पसंत आहे मुलगी - झी मराठीवरील नवीन मालिका

Submitted by योकु on 25 January, 2016 - 09:20

आजपासून ही नवीन मालिका सुरु होतेय. नेहेमीप्रमाणे इथे त्याबद्द्ल काथ्याकूट करूयात Wink
हो जाओ शुरू!

इथे या सिरिअलची कास्ट पाहायला मिळेल

उर्मी - रेशम प्रशांत
वासू - अभिशेक देशमुख
पंत - गिरीश ओक
वासूची आई - मेघना वैद्य
वासूचा भाऊ - पद्मनाभ बिंड
नंदिनी - केतकी सराफ (?)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पसंत आहे मुलगी' हें खरंच वासु व उर्मिच्या लग्नासंदर्भात आहे, असंच मीं खुळ्यासारखं समजत होतों; तें नंदिनीच्या संदर्भात आहे, हें आत्तां लक्षांत आलं माझ्या !! Wink

कुमूदच्या तोंडून " नंदिनीच्या सांगण्यावरून मीं हें केलं " फक्त एवढं एक समयोचित वाक्य वदवून घेण्यासाठी आजचा अख्खा एपिसोड वापरला गेला ! दादा, माई, नंदीनीची आत्या, वासुचा भाऊ व कुमूद ह्यांच्या डयलॉगबाजीला व तथाकथित अभिनयाला विनाकारण वाव देत !! Sad

अगदी, आणि येवढ सगळ करुन कुमुदने कालच्या भागात सांगितल नाहीच. आजच्या भागात सांगणार..

एवढ स्वतःला घराबाहेर पडायची वेळ आली तरी ती कुमुद काही तोंड उघडेना, बाकी नंदिनीच खरं स्वरूप कळल्यावर मालिकेत जीव काय राहणार ? दादा उर्मिला माफ करणार मग तर स्टोरीच संपली.

मला वाटतं की हे प्रकरण कुमुदवरच शेकणार. ती नंदिनी काही तरी ड्रामा करणार आणि दादा त्यावर विश्वास ठेवणार. त्या कुमुदने नंदिनी च्या आईच्या बांगड्या दाखवल्या तरच काही उपयोग होईल.

मला वाटतं आधीच्या ठरलेल्या लग्नातले मुलीचे वडील (संजय मोने बहुतेक) आणि नंदिनी अशी संयुक्त आघाडी होईल खलपात्रांसाठी.

हो ना. त्यांनी तो तेवढा तोकडा रोलतरी का स्विकारला हाच प्रश्न आहे. मला तेव्हा वाटल होत की गिरीश ओक आणि संजय मोनेला बघताना मजा येईल.. बाप आहेत अभिनय, संवादफेक या सगळ्यात.. त्यातल्या त्यात संजय मोने तर आहेच्च. पण नंतर गायबच झाले.

<< संयुक्त आघाडी होईल खलपात्रांसाठी.>> प्रत्येक बाबतींत टोंकाचीच भूमिका घेणारा, स्वतःच्याच मुलांवर सतत अविश्वास दाखवणारा दादांसारखा भलाभक्कम खलनायक आयता तयार असताना आणखी असल्या आघाडीची खरंच गरज आहे ? Wink

काल एपिसोडच्या सुरवातीला उर्मीचे घर बाहेरुन दाखवले आणि आतमधे दादा महाराजांचा संशयकल्लोळ सीन चालू होता.

योकु
रात्रीस खेळ चाले १ च्या धाग्यावर सगळ्या कलाकारांची नावे दिली आहेत..तसे याही मालिकेतील कलाकारांची दिल्यास बरे पडेल.
म्हणजे मला वाशाचे खरे नाव कळेल व इतरांचीही कळतील...त्यांच्या नावाने बोटे मोडायला!!!

काल नंदिनीचा महत्वाचा सीन होता. ती लग्नाला का विरोध आहे ते दादांना सपष्ट सांगते. मला तरी तो सीन तिचा फार आवडला. लग्न होण्या आधीच तिने स्वतः चे मत व्यवस्थित सांगितले आहे. ऑर्डिनरी, अनाथ मुलगी म्हणून तिला कुठेतरी फिट करायचा सर्वांचा अट्टा हास कसा चुकीचा आहे ते तिने पटवून सांगितले सर्वांना. मध्येच वाशा बोलू लागला. पण सारे फसाद की जड तोच असल्याने माती खाल्ली.

कुमूद व तिचा नवरा ह्यांच्यात संवाद नाही. त्याने तिच्या नाकावर दार आपटले. मग ती उर्मी च्या रूमात आली तिथे वाशा व उर्मी वाद घालत होते. मग दार लावून नंदिनीला कसे हाकलायचे ती चर्चा झाली( ते आज दिसेल.)

