गंध हे दरवळणारे

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 28 June, 2016 - 03:05

१) कधी उमलतोय आणि आपला सुगंध आसमंतात दरवळवतोय अस झालय.

२) हे आमच्या कुंडीत फुललेल मे फ्लावर. जणूकाही सृष्टीतील आनंद साजरा करणारा फुलबाजाच.

३) आम्ही क्वचीतच फुलतो. पण फुलाव तर आमच्यासारख स्वतःबरोबर ज्यांनी आधार दिला त्यांनाही सुरंगी कराव.

४) आम्हीच आमची वेणी गुंफली.

आमचे गुच्छही आम्ही असे एकमेकांचे हात धरून, एकत्र राहून बनवतो.

५) आज कसा मनासारखा पाऊस अंगावर रिमझिमला. चिंब चिंब झाल.

६) राणीच्या बागेत तुमच स्वागत आहे अश्या पोज मध्ये हे फुल राणीच्या बागेत होत.

७) नाव माझ पावडर पफ असल तरी त्याहून मी खुप नाजूक आहे.

८) फुलांचे राजे म्हणतात आम्हाला.

९) आम्हाला बाई स्वच्छ, शुभ्रच आवडत.

१०) अय्या, कोण आल?

११) आकाशाकडून रंगाची उधळण घेऊन आलोय आम्ही.

खालचे फोटो माझी मुलगी श्रावणी हिने काढलेत. माझ्या माहेरी.

१२)लहान मुलांचे फ्रॉक, पर्सला अशी फुले किंवा बटन्स किती छान दिसतील.

१३) अगो बाई कॅमेरा हातात धरण्याएवढी इतकी मोठी झालीस लगेच अस म्हणत आहे ते फुल.

१४) हे फुल वळून वळून सांगत आहे "एक माझा पण काढ ना एक छानसा फोटो, डिपी ठेवता येईल असा".

१५) इश्य बाई (लाज वाटते).

१६) वर्षोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या लेखांचे एकत्रीत संकलन मी ह्या ब्लॉग वर करत आहे. http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, अप्रतिम फोटो ....

सुरंगीचा सुवास अजूनतरी अनुभवला नाहीये ... Happy

मस्त फोटो. Happy

माझा मोगरा पण कळ्यांनी बहरून आलाय.. कधी एकदा फुलतोय असं झालंय.

सुरंगीचा सुवास अजूनतरी अनुभवला नाहीये. >> मी पण. Uhoh

व्वा जागू, सुरेख फुले आणि संवाद! Happy
श्रावणीने छानच काढलेत फोटो. Happy
सुरंगीचा सुवास अजूनतरी अनुभवला नाहीये>>>>>>..मी पण. Sad

मोगर्‍याचा सुवास दरवळलाय, चाफ्याचा गंध वातावरण धुंद कुंद करतोय, राजाची स्वारी लय भारी! जास्वंदीने मन पवित्र केलेय.

जागु, मस्त आलेत फोटु!

जागु........ अप्रतिम सौंदर्य...... पाहातच राहावेसे वाटणारे.......

श्रावणी चं विशेष कवतिक!!! Happy

गजानन, कांदापोहे, शोभा, जाई,बॅग्ज, रश्मी, मानुषी, दक्षिणा, अन्जू, वर्षू, इंद्रा, माधव धन्यवाद.

समृद्धी मी पूर्वी बकुळीचा लेख लिहीलेला आहे. मी माझे लेख एकत्र संकलीत करण्याच्या हेतूने ब्लॉग काढत आहे. http://prajaktamhatretarangmaniche.blogspot.in ह्यात बकूळीचा लेख आहे. अवश्य पहा.

आजच्या लोकसत्तामध्ये 'जिवाभावाचा पार' म्हणून 'कोणाचातरी' छान लेख आलाय बरं का Happy

Pages