ट्रायथलॉन

Submitted by हर्पेन on 9 July, 2014 - 04:03

हा धागा, ट्रायथलॉन विषयीच्या माहितीची आदान प्रदान करायला उघडत आहे.

ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. सर्वसामान्यपणे ही स्पर्धा ४ प्रकारात घेतली जाते.

1. स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.

Sprint Distance; 750-meter (0.47-mile) swim, 20-kilometer (12-mile) bike, 5-kilometer (3.1-mile) run

2. ऑलिम्पिक अंतर ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.

Intermediate (or Standard) distance; commonly referred to as the "Olympic distance": 1.5-kilometer (0.93-mile) swim, 40-kilometer (25-mile) bike, 10-kilometer (6.2-mile) run

3. दीर्घ पल्ला - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.

Long Course; commonly referred to as 70.3 (total distance in miles, equivalent to 113.1 km) or the 'half-Ironman'; 1.9-kilometer (1.2-mile) swim, 90-kilometer (56-mile) bike, and a 21.1-kilometer (13.1-mile) run (half marathon)

4. अती-दीर्घ पल्ला – ह्या मधे ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट असते.

Ultra Distance; commonly referred to as 140.6 (total distance in miles, equivalent to 226.2 km) or the 'Ironman'; 3.8-kilometer (2.4-mile) swim, 180.2-kilometer (112.0-mile) bike, and a 42.2-kilometer (26.2-mile) run (full marathon)

ऑलिंपिक मधेही या स्पर्धेचा समावेश असतो. तसेच खासगी आयोजकांतर्फे 'आयर्न मॅन' नावानी घेतली जाणारी स्पर्धा जगभर प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
http://eu.ironman.com/#axzz36xIofIxX

आपल्या शारिरिक क्षमतेचा दीर्घकालीन कस पाहणारा हा स्पर्धा प्रकार सध्या भारतातही लोकप्रिय होत आहे. ह्या स्पर्धाप्रकारात नव्यानेच भाग घेऊ पाहणार्‍या स्पर्धकांकरता नवख्यांसाठी अंतर (Novice category) ज्यात ३५० मी. पोहोणे, १० किमी सायकलिंग आणि ३ किमी धावणे समाविष्ट असते.

ट्रायथलॉन मधे भाग घेतलेले कोणी मायबोलीकर असतील तर त्यांनी आपापले स्पर्धेचे, त्याच्या तयारीबद्दलचे अनुभव इथे मांडावे ही विनंती.

तसेच भाग घेऊ पाहणार्‍या नवीन लोकांकरता हा धागा उपयुक्त ठरू शकेल अशी आशा आहे.

भारतात अशा स्पर्धा कोणातर्फे, कुठे, कधी आयोजित केल्या जातात, ई. माहिती देखिल इथे लिहू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद धनि, सिंडरेला, लिंटी, मंजू, नाठाळ

मी कालची स्पर्धा अंदाजे ४ तास १५ मिनीटा मधे पुर्ण केली.

समुद्रा बर्‍यापैकी शांत होता, लाटा जास्त नव्हत्या त्यामुळे तशी मजा नाही आली Wink

पण अजून वेगळी मजा आली त्याबद्दल लिहितो नंतर

ती वेगळी मजा लिहायची राहेली होती ती अशी

गोव्यात आम्ही मुक्कामी रहायला मिरामार येथे होतो आणि स्पर्धा होती बांबोळी बीच जवळ.

