दहशतवादी पाहुणे
स्वयंपाकघराच्या लहानश्या गच्चीत जमिनीवर साखरेसारखे पातळ काचेचे स्फटीक विखुरलेले दिसले. एक-दोनदा तिथे फिरकून दुर्लक्षही केले. पण थोड्या वेळात प्रमाण जरा जास्त दिसायला लागले. खाली वाकून, निरखून, तर्क करूनपण ते कशाचे असावेत, हे कळेना. ते कुठून पडले असावेत म्हणून वर उठता उठता छताच्या दिशेला मान वळवली आणि एकदम त-त-प-प झाले.
श्याम मनोहरांच्या एका पुस्तकात एक वाक्य होते- आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राक्षसी गुंड राहतोय हे समजलेय. मग आपली मनस्थिती नेमकी काय ठेवायची?
आणि इथे तर अवघ्या फुटाच्या अंतरावर लहानश्या गच्चीत झुंडीने हे दहशतवादी तळ ठोकून बसलेले. फक्त पाच-सहा तासातच. अनपेक्षित गनिमीकावा. एकेकाचा पवित्रा तर असा की बोलती बंद झाली पाहिजे.
.
.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
तो काचसदृश्य चुरा म्हणजे मेण असावे. आज चिमटीत घेऊन बघितले तर स्पर्श मेणकट लागला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(०४-जून-२०१६)
९.
काल पोळे काढले. त्या माणसांनी पोळ्याच्या खाली धूर केला. त्याने बहुतांश मधमाश्या उठल्या.
१०. मग त्याने सरळ हातानेच उरलेल्या मधमाश्यांची मूठ मूठ भरून त्यांना पोळ्यापासून वेगळे केले. आतमध्ये सुरेख असा षटकोनी घरे असलेला अर्धचंद्र होता. ते पाच दिवसांचे पोळे वरच्या दिशेने थोडे मधाने भरलेले दिसत होते.
११. अर्धचंद्राखाली खालून एका डबा धरून हाताने ते छतापासून खरवडून डब्यात धरले. अर्थातच आजूबाजूला मधमाश्या घोंघावत होत्या.
१२.
१३.
१४.
अर्ध्या-एक तासात त्या मोकळ्या जागेत त्या सगळ्या मधमाश्या पुन्हा लोंबू लागल्या.
१५.
मग दुसरा एक झाकणाच्या डबा खालून अश्या प्रकारे छताला लावला की सगळ्या माश्या डब्यात कैद झाल्या. त्यावर पटकन झाकण लावून त्यांनी दूर नेऊन सोडून दिल्या.
त्यातून सुटलेल्या थोड्याश्या बराच वेळ तिथे रेंगाळल्या आणि आता जवळजवळ सगळ्या दुसरीकडे पांगल्या आहेत. स्वयंपाकघराची खिडकी पूर्णवेळासाठी एकदाची उघडली. हुश्श्य!
१६. दरम्यान इकडे पाच-सहाजणी खिडकीच्या वरच्या पत्र्याच्या कडेला केवळ आपल्या पायांच्या टोकाच्या साहाय्याने लटकलेल्या होत्या. आणि बाकीच्या काही त्यांना खाली लटकत होत्या. त्या वरच्या बाजूच्या मधमाश्यांची कसली ताकदवान पकड असेल!
१७.
१८.
१९.
चमचाभर मध पाण्याने भरलेल्या ग्लासात सोडल्यास शुद्ध मध पाण्यात न विरघळता तळाशी बसतो. भेसळयुक्त असेल तर पाण्यात पसरतो / विरघळतो.
२०.
बाप रे!
मस्तंय ! या मधमाश्यांचा
मस्तंय !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या मधमाश्यांचा बंदोबस्त कसा करावा
बापरे गजानन! आता काय करणार?
बापरे गजानन! आता काय करणार? बाकी, ह्या अशा वेळेससुद्धा शाम मनोहरांचे वाक्य आठवावे ना!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे देवा!!
