दहशतवादी पाहुणे
स्वयंपाकघराच्या लहानश्या गच्चीत जमिनीवर साखरेसारखे पातळ काचेचे स्फटीक विखुरलेले दिसले. एक-दोनदा तिथे फिरकून दुर्लक्षही केले. पण थोड्या वेळात प्रमाण जरा जास्त दिसायला लागले. खाली वाकून, निरखून, तर्क करूनपण ते कशाचे असावेत, हे कळेना. ते कुठून पडले असावेत म्हणून वर उठता उठता छताच्या दिशेला मान वळवली आणि एकदम त-त-प-प झाले.
श्याम मनोहरांच्या एका पुस्तकात एक वाक्य होते- आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राक्षसी गुंड राहतोय हे समजलेय. मग आपली मनस्थिती नेमकी काय ठेवायची?
आणि इथे तर अवघ्या फुटाच्या अंतरावर लहानश्या गच्चीत झुंडीने हे दहशतवादी तळ ठोकून बसलेले. फक्त पाच-सहा तासातच. अनपेक्षित गनिमीकावा. एकेकाचा पवित्रा तर असा की बोलती बंद झाली पाहिजे.
.
.
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
तो काचसदृश्य चुरा म्हणजे मेण असावे. आज चिमटीत घेऊन बघितले तर स्पर्श मेणकट लागला.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(०४-जून-२०१६)
९.
काल पोळे काढले. त्या माणसांनी पोळ्याच्या खाली धूर केला. त्याने बहुतांश मधमाश्या उठल्या.
१०. मग त्याने सरळ हातानेच उरलेल्या मधमाश्यांची मूठ मूठ भरून त्यांना पोळ्यापासून वेगळे केले. आतमध्ये सुरेख असा षटकोनी घरे असलेला अर्धचंद्र होता. ते पाच दिवसांचे पोळे वरच्या दिशेने थोडे मधाने भरलेले दिसत होते.
११. अर्धचंद्राखाली खालून एका डबा धरून हाताने ते छतापासून खरवडून डब्यात धरले. अर्थातच आजूबाजूला मधमाश्या घोंघावत होत्या.
१२.
१३.
१४.
अर्ध्या-एक तासात त्या मोकळ्या जागेत त्या सगळ्या मधमाश्या पुन्हा लोंबू लागल्या.
१५.
मग दुसरा एक झाकणाच्या डबा खालून अश्या प्रकारे छताला लावला की सगळ्या माश्या डब्यात कैद झाल्या. त्यावर पटकन झाकण लावून त्यांनी दूर नेऊन सोडून दिल्या.
त्यातून सुटलेल्या थोड्याश्या बराच वेळ तिथे रेंगाळल्या आणि आता जवळजवळ सगळ्या दुसरीकडे पांगल्या आहेत. स्वयंपाकघराची खिडकी पूर्णवेळासाठी एकदाची उघडली. हुश्श्य!
१६. दरम्यान इकडे पाच-सहाजणी खिडकीच्या वरच्या पत्र्याच्या कडेला केवळ आपल्या पायांच्या टोकाच्या साहाय्याने लटकलेल्या होत्या. आणि बाकीच्या काही त्यांना खाली लटकत होत्या. त्या वरच्या बाजूच्या मधमाश्यांची कसली ताकदवान पकड असेल!
१७.
१८.
१९.
चमचाभर मध पाण्याने भरलेल्या ग्लासात सोडल्यास शुद्ध मध पाण्यात न विरघळता तळाशी बसतो. भेसळयुक्त असेल तर पाण्यात पसरतो / विरघळतो.
२०.
सल्ला १: गजा भारीच. बाजारत
सल्ला १: गजा भारीच. बाजारत मधमाशांची घरे मिळतात. त्यातले एक घरीच बसवुन घे. घरच्या घरी व्यवसाय करता येईल. जरा शोध घेतलास तर त्यांना कसे हाताळायचे वगैरे पण कळेल.
सल्ला २: सोसायटीचे लोक कल्ला करतील त्यामुळे त्याला तोंड द्यायला तयार रहा.