स्पर्धा सकाळी ६ वाजता सुरु होणार होती. मिरामार ते बांबोळी दोना पावला गोवा विद्यापीठ मार्गे अंतर ८-१० किमी असेल. तर भल्या पहाटे ५ वाजता काळोखातच आम्ही सायकल वरून बांबोळीला जायला निघालो. वाटेत सगळा काळोख माझ्या हेल्मेट्ला (मी इतरांना दिसावा म्हणून) असलेला दिवा हाच काय तो उजेड आणि रस्त्याचे काम चालू होते. मी सर्वात पुढे होतो, मग कडेला बारीक खडी / चाळ होता त्यावरून घसरू नये म्हणून रस्त्याच्या मधोमध सायकल त्चालवत होतो. पण हाय रे कर्मा दुभाजकाचे काम चालू होते त्याचा खड्डा खणलेला व त्यापुढे एक रिकामा ड्रम ठेवलेला दिसून ब्रेक लावेपर्यंत झाले की धडाम्म..... मारला की धक्का....
पडलो बिडलो नाही पण सायकलचे गियर अडकले की, चाकही फिरेना...
अजून झुंजुमुंजु होतच होते पुरेसा प्रकाश नव्हता. पण स्पर्धेसाठी जाणारे एक दोन थांबले त्यांच्या गाडीच्या प्रकाशात माझ्या मित्राने चाक कसेबसे फिरते केले. आणि तसेच स्पर्धेच्या जागी पोचलो.

पोहायला पाण्यात उतरल्यावर कळले की गुढग्याला थोडेसे खरचटले देखिल होते. पॅडल मुळे असावे.पोहताना गुढग्याला जे चुर्चुर्लेय म्हणून सांगू जखमेवर मीठ म्हण जगलो अगदी.

मग सायकलिंगचा पार्ट गियर न पडणार्‍या अवस्थेतल्या सायकलला गोव्यातल्या चढ उतारावरच्या रस्त्यांवर दामटवत तसाच पुर्ण केला

त्यात भर म्हणून शेवटचा पार्ट धावण्याचा. प्रचंड ऊन आणि हवेत आर्द्रता. काही काळ वॉटर सपोर्ट गंडला होता त्यामुळे मधेच एका फेरीला रस्त्याच्या कडेलाच असलेल्या बांधकाम सार्ईटवरच्या म्माठातले पाणी प्यावे लागले.

अशी ही वेगळीच मजा... सायकलच्या पांगळेपणा मुळे खूप मागे पडेन अशा भितीने सायकल अशी ताबडवली की त्यातही चांगले टायमिंग आले.

पण अशा सगळ्या अडचणींवर मात करत स्पर्धा पुर्ण केल्याचे समाधान्काही औरच.

आता तर असे वाटते कसे केले असेल मी हे, खरोखर मीच केले का?

>>>> अशी ही वेगळीच मजा... <<<<< अरे मजा कसली? आता सांगताना अन आम्हाला वाचताना मजा वाटत असेल.
पण तेव्हाची शारिरीक/मानसिक स्थिती कशी गंभीर असते ते त्या तशाच अनुभवातुन गेलेल्यांना झट्टकिनी कळते.

पण एक आहे हं, हे असे अनुभवच जगण्यातील "खरी मजा" देतात, अडचणींवर मात करीत केलेले साध्य नंतर अपरिमित आनंद व आत्मविश्वास देऊन जाते.
आत्ताच २० ला मी असाच एक प्रयोग फक्त ७७ किमीचा सायकलिंगचा केला, अन अजुन एक "फियास्को" अनुभवला..... काये ना, की मी पण "पांगळा, अन सायकलही पांगळी" अशी पांगळ्यांची जोडी जमल्यावर अजुन काय होणार? तरीही आता नंतर म्हणू शकतो की धमाल आली, अन आले ते अनुभव उपयोगीच पडतील.

तुझे अभिनंदन. Happy भले शाब्बास.

