हा धागा, ट्रायथलॉन विषयीच्या माहितीची आदान प्रदान करायला उघडत आहे.
ट्रायथलॉन म्हणजे पोहोणे, सायकल चालवणे आणि धावणे यांचे ठराविक नेमस्त अंतर पाठोपाठ पार करणे. सर्वसामान्यपणे ही स्पर्धा ४ प्रकारात घेतली जाते.
1. स्प्रिंट अंतर - ह्यात ७५० मी पोहोणे, २० किमी सायकलिंग आणि ५ किमी धावणे समाविष्ट असते.
Sprint Distance; 750-meter (0.47-mile) swim, 20-kilometer (12-mile) bike, 5-kilometer (3.1-mile) run
2. ऑलिम्पिक अंतर ह्यात १.५ किमी पोहोणे, ४० किमी सायकलिंग आणि १० किमी धावणे समाविष्ट असते.
Intermediate (or Standard) distance; commonly referred to as the "Olympic distance": 1.5-kilometer (0.93-mile) swim, 40-kilometer (25-mile) bike, 10-kilometer (6.2-mile) run
3. दीर्घ पल्ला - ह्यात १.९ किमी पोहोणे, ९० किमी सायकलिंग आणि २१.१ किमी धावणे समाविष्ट असते.
Long Course; commonly referred to as 70.3 (total distance in miles, equivalent to 113.1 km) or the 'half-Ironman'; 1.9-kilometer (1.2-mile) swim, 90-kilometer (56-mile) bike, and a 21.1-kilometer (13.1-mile) run (half marathon)
4. अती-दीर्घ पल्ला – ह्या मधे ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट असते.
Ultra Distance; commonly referred to as 140.6 (total distance in miles, equivalent to 226.2 km) or the 'Ironman'; 3.8-kilometer (2.4-mile) swim, 180.2-kilometer (112.0-mile) bike, and a 42.2-kilometer (26.2-mile) run (full marathon)
ऑलिंपिक मधेही या स्पर्धेचा समावेश असतो. तसेच खासगी आयोजकांतर्फे 'आयर्न मॅन' नावानी घेतली जाणारी स्पर्धा जगभर प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे.
http://eu.ironman.com/#axzz36xIofIxX
आपल्या शारिरिक क्षमतेचा दीर्घकालीन कस पाहणारा हा स्पर्धा प्रकार सध्या भारतातही लोकप्रिय होत आहे. ह्या स्पर्धाप्रकारात नव्यानेच भाग घेऊ पाहणार्या स्पर्धकांकरता नवख्यांसाठी अंतर (Novice category) ज्यात ३५० मी. पोहोणे, १० किमी सायकलिंग आणि ३ किमी धावणे समाविष्ट असते.
ट्रायथलॉन मधे भाग घेतलेले कोणी मायबोलीकर असतील तर त्यांनी आपापले स्पर्धेचे, त्याच्या तयारीबद्दलचे अनुभव इथे मांडावे ही विनंती.
तसेच भाग घेऊ पाहणार्या नवीन लोकांकरता हा धागा उपयुक्त ठरू शकेल अशी आशा आहे.
भारतात अशा स्पर्धा कोणातर्फे, कुठे, कधी आयोजित केल्या जातात, ई. माहिती देखिल इथे लिहू शकता.
धन्यवाद हर्पेन.
धन्यवाद हर्पेन.
ट्रायथलॉनसाठी नक्कीच प्रेरणा मिळाली.
आता हिवाळ्यात पळणे कमीच होईल तर स्विमिंग क्लास करून स्ट्रोक्स सुधरवून घेतो. टँक मध्ये पोहता येते पण ओपन वॉटरमध्ये पोहण्याचा अनुभव शून्य आहे.
सायकलिंग वर २५-३० मैल असे अधे मधे करतच असतो त्यामुळे त्याचे फार टेंशन वाटत नाही.
तुझे ह्यावेळी तीन ईवेंट्सचे स्प्लिट्स कसे आहेत?
Triathlon संदर्भात थोडा
Triathlon संदर्भात थोडा रिसर्च करताना ही Half Ironman आणि Full Marathon मधली तुलना वाचली.
https://beginnertriathlete.com/mobile/ForumThread.html?forumId=1&forumPa...
बहुतेक सगळ्यांचेच मत असे आहे की Full Marathon जास्त कठीण टास्क आहे. ट्रेनिंग आणि completion दोन्हींच्या दृष्टीने.
Cross training चा फायदा Ironman मध्ये जास्त मिळतो हे तर स्पष्टच आहे.
हर्पेन, तू दोन्ही अनेकदा केले आहेत तुझे काय मत आहे?
हाब, अजून ऑफिशियल स्प्लिट्स
हाब, अजून ऑफिशियल स्प्लिट्स कळायचे आहेत. ढोबळमानाने सांगायचे झालेच तर तासाहून कमी वेळात पोहोणे, साडे चार तासात सायकलिंग आणि तीन तासात रनिंग आणि उरलेला वेळ ट्रांझिशन मधे लागला. मी स्वतः कसल्याही प्रकारचे घड्याळ वगैरे वापरत नाही त्यामुळे
प्रत्यक्ष स्प्लिट्स करता अजून वाट पहावी लागेल.
