त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप सुलतान बघायला जातोय. बहुतांश जणांचा चित्रपट एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी दुनियादारीच्या वेळी आणि नुकतेच सैराटबाबत केले होते. यण्दा हा मान चक्क सुलतानने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी सुलतानमध्ये नाहीत. म्हणून मग सलमान एखादी फाईट जिंकला रे जिंकला, की टीशर्ट काढून दादा गांगूलीच्या आवेशात फिरवायचा प्लान बनला आहे. मात्र शर्ट काढला तर आतले बनियान दिसणार, त्यामुळे नवी ब्रांडेड बनियान घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या बेबी नंदाला विचारले. म्हणजे गर्लफ्रेंड हो. तर तिने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाली बनियान हवीच कशाला? सीधी बात नो बकवास! शर्ट काढायचे आणि सरळ उघडे व्हायचे. पिक्चर तसाही सलमानचा आहे. त्याला लोकांसमोर उघडे व्हायला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप!
बस्स संध्याकाळ होताच हाच डायलॉग 'रात्रीस खेळ चाले' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक भूत पिशाच्च उगवू लागले आणि प्रत्येकाला ही दरिद्री आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या दिवशी घरून आंघोळ करून यायला आणि बनियानसह शर्ट काढायला तयार झाले. ठराव पास झाला. तिकिटे लागलीच बूक झाली. आणि ईथे माझ्या डोक्यात उदबत्ती पेटली..
तर अंतर आत्मा म्हणाला, भावा तो सलमान आहे. मस्सलचे गोडाऊन आहे. आपले एक छोटेसे हड्डीचे दुकान आहे. न लाजता शर्ट काढले तरी लाज ही जाणारच. पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. पण उगाच ती हाडाची काडं बघून एखाद्या कुत्र्याला मोह अनावर झाला तर ईंज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. कल्पना आहे की मल्टीप्लेक्समध्ये कुत्रे कुठून येणार.. पण मन शैतानाचे घर, भिती कुठूनही प्रवेश करते..
तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,
१) दहा दिवसांत लज्जानिवारण करण्याईतपत मांसाचे गोळे अंगावर कसे चढवावेत?
२) यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरुपी योजनेच्या अंतर्गत येत्या चार-सहा महिन्यात त्या मांसाच्या गोळ्यांवर आकार ऊकार नटस कटस बोल्ट कसे ऊगवावेत?
माहिती दोघांची तितकीच गरजेची असली तरी कृपया आधी नंबर १ बाबत सुचवा. वजन वाढवायला मी केळ खाऊ शकतो पण आता आणखी वेळ खाऊ शकत नाही..
एवढे दिवस शाहरूखचा फ्यान होऊन जगलो, आता काही दिवस सलमानचा फ्यान होऊन जिममध्ये मरायचा विचार करतोय.. खरंच, व्यायामाला वय नसते..
थॅन्क्स ईन् एडवान्स,
धन्यवाद आगाऊ ऋन्मेष
स्किन कलरचे बनियान घाल ,
स्किन कलरचे बनियान घाल , अंगावरचे सगळे केस काढ .![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आठवेल तसं लिहितो
धन्य आहेस तू ऋन्मेश
धन्य आहेस तू ऋन्मेश .............![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
थिएटरातले लाईटस चालू ठेऊन
थिएटरातले लाईटस चालू ठेऊन पिक्चर दाखवतात का हल्ली?
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आमच्यावेळी आम्ही थिएटरात (पडद्यावर कितीही ब्राईट दृश्य असले तरी) अंधार असतो म्हणून जायचो!
कुण्णाला काहीही दिसायचं नाही.
अस्यूमिंग तुम्ही खूप बारीक
अस्यूमिंग तुम्ही खूप बारीक आहात तर मग दहा दिवसात वजन/बॉडी कशी वाढणार?
तरी पण प्रोटीन ड्रिंक्स, नॉन वेज खाण्यावर भर द्या. तुमच्या जिम मधे एखादा इंटेन्सिव बॉडीबिल्डिंग प्रोग्राम आहे हा ते विचारा.
कुण्णाला काहीही दिसायचं नाही.
कुण्णाला काहीही दिसायचं नाही. >>> असं तुम्हाला वाटतं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अरे त्या टिव्हीवर एवढ्या
अरे त्या टिव्हीवर एवढ्या जाहिराती असतान की, बॉड_ई_बिल्डो वगैरे. सगळ्यांच मिश्रण खाउन बघ आणि सांग अनुभव.
नं २ बाबत नंतर लिहेन.
असं तुम्हाला वाटतं
असं तुम्हाला वाटतं![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
साती आम्ही शक्य झाल्यास
साती आम्ही शक्य झाल्यास पडद्यासमोर आणि शक्य न झाल्यास खुर्चीवर उभे राहून नाचणार. शर्ट काढून खुर्चीखाली नाही लपायचेय..
