अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ट्रंप निवडून येणार हे नक्की का?
असे वाटते.
नाही आला तर नाही. त्यासाठी पण आणंदोत्सव साजरा करा. एकदा इथे नि एकदा भारतात!!

चार वर्षांनी पुनः हीच सर्कस होईल. तेंव्हा पुनः असेच वादविवाद आपसात करत बसू. त्याचा निवडणुकांवर काहीहि परीणाम होत नाही, फक्त आपल्याला गंमत!

सध्या तरी ABC/Washington Post सोडून सगळे पोल्स हिलरीच जिंकणार म्हणताहेत.

>>> कॅलि प्रायमरी झाली तरी इथे शांतता?

हे एक संभाव्य कारण असेल का हो? Wink -

ट्रम्प रेसिस्ट/अपंगांना खिजवणारी/बिनबुडाची विधानं करणार --> त्यावर गदारोळ होणार --> ट्रम्पभक्त मात्र मीडियाच कसा, त्या विधानांचा विपर्यास करतो आहे ("गरीब बिचार्‍या ट्रम्पुला, मीडिया टपला छळण्याला!") चे राग आळवणार --> यथावकाश ट्रम्पही कोलांटउडी मारणार किंवा मी असं बोललोच नव्हतो म्हणणार --> repeat ad infinitum/hominem/hoc/nauseam

>>कॅलि प्रायमरी झाली तरी इथे शांतता?<<

जिओपी वाल्यांसाठी प्रायमरीज इंडियाना नंतरच संपल्या. आतातर सॅंडर्सकाकांनी सुद्धा शस्त्र म्यान (फायनली...) केली आहेत. तेंव्हा बिगमाउथ ट्रंप आणि खोटारडि हिलरी यापैकि कोण कोणाला धोबीपछाड मारतो ते नोव्हेंबर मध्ये पाहुया...

ट्रम्प प्रत्येक वेळेस काहीतरी बोलला की आता लाईन क्रॉस केली असे वाटत असे, पण त्याच्या रेटिंग्ज वर, प्रायमरी रिझल्ट्स वर त्याचा काहीही परिणाम होत नसे. काल तो रशियन हॅकर्स व हिलरी बद्दल जे बोलला ते म्हणजे त्याच्या इतर भंकस वक्तव्यांच्या तुलनेत सुद्धा अचाट होते. मला वाटले आता तरी रिपब्लिकन मीडिया त्याची गंभीर दखल घेइल.
पण वॉल स्ट्रीट जर्नल वरची एक बातमी वगळता फॉक्स, नॅशनल रिव्यू कोठेही उल्लेख सुद्धा नाही. रिपब्लिकन बेस पर्यंत हे पोहोचलेच नसेल.

काल तो रशियन हॅकर्स व हिलरी बद्दल जे बोलला ते म्हणजे त्याच्या इतर भंकस वक्तव्यांच्या तुलनेत सुद्धा अचाट होते. >>> अगदी! पूर्णपणे काहीच्या काही वक्तव्य!

कालचं ब्लुमबर्गचं भाषण मस्त झालं. मी पूर्ण नाही ऐकू शकलो पण इनजनरल मुद्दे एनपीआरव ऐकले ते चांगले आणि लॉजिकल वाटले. त्या टीम केनचं नाही आवडलं मला फारसं. खूप जास्त ड्रामॅटीक होतं.

खूप जास्त ड्रामॅटीक होतं.>>> To reach out to the 'base / grass root and to Bernie Sanders supporters. Yahoo News Room मधे याचं अनॅलिसिस झालं होतं. क्लिप मिळाली तर टाकते इथे.

काल तो रशियन हॅकर्स व हिलरी बद्दल जे बोलला ते म्हणजे त्याच्या इतर भंकस वक्तव्यांच्या तुलनेत सुद्धा अचाट होते.>> he just doesn't know what he is saying and what its impact is. Tondala yeel te boltoy.

