एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.
बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -
चूक - बरोबर
१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी
कुठल्या सवयीचा? गांजाच्या? <<
कुठल्या सवयीचा? गांजाच्या?

<<
"तज्ज्ञ हा शब्द तत्+ज्ञ = ते
"तज्ज्ञ हा शब्द तत्+ज्ञ = ते जाणणारा ह्या संधीतून निर्माण झालेला आहे हे उघड आहे. शेवटचा 'त्' आणि ज्ञ मधला पहिला द ही दोन्ही व्यंजने असल्याने व अर्धी (हलन्त) असल्याने त्यांचा संधी होत नाही. व मिसळून उच्चार होत नाही त्यामुळे हा अर्धा 'ज' घुसला असावा."
- वरील वर्णन थोडे चुकीचे आहे. 'ज्ञ'चा उच्चार प्रत्येक भाषेत वेगवेगळा करतात. परंतु मुळात तो संस्कृतभाषेत मुळाक्षर नसून 'ज्ञ = ज् + ञ्' असे जोडाक्षर आहे. त्याचा मुळातला उच्चारही कदाचित वेगळा असावा. इतर भाषेत त्याचा उच्चार 'ग्य, ग्न, ज्न' इत्यादी करतात. किंबहुना तो 'ज् + ञ्' आहे म्हणून तर ज्ञा धातूचे रूप 'जानाति' असे होते.
तत् + ज्ञ मध्ये 'तत् + ज् + ञ' असे होताना पाणिनीच्या 'जश्त्व' संधीनियमानुसार त् चा ज् होतो.
शंतनू, हे अक्षर कुठले आहे - "
शंतनू, हे अक्षर कुठले आहे - " ञ्". हा "ज्ञ" आहे का?
मूळ लेखात ३९ वा शब्द ऋषीकेश =
मूळ लेखात ३९ वा शब्द ऋषीकेश = हृषिकेश वाचला.
भागवत सप्ताहात ऐकलेली माहिती : सगळ्या ऋषीकुळाचा ईश म्हणजे अधिपती, म्हणजे शंकर.
हृषिक म्हणजे इंद्रिय. सर्व इंद्रियांचा स्वामी म्हणजे विष्णू. त्यामुळे दोन्ही शब्द (वेगळ्या अर्थासहित) योग्य आहेत.
<सगळ्या ऋषीकुळाचा ईश म्हणजे
<सगळ्या ऋषीकुळाचा ईश म्हणजे अधिपती, म्हणजे शंकर>
मग ते ऋषी + ईश असं हवं. 'के' कुठून आला?
चिनूक्स, अधिक माहिती विचारून
चिनूक्स, अधिक माहिती विचारून सांगते. मलाही हा प्रश्न पडला होता, पण ते काहीसं 'विघ्नेश' सारखं असावं असं वाटलं मला. विघ्नेश चा अर्थ विघ्नांचा अधिपती होतो का? तर नाही. सर्व विघ्ने नष्ट करणारा असं आपण म्हणतो ना? त्यामुळे इथेही असंच काहीतरी ऋषी आणि ऋषीक मधे असेल असं मी तात्पुरतं गृहीत धरलं. म्हणजे बहुधा अगदी शब्दशः अर्थ न घेणं अपेक्षित असेल.
ऋषिकेश हा शुद्ध अपभ्रंश
ऋषिकेश हा शुद्ध अपभ्रंश आहे.
अवांतर. भागवत सांगणाऱ्या पुराणिकांनी गेल्या शेकडो वर्षांत जितकी प्रक्षिप्त व छद्म माहीती प्रसृत केली तितकी सायबर सेलनेही करायचा यत्न केला नसेल...
विघ्नेश चा अर्थ विघ्नांचा
विघ्नेश चा अर्थ विघ्नांचा अधिपती होतो का?
<<
होय. ऐतिहासिक संदर्भ हेच्च म्हणतात.
हर्ट, मराठी मुळाक्षरांमध्ये
हर्ट, मराठी मुळाक्षरांमध्ये च, छ, ज, झ, ञ अशी तालव्य अक्षरे आहेत. ञ हा तालुला जीभ लावून सानुनासिक उच्चार करतात. 'संयम' या शब्दात अनुस्वाराचा उच्चार जसा करता तसा तो आहे.
धन्यवाद शंतनू. मला हे अक्षर
धन्यवाद शंतनू. मला हे अक्षर पाहून माहिती होते पण उच्चार कसा करायचा माहिती नव्हते.
