Submitted by भास्कराचार्य on 14 December, 2014 - 19:30
क्रिकेटवरील पहिले दोन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
हे दोन्ही धागे प्रतिसादांची मर्यादा ओलांडून गेल्यामुळे हा तिसरा धागा. क्रिकेटविषयक सर्व काही आता येथे बोलता येईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आफ्रिदीच्या वयावरचा जोक एका
आफ्रिदीच्या वयावरचा जोक एका कार्यक्रमात सलमानखानने त्याच्या तोंडावर मारला होता, यात लपवाछपवीचेही आता काही उरले नाही.
लहानपणी आमच्याईथे आफ्रिदीचे वय दर मॅचला चेक करत दरवर्षी तेच आहे याच्या लहानसहान पोरांमध्येही चर्चा रंगायच्या.
पण काही का असेना, जर एखादा खेळाडू वय लपवून अंडर नाईनटीन खेळत असेल तरच आणि तोपर्यंतच या चर्चेला, आरोपांना अर्थ आहे. सिनिअर गटात आला की काही का असेना वय. बाकी अंडर नाईनटीनमध्ये असे प्रकार सर्रास घडतात. यावेळीही युएईचा कोणीतरी खेळाडू २२-२३ वर्षांचा आहे, मी त्याच्याबरोबर खेललेलो असा आरोप भारतातील एका खेळाडूने केलेला. पण त्याचे पुढे काही झाले नाही वाटते.
नक्की काय? >> हेच कि
नक्की काय? >> हेच कि आफ्रिदीचे वय नटीच्या वयासारखे आहे
असामी
असामी
मैदानात त्याला हाणताहेतच, इथं
मैदानात त्याला हाणताहेतच, इथं वय लपवतो म्हणून हाणताय आणि आज मियांदादनेही हाणला आहे आफ्रिदीला, त्याच्या भारतप्रेमाच्या वक्तव्याबद्दल ! आतां १९ तारखेला धोनी आणि कंपनीने हाणला त्याला, तर आपलं खरं वय ६० असल्याचं सागून आत्तांच निवृत्ति घेईल तो !!
(No subject)
टी-२० विश्वचषकासाठी वेगळा
टी-२० विश्वचषकासाठी वेगळा धागा उघडला गेलाय. इथं कीं तिथं करायची विश्वचषक चर्चा, तें आत्तांच ठरवलेलं बरं.
भाऊ, क्रिकेटवर चर्चा करायला
भाऊ, क्रिकेटवर चर्चा करायला आपल्याला निमित्त लागतं, जागा कुठलीही चालते.
आता आयपीएल संपलीच आहे, तर
आता आयपीएल संपलीच आहे, तर कोणी इंग्लंड - श्रीलंका बघताय का? स्विंग बोलिंग बघायला मिळतेय परत!
आयपीएल संपले की नाही अजून?
आयपीएल संपले की नाही अजून?
<< आयपीएल संपले की नाही अजून?
<< आयपीएल संपले की नाही अजून? >>
भाचा - बघत नव्हतो, पण स्कोअर
भाचा - बघत नव्हतो, पण स्कोअर चेक केला काल. क्लिप्स बघतो आता चांगली बोलिंग असेल तर.
फा, क्लिप्स बघ. मी बघत होतो
फा, क्लिप्स बघ. मी बघत होतो मॅचेस मधून मधून. ब्रॉड माईट बी इन ट्रान्झिशन फ्रॉम "बोलर ऑफ ग्रेट स्पेल्स" टू "ए ग्रेट बोलर".
ईंग्लंड मायदेशात टेस्ट
ईंग्लंड मायदेशात टेस्ट खेळताना वेगळेच वाटतात. फक्त ऑस्ट्रेलिया त्यांना समर्थपणे तोंड देऊ शकेल असं वाटत रहातं.
भारताच्या नवोदित संघाची झिंबाब्वे मधे चांगली कामगिरी.
वेस्ट ईंडिज मधली ट्राय-सिरीज कुणी फॉलो करतय का? द. अफ्रिका हा एक मनस्ताप देणारा संघ आहे. परवा ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध हरले, ते बहून ९० च्या दशकातल्या भारताच्या मॅचेस ची आठवण झाली.