अरे देवा!!
आमच्या बिल्डींगला दर दोनेक
आमच्या बिल्डींगला दर दोनेक वर्षांनी लागतात भलीमोठी मधमाश्यांची पोळी ..
एक ठरलेला माश्यामारी करणारा आहे, त्याला बोलावतो आणि साफ करून घेतो..
पैसे काही द्यावे लागत नाही, उलट तोच कमिशन देऊन जातो..
अर्थात कित्येक किलो कित्येक टोपं भरून मध निघतो तो आमच्या बिल्डींगमध्ये विकून जातो.. फटक्यात मस्त कमाई होते त्याची..
गेल्या वेळी दिड दोन हजाराचा बरण्यापातेली भरभरून मध आम्हीच घेतला होता.. नातेवाईकांमध्येही वाटला..
आता हे पोळे काढणार्याला
आता हे पोळे काढणार्याला गाठून काढून घ्यायच्या प्रयत्नात आहे. हे काल बसलेय. त्यामुळे फारसा मध नसणार बहुतेक. पैसे देऊन काढून घ्यावे लागणार आहे. आज स्थानिक एकजण काढणारा येणार म्हणाला आणि टांग दिली. आता पेस्ट कंट्रोल वाला बघतोय. तोपर्यंत स्वयंपाकघर आणि इतर खिडक्या बंदच ठेवाव्या लागणार. :-|
आज दिवसभरात प्रगती म्हणजे खाली लोंबणारे निमुळते टोक तुटल्यासारखे नाहीसे होऊन बाजूचा परीघ वाढवला आहे.
ऋन्मेष, हे स्वयंपाक घरापर्यंत यायच्या आधी इमारतीला दूर कुठेतरी किंवा मोठ्या झाडाला लोंबणारी मधाची पोळी मलाही मस्त वाटायची.
पण इतक्या जवळून त्याच्यासोबत वावरताना घरात जिवंत बॉम्ब असल्याचं फिलींग येतंय.
पेस्ट कंट्रोलवाले बहुतेक रसायनांनी मधमाश्या मारून टाकतात.
भास्कराचार्य,![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
अॅक्चुअली कोणालाही न बोलावता
अॅक्चुअली कोणालाही न बोलावता हे काढू शकतोस. एक पलिता / मशाल मात्र हवी. . अंगावर काहीतरी घेऊन ते पोळे जाळयचे. त्या माश्या मोस्टली पळून जातात. एकदा जाळलेल्या ठिकाणी सहसा परत मधमाश्या येत नाहीत. मी माझ्या घरात दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी केले आहे.
अरे ते अवाढव्य धूड बघून एवढे
अरे ते अवाढव्य धूड बघून एवढे धाडस एकवटणे कठीण आहे. लहानपणी तीन मित्रांनी मिळून छोटेसे पोळे काढायचा प्रयत्न केला होता, पण पुढे दोन तीन दिवस निरनिराळ्या प्रकारे फुगलेले चेहरे घेऊन गावात फिरायची पंचायत होऊन बसली होती.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
एका दिवसात एवढी प्रगती? कमाल
एका दिवसात एवढी प्रगती? कमाल आहे.
आमच्याकडे घर घेतल्यापासुन
आमच्याकडे घर घेतल्यापासुन माशानी ३ दा वेगवेगळ्या ठीकाणी पोळी केलि होती , स्प्रिन्ग च्या दरम्यात कुठल्याशा पेरिनियल फुलाच्या वासाने त्यानी फ्रन्ट डोअर च्या जवळ भिन्त-वायनल स्लाइडिण्ग मधे केले होते
१० सेमी होते मग त्याचा फोटो काढुन काही लोकाना दाखवला त्यावर ते म्हणे वास्प आम्ही काढत नाही एक स्प्रे मिळतो तो मारला की झाल. त्याने गेल ते , मग पुढच्या वर्शी भारतवारी आटोपुन आलो तर जमिनित करुन ठेवल होत .(हे मी पहिल्यादाच बघितल ) मग त्यावर उकळत पाणी ओतुन काम तमाम केल , मागच्या वर्शी डेकच्या खाली केल होत. ते पाण्याचा जोरदार फवार मारुन पाडल. यावर्शी काय नविन जागा शोधणार ते त्यानाच माहित.
