Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04
युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा
या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साधारण ५-६ दिवस पुरेल एवढ्याच
साधारण ५-६ दिवस पुरेल एवढ्याच जवसाची एकावेळी पुड करावी. जास्तीची करू नये.
काकवीत कच्ची कैरी जराशी
काकवीत कच्ची कैरी जराशी वाफाळून मिक्स करा. आणि मग त्या मिश्रणाला एक उकळी आणा. त्यात वेलदोडा पूड केशर असलं काही अॅड करू शकता. गुळांबा तयार.
बाजारात कैर्या असतील बहुतेक.
गजानन ......काकवी चपाती ला + १००. या काकवीत १ चमचा घरचं पातळ लोण्कढं तूप ही घातलं तर अगदीच अहाहा!
मी गुळाएवजी काकवी, ताजं
मी गुळाएवजी काकवी, ताजं कढवलेलं तूप आणि गरम फुललेली. चपाती रोल असं खायची.( म्हणजे आजीच द्यायची)
हाय! गेले ते दिवस.
बर्याच सलग प्रयत्नांती
बर्याच सलग प्रयत्नांती चांगल्या भाकरी जमू लागल्या आहेत. पण भाकरी करताना फार पीठ लागतं थापायला. भाकरी करून झाल्यावर त्या पीठाचं काय करतात ? की शेवटची भाकरी करताना पीठ उरणार नाही याची काही युक्ती आहे?
पीठ थोडे घट्ट भिजवा म्हनजे
पीठ थोडे घट्ट भिजवा म्हनजे वरून जास्त पीठ थापायला लागणार नाही. तसही भाकरीला पोळी-फुलक्यांपेक्षा जास्त लागत थापायला. पाणी फिरवताना १/२ चमच्याएवढे पीठ उरले असेल तर ते भाकरीवर टाकून मग पाणी फिरवू शकता.
रावी, त्या उरलेल्या पिठात
रावी, त्या उरलेल्या पिठात तिखट मीठ मसाला व कोथिंबीर चुरडून टाकून पाणी टाकून सारखे करून घ्यायचे व तव्यावर तेल टाकून धिरडे करायचे. आमची सांगलीची पद्धत. ( पोळीच्या पिठी साठी) बारकी मागून मागून खातात.
रावी, गावाकडे भाजीला परतताना
रावी, गावाकडे भाजीला परतताना (पालेभाजी / फळभाजी) बेसन न लावता अनेकदा भाकरीचे पीठच लावतात. चांगली मिळून येते भाजी. हे पीठ त्यासाठी वापरता येईल.
उरलेले भाकरीचे पीठ परत डब्यात
उरलेले भाकरीचे पीठ परत डब्यात ठेवू शकता. अगदी मळलेल्या पिठाचा उंडाही पुढच्या वेळेसाठी (शक्यतो सकाळचा संध्याकाळी अथवा संध्याकाळचा उद्या सकाळसाठी) पुन्हा पिठाच्या डब्यात ठेवू शकता.
थोडेसे असेल तर पातळ कालवणात घातले तर कालवण मिळून येते.
अरे व्वा! मस्त माहिती मिळाली.
अरे व्वा! मस्त माहिती मिळाली. जमेल तसं सर्वच करून बघेन नक्की.
भरपूर जवस पावडर आहे, ५-६
भरपूर जवस पावडर आहे, ५-६ दिवसात संपणार नाही. खराब होते का पावडर?
दररोज एक चमचा पावडर, पाण्यात घालून घ्यायला सुरुवात केली आहे.
आत्ता या जास्तीच्या पावडरची चटणी करावी काय मग? अथवा आणखी कशात घालू?
भाजलेली जवसपूड + तिखट + मीठ
भाजलेली जवसपूड + तिखट + मीठ अशी मस्त चटणी होते व दोन आठवडे तरी किमान (पुण्यासारख्या ठिकाणी) फ्रीजबाहेर हवाबंद डब्यात आरामात टिकते. रोज नाश्त्याला किंवा जेवणात दोन तीन चमचे जवस चटणी खाता येते. त्यात आवड व पथ्यानुसार कच्चे तेल / तूप घालून खाता येते. भाकरी + तूप + जवस चटणी असा नाश्ता किंवा जेवण एकदम पोटभरीचे होते.
धन्यवाद
धन्यवाद
रंगासेठ जवस पावडर नीट ठेवली
रंगासेठ
जवस पावडर नीट ठेवली तर चांगली टिकते. भारतातल्या हवेला फ्रीजमधे नक्कीच.
मी बनाना लोफ आणि चॉकोलेट चिप्स कुकीजमधे हमखास जवस पावडर वापरते.
