सुखोई-३० एमकेआय + ब्रह्मोस = मस्त समीकरण

Submitted by पराग१२२६३ on 25 June, 2016 - 12:37

बरीच वर्षे वाट पाहिलेला दिवस अखेर आज उजाडला. नाशिकच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि.च्या कारखान्यात गेली पाच-सहा वर्षे सुखोई-30 एमकेआय या भारतीय हवाईदलाच्या सामरिक शक्तीची ओळख असलेल्या लढाऊ विमानावर जगातील एकमेव स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जोडणी सुरू होती. त्यासाठी विमानात आणि या क्षेपणास्त्रातही आवश्यक बदल करण्यात येत होते. अर्थातच त्याची माहिती धडाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हती.

अखेर २५ जूनला सुखोई-30 एमकेआयने त्या ब्रह्मोससोबत पहिले उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये य़ा क्षेपणास्त्राच्या आणखी काही चाचण्या होतील आणि ब्रह्मोसयुक्त सुखोई-30 एमकेआय भारतीय हवाईदलात सामील होईल. त्यामुळे अशी स्वनातीत (सुपरसॉनिक) लढाऊ विमानावरून स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता फक्त आणि फक्त भारतीय हवाईदलाकडे येणार आहे.

भारतीय हवाईदलाची सामरिक शक्ती वाढविण्यामध्ये सुखोई-30 एमकेआय प्लस ब्रह्मोस हे समीकरण अतिशय लाभदायक ठरणार आहे.

हॅट्स ऑफ - आमच्या शास्त्रज्ञांसाठी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगातील एकमेव क्रूझ क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची जोडणी सुरू होती

मला वाटते ब्रह्मोस हे जगातील एकमेव क्रूझ मिसाईल नसून
जगातले सर्वात वेगवान क्रूझ मिसाईल आहे असे शुद्धीकरण सुचवतो, कारण क्रूझ मिसाईल तर अगदी आपलेच शौर्य सुद्धा आहेच की! परमाणु वॉरहेड वाहक क्षमता असलेले क्रूझ मिसाईल + सुपेरसोनिक (वेग+विमान)

___/\___

सोन्याबापूजी , मजकुरात नजरचुकीने राहून गेलेली चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

पराग भाऊ मला जी वगैरे नका म्हणत जाऊ ही विनंती करतो तुम्हाला, तुमच्यासोबत मित्रत्वाचे नाते आवडेल मला मला सरळ बापू किंवा बाप्या म्हणा असे सुचवतो,

क्रूझ मिसाईलचे सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र विमानाप्रमाणे हवेत घिरट्या घालू शकते, तेव्हा स्वप्नतीत वेगात एखाद्या विमानाप्रमाणे घिरट्या घालून नेमक्या क्षणी बहिरी ससण्यासारखे सावजावर झेपावणारे ब्रह्मोस हे अजेय ठरावे ह्यात शंका नाही उरत!!

हॅट्स ऑफ - आमच्या शास्त्रज्ञांसाठी +१
अर्थातच त्याची माहिती धडाडीच्या मराठी वृत्तवाहिन्यांना नव्हती.>>> एक शंका ... अश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का ? (इथे वृत्तवाहिन्यांना अजिबातच झुकतं माप देण्याचा उद्देश नाही )

अश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का ?
<<

+१ @मित

सुखोई-30 एमकेआयने त्या ब्रह्मोससोबत पहिले उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर काल 'एबिपी माझा' ह्या मराठी वृत्तवाहिनीनी ह्या बद्दलची बातमी अगदि प्राईम टाईम मध्ये दाखवत होते.

याची तयारी फार फार आधी पासून सुरु होती. एमआरएफ कडून विमानांचे टायर सुध्दा खास बनवून घेतले आहे. सर्वसामान्य लढाऊ विमानांना वापरले जाणारे टायर हे या चाचणीसाठी उपयुक्त बहुदा नसावे.
आणि या ब्रह्मोस मिसाईल् वापरा करीता वैमानिकांचे हेल्मेट देखील बदलण्यात आले आहे.

