हा धागा, ट्रायथलॉन विषयीच्या माहितीची आदान प्रदान करायला उघडत आहे.
ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. सर्वसामान्यपणे ही स्पर्धा ४ प्रकारात घेतली जाते.
1. स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.
Sprint Distance; 750-meter (0.47-mile) swim, 20-kilometer (12-mile) bike, 5-kilometer (3.1-mile) run
2. ऑलिम्पिक अंतर ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.
Intermediate (or Standard) distance; commonly referred to as the "Olympic distance": 1.5-kilometer (0.93-mile) swim, 40-kilometer (25-mile) bike, 10-kilometer (6.2-mile) run
3. दीर्घ पल्ला - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.
Long Course; commonly referred to as 70.3 (total distance in miles, equivalent to 113.1 km) or the 'half-Ironman'; 1.9-kilometer (1.2-mile) swim, 90-kilometer (56-mile) bike, and a 21.1-kilometer (13.1-mile) run (half marathon)
4. अती-दीर्घ पल्ला – ह्या मधे ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट असते.
Ultra Distance; commonly referred to as 140.6 (total distance in miles, equivalent to 226.2 km) or the 'Ironman'; 3.8-kilometer (2.4-mile) swim, 180.2-kilometer (112.0-mile) bike, and a 42.2-kilometer (26.2-mile) run (full marathon)
ऑलिंपिक मधेही या स्पर्धेचा समावेश असतो. तसेच खासगी आयोजकांतर्फे 'आयर्न मॅन' नावानी घेतली जाणारी स्पर्धा जगभर प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
http://eu.ironman.com/#axzz36xIofIxX
आपल्या शारिरिक क्षमतेचा दीर्घकालीन कस पाहणारा हा स्पर्धा प्रकार सध्या भारतातही लोकप्रिय होत आहे. ह्या स्पर्धाप्रकारात नव्यानेच भाग घेऊ पाहणार्या स्पर्धकांकरता नवख्यांसाठी अंतर (Novice category) ज्यात ३५० मी. पोहोणे, १० किमी सायकलिंग आणि ३ किमी धावणे समाविष्ट असते.
ट्रायथलॉन मधे भाग घेतलेले कोणी मायबोलीकर असतील तर त्यांनी आपापले स्पर्धेचे, त्याच्या तयारीबद्दलचे अनुभव इथे मांडावे ही विनंती.
तसेच भाग घेऊ पाहणार्या नवीन लोकांकरता हा धागा उपयुक्त ठरू शकेल अशी आशा आहे.
भारतात अशा स्पर्धा कोणातर्फे, कुठे, कधी आयोजित केल्या जातात, ई. माहिती देखिल इथे लिहू शकता.
मस्तच रे हर्पेन.
मस्तच रे हर्पेन.
धन्यवाद शशांक आणि हिम्या
धन्यवाद शशांक आणि हिम्या
अभिनंदन हर्पेन दा ..
अभिनंदन हर्पेन दा ..:स्मित:
जबर्या जबर्या जबर्या !
जबर्या जबर्या जबर्या ! अभिनंदन.
सॉलीड इनस्पायरींग आहे हे... मस्तच सर
धन्यवाद समाधानी, रार रार तू
धन्यवाद समाधानी, रार
रार तू पण करू शकशील सहज त्यामुळे आत्ताच मॅम
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
ग्रेट! हर्पेन हार्दिक
ग्रेट!
हर्पेन हार्दिक अभिनंदन!
धन्यवाद सिंडरेला आणि
धन्यवाद सिंडरेला आणि मानुषी
मला लागलेला वेळ ९ तास ३३ मिनिटे इतका होता.
मी माझ्या कॅटॅगिरी मधे १५ वा आलो. ( वेटरन कॅटॅगिरी मधला शेवटचा नंबर आहे हा :P)
अर्थात ओपन कॅटॅगिरी मधे माझ्या नंतर स्पर्धा संपवणारे देखिल आहेत हे पाहून बरं वाटलं
इथे निकाल / वेळ बघू शकता.
http://www.chennaitrekkers.org/2016/07/chennai-triathlon-july-9th-half-i...
अभिनंदन हर्पेन !
अभिनंदन हर्पेन !
खूप छान वाटलं अभिनंदन!
खूप छान वाटलं अभिनंदन!
हर्पेन, अभिनंदन!
हर्पेन, अभिनंदन!
धन्यवाद शब्दाली, मंजूताई,
धन्यवाद शब्दाली, मंजूताई, शैलजा
पुण्यात होणार्या एका
पुण्यात होणार्या एका ट्रायथ्लोन बद्दल माहित करून घ्या
http://tritheos.me/ ह्या वेबसाईटवर
है शाब्बास हर्पेन!
