तरी ही ? -ओलसर जखम तरी

Submitted by साती on 12 May, 2016 - 07:10

ही 'तरी ही?' आहे तरही नाही हे अगोदरच स्पष्ट करते.
'तरी ही ?' म्हणजे लोक म्हणतात ना, लिहितानाच इतकी भिकार लिहिली 'तरी ही' का छापली?
तर या प्रकारची कविता म्हणजे 'तरी ही'

डॉक्टरांवरी उडून फीज भरभकम तरी
लोटला अनंत काळ ओलसर जखम तरी

थंडगार पार्सलास या कसे गिळायचे
मायक्रो करून त्यास कर जरा गरम तरी

वर्ष संपताच पाळणा पुन्हा हलायचा
लेकुरे उदंड मात्र थांबला न क्रम तरी

ही तुझी समीक्षणे कुणा कशी रूचायची
एक चित्र पाहण्यात तीन तास रम तरी

'मी तुझा, तुझाच मी' किती जणींस सांगतो
सोंग हे निभावण्यात लागलाय दम तरी

फोटुशॉपची कृपा विकास हा खरा नसे
काय तू विसंबलास संपलाय भ्रम तरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जमलीय...

मला दुसरा आणि चौथा आवडला.

फोटो चे फोटु हे गणसंख्या जपण्यासाठी केले, हे उघडच आहे.
असे स्वातंत्र्य गझलकारास असते का, ते बघावे लागेल ( सरांना विचारुन )

पण तरी अभिव्यक्ती उत्तमच आहे.

माझी पण याच विषयावरची गझल आहे.. ती स्वतंत्रपणे देतो.

भम, अभिषेक सावंत, दिनेश. धन्यवाद!

दिनेश. नविन धागा काढून द्या तुमची गझल.
हो हो, स्वतंत्र धाग्यातच द्या. नाहीतर तुमच्या प्रतिभेच्या तेजाखाली माझी प्रतिभा झाकोळून जाईल.
Wink

वा वा !

फोटो चे फोटु हे गणसंख्या जपण्यासाठी केले, हे उघडच आहे >>>

दिनेशटिंबदा,

आपल्या शंकेला सध्या तरी उत्तर मिळनार नाही अशी भीती वाटतेय ( आय यम अफ्रेड चं भाषांतर ) . सध्या गझलेत पूर्णविराम असावा किंवा नाही, असल्यास त्याचे परिणाम काय होतील या परिसंवादात अनेक गझलकार व्यस्त आहेत.

या उत्तरानंतर कानामात्राउलटीवेलांटीरफारउकार नसलेल्यां आयडींकडून तासली जाण्याची शक्यता असल्याने येथेच थांबतो.

दिनेश टींब आणि कपोचे ,
मी गझल विभागात कविता लिहिली नाही आहे.
माझ्या कवितेला कुठेही गझल म्हटले नाही आहे, यावरून माझा प्रामाणिकपणा लक्षात यावा.

बाकी इंग्रजी o चा उच्चार ओ, ऊ , ऑ असा होताना पाहिला आहे.

आणि फोटो ला फोटु हा शब्द प्रचलित आहे.
ता. क. १- (काही मूठभर लोकांची 'संस्कारित भाषा' म्हणजेच मराठी नव्हे हे लक्षात घ्या. Wink )

ता.क. २- हल्ली गझलेत/कवितांत/ गाण्यात उर्दू, इंग्रजी, हिंदी फार काय स्पॅनिश शब्द पण चालतात तर ग्रामिण मराठी शब्द वापरल्याबद्दल इतकं काय ते एवढं?

मंजुताई, कांदापोहे,
धन्यवाद!

(तेवढेच धन्यवाद देऊन प्रतिसाद वाढवत्येय! )

Wink

तर्री ही आणा एक >> अत्यंत उपयुक्त सूचना.

साती
गझलसदृश्य प्रकार लिहायचा पण त्याला गझल म्हणायचं नाही हे म्हणजे मांडे करायला घ्यायचे पण शेजारणीला मी मांडे करते हे सांगायचं नाही असंच झालं. थोडक्यात काय तर

गाजराची पुंगी वाजली तर वाजली
पोरगी पटली तर पटली नैतर बहीण माणली

ण बानाचा चुकून झालेलं आहे.

होय कपोचे,
मी पुरणाचे पराठे करत्येय म्हणून सांगते. म्हणजे ते पोलपाटावर लाटून, फाटणारच नाहीत इतक्या बेताचे जाड करता येतात.

मनातले मांडे मनातच खाते किंवा कुठल्यातरी महोत्सवातल्या स्टॉलवर.

सातीतै,
तूम्ही म्हंट्लं नाही, तरी आम्हाला का खरी गझल कळत नाही ? फारच विनयशील बॉ तूम्ही.
प्रत्येक मुशायर्‍यात, हिरहिरीने गझला रेकणे, आपल्या सारख्या प्रतिभावंताला जमणार नाही हे खरेय, पण म्हणून का खाजगी मैफिलीत आपण त्या सादर करु नयेत ?

तर त्या इथे कराव्यातच !

मला वाटते पद्यात लिहीलेल्या गद्य गझल प्रत्येक होतकरूस जमायला हव्यात जेणेकरून खाजगी मैफिलीतून भव्य दालनात गझल पेश करता येऊ शकते. गझल रंजक असण्यापेक्षा रटाळ, कंटाळवाणी असण्याकडे लक्ष पुरवले जावे.

ही 'तरी ही?' आहे तरही नाही हे अगोदरच स्पष्ट करते.
'तरी ही ?' म्हणजे लोक म्हणतात ना, लिहितानाच इतकी भिकार लिहिली 'तरी ही' का छापली?
तर या प्रकारची कविता म्हणजे 'तरी ही'>>>>>

Lol

डायरेक टॉप गीअर !!

दिनेश. , तुमचं मन खूपच मोठं आहे.
धन्यवाद.

कपोचे,
गझलेच्या दोन ओळी सलग वाचल्यावर एक गद्य वाक्य वाचल्याचा फील येऊ नये असे हल्लीच कुणीतरी महान गझलकारांनी लिहिलेले वाचले.
पण गझलेची पहिली ओळ वाचतानाच एखादा परिच्छेद वाचल्याइतका लांब असणे आणि गद्यही असणे माबोवर (तरी) पाहिलेले आहे.
तर त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.

गझल ऐकताना आत्मानंदी टाळी लागल्यास त्या भव्य दालनात गाद्या गिरद्या पांघरूणांची सोयही करण्याचा मानस आहे.

पण सध्या मी कविताच करत्येय.
गझल गृपचं सदस्यत्वही नाही हो घेतलंय!

रूक्ष आणि रखरखीत शब्दांचा वापर आपल्या या गझलसदृश्य (संशयास्पद?) रचनेत असल्याने वैचारीक गझलेकडे आपला प्रवास सुरू आहे कि काय अशी शंका आल्याने गझलेवर करतात तशी चर्चा करण्याचा मोह (संगतीने) झाला.

( गझलेवरील प्रतिसाद कपोचे सरांनी स्वतः दिलेले असून खाद्य पदार्थांचा प्रतिसाद मी लिहीलेला आहे)