‘ञ’चा उच्चार अनुनासिक किंवा
‘ञ’चा उच्चार अनुनासिक किंवा अनुस्वार दिलेला ‘ज’ असा करायचा. हल्ली आपण ‘कुंज’ असं लिहितो. खरं तर ते ‘कुञ’ असं लिहायला हवं. एक संस्कृतमध्ये नियतकालिक प्रसिद्ध होत असतं. त्याचं नाव ‘गुञारव’ असं आहे. हल्ली मराठीत सगळे ‘गुंजारव’ असंच लिहितात.
बे-डर नक्की? कारण याचा उच्चार
बे-डर नक्की?
कारण याचा उच्चार 'यं' शी मिळता जुळता वर शंतनू म्हणतायत तसाच माहित आहे.
बे-डर, आपण कुंज चे लेखन कुञ
बे-डर,
आपण कुंज चे लेखन कुञ असे केले आहे ते चुकीचे आहे. ते कुञ्ज असे हवे. तसेच गुंजारव हे गुञारव असे न लिहिता गुञ्जारव असे लिहिणे बरोबर ठरेल. मला वाटते आपली टंकनचूक झाली असावी.
च, छ, ज, झ. या अक्षरांआधीचा
च, छ, ज, झ. या अक्षरांआधीचा अनुस्वार लिहिताना ञ वापरता येतो.
याच प्रमाणे, त,थ,द,ध - न या ओळीत, दंत= दन्त, मंथ = मन्थ, बन्द, अन्ध इ.
दम्त, दञ्त, दङ्त, किंवा दण्त असे होत नाही. माझ्या माहितीप्रमाणे वर्णमालेत ती शेवटची अक्षरे (त्या अक्षरा आधी येणार्या अक्षरावरील) अनुस्वाराची आहेत.
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व स श ष ह ळ क्ष ज्ञ (या अक्षरांच्या अनुस्वाराचे मात्र वेगळे दिसते. सहसा न /म लावून काम चालते. उदा वंश = वन्श/वम्श. पण ही अक्षरे अशी मोडून लिहिलेली सहसा पाहण्यात नाहीत. याचा नियम कुणाला ठाऊक असेल तर सांगावा.)
व्हॉट्सॅप-फेसबुकावर आजकालचे मराठी साक्षर अर्धशिक्षीत अनेकदा ञ हे अक्षरचिन्ह त्र ऐवजी वापरताना दिसतात. उदा. मिञ. कीव येते.. पण काय करणार!
चिवडेवाला: मलाही व्याकरणात
चिवडेवाला: मलाही व्याकरणात हेच शिकवले होते. (अनुस्वार वापरता येतो)
चंचि, आम्हालाही हेच शिकवले
चंचि,
आम्हालाही हेच शिकवले गेलेय.
चिवडेवाला, आम्हाला हे शाळेत
चिवडेवाला, आम्हाला हे शाळेत शिकवले नव्हते. शाळेत कधी वापरलेही नाही. एखादा वाङ्मय शब्द वगळता मी कधीच शिक्षकांना हा नियम वापरताना पाहिले नाही. हे लॉजिकल असल्यामुळे आणि संस्कृत ८/१० असल्याने हे माहिती झाले. चिनूक्स खात्रीने सांगू शकेल पण माझ्या माहितीप्रमाणे ङ ञ ही अक्षरे सरकारी नियमांनुसार आता रिडंडंट आहेत. तेव्हा गेल्या २० वर्षात शाळा शिकलेल्या किती जणांना हा नियम माहिती असेल ही शंकाच आहे.
अर्थात त्र साठी ञ वापरणे हा मुर्खपणा आहे यात दुमत नाही.
य, स, श ही अक्षरे वगळता इतर यरलव ओळीतली अक्षरे अनुस्वारानंतर येणारे शब्द मला आठवत नाहियेत. असे कुठले शब्द आहेत?
य च्या बाबतीत सगळे सं पासून सुरु होणारेच दिसत आहेत. संयत्र, संयम. इथे ञ योग्य वाटतोय.
कंस आणि वंसं यात कंस साठी ङ तर वंसं मध्ये न योग्य वाटतोय.
अनुस्वाराचा अनुनासिक लिहून
अनुस्वाराचा अनुनासिक लिहून फोड करण्याचा नियम संस्कृतमधून आलाय. मराठीत फोड करून लिहायची गरज नाही -> उदा. दन्त लिहायची गरज नाही, दंत चालेल. संस्कृतमध्ये मात्र दंत चालणार नाही, दन्तच लिहावे लागेल आणि याला कारण आहे 'य र ल व स श ष ह ळ क्ष ज्ञ' या अक्षरसमूहाकरिताचा अनुस्वाराचा नियम. याच नियमामुळे वन्श व वम्श हे दोन्ही शब्द मराठी व संस्कृत दोन्ही भाषांमध्ये अशुद्ध ठरतात.
