मध्यंतरी एका समारंभाला जायच होत. काही ही भेट न आणण्याची यजमानांनी विनंती केली होती . मला मनातुन काही तरी द्यावे असे वाटत होते पण काय द्यावे हे सुचत नव्हते. त्याच्याच काही दिवस आधी क्रेपची फुलं करणार्या एका बाईंची मुलाखत वजा माहिती पेपरामध्ये वाचली होती तेव्हा पासून ती फुलं मनात भरली होती. त्यामुळे स्वतः केलेली क्रेपची फुल भेट देण्याचा विचार पक्का झाला. त्यामुळे मला त्यांना स्वतः काही तरी करुन भेट देण्याचा आनंद मिळाला आणि यजमानांच्या विनंतीचा मान ही राखला गेला. यजमान ही ही अनोखी भेट बघुन खुश झाले.
मग नेट वर शोधाशोध सुरु झाली आणि शिकायला प्रारंभ झाला. नेट वर भरपुर महिती आहे त्यामुळे एकच अशी लिंक सांगता येणार नाही. कुठे मी कागद कोणता आणायचा ते शिकले तर कुठे तो कसा धरुन कापायचा हे. . व्हिडिओ बघताना जेवढे सोपे वाटते तेवढे ते प्रत्यक्ष करताना नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच थोडा प्रयत्न केला तर कोणालाही नक्की जमेल हे ही खरे आहे. मला सुध्धा पहिल्या प्रयत्नात नाही जमलं पण हळू हळु लागल जमायला
टीपा :
१) कागद नेहमी डबल क्रेपचा वापरावा. तो महाग असतो साध्या क्रेप पेक्षा पण कागद वळवणे खूप सोपे जाते
२) कात्री थोडी लांब आणि बारीक पात्याची घ्यावी कागद कापताना.
३) पेन्सिल्ने मार्क करुन मगच कागद कापावा व्हिडीओ नीट फॉलो करावा. पहिल्यांदा व्हिडेओ नुसते बघावेत खूप वेळा आणि नंतर त्यातल्या त्यात सोप्या फुलांपासून सुरवात करावी
४) ही फुल घरात ठेवायला छान दिसतात तसेच भेट म्हणुन द्यायला ही सुंदरच वाटतात. स्वतः केलेली असल्याने देणार्याला आणि घेणार्याला ही खूप समाधान मिळते.
५) फुलं धुता येत नाहीत हे खरे आहे पण तसा त्यांना येणारा खर्च अगदीच नगण्य असल्याने खराब झाली की टाकुन देऊन दुसरी करायला ही काही वाटत नाही
६) शाळेतल्या मुलांना कातरकाम खूप आवडते. त्याच्यासाठी सुट्टीत हा खूप चांगला क्राफ्ट पर्याय आहे सोपे सोपे प्रकार त्यांना करता येतील आणि करायला आवडेल ही त्यांना.
हे मी केलेले पहिले काम
हे मी केलेले काही नमुने
१)
From Drop Box
२)From mayboli
३)
From Drop Box
४)
From mayboli
५)
From Drop Box
६)
८)
वा ! मस्त
वा ! मस्त
कस केलत ते ही लिहा ना प्लिज
कस केलत ते ही लिहा ना प्लिज
मनीमोहोर, खूप छान,
मनीमोहोर, खूप छान, नेहमीप्रमाणेच.
पहिलं आणि शेवटचं खूप आवडलं. तुम्ही कोणत्या वेबसाइट वापरल्या वगैरे सांगणार का?
जाई, शुगोल धन्यवाद . लिहीते
जाई, शुगोल धन्यवाद . लिहीते सविस्तर
सगळीच फुल एक नंबर !!!
सगळीच फुल एक नंबर !!!
ममो, खूप सुंदर आहेत सगळीच
ममो, खूप सुंदर आहेत सगळीच फुलं!! पहिलं तर खूपच आवडलं..
सुंदर!
सुंदर!
हेमाताई ग्रेट. आवडली सर्वच.
हेमाताई ग्रेट. आवडली सर्वच. ___/\___ .
मस्तच! ममो ... फार फ्रेश आणि
मस्तच! ममो ... फार फ्रेश आणि कलर्फुल आहेत सगळी फुलं!
ममो तेरे हाथ मे जादू है.. मला
ममो तेरे हाथ मे जादू है..
मला पहिले तीन, पाचव, आणि आठव विषेश आवडल.. मी पन करणार.. हाहाहाहा..