ईंग्लंड ८२/६ वरुन १८९/६. १३
ईंग्लंड ८२/६ वरुन १८९/६. १३ ओव्हर्स मधे ९७ रन्स हवेत जिंकायला.
विंडीज ३१/३ वरुन १७७/३ (३६ ओव्हर्स).
दोन्ही मॅचेस मस्त चालू आहेत.
धन्यवाद फेरफटका. इथे पाहून
धन्यवाद फेरफटका. इथे पाहून स्कोअर पाहायला गेलो. जबरी झालेली दिसते इंग्लंड-लंका मॅच.
मी पण इथे पाहूनच मॅच बघायला
मी पण इथे पाहूनच मॅच बघायला गेलो तर शेवटचा बॉल होणार होता. क्रिकइन्फोवर पण टैम लावला त्यांनी अपडेट करायला इतके एक्साइट झाले बहुतेक!
जबरी झाली ईंग्लंड - श्रीलंका
जबरी झाली ईंग्लंड - श्रीलंका मॅच.
आता विंडीज - ऑस्ट्रेलिया पण मस्त चाललीये. ऑसीज साठी डू ऑर डाय आहे.
जंबो कुंबळे, टीम ईंडिया चा
जंबो कुंबळे, टीम ईंडिया चा नविन कोच!! मस्त वाटलं वाचुन.
कालच्या भारत - झिंबाब्वे मॅच
कालच्या भारत - झिंबाब्वे मॅच चं वार्तांकन करताना, सकाळ (अमर रहे!) ने 'मराठमोळ्या केदार जाधवचे दमदार अर्धशतक' असा उल्लेख केल्याचं पाहून गंमत वाटली. धोनी खेळला असता तर काय 'भैय्या धोनी चे दमदार अर्धशतक' छापलं असतं का? मला चक दे ईंडिया मधला तो ओळख परेड चा सीन आठवला.
दुसरी एक अशीच जाणवलेली बाब म्हणजे 'प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर केदार जाधवने 42 चेंडूंत 58 धावांची जिगरबाज खेळी उभारली.' - केदार जाधव संघाबरोबर मधल्या फळीतला प्रमुख फलंदाज म्हणूनच गेला होता. तो बॉलर वगैरे असता तर ह्या वाक्याला काही अर्थ होता.
अहो झाले त्याचे कौतुक तर होऊ
अहो झाले त्याचे कौतुक तर होऊ द्या ना. नाहीतरी बंगाल. पंजाब इथले लोक करणार आहेत त्याचे असे कौतुक? शेवटी काय असते बघा - जगभरातल्या लोकांनी कौतुक केले, पण नंतर आपल्या आ़जूबाजूच्या लोकांनी कौतुक केले तर जरा जास्त बरे वाटते.
का तुमचा रोष फक्त सकाळ दैनिकावर आहे? तुम्ही त्यांना असे लिहून पाठवल नि त्यांनी ते छापले नाही, म्हणून?
'जम्बो' भारतीय संघाचा नविन
'जम्बो' भारतीय संघाचा नविन प्रशिक्षक ! परदेशी प्रशिक्षक नेमणं ही एक अंधश्रद्धाच बनत चालली होती. कुंबळे हें सिद्ध करून दाखवेल अशी आशा !
"बंगाल. पंजाब इथले लोक करणार
"बंगाल. पंजाब इथले लोक करणार आहेत त्याचे असे कौतुक?" - त्याच्या खेळीबद्दल क्रिकेट चे चाहते त्याचं कौतुक करतीलच, त्यात त्याचा मराठी असण्याशी किंवा बाकीचे पंजाबी, बंगाली असण्याशी संबंध नाही.
"का तुमचा रोष फक्त सकाळ दैनिकावर आहे?" - सकाळ चा ढासळणारा दर्जा रोषाचं नाही, पण खंत करण्याचं कारण नक्कीच आहे.
भाऊ, कुंबळेकडून खरच खूप आशा
भाऊ, कुंबळेकडून खरच खूप आशा आहेत. त्याच्या प्लेयिंग डेज मधे जसं समोरची जोडी फुटत नसली की कुंबळे येऊन काहीतरी घडवेल अशी आशा वाटायची, तशीच त्याच्या ह्या ईनिंगबद्दल सुद्धा उत्सुकता आणी अपेक्षा आहेत. भारताची टेस्ट मधली गोलंदाजी बळकट करण्याच्या दृष्टीनं त्याचं मार्गदर्शन महत्वाचं ठरेल ही सदिच्छा.