य र ल व स श ष ह ही आठ अक्षरे अर्धस्वर आहेत - अर्थात ती व्यंजने नव्हेत. पाणिनी अनुस्वार व अनुनासिक या दोहोंसाठी दो वेगवेगळी सूत्रे अष्टाध्यायीत देतो, अर्थातच कारण दोहोंचे उच्चार वेगवेगळे आहेत. जेव्हा ज्याला आपण लौकिकार्थाने अनुस्वार म्हणतो त्या सदृश उच्चार येतो, जर त्याच्या नंतरच्या अक्षरात व्यंजन वर्ण असेल तर तुम्ही तिथे अनुनासिक वापरणे अपेक्षित असते. उदा. दन्त मध्ये नंतर त आला व त्याचे अनुनासिक न! जर नंतरच्या अक्षरात अर्धस्वर वर्ण असेल तर तिथे अनुस्वार वापरला जातो. फरक असा कि अनुनासिक व अनुस्वार दोहोंमध्ये उच्चारण होताना हवा नाकातून जाते व आवाजात नाकातून येणारा ध्वनि मिसळला जातो पण अनुस्वार उच्चारण होताना जीभ तोंडाच्या कुठल्याही भागास स्पर्श करत नाही. त्यामुळे संयम लिहिताना कुठलेच अनुनासिक लिहिणे अशुद्ध ठरेल (अगदी ञ देखील). तो वेगळा वर्ण आहे आणि त्याचा उच्चारही वेगळाच होतो.
मराठीत हे दोन्ही नियम आले तेव्हा त्यांच्यात बदल असा झाला कि अनुनासिके व अनुस्वार दोहोंसाठी एकच चिन्ह (डोक्यावर टिंब) आले व फोड करून लिहिण्याची पद्धत लोप पावत गेली.
वा! @ पायस. परफेक्ट माहिती
वा! @ पायस.
परफेक्ट माहिती दिलीत. धन्यवाद!.
संयमसाठी सय्यम लिहिले तरी चालेलसे दिसतेय.
@ टण्या.
ङ वापरात आहे, पण ञ शासननियमाने रिडंडंट ठरवल्याचे मध्यंतरी कुठेतरी वाचनात आले होते. हे इंग्रजी की-बोर्डात देवनागरी अक्षरे बसवण्यासाठी अक्षरचिह्ने कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग असावा असे दिसते आहे.
संयमसाठी सय्यम लिहिले तरी
संयमसाठी सय्यम लिहिले तरी चालेलसे दिसतेय. >> नाही चालणार.
पायस धन्यवाद. ही अर्धस्वर
पायस धन्यवाद. ही अर्धस्वर वगैरे माहिती नव्हते.
म्हणजे मला स्वतःच्या भाषेचे हे मूलभूत ज्ञानही नाहिये
पायस, अगदी व्यवस्थित लिहिलं
पायस,
अगदी व्यवस्थित लिहिलं आहे.
भाषा आणि तिचे व्याकरण हे कायम
भाषा आणि तिचे व्याकरण हे कायम बदलत असते. व्यवहारात वापरलेली जाणारी भाषा वापरून वापरून बदलत असते. तिचे कंगोरे घासून गुळगुळीत केले जातात. त्यामुळे अमुक एक नियम मराठीत आहे म्हणून तो चिरकाल तसाच राहील वा रहावा असे नाही. त्यात बदल करणे शक्य आहे. पुरेसा प्रयत्न केला तर ते होऊ शकते. संस्कृत ही वापरात नसल्यामुळे त्या भाषेचे व्याकरण जसेच्या तसे राहील पण मराठीचे तसे नाही. सोयीप्रमाणे, अन्य भाषांच्या आक्रमणाने, विविध लेखक वा कलाकारांनी घातलेल्या भरीमुळे ते बदलत जाणार.
काही उदाहरणे: इंग्रजीत कॅन आणि मे अशी दोन क्रियापदे आहेत. काही करण्याची परवानगी घ्यायची असेल तर मे आय डू धिस? असे म्हणावे असा संकेत आहे. त्याऐवजी कॅन आय डू धिस? असे म्हटले जाते. भाषेची शुद्धता राखण्याची जाणीव असणारे ह्याला आक्षेप घेतात. कारण त्याचा मूळ अर्थ "मला हे करता येणे शक्य आहे का?" अशा प्रकारचा आहे. उदा. मी दोन डझन केळी खाणे शक्य आहे का? असे काहीतरी. पण व्यवहारात लोक सर्रास कॅन वापरतात. आणखी २०-३० वर्षे उलटल्यावर कॅन हा मे सारखा वापरला जाईल ह्याची खात्री आहे. असो.
य, र, ल, व श ह्या सर्व अक्षरांच्या आधी अनुस्वार येऊ शकतो.