टिने ....काय वाचतीयेस इतक्या
टिने ....काय वाचतीयेस इतक्या रात्री आज? १२.५२ झालेत बघ.
मानुषी , विपू केलीय.. नै तर
मानुषी ,
विपू केलीय..
नै तर ममो चा धागा हायजॅक व्हायचा
ममो, तुमच्या हातात जादु आहे.
ममो,
तुमच्या हातात जादु आहे. सगळीच सुरेख झालियेत पण १,२,३ आणि८ विशेष आवडली.
कृती पण लिहा ना प्लीज.
अतिशय सुंदर फुले.... तुमच्या
अतिशय सुंदर फुले....
तुमच्या हातात जादु आहे. सगळीच सुरेख झालियेत >>>>>+१११११
मस्त आहे. पाकळ्यांचा पोत छान
मस्त आहे. पाकळ्यांचा पोत छान वाटतोय. तो कसा जमवतात?
ममो, खूप सुंदर आहेत सगळीच
ममो, खूप सुंदर आहेत सगळीच फुलं!! पहिलं तर खूपच आवडलं.
ममो.. सगळीच फुल सुंदर
ममो.. सगळीच फुल सुंदर
खुप छान आहेत....रुखवतासाठी
खुप छान आहेत....रुखवतासाठी उत्तम कल्पना आहेत...नक्की करुन बघणार..
वा ममो,किती सुंदर केली आहेस
वा ममो,किती सुंदर केली आहेस फुलं! रंग संगती आणि ताजेपणा लाजवाब .फोटोग्राफीपण कमालिची आहे इतक्या रखरखीत उन्हाळ्यात एकदम फुलांचा बहर आला.तुझ्या हातात तर जादू आहेच पण फुलं बघताना खरच बाहेर पावसाचा शिडकावा झाला .ही जादू काही वेगळीच.खूप मस्त!!
सुंदर !
सुंदर !
अतिशय सुंदर!
अतिशय सुंदर!
खुपच सुंदर..... रंगसंगती छान
खुपच सुंदर.....
रंगसंगती छान आहे. पहिल्या फोटोतल्या फुलामध्ये शेडींग कसे केले??
सुरेख !!!
सुरेख !!!
मस्त एकदम!
मस्त एकदम!
फार सुंदर. हातात सफाई आहे.
फार सुंदर. हातात सफाई आहे.
खुप सुंदर ! अगदी अस्सल
खुप सुंदर ! अगदी अस्सल वाटताहेत.
किती सुंदर फुलं आहेत
किती सुंदर फुलं आहेत सगळीच.
माझ्या लग्नात रुखवत द्या हा मला बनवुन.
व्वा, स्वता: केलेली फुलं भेट
व्वा, स्वता: केलेली फुलं भेट म्हणुन देण्याची कल्पना खुप आवडली...
सगळीच फुले खुप सुरेख..
पहिले फुल खुप जास्त आवडले..
वा ! एकसे एक अप्रतिम झाली
वा ! एकसे एक अप्रतिम झाली आहेत.
आभार सर्वांचे फुलं आवडली
आभार सर्वांचे फुलं आवडली म्हणून. हेडर मध्ये थोड सविस्तर लिहीलयं पण एकच अशी लिंक नाही सांगता येणार जाई शुगोल आणि प्रिया
टीना, तुला सहजच जमतील ही फुलं. तु खरी कलाकार आहेस. करुन बघ आणि इथे फोटो दाखव. सॅटीनच्या रिबीनीची काय सुंदर फुलं केली होतीस तु !!
फुलं बघताना खरचं बाहेर पावसाचा शिडकावा झाला .ही जादू काही वेगळीच. >> मीरा, अगदी बरोबर. खरच छान वाट्त फुल पाहुन
गजानन, त्या डबल क्रेप कागदाचा पोत छानच असतो अर्थात कागदावर काही संस्कार करावे लागतातच. पण तुम्हाला फोटो बघुन जाणवले हे ही तर तुमच्या नजरेची कमाल म्हणावी लागेल . ( स्मित) .
कांचन, तो निळा कागदच खालुन आणि वरुन थोडा वेगळ्या शेडचा होता. ह्याचा फयदा होतो. हवी ती शेड वापरता येते.
माझ्या लग्नात रुखवत द्या हा मला बनवुन.>> स्वरा, नक्की कधी ते सांगच फक्त . मी तयार आहे.
Pages