गजाभाऊ ! सुरक्षित ठिकाणी उभ राहुन पाण्याचा जोरदार फवारा मारता आला तर बघा, तुमच्या माशा फार मेहनती दिसतायत खटाखट घर मोठ करतायत.
माशा हल्ला !! संकटमुक्त
माशा हल्ला !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
संकटमुक्त होईपर्यंत कृपया आम्हांला परिस्थितीची माहिती देत रहा; त्या पोळ्यासारखाच आमचाही जीव आतां टांगणीस लागला आहे !
ओ..बापरे..किती डेडली दिस्तंय
ओ..बापरे..किती डेडली दिस्तंय ते पोळं.. खराच टांगणीला लागलाय जीव्,असा बाँब.. इतक्या जवळ..
कोणी मिळालं का काढायला.. रिअली डेंजरस!!!
आमच्या सोसायटीत पण असच एका
आमच्या सोसायटीत पण असच एका दिवसात मोठ पोळ केल्याच ऐकल आहे. पेस्ट कंट्रोल वाले काढतात म्हणे.
बाप्रे.
बाप्रे.
बापरे... कसे काय राहताय
बापरे... कसे काय राहताय तुम्ही ह्या अश्या परिस्थीतीत....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
उद्या सकाळी काढायचे आहे.
उद्या सकाळी काढायचे आहे. (धास्ती + उत्सुकता).
पाहुण्यांचे जरा जवळून फोटोसेशन केलेले वर टाकले आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
बाप्रे गजानन. डेन्जर आहे.
बाप्रे गजानन. डेन्जर आहे.
बाप रे!!!! खिडक्या दारं बंद
बाप रे!!!!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
खिडक्या दारं बंद आहेत तरी ड्राय बॅल्कनी मध्ये जाऊन फोटो सेशन केलं की काय? आणि सतत त्यांचा घूँ घूँ आवाज येतो का पिक्चर मध्ये दाखवतात तसं?
केदार चा सल्ला वाचून तो आणि/किंवा गजानन जैत रे जैत मधले मोहन आगाशे वाटायला लागले.
जमिनीवर जो मेणकट चुरा पडलाय त्यात लाल ठिपके कसले आहेत? ठिपक्यांपेक्षा मोठे दिसतात तर ड्रॉपिंग्ज् म्हणणार होते मग विचार करतेय खरोखरची बी ड्रॉपिंग्ज् (नो पन इन्टेन्डेड!) आहेत की काय ती?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
याईक्स्, मला ते फोटो बघूनही
याईक्स्, मला ते फोटो बघूनही शहारा आला अंगावर.
त्यांना हिमेश रेशमियाची गाणी
त्यांना हिमेश रेशमियाची गाणी ऐकवं आपोआप उठुन जातील.
बाप रे! भयानक दिसतायेत त्या
बाप रे! भयानक दिसतायेत त्या माशा.
आता श्रीने सुरुवात केलीच आहे
आता श्रीने सुरुवात केलीच आहे तर मी दहशतवादी मेहुणे वाचलं हे पण सांगुन घेतो.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अमितव , सैराटचा परिणाम बाकी
अमितव , सैराटचा परिणाम बाकी काय ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सैराटमधले चहा पिऊन घात करतात
सैराटमधले चहा पिऊन घात करतात , हे मध निर्माण करून करतील.