मला पोहोता येत नाही. सबब मी लाकडीमॅन बनलो तरच काही आशा आहे अशा स्पर्धात उतरायची.
मला धावता येत नाही (दम्यामुळे). सबब मी चेन्डूसारखा बिनपायाने घरंगळू शकलो, तरच काही आशा आहे अशा स्पर्धात उतरायची.
मला सायकल फार वेळ चालविता येत नाही. पाय दुखतात, दम लागतो अन महत्वाचे म्हणजे कंटाळा येतो, सायकल चालविताना वा दम लागुन थांबलो असताना घरची फार फार आठवण येते, मस्तपैकी भजी घेऊन टीव्हीसमोर आडवारलोय अशी स्वप्ने पडू लागतात... अजुनही कसली कसली स्वप्ने पडू लागतात Proud मग कसला मी सायकल चालवितोय????
त्यामुळे, असे काही पराक्रम करणार्‍यांना किती किती अडचणींना तोंड द्यावे लागते ते समजण्या इतपतच सायकलिंग तेव्हडे करतो झालं. निदान इतकेच समाधान की नुस्तेच कीबोर्डवरुन कोरडे अभिनंदन करीत नाहीये, तर थोडाफार स्वानुभवही घेतला आहे. असो. (सहज सुचलं म्हणून लिहिल बरका)

चेन्नई येथे ९ जुलै रोजी होणार्‍या ट्रायथलॉन मधे भाग घेतोय.
अधिक माहीती खालील लिंकवर मिळेल.

http://www.chennaitrekkers.org/2016/03/chennai-triathlon-sprint-olympic-...

मायबोलीकरांच्या शुभेच्छा असतातच /आहेतच माहीत आहे तरीही अशा शुभेच्छांची गरज आहेच /असतेच !

आज निघतोय चेन्नई करता
दीर्घ पल्ला करतोय परत एकदा. स्पर्धा शनिवारी दुपारी ३ वाजता चालू होणारे.
आल्यावर इकडे लिहेनच ! तो पर्यंत बाय बाय Happy

अखिल धावपोहसायकल ग्रूप, मौजे पळणवाडी, ता. दुचाकी, जि पोह कडून माननिय हर्पेन ह्यांना शुभेच्छा.

तू धाव रे मित्रा, आम्ही तुझ्यासोबतच आहोत.

व्वा हर्पेन...२०१५ मधील गोवा ट्रायॅथलॉन पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि आता चेन्नई दीर्घ पल्ला साठी हार्दिक शुभेच्छा!

सस्मित, हिम्या, मनिमाऊ, केदार, मॅगी, आडो, मानुषी, हर्षल, मंजूताई, कनक२७ सर्वांचे आभार.
केदार Proud - विशेष शुभेच्छांकरता विशेष आभार.
मनिमाऊ - आयर्न मॅन म्हणवून घ्यायला नक्की आव्डेल पण फुल-आयर्न केल्याशिवाय नाही. त्याकरता फार्फार वेगळ्या पातळीची तयारी लागते. जरा वेळ लागेल पण करुया Happy
परत एकदा धन्यवाद लोकहो ! मंडळ आभारी आहे.

मला तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा चेन्नईत असतानाच मिळाल्या. पण पोच देता आली नाही.
तर कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मी ही ट्रायथलॉन निर्धारित वेळेच्या आत पुर्ण केली.

पुण्याहून आम्ही ७ जण गेलो होतो त्या सगळ्यांनी देखिल ही स्पर्धा निर्धारित वेळेच्या आत पुर्ण केली.

दुपारी तीन वाजता चालू होणार्‍या ह्या स्पर्धेकरता वेळ मर्यादा १० तास होती. प्रत्यक्षात साडेतीन वाजता चालू झाल्या कारणाने शनिवार पासून सुरु झालेलो आम्ही रवीवार पर्यंत स्पर्धेतच होतो असे म्हणता येईल. रात्री उशीर झाल्याकारणाने नक्की कधी संपवली किती वेळ लागला ह्याकडे माझे अजीबात लक्ष नव्हते. एक दोन दिवसात अधिकृत निकाल जाहीर होईल त्यावेळी कळेलच. Happy

तर कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मी ही ट्रायथलॉन निर्धारित वेळेच्या आत पुर्ण केली. >>>>>

अरे वा वा वा ..... हार्दिक अभिनंदन .... Happy

Pages