पद्मावती आभासी सुद्धा चालेल. क्रमांक एक बाबत हं. जर शॉर्टकट शक्य नसेल तर सोंग सही. वेळ मारून न्यायचीय. म्हणून बॉडीबिल्डींगच्या डॉक्टरांचा सल्ला न मागता ईथे धागा काढलाय.
पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क
पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. >>>
पण अरे तुच तर लिहिले आहे ना की, "मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप!"
म्हणजे तिने टिपावं अशी सुप्त इच्छा मनात आहे. म्हणजे मन साफ नाही !
त्यासाठी (मन साफ होण्यासाठी) सुप्तपिडानाशस्त्राव तिनदा कोमट पाण्याबरोबर घे. १० दिवसात मनही साफ अन तनही ! म्हणजे ना रहेगा बास वगैरे वगैरे.
मी अॅक्चुअली ८ दिवसातच बॉडी बनवली होती. तर प्लान असा आहे.
सकाळी ४ वाजता ऊठावे लागते. ब्रह्ममूर्हूत टळला तर बॉडी बनत नाही.
२०० बर्पी, १५० सुर्यनमस्कार, २०० स्वॅक्टस, १०० सिटप, १० मिनिटे प्लँक असा एक सेट !
तर तुला सकाळी नौकरीवर जायच्या आधी तीन सेट करावे लागतील. आणि आल्याबरोबर परत तीन. मध्ये बॉडीला रेस्ट !
हे केले की ४च दिवसात तुला बॉडी येईल. मग वरिल प्रकारच्या सुप्त इच्छा पूर्ण ही होतील.
अन हो हा प्लान डायनॅमिकली चेंज करता येतो. ( नाहीतर तुला कोच कसे करता येईल) पहिल्या दिवशीचे फोटो टाक, मग मी दुसर्या दिवशीचा काय प्लान आहे ते सांगेल. शिवाय बिफोर / आफ्टर पिक्चर पण मिळेल लोकांना.
जय बजरंगा, हुप्पा हुय्या !
आधी वेट ट्रेनिंग कराच आणि
आधी वेट ट्रेनिंग कराच आणि वेळेवर म्हणजे तुमच्या कार्यक्रमाच्या आधी थोडे सेट्स करा. अगदी मूवी ला जातांना जिम बॅग मधे डंबेल्स घेऊन जा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पब्लिक प्लेस मध्ये ईंडिसेंट
पब्लिक प्लेस मध्ये ईंडिसेंट वर्तणूक, दुसर्याच्या खाजगी मालमत्तेचा अयोग्य वापर, तुमच्या शरीराचं कोणत्या कारणासाठी काय करायचं तुम्हीच ठरवू जाणे, पण अश्या वाह्यात कारणासाठी सल्ले मागणं आणि लोकांनीही ते देणं हे सगळं महान आहे. ऊद्या कोणी १०० केळी खायला सांगितली आणि तुम्ही ती खाल्ली (आजवरच्या धाग्यांचा रेकॉर्ड बघता हे अशक्य नाही) तर घडू शकणार्या विपरित परिणामांना नक्की जबाबदार कोण?
केदार, बच्चे की जान लोगे
केदार, बच्चे की जान लोगे क्या?
केदार +१ हे सगळे केले की तो
केदार +१
हे सगळे केले की तो हापिसात जाऊन ढाराढूर होणार![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बच्चे की जान लोगे क्या?>>>>
बच्चे की जान लोगे क्या?>>>> बच्चा इतनाभी तो मासूम नही है।
केदार, बच्चे की जान लोगे
केदार, बच्चे की जान लोगे क्या? >>. ही इज आस्किंग फॉर इट !! सो बि इट.
१० दिवसात बॉडी बनते का? मग जर बाफ काढला असेल तर सल्ला ही स्विकारावा. अन्यथा मी टीपी म्हणून असे बाफ काढतो हे लिहावे. आम्ही उगाच सिरियसली सल्ले द्यायचे थांबवतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असा टि शर्ट घाल
असा टि शर्ट घाल
यडाए काय रे तु ?????
यडाए काय रे तु ?????
स्वस्ति
स्वस्ति
>>आम्ही उगाच सिरियसली सल्ले
>>आम्ही उगाच सिरियसली सल्ले द्यायचे थांबवतो>> कशाला द्यावेत सिरियसली सल्ले? आजवर त्याने काढलेले बीबी त्याचा टाईमपास म्हणून काढलेले आहेत हे लक्षात आलेलं नाही का?
त्याचा नेहमीचाच फालतूपणा. त्याची गफ्रे, त्याची ब्रँडेड बनियन, अंडरवेअर, कॉलेजगृपचा आचरटपणा. कशाला लक्ष देता त्याच्याकडे?
किती तो सात्विक संताप!
किती तो सात्विक संताप!