(पण ह्या मेव्हण्या ना??? ;))
सशल, एक राणीमाशी सोडली तर
सशल, एक राणीमाशी सोडली तर बाकी सगळे ड्रोन्स आणि मेल्स त्यामुळे मेव्हणेच ना?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
(सैराटचे स्पॉइलर्स कुठेकुठे दिसतील काही सांगता येत नाही. :दिवा:)
मेहुण्यांना दहशतवादी म्हणु
मेहुण्यांना दहशतवादी म्हणु नये![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>> एक राणीमाशी सोडली तर बाकी
>> एक राणीमाशी सोडली तर बाकी सगळे ड्रोन्स आणि मेल्स त्यामुळे मेव्हणेच ना?
असं असतं काय? मला वाटायचं मुंग्या आणि माश्या ह्यातले मेल्स हे फक्त नाममात्र असतात (आणि नक्की कुठे असतात ते ही माहित नव्हतं एनीवे).
पण मग लगेच आठवलं की बी मुव्ही मधला जेरी साइनफेल्ड चा रोल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी चुकत नसेन, तर मी बरोबर
मी चुकत नसेन, तर मी बरोबर आहे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
आपण बरोबरच आहात.
आपण बरोबरच आहात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अॅक्चुअली कोणालाही न बोलावता
अॅक्चुअली कोणालाही न बोलावता हे काढू शकतोस. एक पलिता / मशाल मात्र हवी. . अंगावर काहीतरी घेऊन ते पोळे जाळयचे. त्या माश्या मोस्टली पळून जातात. एकदा जाळलेल्या ठिकाणी सहसा परत मधमाश्या येत नाहीत. मी माझ्या घरात दोनदा वेगवेगळ्या ठिकाणी केले आहे.
गेल्या आठवड्यात आमच्या खाली असलेल्या झाडाचे पोळे असेच काढले.
आणि इतके घाबरु नका, ह्या आग्यामोहोळ माश्या नाहियेत तर साध्या मधमाश्या आहेत. तुम्ही मुद्दाम त्याना डिवचले नाही तर त्या काहीही करणार नाहीत. फक्त त्यांची यायची जायची वेळ असते तेव्हा तिथे जरा कालवा असतो, तेवढा वेळ आपण जरा बाजुला राहायचे.
काही लोकांनी केलेले अघोरी उपाय वाचुन थोडे वाईट वाटले. म्हणजे त्या लोकांचा राग आला किंवा ते लोक उलट्या काळजाचे आहेत असे म्हणायचेय असे काही नाहीय.
पण काहीही कारणाने प्राण्यांना लोकांनी त्रास दिल्याच्या बातम्या आपण वाचतो तेव्हा किती हळहळतो, इथे कोणी असली काही बातमी टाक्ली की लगेच लाल टिकल्या टाकतो. पण आपल्यावर वेळ येते तेव्हा आपण काय करतो? आपणही त्याच लोकांप्रमाणे अमानवी वागतो.
जे पक्षी , प्राणि आधी मानवी वस्तींपासुन दुर राहत होते ते आता आपल्या घराच्या जवळ यायला लागत्लेत, घरात घुसायला लागलेत. याची कारणॅ काय असावीत ? आपणच याला कारणीभुत आहोत ना?
मग उपायही आपणच शोधायला नकोत? आपल्या अन्नसाखलीत मशमाशा खुप महत्वाची जबाबदारी निभावतत. त्यांना असे हाकलुन देऊन, त्यांचा नाश करुन शेवटी आपलेच नुकसान होणार आहे.
ज्यांना रस आहे त्यांनी हा लेख वाचा https://sundayfarmer.wordpress.com/2015/11/26/mumbais-only-bee-keeper/
Johnson can be reached on 09619799261
गजानन, ऋण्मेष, तुम्ही याच्याकडुन माहिती घेऊन तुम्हाला जे संकट वाटतेय त्याचे लाभात रुपांतर करु शकता. तुमचा फायदा होइल, मशमाशाही सुखाने राहतील.
Pages