तू दिलेली लिंक उघडून वाचयला नाही जमलंय अजून पण मला वाटते हे जरा आप अॅपल टू ऑरेंज प्रकारची तुलना होत्ये. मला स्वतःला दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे तितकेच सोपे / अवघड वाटतात
ट्रेनिंगच्या वेळी -
फुल्ल मॅरॅथॉनचे ट्रेनिंग काही जणांना एकसुरी वाटू शकते त्यांच्या करता ट्रायथ्लॉन ट्रेनिंग सोपे किंवा रोचक वाटू शकते. तीन वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांंमुळे इण्ट्रेस्ट आणि फिटनेस टिकून राहू शकतो.
ट्रायथलॉन ट्रेनिंग मधला पोहोण्याचा भाग अनेक जणांना अवघड / जाचक वाटतो. फ्री स्टाईल किंवा फ्रंट क्रॉल प्रकारे एवढाल्ली अंतरे पोहून जाणे ते ही ओपन वॉटर मधे हे भयाकारी वाटते / सरावाकरता (चांगले स्वच्छ पाणी असलेले) ओपन वॉटर मिळतेच असे नाही.
रेसच्या दिवशी
फुल्ल मॅरॅथॉन अंतर जास्त असलं तरी भल्या पहाटे चालू होते बहुतेक वेळा सहात आतच पण उशीरात उशीरा सकाळी सहा वाजता. अगदी ६ तास लावणारा असेल तोही १२ वाजता परत आलेला असतो.
हाफ आयर्न मधे आधी पोहून मग सायकल झाल्यावर पळणे चालू करायचे तेव्हाच अकरा बारा वाजतात. भरउन्हात धावणे हे अत्यंत त्रासदायक ठरते. भारतात ह्या दिवसात पुरेसे उजाडत नसल्याने साडेसहाच्या आत पोहोणे चालू होत नाही. एका एव्हेंट्ला तर सात नंतर पोहणे चालू झाले. मग पुढचे सगळे पुढेच ढकलले जाते.
सायकलिंगच्या वेळेस वाहतूक नियंत्रण असले तरी रस्ते वाहतुकीकरता पुर्णपणे बंद करत नाहीत, जोरात चालवताना व्यवधान सांभाळावे लागते जे खूप भितीदायक असे नसले तरी जरा चिंताजनक काळजी घ्यायला लावणारे तरी असतेच. फुल्ल मॅरॅथॉन मधे रस्ता निदान एक लेन तरी मोकळा केलेला असतोच. सायकलिंग मधे चाक पंक्चर झाले तर स्वतःचे स्वतःलाच काढावे लागते. इतरांची मदत गृहित धरून चालता येत नाही.
मॅरॅथॉन संपुर्ण अंतरभर फुल्ली सपोर्टेड असते.
एकंदरीत विचार करता मला स्वतःला ट्रेनिंग हाफ आयर्न चे आनंददायी / सोपे आणि एव्हेंट फुल्ल मॅरॅथॉनची बरी असे म्हणावेसे वाटते.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अभिनंदन हर्पेन.
अभिनंदन हर्पेन.
धन्यवाद सिम्बा.
धन्यवाद सिम्बा.
मला स्पर्धा पुर्ण करायला लागलेला वेळ खालील अधिकृत लिंक वर पाहू शकता.
http://www.timingindia.com/my-result-details/MTMwNTp0aW1pbmdfcjE4MTFfa3R...
पोहायला ५१ मि ३४ से.
ट्रन्झिशन १ - १३ मि ४१ से.
सायकलिंग - ४ ता १४ मि. ३२ से.
ट्रन्झिशन २ - ५ मि. ८ से.
धावणे - २ ता ५६ मि. ४६ से.
एकूण वेळ - ८ ता. २१ मि. ४० से.
ही माझी तिसरी हाफ आयर्न आणि सर्वोत्तम वेळ
https://www.google.co.in/amp
https://www.google.co.in/amp/s/www.sportstarlive.com/other-sports/ironma...
India's first Ironman triathlon event will be held in Goa next year. The Ironman 70.3 race -- a 'half-Ironman', which involves 1.9km of swimming, 90km of cycling and 21.1km of running -- will take place near Panaji on October 20, 2019.
The race will begin on Miramar beach, with a two-loop swim course in the Arabian Sea. The bike leg will pass through the city and along the Mandovi river, for three laps of 30km each. The run course will begin and end near Miramar beach.
ट्रायथेलोन च्या जगात शेवटी
ट्रायथेलोन च्या जगात शेवटी पाऊल टाकले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कालच्या रविवारी पुणे बालेवाडी स्टेडियम मध्ये ऑलिम्पिक डिस्टन्स ट्राय स्पर्धा पूर्ण केली
(1.5K पोहोणे, 40K सायकल आणि 10K धावणे )
एकंदर लागलेला वेळ 3 तास 27 मीन.