है शाब्बास हर्पेन!
अभिनन्दन हर्पेन..
अभिनन्दन हर्पेन..
नुकतीच म्हणजे १७ ते १९
नुकतीच म्हणजे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान फ्लोरिडा येथे 'अल्ट्रामॅन' नामक (http://ultramanflorida.com/) सलग तीन दिवस चालणारी ट्रायथलॉन पार पडली.
ह्या स्पर्धे करता सलग तीन दिवसात मिळून करायच्या गोष्टीत, १० किमी पोहोणे, ४२३ किमी सायकलिंग आणि ८४ किमी धावणे यांचा अंतर्भाव असतो.
ह्या स्पर्धेत पुण्याच्या कौस्तुभ राडकर आणि पृथ्वीराज पाटील व मिलिंद सोमण यांच्यासह एकूण ५ भारतीयांनी भाग घेतला होता.
आनंदाची गोष्ट म्हणजे सगळ्यांनीच ही स्पर्धा निर्धारित वेळेत पुर्ण केली.
भारतातल्या पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ही स्पर्धा ३१ तास ३० मिनिटे लावून एकूणात ३४व्या क्रमांकावर पार पाडली.
भारताकडून भाग घेणार्यांत हा पहिला.
निकाल इथे पाहू शकता
http://ultramanflorida.com/wp-content/uploads/2017/02/UMFLTiming2017.pdf
पुण्यात १९ मार्च रोजी एक
पुण्यात १९ मार्च रोजी एक ट्रायथ्लॉन आयोजित करण्यात आलेली आहे.
स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.
ऑलिम्पिक अंतर - ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.
आणि दीर्घ पल्ला (ज्याला ह्याचे आयोजक हाफ ट्रायथलॉन म्हणत आहेत) - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.
अशा तीन प्रकारांमधे ही स्पर्धा होणारे. याच बरोबर ड्युएथ्लोन प्रकाराची स्पर्धा देखिल होणार आहे. (ज्यात सायकलिंग आणि पळणे समाविष्ट आहे) नावनोंदणी ५ मार्च पर्यंत चालू राहील.
अधिक माहीती करता भेट देऊ शकता -
http://www.myiifw.com/
ऑल द बेस्ट हर्पेनदा. यावेळी
ऑल द बेस्ट हर्पेनदा. यावेळी कामगिरी अजून चांगली होवो ही सदिच्छा !
काल कोल्हापुरात पार पडलेल्या
काल कोल्हापुरात पार पडलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेतला होता.
दीर्घ पल्ला - १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असलेली म्हणजेच हाफ आयर्न अंतराची स्पर्धा अंदाजे साठेआठ तासात पुर्ण करता आली ह्याचे समाधान आहे.
उत्कृष्ट संयोजनाचा नमुना, उत्साही स्वयंसेवकांमुळे स्पर्धकांना खूप म्हणजे खूप मदत झाली.
अजून एक आवर्जून सांगा यला हवी
अजून एक आवर्जून सांगा यला हवी होती पण राहून गेलेली एक बातमी म्हणजे पुण्याच्या 'मेघ ठक्कर' ने फुल्ल आयर्नमॅन स्पर्धा त्याच्या (बरोबर) अठराव्या वाढदिवसाच्याच दिवशी पुर्ण केल्यामुळे अशी कामगिरी करणारा जगातला सगळ्यात लहान खेळाडू ठरला आहे.
कौतुक करावे तितके थोडेच
https://www.loksatta.com/krida-news/pune-physiotherapy-student-won-ironm...
सही हर्पेन.. खूप अभिनंदन...
सही हर्पेन.. खूप अभिनंदन...
तू नुसत्या रनिंगकडून ट्रायथलॉनकडे वळला... भारीच.
तुझ्याकडून ऊत्तेजन घेतले पाहिजे हाफ आयर्नमॅन साठी.
मेघ ठक्करचे विशेष अभिनंदन आणि प्रचंड कौतुक... १८ काय वय आहे का राव? कौस्तुभ राडकर ट्रेनर आहे म्हंटल्यावर सहीच मार्गदर्शन मिळाले असणार.
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन !! सहीच ! जरा
अभिनंदन हर्पेन !! सहीच ! जरा अजून डिटेलस लिही की.
धन्यवाद पराग, टवणे सर आणि हाब
धन्यवाद पराग, टवणे सर आणि हाब.