संयम, संरक्षण, संलग्न, संवेदना, संशय, संहार (सम हा उपसर्ग अनेक क्रियापदांना लागतो त्यामुळे ते होणारच!)
मराठीत ह्या अनुस्वारांचे उच्चार सय्यम, सौरक्षण, सल्लग्न, सौवेदना सौशय सौहार + अनुनासिक ध्वनि असे काहीसे होतात. पण हिंदीत तसे होत नाहीत. (उदा अंशः मराठी औंश पण हिंदी अन्श, कंसः मराठी कौंस, हिंदी कन्स) मूळ संस्कृतमधे अशा शब्दसमूहाचे उच्चार कसे असावेत ह्याबद्दल काही मार्गदर्शन आहे का?
मूळ संस्कृतमधे अशा
मूळ संस्कृतमधे अशा शब्दसमूहाचे उच्चार कसे असावेत ह्याबद्दल काही मार्गदर्शन आहे का? >> अशा शब्दांमधला अनुस्वार उच्चारताना ञ उच्चारताना जशी जिभेची हालचाल कराल तशी करा पण जीभ टाळूला स्पर्श करण्यापूर्वीच पुढचा वर्ण उच्चारावा (जसे संयम मध्ये य् ). असे केल्यास आपोआप नाकातून आवाज येतोच आणि वर्णाला आभासी द्वित्व मिळू शकते(य्य, हे सर्व सिद्धांत कौमुदी मध्ये मिळेल) पण ओढून ताणून असे उच्चारण केले तर तुम्ही वर दिलेल्या उदाहरणांप्रमाणे प्रकार निर्माण होतात.
व्यवहारात निश्चित तसे उच्चार सोयीस्कर असू शकतात व पुढे जाऊन त्यांना शुद्ध म्हणून मान्यता मिळेलही पण वर्तमान मराठी व्याकरणानुसार तसे लिहिणे अशुद्ध!
हीरा... तुमचे बरोबर आहे एकदम.
हीरा...
तुमचे बरोबर आहे एकदम. माझ्याकडून चूक झाली. ते मासिक `गुञ्जारव` असेच आहे.
उज्वल की उज्ज्वल ?
उज्वल की उज्ज्वल ?
उज्ज्वल
उज्ज्वल
जनरली मराठी बोलताना "तू असं
जनरली मराठी बोलताना "तू असं वागायला नको होतंस." असं सरळ वाक्य बोललं जातं ना? (म्हणजे मी तरी असंच बोलते.)
पण काही वेळा "तू असं वागायला नको हवं होतंस." असं वाक्य ऐकलंय/वाचलंय.
या दोन वाक्यांपैकी नेमकं कुठलं वाक्य बरोबर आहे??
`ञ` अक्षराची चर्चा झाली. ते च
`ञ` अक्षराची चर्चा झाली. ते च ते झ या मालेत अनुस्वाराऐवजी वापरायचे. त्याच धर्तीवर मग `वाङ्गमय` असेच लिहिले पाहिजे ना? सगळीकडे सरसकट `वाङमय` असंच वाचायला मिळतं. नेमकं काय (आणि का) बरोबर?
पायस, तुमचे म्हणणे पूर्णपणे
पायस, तुमचे म्हणणे पूर्णपणे पटले नाही. पाणिनिच्याच अष्टाध्यायीनुसार 'इचुयशानाम् तालु', म्हणजे 'इ', 'च-छ-ज-झ-ञ' (ह्या वर्गाला पाणिनी चु म्हणतो), 'य' आणि 'श' हे सर्व तालव्य आहेत. तसेच 'ह' कंठ्य आहे आणि 'ष' मूर्धन्य आहे. 'स' दन्तव्य आहे. सर्व कंठ्य वर्णाच्या आधीचा अनुस्वार कंठ्य सानुनासिक (ङ्) होतो. तालव्याच्या आधीचा अनुस्वार ञ् होतो. आपण ञ वर्ण पूर्ण उच्चारताना त्यात ञ् + अ हा स्वर मिसळलेला असतो, त्यामुळे तालव्य स्पर्श पूर्ण होतो. पण स्वर नसताना प्यूअर व्यंजन ञ् हा सर्व तालव्य वर्णांच्या आधीच्या अनुस्वारांसारखाच आहे. (संरक्षण, संसार, संज्ञा - ह्यामध्ये अनुस्वाराचा जो सध्याचा उच्चार आहे, तो मूळ संस्कृतमध्ये तसाच होता का, माहिती नाही. जसे ज्ञ च्या उच्चारात फरक पडला, तसा ह्या अनुस्वारांमध्येही पडला असण्याची शक्यता आहे).
Pages