इंटरनेटवरून :-

The Brahmos is an anti-ship cruise missile developed jointly by India and Russia. Its design inherits from a long line of large (3000+ kg) supersonic (mach 2+) anti-ship cruise missiles (using air breathing engines instead of rockets) originating in the Soviet Union, primarily to attack US carrier task forces. The P-700 Granit (NATO designation was SS-N-19 Shipwreck) and P-270 Moskit (aka "Sunburn") and P-800 Oniks (aka SS-N-26) are in Brahmos's lineage.

These missiles are much faster than the Tomahawk or other Western designs(usually subsonic) because they have to penetrate multiple layered air defenses protecting the US carrier task forces (aircraft, Aegis destroyers or cruisers, close-in defenses). Speed reduces reaction time for these air defense systems. They are also much larger (the Tomahawk is only 1300 kg) because they have to carry enough fuel to have enough range to be launched outside of weapon range from the carrier's escorts and still reach the carrier with a warhead large enough to hurt it. Aircraft carriers are extremely sturdy because they have to withstand the impact of 20+ ton fighter jets landing at 100+ miles/hour.

<<अश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का ?>>

------ यात संवेदनशील काय आहे ? विविध प्रसारमाध्यमात या बातम्या सहजगत्या उपलब्द आहे.

ब्रह्मोस बद्दल प्रसिद्ध झालेल्या बातमीपेक्षाही जास्त खोलवर माहिती ज्यान्ना नको असायला हवी त्यान्ना (पाक, चिन, अमेरिका) आहेच. ते बारकाईने सर्व विकासावर लक्ष ठेवत नसतील असे मानणे भोळेपाणा ठरेल.

अश्या संवेदनशील बातम्यांना मुद्दामच कमी प्रसिद्धी देणं हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचं नसावं का ?

उदय यांच्या मताशी पूर्णपणे सहमत.

बऱ्याचदा विशेषत: युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी शत्रुला मदत करून आपल्याच जवानांचे जीव घालवायला आमची माध्यमे तयार असतातच की.

पराग - मी मित यान्च्या मुळ प्रतिसादावर मत व्यक्त केले आहे.

शत्रु नेहेमी सावध असतो, आणि त्याला बर्‍यापैकी आपल्या क्षमतेची जाण आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती त्यान्च्याकडे असावी असा माझा अन्दाज आहे.

उदय, मीही मित यांच्या मतालाच प्रतिक्रिया दिली आहे. आणि शत्रुला आपली माहिती आधीपासूनच असली तरी प्रत्यक्ष आणीबाणीच्या प्रसंगात आपल्या काय हालचाली होत आहेत त्यांचे भान हरपून थेट प्रसारण करणाऱ्या आमच्या माध्यमांच्या कृतीबद्दल मी माझे निरीक्षण व्यक्त केले आहे.

बऱ्याचदा विशेषत: युद्ध किंवा दहशतवादी हल्ल्यांच्या वेळी शत्रुला मदत करून आपल्याच जवानांचे जीव घालवायला आमची माध्यमे तयार असतातच की.>> हे संसद आणि मुंबई ताज च्या वेळी बघितलंच आहे. अतिशय चुकीचं आहे. याबद्दल दुमत नाहीच.
शत्रु नेहेमी सावध असतो, आणि त्याला बर्‍यापैकी आपल्या क्षमतेची जाण आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती त्यान्च्याकडे असावी असा माझा अन्दाज आहे.>> हे ही मान्य. पण म्हणून आपणहून माहिती देऊन त्यावर शिक्कामोर्तब का करा... असं माझं म्हणणं होतं.