सल्ला ३: Call the expert and remove it.
साधना तुझी काळजी जरी स्वाभाविक असली तरी घरात लहान मुल असताना जरा रिस्की आहे.
पेस्ट कंट्रोलवाल्यांना
पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलावून माशांना मारून पोळे काढू नका अशी कळकळीची विनंती आहे.
या माशा कायम तिथे राहाणार नाहीत तीनचार महिन्यांनी निघून जातील. पण त्यांना हाकलायचेच असेल तर न मारता हाकलता येते.
तुम्ही पुण्यात रहात असाल तर अमित गोडसे म्हणून एकजण आहेत मी त्यांचा संपर्क तुम्हाला देऊ शकेन. ते सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत, मधमाशा वाचाव्यात म्हणून पूर्णवेळ काम करतात. मधाची पोळी स्थलांतरीतही करतात.
>>आपल्या अन्नसाखलीत मशमाशा खुप महत्वाची जबाबदारी निभावतत. त्यांना असे हाकलुन देऊन, त्यांचा नाश करुन शेवटी आपलेच नुकसान होणार आहे.>>
अगदी खरे आहे.
आमच्याही सोसायटीत असेच पोळे लगले होते. आम्हीही अमितला बोलावून ते काढले. त्यानिमित्ताने मी मधमाशांबद्दल वाचत गेले, माहिती मिळवत गेले. खरोखर, मी त्या इवल्या जीवांच्या प्रेमात पडले आहे. त्यातूनच मी पुण्यात केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून मधमाशी पालनाचा एक छोटा कोर्सही केला आणि आता मी माझ्या मधमाशाही पाळल्या आहेत.
सांगायचा मुद्दा एवढाच, की त्या दहशतवादी नाहीत, त्यांना मारून टाकायचा विचार करू नका.
घराजवळ मधमाशांचे पोळे असणे
घराजवळ मधमाशांचे पोळे असणे "नशिबवानाचे" लक्षण अस्ते असे काय से से कुठेतरि वाचले आहे...
सशल, हो गच्चीत जाऊन आणि
सशल, हो गच्चीत जाऊन आणि काठावरून पण काळजी घेऊनच फोटो काढले. त्यांचा सतत घूँ घूँ असा आवाज येत नाही. विशेष लक्ष वेधून घेणारा कसलाच आवाज येत नाही. तसा आवाज त्या खवळून उठल्या तर येतो मात्र.
साधना, आग्यामोहोळ आणि साधे मोहोळ यातला फरक कसा ओळखायचा? माझा ठोकताळा म्हणजे पोळ्याचा आणि मधमाश्यांचा आकार लहान असेल तर साधे असते; शिवाय मधमाश्या सोनेरी असतात. पण या मधमाश्या तश्या थोराड आहेत.
अतिधोकादायक माश्यांविषयीही ऐकून आहे. हे फरक कसे ओळखायचे?
आमच्या सोसायटीत गेल्या वर्षात तीनदा काढले गेले असल्याने (कारण काढायचे असते तेंव्हा दारे खिडक्या बंद करून घ्या, असे सांगायला येतात.) हे धोकादायक नसावे, अशी आशा आहे.
परवा पेस्ट कंट्रोलवाला शोधत असताना मला खालच्या दोन ओळींनी मधमाश्या मारून टाकणार्या (किलींग) उपलब्ध पर्यायापासून थोडे वेगळे पर्याय बघायला प्रवृत्त केले.
एकजण आज येणार होता. तो आधी धूर करून मधमाश्यांना पळवतो. मग मध गोळा करतो आणि नंतर त्या जागी पुन्हा बसू नये म्हणून तिथे औषध मारतो. पण आधीच्या तिघांप्रमाणे यानेही टांग दिली. याच्या घरी रात्रीपासून झालेल्या पाण्याच्या प्रॉब्लेममुळे तो सकाळपासून त्याच नादात आहे, परिणामी पाहुण्यांचे वास्तव्य आणखी एका दिवसाने लांबले आहे.
