अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग ३

Submitted by मिर्ची on 26 November, 2015 - 10:51

२६ नोव्हेंबर २०१२ ला स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाचा आज तिसरा वाढदिवस. विश्वास उडावा आणि 'मरो ते राजकारण,सगळे एकाच माळेचे मणी' असं वाटण्यासारखं अजून तरी अरविंद केजरीवालांनी काही केलेलं नाही.
लगे रहो, लडाई लंबी है ! शुभेच्छा. Happy

अके आणि आप - भाग १
अके आणि आप - भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजपाची पेडआर्मी यापेक्षा अजून काय जास्त करणार Wink
त्यांचा वेडा आमदार विधानसभेत सीटवर उभा राहून मुर्खपणाची सीमा गाठली शेवटी उचलून बाहेर फेकले

दिल्ली विधानसभेत नौटंकीवाल पार्टीने पारित केलेले 'विधिमंडळ सचिव विधेयक' राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नामंजूर केले आहे. हे विधेयक जरी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नामंजूर केले असले तरी नौटंकीवाल यांनी नेहमी प्रमाणे याचे खापर मोदीसरकारवर फोडले आहे.

राष्ट्रपतींचा निर्णय केंद्रसरकारच्या टिप्पण्णीवर आधारित होता इति सरकारी बातम्या

उडले पडतील = उघडे पडतील
का म्हणे, भाजपा कसे काय उघडे पडतील ? गेल्या कित्त्येक दशकांपासुन राज्य होऊ नये म्हणून त्यांनी रोखले आहे का ? Uhoh

महेश,

हे आपटार्ड त्या केजरीवाल प्रमाणेच असंबध बडबड करत आसतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

बर्याच दिवसानी हे सदर वाचत आहे म्हणून उशीर. घायल यानी केजरीवाल हे आयएएस व आयपीस असल्याचा शोध लावला आहे. केजरीवाल हे एक IRS म्हणजे Indian Revenue Service चे अधिकारी आहेत. IRS ही आयएएस व आयपीस यान्च्या तोडीची नाही. त्यान्ची पहिली पदवी IIT मधुन mechanical engineering ची आहे. केजरीवालान्ची स्तुती करताना उगीच त्यान्च्याविशयी काहीच्या बाही व असत्य लिहू नये. ही विनन्ति.

दिगोची, माझा fb मित्र आहे. मोदींचा चाहता आहे. तो बरेच फोटोशौप मेसेज डकवत आसतो. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे केजारीवाल IRS चे अधिकारी आहेत. IRS ला JEE परीक्षा असते का हो. माझ्या त्या मित्राने केजरीवालनी JEE ची परीक्क्षाच दिलेली नाही म्हणून थयथयाट केलेला. मी खरोखरच jee बद्दल अनभिज्ञ आहे.

Kejriwal did crack IITJEE
http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/Kejriwal-did-crack-IITJE...

आईआईटी खड़गपुर के अंडरग्रैजुएट और ऐडमिशन के डीन राजेंद्र सिंह ने बताया कि केजरीवाल काफी तेज-तर्रार स्टूडेंट थे।
http://navbharattimes.indiatimes.com/state/other-states/kolkata/iit-khar...

सौरभ , हे चार पानं आधी दिलं असतंत तर त्या सत्यकामना जरा बरं वाटलं असतं; भाजप मीडिया सेलने त्यांना पुरवलेल्या मसाल्यावर पाणी ओतलं गेल्याचं पाहून....

एक सामान्य माणुस प्रतिथयश पक्षांना फाट्यावर मारुन दिल्लि जिंकतो. स्वताचा पक्ष काढतो, निगरगट्ट पक्षांना लढत देतो हे पाहुन इथल्या सामान्य माणसांना त्याचे कौतुक वाटले पाहिजे. पण ईथे तर गंगा उलटी वाहतेय. भांडवलदारांच्या जिवावर गडगंज झालेल्या, धर्माधर्मात लढाया लावणार्या पक्षांवरच लोक फिदा दिसतात.