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे सगळे केले की तो हापिसात
हे सगळे केले की तो हापिसात जाऊन ढाराढूर होणार
>>>
केले की? हे मी करेन असे वाटलेच कसे तुम्हाला..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेहनत घ्यायची तयारी आहेच केदारभाऊ .. पण जरा माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना झेपेल असा प्लान सांगा ना..![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
त्या वरच्या टीशर्टची किँमत काय आहे? भाड्याने मिळतो का? क्रमांक १ साठी अंधारात खपून जाईल.. तरी थोडे केस चिकटवले तर आण्खी नॅचरल वाटेल..
हे केले की ४च दिवसात तुला
हे केले की ४च दिवसात तुला बॉडी येईल.
>> हे केले की ४च दिवसात लोकांवर तुझ्या शरीराला बॉडी म्हणण्याची वेळ येईल. "बॉडी उचला, बॉडी कधी नेणार, बॉडीच्या आसपास निलगिरी तेल शिंपडा, बॉडीचे पाय दक्षिणेकडे करा" इत्यादी![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
२०० बर्पी, १५० सुर्यनमस्कार,
२०० बर्पी, १५० सुर्यनमस्कार, २०० स्वॅक्टस, १०० सिटप, १० मिनिटे प्लँक असा एक सेट !>>> ऋनम्या खरच कर लेका , सलमानपेक्षा भारी होशील , होऊ दे खर्च![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
पाहीजे तर आपण फ्लेक्स बनवु ' बघतोस काय रागानं , २०० बर्पी मारलाय वाघानं'
साती, त्याला संताप म्हणत
साती, त्याला संताप म्हणत नाहीत, वैताग म्हणतात. सात्विक वैताग हा शब्द माझ्या ऐकण्यात आलेला नाही आजवर.
पण जरा माझ्यासारख्या
पण जरा माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांना झेपेल असा प्लान सांगा ना >>. कधी सोडणार ही मध्यमवर्गिय मेंटॅलिंटी? आँ?
अन सगळे मोजायला गर्लफ्रेन्डला बोलाव म्हणजे तिलाही आपला बॉयफ्रेन्ड किती मेहनत घेतो हे दिसेल. ( रेफ जो जिता वही सिकंदर )
हो दे खर्च ! ( बदाम, तुप, काजू, खिसमिस, प्रोटिन शेक वगैरेवर)
राजकारणी गरळ ओकणार्या आणि
राजकारणी गरळ ओकणार्या आणि दूसर्यांवर अर्वाच्य चिखलफेक करणार्या , बाफांपेक्शा आणि प्रतिसादांपेक्शा नक्कीच चांगले.
अन सगळे मोजायला गर्लफ्रेन्डला
अन सगळे मोजायला गर्लफ्रेन्डला बोलाव >> मला एक मिनीट कळलेच नाही नक्की काय मोजयचे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बीफोर - आफ्टर पहिल्या दिवशी
बीफोर - आफ्टर
पहिल्या दिवशी फोटो - दुसऱ्या दिवशी फोटोवर हार .. अगदीच असा प्लान नकोय हो..
बाकी गर्लफ्रेण्डला बोलवायची आयडिया तेवढी छान. फक्त बॉडी बनवायच्या आधी तिच्यासमोर व्यायाम करायला उघडे व्हायचे म्हणजे पुन्हा पंचाईत.. पहिल्या दिवशीचा व्यायाम शाल लपेटून केला तर चालेल का?
मला एक मिनीट कळलेच नाही नक्की
मला एक मिनीट कळलेच नाही नक्की काय मोजयचे >>
जो जे वांच्छिल तो ते लाभो !!
अरे व्यायामाचे सेट. नाहीतर कु ऋ १ बर्पी काढून १०० मोजायचा. बॉडी बनवायची म्हणजे कसं? त्या भाईंनी ( कु ॠ चे सलभान भाई, तो जुना बाफ ) नाही का सांगीतलं की रोज त्यांना बलात्कार झाल्यासारखे वाटत होते म्हणे. मग ! भाईच ते. काहीही बोलू शकतात !
बॉडी बनवने काय खेळ नव्हं माय ! तर बिफोर चा फोटो टाक आता. ( नाहीतर ब्लॅक अॅण्ड व्हाईट टाकू की पोर्टरेट कि लॅण्डस्केप मध्ये असा बाफ काढं. म्हणजे तिकडेही जाता येईल. )
फक्त बॉडी बनवायच्या आधी तिच्यासमोर व्यायाम करायला उघडे व्हायचे म्हणजे पुन्हा पंचाईत.. >> तिच्यासमोर उघडे व्हायची पंचाईत ! अरे देवा !!
मग पुढचे काय? ( म्हणजे व्यायामाचे) किती ते मन अस्वछ ! छे छे ! काय जमाना आला आहे !
मग पुढचे काय? >> तात्या
मग पुढचे काय? >> तात्या त्यावर पण हातासरशी एक मध्यमवर्गीय सल्ला देऊन टाकाच, एक बाफ वाचेल त्याचा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages