त्याचे झाले काय, पुढच्या विकांताला आमचा कॉलेजग्रूप सुलतान बघायला जातोय. बहुतांश जणांचा चित्रपट एव्हाना बघून झालाय तरीही पुन्हा बघणार आहोत. कारण फुल्ल टू दंगा घालायचा प्लान आहे. या आधी आम्ही असे फार वर्षापूर्वी दुनियादारीच्या वेळी आणि नुकतेच सैराटबाबत केले होते. यण्दा हा मान चक्क सुलतानने पटकावला आहे. पण एक गोची आहे. धिंगाणा डान्स करायला पोषक अशी झिंगाट किंवा झिंदगी सारखी गाणी सुलतानमध्ये नाहीत. म्हणून मग सलमान एखादी फाईट जिंकला रे जिंकला, की टीशर्ट काढून दादा गांगूलीच्या आवेशात फिरवायचा प्लान बनला आहे. मात्र शर्ट काढला तर आतले बनियान दिसणार, त्यामुळे नवी ब्रांडेड बनियान घेणे आले. किती वेळा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मायबोलीकरांना त्रास देणार. म्हणून यंदा सरळ आमच्या बेबी नंदाला विचारले. म्हणजे गर्लफ्रेंड हो. तर तिने यापेक्षा भारी आयडीया दिली. म्हणाली बनियान हवीच कशाला? सीधी बात नो बकवास! शर्ट काढायचे आणि सरळ उघडे व्हायचे. पिक्चर तसाही सलमानचा आहे. त्याला लोकांसमोर उघडे व्हायला लाज वाटत नाही तर तुम्ही का लाजत आहात? कमॉन, मन साफ तन साफ तर उघडे होण्यात कसले आलेय पाप!
बस्स संध्याकाळ होताच हाच डायलॉग 'रात्रीस खेळ चाले' या आमच्या व्हॉटसप ग्रूपवर चिपकवला. एकेक भूत पिशाच्च उगवू लागले आणि प्रत्येकाला ही दरिद्री आयडीया आवड्यायला लागली. हो हो करता सारेच जण त्या दिवशी घरून आंघोळ करून यायला आणि बनियानसह शर्ट काढायला तयार झाले. ठराव पास झाला. तिकिटे लागलीच बूक झाली. आणि ईथे माझ्या डोक्यात उदबत्ती पेटली..
तर अंतर आत्मा म्हणाला, भावा तो सलमान आहे. मस्सलचे गोडाऊन आहे. आपले एक छोटेसे हड्डीचे दुकान आहे. न लाजता शर्ट काढले तरी लाज ही जाणारच. पोरींना समोर डेरी मिल्क सिल्क दिसत असताना त्या आजूबाजुच्या Gem's च्या गोळ्या काही टिपणार नाहीतच. पण उगाच ती हाडाची काडं बघून एखाद्या कुत्र्याला मोह अनावर झाला तर ईंज्जतीचा पंचनामा होईल तो वेगळाच. कल्पना आहे की मल्टीप्लेक्समध्ये कुत्रे कुठून येणार.. पण मन शैतानाचे घर, भिती कुठूनही प्रवेश करते..
तर, आता ऐनवेळी फजिती होऊ नये म्हणून,
१) दहा दिवसांत लज्जानिवारण करण्याईतपत मांसाचे गोळे अंगावर कसे चढवावेत?
२) यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरुपी योजनेच्या अंतर्गत येत्या चार-सहा महिन्यात त्या मांसाच्या गोळ्यांवर आकार ऊकार नटस कटस बोल्ट कसे ऊगवावेत?
माहिती दोघांची तितकीच गरजेची असली तरी कृपया आधी नंबर १ बाबत सुचवा. वजन वाढवायला मी केळ खाऊ शकतो पण आता आणखी वेळ खाऊ शकत नाही..
एवढे दिवस शाहरूखचा फ्यान होऊन जगलो, आता काही दिवस सलमानचा फ्यान होऊन जिममध्ये मरायचा विचार करतोय.. खरंच, व्यायामाला वय नसते..