>>एक सामान्य माणुस प्रतिथयश पक्षांना फाट्यावर मारुन दिल्लि जिंकतो. स्वताचा पक्ष काढतो, निगरगट्ट पक्षांना लढत देतो हे पाहुन इथल्या सामान्य माणसांना त्याचे कौतुक वाटले पाहिजे.

अज्जिबात नाही. अनेक कारणे आहेत. मिर्ची यांच्या धाग्यांवर बरीच उगाळून झाली आहेत.

सूनटून्याजी, मी पण त्याबद्दल अनभिज्ञच आहे. केजरिवलान्च्या सध्याच्या म्हणजे पार्लमेन्टरि सेक्रेटरी प्रश्नाबद्दल बोलायचे तर जरी राष्ट्रपतींचा निर्णय केंद्रसरकारच्या टिप्पण्णीवर आधारित होता तरी राष्ट्रपतींनी कायदेतज्ञाकडुन त्यावर सल्ला मागवला असेलच कारण तसा प्रघात आहे. शिवाय राष्ट्रपती कॉन्ग्रेसचे माननीय नेते होते ते फक्त नायब राज्यपाल व मोदीसरकार सान्गते म्हणुन दबावाखाली नक्कीच निर्णय देणार नाहीत. तसेच सध्याच्या राष्ट्रपतीची दुसरी टर्म या तीनेक वर्षात सम्पेल म्हणजे मोदी त्याना बडतर्फ करतील असे पण नाही. शिवाय राष्ट्रपतीना बडतर्फ करायला मोदीसरकारला राज्य व लोकसभा मधल्या आमदार खासदारापैकी पन्चाहत्तर टक्के मते लागतील आणि एव्हढी मते त्यान्चे कडे नाहीत. त्यामुळे मोदीसरकार राष्ट्रपतीवर पास करा नाहीतर तुम्हाला बडतर्फ करु अशी धमकी देऊ शकत नाही. मला वाटते हे कोणाला माहित नसेल म्हणुन केजरीवालान्च्या बाजुने जोरानेआरडाओरडा चालला आहे असे दिसते.

~ शीला दीक्षित आणि आप सरकार ~

मागच्या ४९ दिवसांच्या कार्यकाळामध्ये आप सरकारने शीला दीक्षित यांच्यावर FIR दाखल केली होती. (कॉमनवेल्थ खेळांच्या दरम्यान झालेल्या भ्रष्टाचारासाठी.)
पण त्यावेळी केंद्रात असलेल्या कॉंग्रेस सरकारने शीला दीक्षित यांना केरळच्या राज्यपाल बनवून त्यांना एकप्रकारे राजाश्रयच मिळवून दिला होता.
काही दिवसांनी केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आले.
त्यांनी एका मागोमाग एक सगळीकडचे राज्यपाल बदलायला सुरूवात केली, पण शीला दीक्षित यांना काही राज्यपाल पदावरून काढले नाही. (दिल्लीच्या नजीब जंग यांनासुद्धा काढले नाही.)
यामागचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर एकतर तुम्ही परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.

या चौकशीची वाट लागल्यानंतर आम आदमी पार्टी वर्षभरानंतर परत सत्तेमध्ये आली.
यावेळी त्यांनी शीला दीक्षित यांच्या काळात झालेल्या CNG स्कॅमची चौकशी करायचे ठरवले.
या चौकशीच्या शेवटी शीला दीक्षित आणि त्यांचे त्यावेळचे अनेक सहकारी अडकण्याची शक्यता होती, पण केंद्रात असलेल्या भाजप सरकारने आम आदमी पार्टीने स्थापन केलेली ही चौकशी समितीच रद्द करून टाकली.
यामागचेसुद्धा कारण तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही एकतर परमभक्त आहात किंवा फारच भोळे आहात.

आता आपच्या श्री. कपिल मिश्रा यांनी दिल्ली जल बोर्डात झालेल्या ४०० करोडच्या वाटर टॅंक घोटाळ्यामध्ये शीला दीक्षित यांच्याविरोधातले सगळे पुरावे देऊन त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे सुचवले आहे.
काही दिवसांपूर्वी स्वतः शीला दीक्षित यांनी कबूल केले आहे की या प्रकरणामध्ये घेतलेले निर्णय हे त्यांच्या एकट्याचे नव्हते.
हे सगळे निर्णय त्यांनी भाजपासोबत मिळूनच घेतलेले होते.