सलग तीन दिवस वेगवेगळ्या व्यक्तींनी येतो येतो म्हणून येण्याचे रद्द केले यावरून नुकत्याच वसलेल्या या पोळ्यात थोडातरी मध जमण्यासाठी ते लोक मुद्दाम येण्याचे लांबवताहेत की काय असेही वाटले.
केपी, मधमाश्यांची शेती करायचा विचार आणि मनाची तयारी अजून अजिबातच झालेली नाही. त्यातही सोसायटीची परवानगी हा एक मोठा न टाळतायेण्यासारखा अडथळा आहे. जो पार करणे जवळजवळ अशक्य आहे.
सध्याचे हे पोळे लवकरात लवकर काढावेसे वाटतेय याचे मुख्य कारण म्हणजे याची जागा अगदीच दैनंदीन वर्दळीच्या ठिकाणी सहज डिवचले जाईल अशी आहे. शिवाय ते 'वाढता वाढता वाढे' प्रमाणे परिघाने आणि उंचीने वाढतच चालले आहे. इतर खिडक्या जरी उघड्या ठेवायचा निर्णय घेतला तरी स्वयंपाकघराची तरी कायम बंदच ठेवावी लागणार, जे फार गैरसोयीचे आहे. आम्ही स्वतःहून जरी त्याला डिवचले नाही तरी इतर कोणत्या कारणाने ते डिवचले गेले तरी त्याच्या पहिल्या तडाख्यात आम्ही असू.
बाबौ! मी नुकतेच
बाबौ!
मी नुकतेच त्र्यम्बकेश्वर जवळ पिम्पळद येथे विवेकानन्द केन्द्राच्या योगा शिबिराला जाउन आले. तिथे ही लेडीज हॉस्टेलच्या खिडक्यान्च्या बाहेर अशीच भली मोठी पोळी लटकलेली होती. पहाटेपासुन माश्यान्चा आवाज यायचा. काही काही तर आम्ही झोपलो त्या हॉलमधे पण यायच्या. सकाळी पायर्यावर कित्येक नर माश्या मेलेल्या दिसायच्या. अर्थात आपण काही केले नाही तर काही करत नाहीत त्याही.
अदिजो, भारीए. छोट्या
अदिजो, भारीए. छोट्या प्रमाणात मधमाश्या पाळुन मध मिळतो का? हे केवळ छंद म्हणुन करता की कसे?
ते अमित गोडसे, पोळे स्थलांतरित करतात म्हणजे नक्की काय करतात?
गजानन,
भिती वाटणे सहाजिक आहे. आमच्याकडे रोज संध्याकाळी दोन तीन मधमाश्या घरात येतात . ( जवळ पाण्याची टाकी आहे तीला लागलेल्या असतात. त्यांना पोळ्यासाठी थंडावा हवा असतो त्यामुळे थंड ठिकाणी पोळं केलं जातं ) आलेल्या माश्यांना पळवण्यासाठी आम्ही घरातले सगळे लाईट एकेक करुन बंद करत बाल्कनीतला लाईट लावतो आणि मग त्या फसुन बाहेर जातात. आम्ही हुश्श करुन बाल्कनी लावुन घेतो, तिथला लाईट बंद करतो. फसलेल्या मधमाशा मग काचेवर येऊन घुं घूं करत बसतात.
तुला डायरेक्ट पोळं न जाळता खाली धुर करुन किंवा इतर काही उपायांनी तिथले तापमान वाढवता आले तर बघ. जास्त गरम झाले तर कदाचित त्या निघुन जातील. हे करताना तुमच्या आणि जवळपास्च्या इतरांच्याही खिडक्या दारे बंद ठेवा.
रच्याकने, तो जोसेफ यांचा लेख
रच्याकने, तो जोसेफ यांचा लेख आणि माश्यांच्या विषामुळे तरुण दिसणं याबद्दल वाचुन रोल्ड डालची रॉयल जेली नामक कथा आठवली.