थॅन्क्स ईन् एडवान्स,
धन्यवाद आगाऊ ऋन्मेष
ओ श्री काहीही हां, ..
ओ श्री काहीही हां, .. पिण्ट्या माझा पाकृत पार्टनर आहे. माझ्या लेखनात वरवरच आम्ही जोडीने केलेल्या दोन अभिनव पाकृ सापडतील.
आहार येस्स! बारा चौदा अंड्यांचे ऑमलेट. एक अंडे इझ इक्वल टू एक कोंबडी. यापुढे नो चिकन नो मटण ओनली अंडी. आजवर जे दाणे पोरींना टाकायचो ते यापुढे कोंबड्यांना टाकणार. कोंबड्या पाळायच्या, अंडी मिळवायची, आणि बॉडी बनवायची! ठरलं
अरे काय एकेक खुळ काढतोस. हे
अरे काय एकेक खुळ काढतोस.
हे असं थेट्रात कपडे म्हणजे शर्ट वैगेरे काढुन नाचुन इतर पब्लिकला का त्रास द्याय्चाय? कुणी कंप्लेंट केली तर नस्ती आफत. गपगुमान भाईची बॉडी बघुन सिनेमाचा आनंद घ्य्या. इतरांनाही घेउद्या.
फारतर भाईच्या एन्ट्र्रीला, फाईटींगच्या सीनला शिट्या मारा. ओरडा. मजा येइल.
आणि काय पब्लिकपण प्रतिसाद देतय. केदार एकसे एक प्रतिसाद. विडंबनं पण आलीत. काय खरं नाय ब्वा.
'मेहेनत करे मुर्गा और अंडा
'मेहेनत करे मुर्गा और अंडा खाय फकिर' या तत्वावर या बीबीवर निघालेले विडंबनाचे बीबी जास्ती भन्नाट आहेत.
ऋन्म्याची लोकप्रियता बघून
ऋन्म्याची लोकप्रियता बघून आयत्या विडंबन गंगेत हात धुणे चालु आहे
लोकप्रियता >>
लोकप्रियता >>
अरे काय हे, इथेतर धिंगाणा
अरे काय हे, इथेतर धिंगाणा सुरु आहे
डोंबिवलीला आमचे नातेवाईक राहतात त्यामुळे नेहमी तिकडे जाणे होते, जेव्हा मी पहिल्यांदा तिकडे गेलेली तेव्हा तिथली सर्व मुले किडकडीत शरीरयष्टी असलेली होती त्यानंतर एका महिन्याने वैगरे जेव्हा परत गेले तेव्हा तीच मुले फुल्ल बॉडी शॉडी बनवुन मिरवत होते. अल्पावधीत कमवलेल्या त्यांच्या बॉडीचे रहस्य होते, तिथला एक जिमवाला त्यांना कसलेसे इंजेक्शन टोचत होता
वरुन प्रोटीन शेक ,गोळ्या वै. होत्याच ( कसले मेल्यांचे शौक)
आज पहिल्याच पानावर एव्हढी विडंबने बघुन क्षणभर चुकून मिपावर आले की काय असे वाटले
निल्सन, ती पौडरची बॉडी लवकर
निल्सन, ती पौडरची बॉडी लवकर उतरते सुद्धा. साईड ईफेक्ट काही होत असतील ते वेगळेच.
आमच्या ईथे एका हडकुळ्या मुलाने जाड व्हायला पावडर घेतलेली. जाड तर झाला, पण ताकद तेवढीच राहिली आणि पायांवरचे वजन उगाच वाढले. परिणामी दोन्ही गुडघे फेल गेले. शेवटी शेवटी तर भ्रमिष्ठासारखा वागू लागला होता. मग काही तरी गंडेदोरे बांधले. त्याच्यामुळे कि पावडर बंद केल्याने कल्पना नाही, मात्र हळूहळू सुधारला, नॉर्मल झाला, गुडघेही जागेवर आले.
साईड ईफेक्ट काही होत असतील ते
साईड ईफेक्ट काही होत असतील ते वेगळेच.>> हो ते तर होणारच ना. असे इंजेक्शन आणि गोळ्या घेऊन जर बॉडी बनत असती तर आज प्रत्येक घरात एक सलमान असता.