पूर्ण घटनाक्रम कसा आहे बघा.
हा घोटाळा झाला जून-जुलै २०१२ मध्ये, आणि आम आदमी पक्षाची 'स्थापना' झाली नोव्हेंबर २०१२ मध्ये.
आम आदमी पक्षाने दिल्लीत पहिल्यांदा सरकार स्थापन केले (४९ दिवसांचे) २०१३ साली.
या ४९ दिवसांमध्ये त्यांनी शीला दीक्षितवर 3 FIR दाखल केल्या.
त्यानंतर आम आदमी पार्टी परत सत्तेत आली २०१५, म्हणजे मागच्या वर्षी.
एका वर्षाच्या आत त्यांनी हे प्रकरण परत वर काढले आणि आपला रिपोर्ट दाखल केला.
खरी गंमत तर पुढे आहे.
भाजपाने आता या प्रकरणात केजरीवालविरोधातच FIR नोंदवला आहे. Proud
विशेष म्हणजे न्यूज चॅनल्सच्या हेडलाईन्ससुद्धा अशाच आहेत, 'केजरीवाल के खिलाफ वाटर टॅंकर घोटाले में एफआयआर ।', 'केजरीवालपर गिरी गाज !', 'केजरीवाल की मुश्किलें बढी ।'
कमाल आहे राव भाजपाची !!!

पण भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाला जो कोणी हे असे सल्ले देतो ना, त्याचे खरं तर इतर पक्षांनी आभारच मानायला पाहिजेत राव.
म्हणून मी नेहमी म्हणतो की भाजपाला पायउतार होण्यासाठी/करण्यासाठी इतर पक्षांची काहीच गरज नाहीये.
भाजपा स्वतःच्या कर्मानेच सत्ता घालवते.

अवांतर :
दुर्दैवाने (आम आदमी पार्टीच्या) लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्यासाठी आपकडे कोणतीही यंत्रणा नाहीये.
आणि सुदैवाने (भाजपाच्या) खोटी माहिती लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी भाजपाकडे मीडिया आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे भक्त-परमभक्तांची मोठी फौज आहे.

आम आदमी पक्षाला शेवटची घरघर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. संदीपकुमार ह्यांची अश्लील सीडी प्रकरणी केजरीवालांनी हकालपट्टी केल्यानंतर त्याच पक्षाचे आशुतोष ह्यांनी सुमारे अर्धा डझन अत्यंत वादग्रस्त मुक्ताफळे उधळलेली आहेत.

त्यात महात्मा गांधी, नेहरू व वाजपेयी ह्यांच्या चारित्र्याची चिरफाड करण्यात आलेली आहे. गांधी आणि नेहरूंबद्दल तर जे काही ह्या मनुष्याने ब्लॉगवर लिहिलेले आहे ते पाहून आता काँग्रेस संतापणार ह्यात शंका उरलेली नाही.

केजरीवालांची अवस्था अतिशय बिकट झालेली असणार! विविध कारणांनी एकेक नेता वादग्रस्त ठरू लागला आहे. सोशल मीडियावर संतापाचा आगडोंब उसळून शांत होतो न होतो तोच आशुतोष ह्यांची मुक्ताफळे बाँबसारखी येऊन फुटली आहेत.

विधानसभा निवडणुका होताहेत. आता दिल्ली मनपांच्याही निवडणुका येऊ घातल्यात. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपापली पाने बदलून घेतलीत.
विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करू नये असे विरोधी पक्षाचे म्हणणे होते. भाजपला अर्थातच ते मान्य नव्हते.
आता भाजपनेच मागणी केली आहे की दिल्ली मनपांच्या निवडाणुका लक्षात घेऊन दिल्ली राज्यसरकारने बजेट सादर न करता vote-on-account सादर करावे.

Pages