हाब अरे ट्रायथ्लॉन मधे एक मजा असते. एकच एक प्रकार करत राहताना कंटाळा यायला लागला की दुसरा प्रकार चालू होतो आणि त्याचा कंटाळा येतोय न येतोय तोवर तिसरा प्रकार चालू होतो.
सायकलिंग लहानपणापासूनच करत आलेलो असू तर आताही परत चालू करायला फार त्रास होत नाही.
पोहोणे मात्र मला लहानपणी शिकलो म्हणून सोपे जात असावे बहुतेक. पण मी गावठी पद्धतीनेच पोहतो. म्हणजे माझे डोके पाण्यावर असते जे खरेतर पाणी अडवते (रेझिस्टन्स वाढवते) पण माझे वर असलेले डोके ओपन वॉटर मधे पोहताना मला तरी इष्टापत्तीच वाटते. लांब दूरवर कुठेतरी तरंगता झेंडा वगैरे असतो तिथवर कमीत कमी अंतरात व्यवस्थित पोहोचतो. बरेच जण पाण्याखाली डोके गेल्यावर पाण्यातली वाट हमखास चुकतात. आणि मग त्यांना जास्त अंतर पोहायला लागते. मी मस्त मजेत सगळ्या वातावरणाचा आस्वाद घेतघेत, उड्णारे पक्षी, उगवता सुर्य, तरंगते ढग यांना पहात आनंद घेत पोहतो ज्याचा फायदाच होतो.
छोट्या अंतराच्या स्पर्धांनी चालू करून बघ मजा वाटेल.
पराग अजून तपशील सांगायचेच
पराग अजून तपशील सांगायचेच झाले तर कोल्हापुरातल्या शिवाजी विद्यापीठाच्या बाजूला असलेल्या राजाराम तलावात पोहायचे होते. इंग्रजी एल अक्षराच्या आकारात एका बाजूने जाऊन दुसर्या बाजूने यायचे असे सलग पोहायचे होते. (म्हणजे लूप मधे पोहायचे नव्हते)
सायकलिंगकरताही सायकल चालवत निपाणीच्याही पुढे चिकोडी रस्त्यावर १० किमी वर ४५ किमी पुर्ण झाले की परत वळायचे होते. ह्या सगळ्या मार्गावर जिथे कुठे म्हणून फाटे असतील तिथे तिथे स्वयंसेवक / पोलीस होते. स्वयंसेवक तर स्वयंसेवक, दोन चार ठिकाणचे पोलीसही टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत होते. काही ठिकाणी रहदारी तात्पुरती थांबवली जात होती. कुठेही रस्ता चुकायला वाव राह णार नाही हे बघितले गेले होते. (मागे चेन्नई मधे रस्ता चुकल्यामुळे मला खूप जास्त सायकल चालवायला लागली आणि एकूण स्पर्धा संप वायला लागलेला वेळ वाढला.)
धावण्याकरता मात्र राजाराम तलावापासून अर्धा किमी दूर (म्हणजे जाऊन येऊन एक किमी) ५ किमी अंतराच्या मार्गावर चार फेर्या मारायच्या होत्या. भर दुपारच्या उन्हात धावताना वाटेत पाणी, ईलेक्ट्रॉल, मीठ लावलेल्या मोसंबीच्या- कलिंगडाच्या फोडी, संत्राच्या गोळ्या, थंडगार पाण्याची स्पंजिंग तीन स्टेशन्स अशी जय्यत तयारी आणि त्यावर कडी म्हणजे अत्यंत उत्साही, उमदे, हसतमुख कार्यकर्ते ज्यांना खरोखरच कळकळ होती की कोणालाही उन्हाचा त्रास होऊ नये. जणू त्यांच्या घरचं कार्य होतं आणि आम्ही वर्हाडी.
त्या सर्वच आयोजक, स्वयंसेवक मंडळींचे खूप खूप आभार.
मस्त च की हर्पेन! अभिनंदन!!
मस्त च की हर्पेन! अभिनंदन!!
धन्यवाद इन्ना !
धन्यवाद इन्ना !
मस्तच हर्पेन ! त्रिवार _/\_
मस्तच हर्पेन ! त्रिवार _/\_ अभिनंदन आणि ऑल द बेस्ट!
अरे वा. छान वाटलं वाचून हाब.
अरे वा. छान वाटलं वाचून हाब. पुणे मॅरेथॉन वाल्यांना ट्रेनींग करता पाठवलं पाहिजे ह्यांच्याकडे !!
मस्त हर्पेन !!
मस्त हर्पेन !!
Pages