काल तो रशियन हॅकर्स व हिलरी बद्दल जे बोलला ते म्हणजे त्याच्या इतर भंकस वक्तव्यांच्या तुलनेत सुद्धा अचाट होते.> हेच हिलरी बोलली असती तर आत्तापर्यंत ५-६ काँग्रेशनल हियरींह्गची घोषणा झाली असती. देशाभिमान हि फक्त आपलीच मक्तेदारी आहे असा आव आणणारे लोक कुठे गेलेत आत्ता देव जाणे Wink

हा हा. ट्रंपची कमेंट डेम्संना हि समजलेली दिसत नाहि... Wink

"Why do I have to get involved with Putin? I have nothing to do with Putin. I’ve never spoken to him. I don’t know anything about him other than he will respect me. He doesn’t respect our president. And if it is Russia — which it’s probably not, nobody knows who it is — but if it is Russia, it’s really bad for a different reason, because it shows how little respect they have for our country, when they would hack into a major party and get everything. But it would be interesting to see — I will tell you this — Russia, if you’re listening, I hope you’re able to find the 30,000 emails that are missing. I think you will probably be rewarded mightily by our press. Let’s see if that happens. That’ll be next. Yes, sir.”

इफ यु नो लिटल अबाउट टेक्नाॅलाॅजी, धिस कमेंट वाज ए ब्रिल्यंट ट्रॅप लेड डाउन बाय ट्रंप ॲंड डेम्स ब्लाईंडली फेल स्ट्रेट इंटु इट... Rofl

नाही राज, ते रिपब्लिक र्‍हिटॉरिक आहे. नंतर बनवलेले. आणि तो अगदी ट्रॅप होता हे एक मिनीट गृहीत धरले तरी त्यातले आवाहन प्रेसिडेन्शियल रेस मधल्या व्यक्तीने करणे हे गंभीर आहे. ट्रिवियलाईज करत आहे तो.

"हिलरीच्या मेल्स मधे काही national security वाले नाहि हे गळ्यात घालणे " हा ट्रॅप होता हे समजू शकते . Original text हे एव्हढेच होते
If Russia or any other country or person has Hillary Clinton's 33,000 illegally deleted emails, perhaps they should share them with the FBI!

अरे पण तो ज्या कोणाकडे (रशिया धरुन) त्या ३३,००० ईमेल्सची काॅपी आहे, त्यांना ती एफबिआयला देण्याची विनंती करतो आहे; त्यात अनप्रेसिडेंशियल किंवा देशद्रोह कुठून आला? डॅमेज इज आॅल्रेडि डन. हि इज आस्किंग फाॅर "हॅक्ड" ईमेल्स ॲंड नाॅट आस्किंग देम टु हॅक द सर्वर्स (दॅट आर लाॅंग गाॅन)...

धन्य आहे. Lol ही शुड बी अ कमेडीयन. हल्ली मज्जा यायला लागल्येय त्याची स्पीच ऐकताना.

वरचा नविन एपिसोड एकवेळ खपुन जाईल पण खान एपिसोडच्या बाबतीत तर ट्रंपने स्वत:च्याच पायावर गोळी झाडलेली आहे. त्याच्या कॅंपेन मधल्या कोणितरी खानला हॅंडल करायला हवं होतं, ट्रंप ऐवजी. एनीवे, डॅमेज इज आॅलरेडी डन, हि शुडंड पिक ए फाइट विथ एवरि स्लर थ्रोन ॲट हिम, गोइंग फाॅरवर्ड...

ट्रंपचं काही खरं नाही आता. बरय, एकेक वेडेपणा करत स्वतःच खड्ड्यात चाललाय.

हे मी लिहिलं खरं पण असे किती टक्के लोकं हे वक्तव्यं बघून वोट बदलतील हा एक माझा प्रश्न आहे. मला स्वतःलाही त्याची आधीची काही वक्तव्यं ठीक आहे बॉ अशी वाटली होती पण नंतर तर त्यानी कहरच केला. वोटिंग राईट असते तर अर्थातच मी त्याला वोट केलं नसतं पण असं कँपेन मध्ये ही लोकं काय सांगतात त्यावरुन शेवटी ठरवणारे किती लोकं असतील?

