सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३० व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
चैत्रपालवीचा बहर ओसरु लागलाय, झाडाला फुटलेल पानांच कोवळ जावळ वैशाख उन्हाचा तडाका झेलुन एव्हाना तरुण दिसु लागलय. बाहेर उन रटरटतय, दुष्काळाच्या झळा परमोच्च बिंदूवर पोहचल्यात. शुष्क गळा पाण्याची ओल शोधतोय आणी मन सावली, आतुन जाणीव होतेय तो येईल आणी यायलाच हवा. निसर्ग कठोर आहे पण दयाळूही तेवढाच तो आपल्या लेकरांना अस तडफडत ठेवणार नाही. नजरेखालून हवामानखात्याचे अंदाज जाऊ लागतात तो अंदमानात कधी पोहचेल मग केरळ किनारपट्टी नंतर आपला नंबर येईल, हे दिवस त्याचे सरासरीचे अंदाज पाहीले जाण्याचे.
तो येण्याआधी आगोटची तयारी करण्याचे हे दिवस, आबुदाना, आशियाना शोधणार्या पक्ष्यांची लगबग, आगोठाची तयारी करणार्या मुंग्याच्या रांगा दिसू लागतील. आकाशातील ढग दरडवताहेत. पापड,फेण्या,कुरडया,सांडगे,लोणची बनवण्याचा हंगाम संपत आलाय. आंबे, फणस, करवंद खाऊन घ्या तो येतोय.
अभ्यासाचे टेंशन नसल्याने खर बालपण चिमण्या चेहर्यांवर झळकतय पण सोबत नव्याकोर्या पुस्तकांचा , दप्तर घेण्याचा हंगाम आलाय.
आकाशातील मोती झेलुन जमिनीतुन मोती पिकवण्यासाठी तिच्या मशागतीचा हंगाम आलाय. गावाकडे शेतात भाजावळी सुरु होतील. भाजणी झालेली शेत काळी दिसू लागतील. भाजलेल्या मातीचा खरपुस वास आसमंत दरवळून टाकेल. अचानक एका पहाटे साखर झोपेत हवेत गारवा जाणवू लागेल, घराच्या छपरावर तो जादुई टपटप आवाज आसमानीचा संगीतकार राग मेघमल्हार आलापत धरतीवर अवतरल्याची वर्दी देइल.
तो वैशाख वणव्यात तापलेल्या धरतीवर आपल्या ओंजळीचे दान टाकेल मग मातीचा सुगंधही आसमानीचा किमयागार आपल्या जलधारा घेऊन वसुंधरेला साज चढवायला आल्याची वर्दी देईल.
पहाटे पहाटे ढवळ्या पवळ्यांना तयार करुन नांगर घेऊन बळीराजा शेताकडे जाईल.धरणीला अन फाळाला हाथ जोडुन साथ देण्याची विनवणी होईल.
भाजणी झालेल्या शेतात जेव्हा नांगर चालेल त्या स्रुजनतेच्या तयारीच्या तोडीचे सुंदर द्रुष्य नसेल.
क्रुष्णमेघ दाटून येतील वार्याची एक थंड झुळुक आणी पाठोपाठ आलेल्या जलधारा धरतीला न्हाऊ घालतील
तोवर निसर्गमय झालेल्या मनाला प्रश्न पडेल, नांगरलेल्या शेतातली ढेकळ जास्त मुलायम की त्या ढेकळांवर जेष्ठाच्या आगमानाची वर्दी देणारे म्रुगाचे लाल चुटुक रेशमी किडे ?
भुरभुरणार्या पावसात लुकलुकणारे काजवे पहाण्यात मन हरपून जाण्याचा ऋतु येतोय.
मग उगा मनाला प्रश्न पडेल, आकाशात चमचमणार्या चांदण्या सुंदर की आता भुतली अवरलेल्या काजव्यांच्या दिपमाळा सुंदर?
उत्तर काहीही असो शेवटी सर्व निसर्गाचीच किमया.
शहरांमध्ये याच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु होईल. छत्र्या रेनकोट पावसाळी चपलांच्या खरेदीचे दिवस, चिखलाला नाकं मुरडली तरी येणारा पाऊस जीवनदायी आहे मनाला याची पुरेपूर जाणीव असतेच.
तासंतास खिडकीत उभ राहून फक्त याच भुरभुरण,रिपरिपण,जोरदार बरसण अनुभवण्याचा ऋतु येतोय.
