पुणे गटग - दि. ६ जुलै २०१६ संध्याकाळ

Submitted by फारएण्ड on 5 July, 2016 - 07:46
ठिकाण/पत्ता: 
वाडेश्वर रेस्टॉ. डेक्कन जिमखाना. संध्याकाळी ७:३०

लोकहो,
उद्या (६ जुलै) संध्याकाळी ७:३० वाजता वाडेश्वर रेस्टॉ मधे एक गटग ठरवत आहोत. ज्यांना जमू शकेल त्या सर्वांनी जरूर या. पुपुकर्स, स्थानिक न-पुपुकर्स व सध्या परदेशातील सुट्ट्यांमुळे येथे असलेले माबोकर सर्वांना आमंत्रण आहे Happy

कोणाला वाडेश्वर माहीत नसेल तर मला संपर्कातून कळवा. मी माहिती देतो. वेब वर त्यांना नं २५५२ ०१०५ असा मिळाला.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
Wednesday, July 6, 2016 - 10:00 to 13:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शब्दाली - कदाचित लौकरही जमेल. सांगतो.
हर्पेन -सध्या आहेत. उद्यापर्यंतचे माहीत नाही Happy
हिम्या - १-२ तास तरी प्रॉब्लेम नसेल. नंतर दुसरीकडे जाऊ शकतो Happy
महेश - चालेल.
मेधा - बुधवार वाले तेथून इतरत्र जाउ शकतील Happy
कृष्णा - ९ चा फंडा बाउन्सर.
अ.अ.अ - संध्याकाळी ७:३० च आहे. मला माझ्या प्रोफाईल मधून वेळ बरोबर दिसत आहे. पण इतरांना दिसली नाही तरी खाली डीटेल्स मधे मुद्दाम वेगळी दिलेली आहे.
पियु - काल आम्ही इथे ट्रिप वर आलेले एक दोन जण थोडा वेळ भेटलो होतो तेव्हा अचानक ठरवले आहे. याची चर्चा माबोवर कोठेच झालेली नाही. मी गुरूवारी परत जाणार असल्याने उद्याच भेटायचे ठरले.

कोणाला उत्तर द्यायचे राहिले असेल तर रात्री परत चेक करेन Happy

उद्या काही लोकांना सुट्टी असेल असे दिसते. आणखी लौकर भेटायचे असेल तरी मी येउ शकतो.

अरे काय हे? आम्ही लांब हापिसवाल्यांनी ईच्छा असून कसं यायचं? आम्ही धा ला पोचतो घरी. Uhoh
ऑड डे ला का ठरवले गटग?
तुला भेटायला आवडलं असतं फा. सेनापतीच्या एका गटगला भेटलो त्यावर आपली भेट नाहीच Sad

असो मज्जा करा.

दक्षिणा - आज तुला जमले नाही तर पुढच्या वेळी भेटू. हो बहुधा सेनापती गटग च्या नंतर भेटल्याचे आठवत नाही. तू गंधर्व मधे कधी गटगला होतीस का?

या वेळेस मी अगदी ४-५ दिवसच आलो आहे, उद्या परत. म्हणून हे अचानक ठरवले.

_डी - उशीराही चालेल. ये.

मयुरेश - हो साडेसातच.

इन्ना - मी उद्या परत चाललोय पण इथे बरेच प्रवासी भारतीय आहेत अजून. तेव्हा तुम्ही सर्व पुन्हा भेटा अजून एकदा Happy

अगदी उद्या पण चाललं असतं, उद्या सुट्टी आहे मला.
Sad
असो मज्जा करा. परत येशिल तेव्हा भेटू नक्कीच.

अरे, फारच 'लवकर' पाहिला हा बीबी. असो. मज्जा करा मंडळी. भेटा, खा-प्या, गप्पा मारा, मटार उसळ खा, शिकरण खा!* Proud

वविलाही यायचे बघा! * Wink

चला भेटू साडेसातला लोकहो. मी कॅशियर्/काउण्टर वर सांगून ठेवतो म्हणजे कोणाला आम्ही सापडलो नाही तर त्यांच्याकडून कळेल.

महेश - आत्ता कल्पना नाही अजून.

मस्त झाले गटग. आम्ही साधारण ११ पर्यंत होतो. आधी वाडेश्वर ला भेटलो. मग तेथून बाजूलाच कल्याण भेळ, आणि त्यानंतर गावात सुजाता मस्तानी.

मयुरेश, मित, मी, मंदार, राखी, रश्मी आणि चिनूक्स जमलो होतो.

Pages