बाकी खान एपिसोड मध्ये जे काही ट्रंपनी बकबक केली, तो खरा ट्रंप आहे. नो सब्स्टन्स, निस्ती हवा.
परवा बफेटनी पण सॉलिड चिंद्या उडवल्या. फायनॅन्स अन मनी मध्ये तर सपोसेडली तो स्वतःला बादशाह समजतो पण हिंमत नाही करणार तो प्रत्युत्तर द्यायची बफेटला. अंदर कुछ हैच नई. ऑल स्मोक अ‍ॅन्ड मिर्र्स.

अमितव, पण त्यामुळे माझ्या बाबतीत तरी हिलरीचं पारडं जड होत नाहि. Happy

माझ्यामते, हिलरीपेक्शा तो चांगली धोरणं राबवु शकतो. यापुढे त्याने खान एपिसोड सारख्या अनफोर्स्ड एरर टाळल्या तर तो प्रेसिडेंट होउ शकतो...

राज तुमच्या मताचा आदर आहेच. conservative डायरेक्ट लिबरल होणार नाही ह्याची ही कल्पना आहे. फक्त ट्रंप विल डू फार टू damage ह्याची तुम्ही दखल घेतलीत म्हणून म्हटलं.

माझ्यामते, हिलरीपेक्शा तो चांगली धोरणं राबवु शकतो >> हे मत कशाच्या आधारावर बनवलत राज ? एक कुतूहल म्हणून विचारतोय. फक्त गट फिलिंग असेल तर जाउ दे.

तो ट्रंप खुप काही करु शकतो आणि एन्फोर्स करु शकतो हे एक मोठं पाय साईज बलोनी आहे. आत्ता पर्यंतच्या कुठल्याच वेंचरमध्ये त्याला भरभरून यश वगैरे मिळालेलं नाही. एक तर बिलियनेअर आहे की नाही त्यातच शंका आहे आणि त्यापेक्षाही साधं गूगल मारलं तरी बफेट, आयकॅह्न, सोरोस बद्दल माहिती वाचली तर कळतं की कुठे कुठे त्यांनी डोकं लावून येवढा पैसा मिळवला. हा भाऊ म्हणजे फक्त इकडचा पैसा तिकडे अन तिकडचा अजून कुठेतरी भलतीकडे येवढं करुन तगला आहे. बफेट म्हणला तसं, तुम्ही काही लाखांचं लोन घेतलं अन नाही फेडू शकले तर तुम्हाला जेल मध्ये टाकतील पण मिलिय्न्स घेतले तर "हँग इन देअर डोनल्ड" म्हणतील.

दॅट सेड, हिलरीही फेवरेट नाहीच. काही एन्फोर्स करण्यापेक्षा स्वतःचे अजेन्डे जास्त राबवेल असच वाटत राहतं. बट शी इज डेफ्निटली द लेसर इविल.

हिलरी प्रचंड करप्ट आहे. अणुकरारा वेळी भारताला पाठिंबा देण्यासाठी अमर सिंग कडून पैसे घेतले होते. त्या वेळी संत सिंग चटवाल यांनीही मध्यस्थी केली होती म्ह्णून त्यांना पद्मश्री दिली गेली. अर्थात नंतर ते कारगृहात गेले हा भाग अलहिदा. क्लिंटन फाउंडेशन , रोझ लॉ फर्म ई ई.

हिलरी युद्धखोर वाटते. किसिंजर तिचे मार्गदर्शक आहेत म्हणल्यावर "अंजामे गुलिस्तां क्या होगा !"

ट्रंपची इकाॅनाॅमी बाबतची धोरणं, जाॅब क्रिएशन, ट्रेड पाॅलिसीज, नॅशनल सिक्युरीटी, ॲंटाय-टेरीरीझम, इमिग्रेशन रिफाॅर्म ई. ई....

आॅन द अदरहॅंड, हिलरी (फिल इन द ब्लॅंक्स)...

[गाट टु रन फार ए वनोक्लाॅक]

Pages