आमच्या इस्त्रीवाल्याच्या मुलाने अशाच प्रकारे बॉडी कमवयाचा प्रयन्त केला त्याच्या पोटात दिड-एक किलोचा गोळा झालेला (पुर्ण डिटेल माहित नाही पण इस्त्रीवाला गेल्या महिन्यात सांगत होता) टोटल उपचार खर्च ४ लाख वर ठरलेले लग्न पण मोडले.
ठरलेले लग्न पण मोडले<<
ठरलेले लग्न पण मोडले<< मित्रा ऋन्मेषा काय करायचे ते नीट विचार करून कर.
आमच्या ईथे एका हडकुळ्या
आमच्या ईथे एका हडकुळ्या मुलाने जाड व्हायला पावडर घेतलेली. शेवटी शेवटी तर भ्रमिष्ठासारखा वागू लागला होता. >>>> आमच्या इथे माबोवर पण असलंच काहीतरी घडलेलं दिसतंय
कु. ऋ. चा धागा आणि प्रतिसाद..
कु. ऋ. चा धागा आणि प्रतिसाद..
प्रतिसाद खरच खतरनाक आहेत.
प्रतिसाद खरच खतरनाक आहेत. हहगलो
बाप रे! त्या पावडरीं इतक्या भयंकर असतात?
सुनिधी, ते स्टीरॉईड असतात
सुनिधी, ते स्टीरॉईड असतात बहुधा .. मागे माझा पोटाचा आजार बळावलेला तेव्हा माझा कोर्स सुरू केलेला एक डॉक्टरने. नुसते खा खा भूक लागायची आणि खाईल ते पचायचे. दोनच महिन्यात माझा स्वनिल जोशी झालेला. रस्त्याने गर्दीतून चालताना मध्ये येईल त्याला सरळ उडवून पुढे जावे अशी माज आल्यासारखी बॉडीलँगवेज झालेली.. मात्र दुष्परीणामांना गिणती नाही त्याच्या. अचानक बंद केले तर आणखी हालत. मग क्रमाक्रमाने डोस कमी करत बंद करावे लागलेले.
बॉडी झाली, साडी झाली, माडी
बॉडी झाली,
साडी झाली,
माडी झाली,
ताडी झाली,
काडी झाली.
आता गाडी, नाडी, वाडी, जाडी, झाडी हे विषय अजून विडंबनासाठी उपलब्ध आहेत. होतकरू लेखकांनी लाभ घ्यावा.
लोखंडी बत्ता प्रकरण- एक छोटे
लोखंडी बत्ता प्रकरण-
एक छोटे हलके वजन हातात डोक्यामागे ( उजव्या हाताने डाव्या खांद्याकडे) धरायचे.पाचदहावेळा दंड सरळ ठेवून वर खाली करायचे.नंतर पाचदहा वेळा दंड आणि कोपरापासून पुढचा हात काटकोनात कायम ठेवून वजन खांद्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा.हेच डाव्या हाताने.या प्रकाराला काही नाव आहे ते मला माहित नाही.
२) दुसरा साधा व्यायाम सर्वांसाठी - भिंतीला डावा खांदा चिकटवून उभे राहा.उजवा हात वर सरळ धरा.तो हात भितींला वरती टेकवण्याचा प्रयत्न करताना टाचा उंच कराव्या लागतात..हेच डाव्या हाताने पाच दहा वेळा.
घामाघुम न होता पंधरा दिवसात फरक नक्की दिसतो.
आता गाडी, नाडी, वाडी, जाडी,
आता गाडी, नाडी, वाडी, जाडी, झाडी हे विषय अजून विडंबनासाठी उपलब्ध आहेत. होतकरू लेखकांनी लाभ घ्यावा. स्मित
काल हेच लिहिणार होते.