असं वाचलंय की बेकरीप्रॉद्डक्ट्समधे अंड्याऐवजी जवस पावडर भिजवून वापरली तर ..... सबस्टिट्यूट टु अंडा.
अमा.....सांगलीकडच्या रेस्पीला अगदी अगदी आणि बारकी मागून खातात .....यातल्या "बारकी" ....अगदी सांगलीकडचा शब्द!
जवसाची पूड पाण्यात भिजवून
जवसाची पूड पाण्यात भिजवून घोटली तर चिकट होते आणि ती अंड्याप्रमाणे बाईंडीगचे काम करते. अर्थात आरोग्यपूर्ण तर ती आहेच.
हो दिनेश मी अशीच वापरते
हो दिनेश मी अशीच वापरते बेकिन्ग मधे जवस पावडर.
जवसाची एक गम्मत आहे. ते पावडर
जवसाची एक गम्मत आहे. ते पावडर स्वरूपात वापरले तर पचायला सोपे जाते आणि त्याचे फायदे अधिक प्रमाणात मिळतात.
परंतू ही पावडर थंड तापमानाला आणि प्रकाशापासून दुर, हवाबंद ठेवायाला हवी असते. अगदी सगळी काळ्जी घेऊन साठवलेली पावडर चार आठवडे वापरण्यासाठी योग्य असते. जवसाची पावडर केली की तिचे लगेच ऑक्सीडायझेशन व्हायला सुरवात होते म्हणून एकावेळी ४-६ दिवस पुरेल एवढीच पावडर करायची.
हं...नलिनी ...अगदी शास्त्रीय
हं...नलिनी ...अगदी शास्त्रीय विवेचन केलंस. इथे जवस पावडर मिळते. आणि अर्धा किलोचा पॅक संपायला तू म्हणतेस तसा
४/५ पेक्षा खूपच जास्त कालावधी लागतो. त्या पॅकेटवर एक्सपायरी डेट आहे का तेही बघीन आता एकदा.
आणि भारतात जवस भाजून जी चटणी आपण करतो तीही ४/६ दिवस पुरेल एवढी च करावी नाही का?
नाही तर फ्रीजमधे ठेवणे हा योग्य उपाय होईल का? एस्पेश्यली भारतात?
मानुषी, चटणी सुद्धा थोड्याच
मानुषी, चटणी सुद्धा थोड्याच प्रमाणात करावी आणि फ्रिजमध्ये ठेवावी. जवसाची पावडर विकत घेत असाल तर ती रेफ्रिजरेटर सेक्शनमध्ये मिळत असेल तरच घ्या.
नारळाच्या वड्या फसल्यात. चव
नारळाच्या वड्या फसल्यात.
चव बेस्ट आली आहे पण वड्या पडल्या नाहित, मिश्रण मऊसर राहिले बहुतेक.
तरी बरं दोन पैकी एकच नारळ वापरला, नाहितर दोन्हीच्या वड्या फसल्या असत्या. ज्या नारळाच्या वड्या केल्यात त्याला थोडा खवट वास पण येत होता.
काय करू त्या मिश्रणाचं? वड्या पडतील का परत थोडं परतून घेतलं तर?
अजुन एका नारळाचा चव शिल्लक आहे, तेव्हा काय खबरदारी घेऊ? क्रमवार सांगा.
वड्या पडतिल आणखी परतल तर फक्त
वड्या पडतिल आणखी परतल तर फक्त रन्ग थोडा ब्राउन होइल, किवा बारिक रवा थोडा भाजुन घातला तर हमखास वडि पडेल पण थोडी गोडी कमी होइल.
नारळाच्या वड्या कमी आचेवर कराव्या म्हणजे क्रुती करायला वाव मिळतो , साखर जळुन रन्ग बदलत नाही ,थोडि मिलक पावडर/दुध मसाला घातला तर फर्मास चव आणि पोत येतो. गोळा कढइत साधारण जमायला लागला की लगेच वड्या पाडाव्या.
पिठीसाखर घालून परत अगदी थोडं
पिठीसाखर घालून परत अगदी थोडं गरम कर आणि घोटत राहून साधारण गार झालं कि वड्या थाप. पूर्ण गार झालं कि वड्या काप. नक्की होतील .
डिसिकेटेड नारळात घोळवून लाडू कर त्याचे .मऊसर मस्त लागतील.
तशाच काही न करता फ्रिज मध्ये ठेव आणि तसाच मऊ गोळा खाऊन टाका कंटाळा आला असेल सुधरवायचा तर.