घराजवळ मधमाशांचे पोळे असणे
घराजवळ मधमाशांचे पोळे असणे "नशिबवानाचे" लक्षण अस्ते असे काय से से कुठेतरि वाचले आहे... >>> असेल ही... कुर्ग मधील या मॉनेस्ट्रीवरुन तरी तसेच वाटते.
बाप्रे.... महिरपच बनवलीय की!
बाप्रे.... महिरपच बनवलीय की!
बाब्बौ
बाब्बौ
बाप्रे! फोटो बघून अंगावर काटा
बाप्रे! फोटो बघून अंगावर काटा आला. घराच्या एव्हढ्या जवळ वावर असण्याच्या जागी मधमाश्यांचे पोळे असणे म्हणजे भयंकर आहे.
कार्ले लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ सुध्दा मधमाश्यांच्या पोळ्यांची झालर इंद्रधन्युष्याने टाकलेल्या फोटोप्रमाणेच असते. पण म्हणतात ना दुरून डोंगर साजरे तेच खरं.
>> छोट्या प्रमाणात मधमाश्या
>> छोट्या प्रमाणात मधमाश्या पाळुन मध मिळतो का?>>
आजूबाजूला फुलोरा कसा आहे त्यावर अवलंबून आहे. चांगला फुलोरा असेल तर बागेतल्या पेटीतून वर्षाला सात आठ किलो मध मिळू शकतो.
>>पोळे स्थलांतरित करतात म्हणजे नक्की काय करतात>>
स्मोकरने धूर करतात, म्हणजे माशा हल्ला करत नाहीत. मग बांबूच्या सापटीत पोळे (माशांसकट) अलगद काढले जाते आणि जाळीच्या पिशवीत बांबूसकट ठेवले जाते. नंतर एखाद्या झाडावर बांबू ठेवतात, माशा ते पोळे सोडून जात नाहीत. तिथेच आपला वंश वाढवतात.
गजानन यांच्या घरातले पोळे आग्या मधमाशांचे आहे. त्या माशा पाळता येत नाहीत. पाळायच्या माशा अंधार्या जागी / झाडांच्या ढोलीत पोळे करणार्या असतात (सातेरी माशा आणि इटालियन माशा)
खतरनाक! बघून खरंचच ततपप
खतरनाक! बघून खरंचच ततपप होतंय.
Whatever Sadhana said is
Whatever Sadhana said is right!
Honey bees are essential for our own existence since no one can do pollination as good as them and no one does.. we hear about reduced yields in farming and reduced # of bees is one of the reasons.
If you can keep your door closed and blinds/curtains pulled (so that light wont be seen) during evening when sun is setting - they will not trouble you.
We eat honey, we eat all lentils, dals etc - they are the folks who give us major portion of our food.
When honey bees stung - you get protection against arthritis and many more diseases automatically. Bee keepers live longer than ordinary people by avg of 7 years since they get stung while handling.
Please do not use pest control if you see honeybees. They are very essential in food chain.. almost at the base of pyramid and we on top. We will not survive if they are not there.
AS soon as they start forming the hive, you can drive them away by calling a qualified professional - if you are too scared and do not even want to try option suggested above where in you can co-exist.. That way, they will go away and they wont have eggs and larva's in the hive yet. If you wait till hive is too big, bees will fly but eggs and larva's will die due to smoke. Please do not try on your own. Its dangerous to you and others.
Also try to see if you can find someone who can relocate them, along with the hive.
sorry, had missed page 2
sorry, had missed page 2 earlier .. Aadijo good going.
आदिजो, नानबा, चांगली
आदिजो, नानबा, चांगली माहिती.
सावली, सध्यातरी स्वतः प्रयत्न करायचे धैर्य होत नाही खरेच. कारण त्याच्या अशा प्रकारच्या अस्तित्वाने आलेले दडपण अजून कमी झालेले नाही.
माझे आजवरचे अजून एक निरिक्षण (निष्कर्ष नाही) म्हणजे, जिथे विहिरी असतात तिथे जवळच उंबराचे झाड असण्याची आणि तिथेच आजूबाजूला मधमाश्यांचे पोळेही असण्याची शक्यता असते. यात किती तथ्य आणि काय कारण असावे याबद्दल माहीत नाही.