भाऊ, कुंबळेकडून खरच खूप आशा
भाऊ, कुंबळेकडून खरच खूप आशा आहेत.>> +१ पण त्याच बरोबर मला असेही वाटते कि भारताचा संघ जेंव्हा प्रशिक्षक हा gifted खेळाडू नसेल तर अधिक चांगली कामगिरी करतो नि दुर्दैवाने कुंबळे हा तसा खेळाडू होता.
मला समहाऊ हा गॅम्बल वाटतोय.
मला समहाऊ हा गॅम्बल वाटतोय. कुंबळे पेक्षा द्रविड हवा होता. पण कुंबळेला शुभेच्छा.
केदार, द्रविड ने अॅप्लाय
केदार, द्रविड ने अॅप्लाय नव्हतं केलं ह्या पदासाठी.
कुंबळे (९५३ आंतरराष्ट्रीय विकेट्स), हा एक भारताचा अंडर-रेटेड खेळाडू होता असं मला वाटतं. भारतातर्फे सर्वाधिक विकेट्स मिळवणार्या ह्या बॉलरविषयी सहसा बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, कपिलदेव (अॅज अ बॉलर) विषयी जितकं कौतुकानं, आदरानं वगैरे लिहीलं / बोललं जातं, तितकं कौतुकानं नाही लिहीलं/बोललं जात.
करियर च्या सुरुवातीच्या काळातलं उपखंडाबाहेरचं अपयश त्याने कारकीर्दीच्या उत्तरार्धात, ऑस्ट्रेलिया (२००३, २००८) आणी वेस्ट ईंडिज (२००५-०६) मधे धुवून काढलं होतं.
हो अप्लाय केलं नव्हतं ते
हो अप्लाय केलं नव्हतं ते माहिती आहे. पण समहाऊ कुंबळे म्हणल्यावर जरा आश्चर्य वाटलं होतं. तो विटी अन जबरी खेळाडु आहे. तो मला खूप आवडतो. पण कोच म्हणून चांगला असेलच ह्यावर विश्वास नाही म्हणून लिहिले. (अर्थात हे लिमिटेड ज्ञानावर आधारलेले मत आहे, त्यामुळे कुचकामी आहे. )
पण कोच म्हणून चांगला असेलच
पण कोच म्हणून चांगला असेलच ह्यावर विश्वास नाही म्हणून लिहिले. >> माझ्या माहितीप्रमाणे कुंबळे ने अजून कोचिंग चे काम केलेले नाहि. तो MI नि RCB चा mentor होता. त्याची एक अॅकॅडमी होती (/आहे) तो Administrative fields मधे बर्यापैकी active होता. भारतीय कोच ला निवाळ खेळाडूंचा technical नि खेळाचा strategic भाग न बघता बाकी बर्याच भाकर्या भाजाव्या लागतात त्यामूळे egoistic किंवा naturally प्रतिभावान खेळाडू कोच म्हणून यशस्वी होत नसून ह्याउलट तुलनात्मक कमी प्रतिभेचे पण मेहनतीच्या जोरावर यशस्वी झालेले खेळाडू कोच म्हणून अधिक जमतात. (ह्याचा अर्थ gifted खेळाडू मेहनत करत नाहित असे नाही.)
माझ्या माहितीप्रमाणे कुंबळे
माझ्या माहितीप्रमाणे कुंबळे ने अजून कोचिंग चे काम केलेले नाहि >> तेच तर म्हणतोय. कुंबळेने अजून कोचच्या रोल मध्ये एकदाही काम केलेले नाही. अन डायरेक्ट इंटरनॅशनल टीमचा हेड कोच. त्यामुळे लिहिले की कोच म्हणून चांगला असेलच ह्याची अजून खात्री नाही. वेळच सांगेन.
" वेळच सांगेन." - सहमत.
" वेळच सांगेन." - सहमत. म्हणुनच त्याच्याशी एक वर्षाचाच करार केलाय.
Pages