सध्या मी जमतील तशा वड्या
सध्या मी जमतील तशा वड्या पाडून डब्यात घालून फ्रिजर मध्ये ठेवल्यात. आता काढून पाहते कशा झाल्यात ते. मला वेलदोडा आवडत नसल्याने थोडा खवट वास होता तो येतो आहे.
घरात दूध मसाला होता पण तो घातला तर चालेल हे नव्हतं माहिती. पण मी मिल्क पावडर घातली, जर गुठळ्या झाल्या, पण मी शक्य तितक्या मोडल्या. वड्याचं मिश्रण मी अगदी बारिक गॅसवरच परतलं होतं, फक्त जरा अलिकडेच काढल्यामुळे वड्या पडल्या नाहित बहुतेक.
आता पुढचा लॉट करीन तेव्हा हे सगळं लक्षात ठेविन. थँक्स टू ऑल.
घरात ब्रेड क्रंब्ज् चं मोठं
घरात ब्रेड क्रंब्ज् चं मोठं पॅकेट उरलयं...काय करता येईल?
इथे कडक उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे कटलेट, रोल्स असलं काही तळण्याचं जीवावर येतं...
पुडिन्ग मधे ब्रेड एवजी क्रम्ब
पुडिन्ग मधे ब्रेड एवजी क्रम्ब चालतिल बहुधा!
आम्ही D-Mart अथवा अन्य
आम्ही D-Mart अथवा अन्य दुकानातून पॅक्ड डाळी/मसाले, रवा, मैदा आणतो. उदा. 'टाटा संपन्न मूग डाळ'.
अशा पाकिटांवर एक्सपायरी डेट असते. हे घटक एक्सपायरी डेट नंतर वापरले जाऊ शकतात का? कितपत सुरक्षित आहे?
कारण लहानपणी सूट्ट्या डाळी, मैदा, रवा भरपूर प्रमाणात आणल्या जायचा पण त्यांची कधी एक्सपायरी झालेली ऐकली नाही. या अशा एक्सपायरी डेट्स मुळे आम्ही काहि पाकिटे न वापरता टाकून दिली आहेत.
तज्ञ लोक नक्की माहिती
तज्ञ लोक नक्की माहिती सांगतील पण बहुतेक तरी अशी एक्सपायरी डेट नसते. इकडचे (उसगावातले) बघून सगळ्यांच गोष्टींमध्ये एक्सपायरी डेट टाकायला लागलेत की काय ? इथे तर आता अशा एक्सपायरी डेट / युज बाय डेट च्या विरोधात वातावरण होते आहे. कारण त्या नंतरही बरेच दिवस गोष्टी चांगल्या राहतात. फक्त फ्रेश वास येत नाही कधी कधी. अगदी भाज्या सॅलड्स (नुसती पानं) ही २ ३ दिवस अधिक टिकतात त्या डेट्स नंतरही.
डाळींच्या expiry date कडे मी
डाळींच्या expiry date कडे मी चक्क कानाडोळा करते
आणि बाकी मैदा, रवा , वेग्वेगळी पिठं हे बघून कळतंच चांगलं आहे की नाही. आपल्या judgement नुसार मी ते वापरते, डेट होऊन गेली असली तरी
बाकी processed food म्हणजे नूडल्स वगैरेसाठी मात्र expiry date चं restriction follow करायचं
मी मागे एकदा एका आर्टिकलमध्ये
मी मागे एकदा एका आर्टिकलमध्ये वाचलं होतं ( किंवा टिव्हीवर बघितलं होतं आता आठवत नाही) की अंडी, दूध, चीझ, मीट अशा नाशवंत (?) पदार्थांच्या बाबतीत एक्सपायरी डेट काटेकोरपणे पाळावी आणि इतर बाबतीत कॉमन सेन्स/ अनुभवावरून ठरवावं. बरेच पदार्थ एक्सपायरी डेटनंतर आठेक दिवस सुद्धा चांगले असतात. डाळी/कडधान्ये जास्तच टिकत असतील.
डाळीच्या पाकीटावर एक्सपायरी डेट घालणे ही एक खप वाढवण्याची युक्ती असु शकेल किंवा आजकाल जे जास्तीचं प्रोसेसिंग करतात त्यामुळे पण एक्सपायरी डेट घालण्याची गरज पडत असेल. कल्पना नाही.
सिंडे +१ पण टाटा आयशक्ती तर
सिंडे +१
पण टाटा आयशक्ती तर म्हणतात की ते अन्प्रोसेस्ड आहेत.
इथली जवसाची चर्चा वाचून
इथली जवसाची चर्चा वाचून आठवलं, घरी ३००-४०० ग्रॅम जवस आहेत. त्याचं काय करता येईल?
मागे कशासाठीतरी आणले होते पण हाच छोटा पॅक मिळाला.
Pages