दोनचार सरी बरसल्यावर धुळभरला आसमंत स्वच्छ होईल क्षितीजरेषा सुस्पष्ट दिसु लागतील.
झाडांचे पाननपान हिरवेगार दिसू लागेल.जमिनीतून त्रुणांकुर फुटुलागतील.
नद्या, नाले ,आटलेले झरे पुन्हा पाझरु लागतील.निसर्गाची कुस पालटण्याचा ऋतु येतोय.
कागदी होड्या बनवून येरे येरे पावसाचे बोबडे बोल एैकण्याचा
ए आई मला पावसात जाऊदे हा हट्ट पुरवण्याचा निरागस ऋतु येतोय.
पाणी भरल्या रस्त्यातून न भिजता ऑफीसात पोहण्याचा
उलट्या झालेल्या छत्र्या सरळ करण्याची तारांबळ उडुन मजा बघण्याचा ऋतु येतोय.
शेतकर्यांच्या डोळ्यात आशेचे किरण आणणारा त्यांचा दुष्काळलेला संसार पुन्हा उभा करण्याची जिद्द देणारा,
नवचैतन्याची चाहुल देणारा जीवनदायी ऋतु येतोय.
त्याच्या स्वागताची तयारी करा.
वरील प्रस्तावना नि.ग. कर इनमिनतिन यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203
आहा.. श्रावणी पासून नको गा
आहा.. श्रावणी पासून नको गा लपवून ठेवूस कॅमेरा.. जमलं तर फोटोग्राफी च्या क्लास लाच घाल कशी तिला..
किती सुर्रेख काढलाय तिने फोटो.. अ बिग हग फॉर हर!!!
दगडी कुंडीतलं फूल मस्तंये..
दगडी कुंडीतलं फूल मस्तंये.. कुंडी पण भारी दिस्तीये.. एथनिक
हे कसलं प्लांट/ बुश्आहे??
हे कसलं प्लांट/
हे कसलं प्लांट/ बुश्आहे??>>Persian Shield Plant
श्रावणी पासून नको गा लपवून ठेवूस कॅमेरा.. जमलं तर फोटोग्राफी च्या क्लास लाच घाल कशी तिला..
किती सुर्रेख काढलाय तिने फोटो.. अ बिग हग फॉर हर!!!>> अनुमोदन!
नलिनी..थांकु गा.. किती पटकन
नलिनी..थांकु गा.. किती पटकन सांगितलेस..
वर्षूताई, नलिनी ती मला फोटो
वर्षूताई, नलिनी ती मला फोटो काढून देत नाही म्हणून लपवते स्वतःकडेच घेते आणि मी काढते मी काढते करते.
रविवारी नविन मेंबर्स आणले
वा जागू ! मस्त फुले .
वा जागू ! मस्त फुले .
वर्षू. | 17 June, 2016 -
वर्षू. | 17 June, 2016 - 06:02 नवीन >>>>>>.तुला झब्बू देऊ का?
शोभा हाहाहा, मनाली ना
शोभा हाहाहा, मनाली ना
सध्या जो पारसिक टनेल गाजतोय
सध्या जो पारसिक टनेल गाजतोय ना, त्यावर पुर्वी खुप सुंदर टेकडी होती. ती पूर्ण टेकडीच अभिनेत्री नूतनच्या
मालकीची होती, असे सांगत असत. तिथे तिचा एका त्या काळातल्या कल्पनेनुसार एक सुंदर बंगला होता..
बाकि काहीच नव्हते. तिथे जायचा रस्ताही खाजगी होता म्हणे... पण ती फारशी तिथे कधी राहिलीच नाही.
जागू,लेकीने सुरेख फोटो
जागू,लेकीने सुरेख फोटो काढलाय.
पर्दे के पिछे मस्तच्,अनिल.
शोभा, सुरेखच.
सर्वच फोटो भारी एकेक. पारसिक
सर्वच फोटो भारी एकेक.
पारसिक बोगदा जिव्हाळ्याचा आमच्या, त्याच्या पोटातून गेल्याशिवाय आमच्या पोटापाण्याची सोय होत नाही. अर्थात स्लो ट्रेन त्यातून नाही जात म्हणा. नवरा सध्या स्लो ट्रेनने जातो.
दिनेशदा नूतनचा बंगला हे आकर्षण होते गाडीतून लहानपणी जाताना, बाबा दाखवायचे.
जागूचा फोटो Scadoxus
जागूचा फोटो Scadoxus multiflorus चा आहे. आम्ही त्याला लहानपणी मेफ्लॉवर म्हणत असू.