पहिले दान देवाला म्हणून पुढच्या थोन्नूर इव्हेंट ची तयारी सुरू करत आहे
हार्दिक अभिनंदन सिम्बा
हार्दिक अभिनंदन सिम्बा
Congratulations Simba
Congratulations Simba
थोन्नूर येथील स्पर्धा रद्द
थोन्नूर येथील स्पर्धा रद्द झाल्यानंतर गोवा येथे होणाऱ्या हाफ आयर्न अंतराच्या ट्रायथलॉन स्पर्धेत भाग घेऊन सिम्बा यांनी सात तासाच्या आत ती स्पर्धा संपवली.
सिम्बा यांच्याकडून सविस्तर वृत्तांताच्या प्रतीक्षेत
थोन्नूर येथील स्पर्धा रद्द
द्विरुक्ती
ओह ट्रायथलॉन होती का ? तिकडची
ओह ट्रायथलॉन होती का ? तिकडची पोस्ट वाचून कळल नाही. भारीच एकदम.
सिम्बा, पुन्हा एकदा अभिनंदन. डीटेल्स लिही.
अभिनंदन सिम्बा. तुझी प्रगती
अभिनंदन सिम्बा. तुझी प्रगती थक्क करणारी आहे. २०१८च्या जानेवारीत तू धावायला नुकतीच सुरुवात केली होतीस, टिळक तरणतलावावर तू/हर्पेन सोबत मी धावायला आलो होतो. तिथून २वर्षांच्या आत तू ट्रायथलॉन ७ तासाच्या आत पूर्ण केलीस हे महानच!
धन्यवाद मंडळी _/\_
धन्यवाद मंडळी _/\_![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हो लिहावेसे वाटतंय, let the initial excitement die, नाहीतर बरेच काय काय लिहित बसेन
डिटेल मध्ये लिहिनच, पण हर्पेन आणि त्यांचा (आता माझा) ढक्कन अथलिट्स ग्रुप नसता तर हे शक्य झाले नसते.
हार्दिक अभिनंदन सिम्बा.
हार्दिक अभिनंदन सिम्बा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुम्ही सगळी मंडळी अशक्य आहात.
मुद्दामून नमूद करू इच्छितो की
मुद्दामून नमूद करू इच्छितो की माझा सहभाग केवळ नाममात्र असून सर्व credit सिम्बाच्या सातत्य ह्या गुणाला जायला हवं.
I am really proud of Simba, he is awe inspiring.
अभिनंदन सिम्बा.
अभिनंदन सिम्बा.
सिम्बा यांच्याकडून सविस्तर
सिम्बा यांच्याकडून सविस्तर वृत्तांताच्या प्रतीक्षेत +११११
अभिनंदन सिम्बा !!!
अभिनंदन सिम्बा !!!
अभिनंदन सिम्बा, way to go!
अभिनंदन सिम्बा, way to go!
हर्पेनना गुरूदक्षिणा म्हणून काका हलावाईचे पाव किलो पेढे, दुर्वांकूरची शाही थाळी आणि वर एक मस्तानी खाऊ घाला , कयानी बेकरीचा केक नको त्यात कॅलरी जास्त असतात.
>>काका हलावाईचे पाव किलो पेढे
>>काका हलावाईचे पाव किलो पेढे, दुर्वांकूरची शाही थाळी आणि वर एक मस्तानी खाऊ घाला>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> कयानी बेकरीचा केक नको त्यात कॅलरी जास्त असतात.>>>> हाहाहा
हार्दिक अभिनंदन सिम्बा.
हार्दिक अभिनंदन सिम्बा.
हाब, खायला प्यायला सगळं
हाब, खायला प्यायला सगळं चालेल, अगदी कयानीचा केकही.
पण गुरुदक्षिणा म्हणून नाही रे
आपण 'गुरु' शब्दाला अस्थानी वापरून सवंग नको करायला.
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे
कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की (बहुतेक सर्वांना हे या आधीच कळलेही असेल पण तरीही ह्या धाग्यावरही नोंद रहावी म्हणून लिहीत आहे) मी इटली मधील चर्विया ह्या गावी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेऊन ती स्पर्धा निर्धारित वेळे आधी संपवली. मला लागलेला वेळ १४ तास ३४ मिनिटे २० सेकंद इतका होता. ही स्पर्धा अती-दीर्घ पल्ल्याची होती. ह्यामधे अॅड्रीयाटिक समुद्रात ३.८ किमी पोहोणे, १८०.२० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी (फुल मेरेथोन) धावणे समाविष्ट होते.
https://www.ironman.com/im-emilia-romagna-results
ह्या पानावर जरा स्थिरावले असता माझे नाव टंकून निकाल अधिक तपशीलानिशी बघता येईल.
ग्रेट आहेस हर्पेन!
ग्रेट आहेस हर्पेन!
इंडीआ साठी फिल्टर केलं की हर्पेन दुसर्या पानावर आहे. फारच भारी वाटलं.
वेळ झाला की लिही अनुभव. वाट बघतोय.
अमितव सुरु केलंय बघ.https:/
अमितव सुरु केलंय बघ.
https://www.maayboli.com/node/82537
Pages