इंद्रा, फोटो भारी आहे. अगदी सममिती साधून पोळी वसवली आहेत मधमाश्यांनी!
माफ करा ! पण ,आम्ही केलेले
माफ करा ! पण ,आम्ही केलेले उपाय अघोरी वाटले तरी आम्ही ते अविचाराने बिलकुल केले नाही , त्याचा अभ्यास करुनच मग निर्णय घेतला, पहिल्यादा जेव्हा घरट्याची चाहुल लागली तेव्हाच त्याचे फोटो काढुन एका पोळ काढणार्या एक्पर्टला विचारले त्यावर त्याने या हनी बी नसुन वास्प जातिच्या माशा आहेत अस सान्गितल.हनि बी असेल तरच त्याला (नॅचरली ) interest होता.
हनी बी या पॉलिनेटर असतात तर वास्प प्रेडिटेअर, हनीबी /मधामाश्या स्वतःहुन हल्ला करत नाहीत मात्र वास्प करु शक्तात शिवाय काही जातिच्या वास्प एकदा घर केले की त्यावरचा हक्क सोड्त नाहीत आणी त्याच्या आसपास तुमचा वावर त्याना instigate करु शक्तो. त्यात मागे एकदा मुलिला शाळेत वास्प चावली होती तेव्हा अॅलर्जी ने ताप येवुन गेला होता.एवढा अभ्यास झाल्यावर दोन लहान मुल आणी पाहुण्याच नेचर बघता मग त्यावरचे आम्हाला जमणारे उपाय करण्याशिवाय पर्याय नव्हता.
बाकी पशु-प्राण्याविषयी प्रेम आहेच, मागले ३ वर्श आमच्याकडे रॉबिन पक्षी घरट बनवतो( एकच आहे की दर वेळी वेगळा ते माहित नाही) अन्डी दिली की नर-मादी फार प्रोटेक्टिव्ह होतात मग आम्ही डेकचा वापर मिनिमाइझ करतो
गाडि तिथे न लावता ड्राइव्हमधे लावतो ,त्या बाजुचा दरवाजा वापरत नाही ज्यायोगे त्याना असुरक्षित वाटु नये. (३ आठ्वड्याने साधारण) परिवार मुव्ह होतोच.बाकी बॅकयार्डात ससे विथ फॅमिली , खारी ( ज्या अधुन मधुन लॉनमधे खड्डे खणुन खाउ लपवतात्),
माझ्या घरातल्या खिडकीसमोर
माझ्या घरातल्या खिडकीसमोर येणार्या झाडावर माशांच पोळं होतं. रात्री खिडकीतुन माशा आत येऊ लागल्या उजेडाच्या दिशेने. मग अंधार पडायच्या आत खिडकी बंद करायला लागायची. आणि एक दिवस अचानक ते पोळं गायब झालं. काहीच माग्मूस न ठेवता. पोळ्यासकट माशा स्थलांतर करतात की काय असा प्रश्न मलाही पडलाय.
प्राजक्ता, वास्प हा असाही एक
प्राजक्ता, वास्प हा असाही एक प्रकार असतो, हे माहीत नव्हते.
हे एक इंटरेस्टींगः मधमाश्या षटकोनीच कप्पे का बांधतात?
कसलं डेंजर वाटतंय ते पोळं.
कसलं डेंजर वाटतंय ते पोळं.
मला मधमाशीने दोनदा उगाचच दंश केलेला आहे. त्यामुळे मला त्यांची दया वगैरे येत नाही. पण मी त्यांच्या जवळ पण जात नाही.
रावी, हा प्रकार मी पण पाहिलाय. आमच्या घराजवळ रिंगीच्या झाडावर पोळं वसवलं होतं. दिवसेंदिवस मोठंच होत होतं. जवळपास महिन्याभराने एका आक्रित चुलतभावाने त्यावर दगड मारला तर त्या माशा पिसाळल्या तर नाहीतच पण पोळ्याच्या आकारातच उडून गेल्या. फांदीवर पोळं असल्याचे काहीच निशाण नव्हते.