प्रचंड माहीती मधली १-२ % माहीती फक्त प्रसारमाध्यमांकडे प्रसिध्द केली जाते ती ही संबंधित खात्याची परवानगी घेऊन (किमान २०१४आधी तरी असे होते. आता टेलिकॉम बद्दलची मते शिक्षणमंत्री अर्थ मंत्री व्यक्त करतात तर अर्थखात्याबद्दलची मत अर्थमंत्री सोडून बाकी सग़ळे व्यक्त करतात Wink असो )

अग्नी ५ ची क्षमता ५ हजार आपण डिक्लिअर केली आहे तरी चीन आणि इतर देश तिचा पल्ला १० ते १२ हजार किमी सांगत आहे. असे बहुदा पहिल्यांदा घड्ले असेल जिथे इतर देश भारतीय क्षेपणास्त्राची क्षमता वाढवून सांगत आहे.
जेव्हा प्रत्यक्षात युध्द जर झाले तेव्हाच अग्नी ५ ची खरी क्षमता जगासमोर येईल. तो पर्यंत ही माहीती गुलदस्त्यातच राहणार आहे. (अतिउत्साही , चढवून माहीती प्रसिध्द करणारे व नको तिथे इवेंट्स साजरे करणारे सरकार काय करेल हे सांगता येणार नाही)

फ़ायटर विमानातुन क्रुझ मिसाईल दागणेही हे करणारा कदाचित भारत हा एकमेव देश असेल. टॉमहॉक क्रुझ मिसाईल बी ५२ विमानावरुन लावुन सोडता येते. आर्थात पे लोड मधे फ़्रक असु शकेल.

<<असे बहुदा पहिल्यांदा घड्ले असेल जिथे इतर देश भारतीय क्षेपणास्त्राची क्षमता वाढवून सांगत आहे.>>
----- त्या देशाच्या डिफेन्ससाठी मोठा आर्थिक हिस्सा मिळण्यासाठी शत्रुच्या क्षमता फुगवुन सान्गायच्या... तरच हवे असलेले $$$ मिळणार.

उदय हे पाकिस्तान सारख्याच्या बाबतीत बरोबर ठरू शकते पण चीन, रशिया सारख्या देशांबद्दल नाही.
अग्नी ५-६ बद्दल रशियाने सुध्दा मत व्यक्त केले आहे.

सुखोई-३० एमकेआय आणि ब्रह्मोसचे हे काँबिनेशन समुद्रावरही अतिशय लाभदायक ठरणार आहे. सध्या विकसित होत असलेली याची आणखी छोटी - ब्रह्मोस-मिनी - ही आवृत्तीही भविष्यात लढाऊ विमानांशी संलग्न केली जाणार आहे

शत्रु नेहेमी सावध असतो, आणि त्याला बर्‍यापैकी आपल्या क्षमतेची जाण आहे. प्रसिद्ध झालेल्या माहितीपेक्षाही जास्त माहिती त्यान्च्याकडे असावी असा माझा अन्दाज आहे.

सहमत. विशेषतः रशिया, व चीन, इंग्लंड.

भारताला तसे मित्र कुणीच नाहीत. रशिया आता पाकबरोबर लष्करी सराव करत आहे, चीन तर आहेच. बांगला देश च्या वेळी इंग्लंड अमेरिका दोघांनीहि लढाऊ जहाजे पाठवलीच होती भारता विरुद्ध.

अमेरिकेतहि सरकारी खात्यांतल्या अनेक खात्यांना ही माहिती सर्वात आधी कळली असेल, पण सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक, काळ्या लोकांना पोलीसांनी मारणे, नि ब्रॅड पिट व अंजेलिना चा घटस्फोट यामुळे अजून connect the dots हे प्रकरण मागे पडले असावे. काही झाले तर काही वर्षांनी ट्रंपसारखा कुणितरी सांगेल मला माहितच होते.
Happy

रशिया पाकिस्तानशी संबंध वाढवत आहे. म्हणजे आता तो आपला मित्र राहिलेला नाही असा विचार सध्या आपल्याकडे व्यक्त होऊ लागला आहे. पण त्याबरोबर रशियाने असे करण्यास सुरुवात का केली याकडेही पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.