व्वा! श्रावणी फोटो चांगले
व्वा! श्रावणी फोटो चांगले काढणारच!
सगळ्यांचेच फोटो छान आणि गप्पा माहितीपूर्ण!
काल २१ जून सर्वात मोठा दिवस वर्षातला. इथे ५.४५ ला सूर्योदय आणि ८.३८ ला सूर्यास्त.
त्या आधी अति थंडरस्टॉर्म्स आणि धोधो पाऊस झाला.
तेव्हाचे काही फोटो....तेव्हा पाऊस पडून गेलेला. आणि सूर्यास्त होतोय....
पाऊस पडून गेल्यावर खिडकीच्या कांचांवर झगमगत्या चमकदार मण्यांचा पड्दा तयार झाला.
बुडाला अखेरीस.
वॉव, मस्त फोटो मानुषीताई.
वॉव, मस्त फोटो मानुषीताई.
थॅन्क्स अन्जू. कशी आहेस?
थॅन्क्स अन्जू. कशी आहेस?
मजेत मानुषीताई. पावसाची वाट
मजेत मानुषीताई. पावसाची वाट बघतेय. इथे थोडासाच झाला काल, मुंबईला पडला. मग नाहीच.
हो गं... आपल्याकडे सगळीकडे
हो गं... आपल्याकडे सगळीकडे पावसाची वाट पहाण चालू आहे.
वाह मानुषी.. एक से बढकर एक
वाह मानुषी.. एक से बढकर एक फोटोज.. मण्यांचा पडदा,खूपच सुबक
मानुषीताई मस्त फोटो. कसली
मानुषीताई मस्त फोटो.
कसली चिडलेय पहा.
मानुषीताई मस्त फोटो. कसली
मानुषीताई मस्त फोटो.
कसली चिडलेय पहा.
सतत फोटो काढल्या वर
सतत फोटो काढल्या वर चिडणारच... थोडी प्राव्हसी द्या त्यांना
त्या टेकडीच्या अर्ध्या भागात
त्या टेकडीच्या अर्ध्या भागात सिंग म्हणून एका वृद्ध गृहस्थांचे निसर्गोपचार केंद्र होते. तिथे आम्ही शुद्धिक्रिया करायला जायचो. त्यानंतर उकडलेल्या मुगात खजूर घातलेला नाश्ता असायचा... आणि गवती चहा...
नंतर आम्ही नूतनच्या बंगल्याभोवती फेरी मारायचो.. आतल सगळ फर्निचर पांढर्या कपड्याने झाकलेल आहे एवढंच काचेतून दिसायचं... ही 89 ते 94 पर्यंतची गोष्ट
नंतर एकदा 4/5 वर्षापूर्वी माझ्या व्यवसायामुळे तिचा मुलगा मोहनीश माझ्याकडे त्या प्लाॅटच्या मोजणी बाबत आला होता..
पण आता मात्र ते निसर्गोपचार केंद्र सिंग यांच्या निधनानंतर बंद आहे...
निरू भारीच. त्यांना कोण यायला
निरू भारीच.
त्यांना कोण यायला सांगत आमच्या कंपाउंडवर. प्रायव्हसी पाहीजे तर झाडात बसायच गुपचुप
जंगली कृष्णकमळ आपल्या गार्डन
जंगली कृष्णकमळ
आपल्या गार्डन व्हरायटीच्या कृ.क. पेक्षा लहान असत.
हे त्याच फळ आणि पानं.
जागु.. कसलं सुंदर आहे कृ.क.
जागु.. कसलं सुंदर आहे कृ.क. .. चक्कं पांढरं..पहिल्यांदाच बघितलं..
हाहाहा..चिडका पक्षी...
हुश्श!! १५० पोस्टी... सगळा
हुश्श!! १५० पोस्टी... सगळा ब्याक लॉक भरुन काढला...
सगळ्या गप्पा, प्र.ची एकदम रीफ्रेशींग.....
सायली जास्वंद आहाहा क्युट
सायली जास्वंद आहाहा क्युट कलर.
आधीचे सर्व फोटो पण छान जागू.
नीरु मस्तच.
कान्हाला दिसलेला वाघ...
कान्हाला दिसलेला वाघ...
वा, मस्त फोटु, भारी गप्पा,
वा, मस्त फोटु, भारी गप्पा, सुरेख माहितीही ....
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/59137 - सह्याद्री देवराई....एक अनुभूती - हा लेख जरुर वाचणे....
Pages