सुरुवातीला उर्मीच्या माहेरचा लाडे लाडॅ आजी आजारी सीन झाला. उर्मीच्या आईचा चेहरा लाल भडक सुजलेला गोल असा दिसतो. अहो आई अहो आई करत काळजी करून झाली. मग आजी ची कथा मो ठ्या डॉकटराला सांगितली आहे विद्याने व ओके मिळाला की ते लगेच उर्मीक डे जाणार ह्यावर तोड झालेली आहे.

वाशाची आई पिट्स आहे. मुलाबद्दल आंधळी माया. माझा पुनर्वसू पुनर्वसू करत असते. आदिती सारख एकदम लग्न ठरवूनच टाका यला हवे होते व मग सांगायला हवे होते असे म्हण ते. घोड चुका कळत नाहीत का ह्यांना?! दादांनी नंदिनीला इतके स्वा तंत्र्य का दिले आहे असे विचारत होती. आदितीची पण काही स्टोरी असेलच. उर्मी काढेल माहिती.

काय तर म्ह्ने नंदिनीला आपण मुलगीच मानलं आहे आणि तिचं सुख पाहणं आपलं कर्तव्यच आहे. आधी स्वत:च्या मुलीचं सुख कशात आहे ते पहात नाहीयेत. चाललेत समाजसेवा करायला.

तसे नाही ते. आपल्या मुलाबाबतीत चूक केली तर समजू शकतो पण दुसृयाच्या मुलीच्या बाबत ते देखिल तिचे आईबाबा आता हयात नाहीत तेव्हा चूकझाली किम्वा केली तर ते बरोबर ठरणार नाही म्हणून तिला शक्य तितक्या संधी देत आहेत. न उखडता. माझी तर खू प इच्छा आहे नंदिनीने बाहेर पडून शिक्षण घ्यावे व आपल्या पायावर उभे राहून दाखवावे. आपल्या आवडीनेच लग्न करावे. दादा वासू गेले खड्ड्यात.

मला आवडते ती नंदीनी . मस्त आहे . थोडीशी हट्टी , थोडीशी आगाउ - आपली मन्मानी करणारी . उर्मीचा राग करणारच ना ती. तिचा तो साडी चा सीन जरा अति वाटला , नाहीतर बाकी आवडते ती . गबाळी असली तरी. Happy

उर्मी पतसचिवांच्या घरी गेल्यापासुन बघण्यालायक वाटतेय ही शिरेल . अजुन तरी ती मुळु मुळु गळा काढु नै झालीय. होपफुली होणार ही नाही Happy

कालचा एकुण भाग बरा झाला. समथिंग इज हॅपनिंग अस वाटुन गेल. उर्मी म्हणते नंदिनी हुशार आहे तिला नीट शिकवल तर ती चांगल शिकेल पण ती तिचा सगळा वेळ वाया घालवते आहे.

मला हे कळत नाही की उर्मी सारखी मुलगी वटसावित्री च्या पुजेसाठी कशी काय तयार झाली?

हे वटसावित्री पुजेचे पर्यावरणाशी जोडणे म्हणजे कैच्याकै. "आम्ही कसे वेगळ्या विचारान्चे आहोत" हेच दाखवायचे असते त्यान्ना. तसेही पन्ताचे विचार कधीपासून एवढे आधुनिक झाले?

मला हे कळत नाही की उर्मी सारखी मुलगी वटसावित्री च्या पुजेसाठी कशी काय तयार झाली? >>>>>> धाकट्या पंतसचिवांचा स्पष्टपणे न बोलण्याचा वाण नाही पण गुण लागला सुनबाईंना.. तो तिला शंभरवेळा सांगत असतो की तु माईला स्पष्टपणे सांग पण हिचच चालु असत मला त्यांना दुखावण नाही जमणार वै वै..

तसेही पन्ताचे विचार कधीपासून एवढे आधुनिक झाले? >>>> पंतांचे विचार काही आधुनिक बिधुनिक झालेले नाहीत, वटसावित्रीच्या दिवशी वडाची झाडं लावायची उर्मीची आयड्या वासुने सुनिलकरवी पंतसचिवांपर्यंत पोचवली..

त्यांनी वडाची झाडे लावली पण घरच्या पुजेत एक वडाची फांदीपण होती Angry

आणि वडासारखी मोठी झाडे अशी रँडम कुठेही लावलेली चालतात का? काही वर्षांनी त्यांचे मोठे वृक्ष होणार ना. मग नीट प्लॅन करुन लावायला पाहिजे ना.

त्यांनी वडाची झाडे लावली पण घरच्या पुजेत एक वडाची फांदीपण होती >>>> हो. हे चुकलच.. खरतर माईंनी दिलेल्या एक्स्प्लनेशनप्रमाणे त्यांनी पाटावर वडाची रांगोळीच काढलेली दाखवायला हवी होती.. त्यांनी रांगोळी तर दाखवलीच पण फांदी पण दाखवली जे चुकीच आहे.

Pages