युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काकवी मी कणकेची गोड धिरडी (लहान आकारातली) आणि रव्याचे गोडाचे आप्पे करताना वापरली होती. घरी दोन्हीही आवडले.

गाजर हलवा - अर्धी साखर आणि अर्धी काकवी घालून.
ज्वारी आणि रव्याचा केक - पाउण कप काकवी घालून (साखरे ऐवजी)
एगलेस जिंजरब्रेड कूकिज - यात अर्धा कप काकवी. (रेसिपी गूगल करा)

काकवीसाठी: काकवी-चपाती (चहा चपाती धर्तीवर) खाऊन संपवण्यास हातभार लागेल.
(शिवाय ही जोडी तुमच्या आवडीच्या पदार्थांच्या यादीत स्थानबद्ध होण्याची शक्यता आहेच.)

चॉकलेटांसाठी: हापिसात रोज दोन तीन घेऊन यावे आणि दुपारच्या जेवणानंतर वाटून खावीत. Happy

तोंदल्यांच्या भाजीत हरभरे घातल्यास छान लागते असे आज लक्षात आले.

काकवीसाठी: काकवी-चपाती (चहा चपाती धर्तीवर) खाऊन संपवण्यास हातभार लागेल.
(शिवाय ही जोडी तुमच्या आवडीच्या पदार्थांच्या यादीत स्थानबद्ध होण्याची शक्यता आहेच.) >> हा प्रकार आवडीचा आहेच त्यामुळे पाव लिटर काकवी संपली आहे. फक्त खाणारी व्यक्ती एकच आहे त्यामुळे संपत नाहीये.

काकवी म्हणजे प्युअर शुगर फार खाउ नका वजन वाढेल. संपवायच्या नादात. त्याचे कॅरेमल करून तुकडे करून आइस्क्रीम वर घालता येइल का ती ट्रायल घ्या. ते जास्त दिवस टिकेल.

काकवी म्हणजे प्युअर शुगर फार खाउ नका वजन वाढेल >> करेक्ट..

त्यामुळेच ती पोळी बरोबर खाता येत नाहिये..

धन्यावाद मॅगी

आशुडीचा प्रश्न मलाही पडलाय. डबाभर चॉकलेट्स, टाकुनही देववत नाहीत आणि खाववतही नाहीत..

काकवी खोकल्यावर उपयुक्त असते. औषधासाठी म्हणुन ठेवा घरात.

वा वा योडे. मॅगी, विपूत कशाला बाहेरच लिहीकी मूस ची पाकृ. शोधायला सोपे.
चाॅकलेटं वितळवून सिरप करता येईल का टाॅपिंग म्हणून वापरायला?

योडे, अगं विपुमध्ये लिहिली रेसिपी पण ती सेव्ह नाही झाली.
आशु, आता वाच इथेच आणि हँड ब्लेंडरचं उदघाटन कर Happy

चॉकलेट मूस

साहित्य
4 अंड्यातलं पिवळं
पाव कप साखर
दीड कप हेवी व्हिपिंग क्रीम
1 कप डार्क/व्हाईट चॉकलेटचे तुकडे

कृती
1. हँड ब्लेंडरने अंड्यातलं पिवळं आणि साखर ब्लेंड करा
2. गॅसवर डबल बॉयलर पद्धतीने 1 कप क्रिम गरम करा. गॅस बारीक करा. त्यातलं अर्ध ब्लेंड केलेल्या अंड्यात नीट मिसळा. आता ते गॅसवरच्या क्रीम मध्ये ओतून परत 5 मिनिटं नीट ढवळत (थोडं घट्ट होईपर्यंत) रहा. (उकळी आणायची नाही)
3. दुसऱ्या डबल बॉयलरने चॉकलेट वितळवा, वितळलेले चॉकलेट आधी तयार केलेल्या क्रिममध्ये ओतून नीट ढवळा. गार झाल्यावर बंद डब्यात ठेवून 2 ते 3 तास फ्रिजमध्ये ठेवा.

फ्रिजमधून काढल्यावर एका मस्त ग्लासमध्ये ठेवा वर कॉन्ट्रास्ट रंगाचं चॉकलेट किसून भुरभुरा आणि खुपसा चमचा Happy
उरलेलं अर्धा कप क्रीम केक डेकोशन च्या पायपिंग नॉझल मध्ये घालून सजवा..

काकवी जर नीट वापरली तर बरीच वर्षे टिकते त्यामुळे संपवण्याची घाइ कशाला ? इडली , इडलीच्या पिठाचे सांदण, आप्पे, डोसे या सर्वांबरोबर पण मस्त लागते. काकवी ज्यांना आवडत नाही त्यांना अजिबात आग्रह करु नये अथवा इतर पदार्थात घालून संपवू नये . थोडी थोडी पुरवून पुरवून वापरायची Happy

इडलीबरोबर खाल्ली नाही कधी, हा प्रकार सगळ्यात सोपा आहे Happy

काकवी ज्यांना आवडत नाही त्यांना अजिबात आग्रह करु नये >> याला हजार मोदक

योडी, हाती एग बीटरने फेटलंस तरी चालेल, फक्त जरा जास्त वेळ फेट पाच ते दहा मिन. डीचा नवीन ब्लेंडर आहे म्हणून सांगितलं Happy

अरे लोक्स , काकवीच बोला........ माझ्या पत्यावर पाठवा.कुरियरचा खर्च दिला जाईल. Light 1

काकवी, मेपल सिरप सारखी पॅनकेक, केक, पुदिंग्स, आइसक्रीम्स, टोस्ट वर घालून मस्त लागेल.
मला नैवेद्याच्या वाटीत घेउन बोटानी खायला ही आवडते. Happy

जवसाची पूड करताना जवस भाजून घ्यावेत की न भाजता पूड केली तर चालतय?>>>>>> नाही.जवस भाजूनच घ्यावे.न भाजता जवस घेतले तर त्यातला एक घटक आरोग्यासाठी चांगला नाही.हे वाचलेले,घटकाचे नाव आठवत नाही.

Pages