>>
गझलकारांना पण उपयोग होईल खर तर याचा. ऋन्मेषचं शिर्षक तरही म्हणून घ्या

अल्पावधीत कशी बनवावी
अल्पावधीत कशी बनवावी बॉडी
अल्पावधीत कशी चढवावी माडी
संस्थळी शांतता बरी नाही
अल्पावधीत कशी लावावी काडी
खेळ रंगात ये दु:शासनाचा
अल्पावधीत कशी फेडावी साडी
रांग भलतीच लांब गेलेली
अल्पावधीत कशी सोडावी नाडी
पाहूणे यायचे उद्या दारी
अल्पावधीत कशी घटवावी जाडी
चढ चढताच लागला खड्डा
अल्पावधीत कशी वळवावी गाडी
>>

रीया, तुझ्यासाठी काय पण!
दाढी गाडी झाडी ताडी खाडी
दाढी
गाडी
झाडी
ताडी
खाडी
आक्का, छान कवीता / गझल /
आक्का,
छान कवीता / गझल / कायसंसं.
साती मान गये
साती मान गये
रांग भलतीच लांब
रांग भलतीच लांब गेलेली
अल्पावधीत कशी सोडावी नाडी>>>>>:हहगलो: नक्की कुठली रांग्?:फिदी:
रश्मी, आता नाडी सोडाय्चा
रश्मी, आता नाडी सोडाय्चा उल्लेख आहे म्हणुन मी समजायचं ती रांग समजले.
अल्पावधित म्हणजे अगदी दिवसातच
अल्पावधित म्हणजे अगदी दिवसातच नव्हे तर काहि महिन्यांमधेही बॉडी बनविण्यास प्रोटिन्स्/पावडरी वगैरेंचा खुराक दीर्घकालाकरता हानीकारक ठरू शकतो. जर प्रोफेशनल बॉडी बिल्डींग मधे उतरायचे नसेल, तर हे प्रकार सामान्य व्यक्तिने करु नयेत. नेहेमीचा नियमित व्यायाम, नेहेमीची खाणे जरा जास्त प्रमाणात व रिपिटेड वेळा पाळून केले तरी पुरे होते असा माझा तरी अनुभव आहे.
) इतके सगळे केले तरी अंग भरते, मसल्स दिसू लागतात... चवळीची शेंग नै बनले तरी अगदीच लालभोपळा होत नाही ! 
बाकी काही नाही, तरी घरात केरवारे करणे, फरशी खाली उकिडवे बसुन पुसणे, भांडी घासणे, धुणी हाताने (मशिनमधे नव्हे) धुणे, गाडी धुणे, जळमटे कोळीष्टके काढणे, बाथरुममधिल भरलेल्या बादल्या उगाचच इकडुन तिकडे ठेवणे (काये ना, हल्ली पाणी भरण्याचे काम नाहीसेच झाले आहे, इतकेच काय तर टॉयलेटमधेही हल्ली टमरेल उचलावे लागत नाही, नुस्ती कळ दाबली की पाणी पडते
तर मुद्दा इतकाच, की अन्ग झटकुन सडसडून कामे करा, तब्येत आपोआप ठणठणीत रहाते. स्वानुभवाचे बोल आहेत.
अन उघडेबंब व्हायची इत्गकीच तमन्ना असेल, तर मग या लाल मातीत.... !
साती ..
साती ..:हहगलो:
साती एक नंबर.
साती एक नंबर.
गझलकारांना पण उपयोग होईल खर
गझलकारांना पण उपयोग होईल खर तर याचा. ऋन्मेषचं शिर्षक तरही म्हणून घ्या >>> गझलकार दुसर्यांच्या "जमिनीवर" अतिक्रमण करत नाहीत.

फक्त १२ हवेत. १०० ला
फक्त १२ हवेत. १०० ला
साती
साती
पाटाकडच्या तालमीत भर्ती व्हा!
पाटाकडच्या तालमीत भर्ती व्हा!
नाडी आणि रांगेचा संबंध नक्कीच
नाडी आणि रांगेचा संबंध नक्कीच काहीतरी चावट असणार..
माझा मायबोलीचा आजवरचा अनुभव बोलतो की जे सगळ्यांना समजते पण मला समजत नाही ते काहीतरी चावटच असते..
Pages