वास्प वेगळं आणि मधमाश्या
वास्प वेगळं आणि मधमाश्या वेगळ्या...ह्यावरून अतिशय रटाळवाणा मि. होम्स् हा चित्रपट आठवला...
वास्प म्हणजे गांधीलमाशी ना?
वास्प म्हणजे गांधीलमाशी ना? हीची अॅलर्जी असेल तर दंशाने हार्ट एटॅक येतो असे शाईनिंग मध्ये वाचले होते.
माझ्या मुलिला बग बाइट चा
माझ्या मुलिला बग बाइट चा त्रासच होतो, लहानपणी डास चावुन मोठे फोड, मग पिपल्स टाइप झाल होत तेव्हापासुन भारतात जाउ तिथे मच्छरदाणी मस्ट! आता तेवढा त्रास होत नाही पण ,व्हास्प स्टिन्ग हे कॅम्पला गेल्यावर झाले होते. नुसत्या तापावरच निभावल ते बर झाल (मागे एकदा चावल्यावर लाल झाले होते पण बन्प आल्यावर त्याचा त्याचाच गेला त्यामुळे अॅलर्जी नसुही शकेल हा निष्कर्श निघाला) असो ते काहीही असल तरी स्टिन्गिन्ग इन्स्केट च्या आसपास वावरताना सतत एक दहशत असल्यासारख वाटत.
जावे त्याचा वन्शा कळे
आमच्याकडच्या एक -दोन पेरिनियल फुलामुळे वास्प येतात हे कळल्यावर ती झाडे काढलित तरी येतातच मग कळले नेबरहुड मधे आहेत बरेच पेरिनियल.
Wasps vary greatly among the more than 100,000 species. Some are wingless, some dig in the ground, but nearly all prey on or parasitize pest insects.
गजा तुमच्या इथले पाहुणे हालले
गजा तुमच्या इथले पाहुणे हालले की नाही अजून??
हो, आज पाहुण्यांना निरोप
हो, आज पाहुण्यांना निरोप दिला.
सकाळी त्या माणसांनी पोळ्याच्या खाली धूर केला. त्याने बहुतांश मधमाश्या उठल्या. मग त्याने सरळ हातानेच उरलेल्या मधमाश्यांची मूठ मूठ भरून त्यांना पोळ्यापासून वेगळे केले. आतमध्ये सुरेख असा षटकोनी घरे असलेला अर्धचंद्र होता. ते पाच दिवसांचे पोळे वरच्या दिशेने थोडे मधाने भरलेले दिसत होते. अर्धचंद्राखाली खालून एका डबा धरून हाताने ते छतापासून खरवडून डब्यात धरले. अर्थातच आजूबाजूला मधमाश्या घोंघावत होत्या. अर्ध्या एक तासात त्या मोकळ्या जागेत त्या सगळ्या मधमाश्या पुन्हा लोंबू लागल्या. मग दुसरा एक झाकणाच्या डबा खालून अश्या प्रकारे छताला लावला की सगळ्या माश्या डब्यात कैद झाल्या. त्यावर पटकन झाकण लावून त्यांनी दूर नेऊन सोडून दिल्या. त्यातून सुटलेल्या थोड्याश्या बराच वेळ तिथे रेंगाळल्या आणि आता जवळजवळ सगळ्या दुसरीकडे पांगल्या आहेत. स्वयंपाकघराची खिडकी पोर्र्णवेळासाठी एकदाची उघडली. हुश्श्य!
फोटो नाही काढले गजानन?
फोटो नाही काढले गजानन?
हुस्श! अस मलाही झाल! तुम्हाला
हुस्श! अस मलाही झाल! तुम्हाला मध चाखायला दिला की नाही?
...आणि शेवट गोड झाला
...आणि शेवट गोड झाला
हुश्श!
हुश्श!
>> .आणि शेवट गोड झाला
>> .आणि शेवट गोड झाला
Pages