाराची तीसरी टर्म.>>>> Lol ट्रू रिपब्लिकन स्पिरिट.

असामी, आधी कँपेन द्वारा सुचवलेले गेलेले घाऊक बदल नंतर इंप्लिमेंट करायला अवघड होउन बसतात मग तिथेच डील कराव्या लागतात आणि त्या त्यानी ग्रेटर गूड करता केल्या असत्या कारण तो ट्रंप सारखा एककल्ली वाटला नाही.

घाऊक बदल नंतर इंप्लिमेंट करायला अवघड होउन बसतात मग तिथेच डील कराव्या लागतात >> बुवा तोच खरा क्र्क्स आहे ना. जर तुम्ही एखादी गोष्ट प्रॉमिस करत असाल नि त्याच्या जोरावर निवडूण यायची तयारी आहे तर तुमचे विचार नि प्लॅन पक्का हवा. शेवटी डीळ म्हटले कि compromise येणार हे उघड आहे. (कितीही सज्जन मनुष्य असला तरी ) मग अशा वेळी practical suggestions असलेले उमेदवार मला अधिक पटले.

Pages