वाह...! वाह...! बहावा...!!!
Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
50
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
१०.
११. आणि आता हे कोण महाशय ओळखा पाहू?
विषय:
प्रकार:
शेअर करा
वाह् वाह्
वाह् वाह्![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ब्यूटीफुल.. सोनेरी पसारा..!!!
ब्यूटीफुल.. सोनेरी पसारा..!!!
सुंदर !
सुंदर !
सुपर्ब!!
सुपर्ब!!
गॉर्जीयस! इथे शेअर
गॉर्जीयस! इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!
दिवस आले हे बहाव्याचे पिवळ्या
दिवस आले हे बहाव्याचे
पिवळ्या फुलांनी बहरायचे!
गजाभाऊ, बहाव्याचे सुंदर प्रचि!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोनसळ काय अप्रतिम टिपलियेस..
सोनसळ काय अप्रतिम टिपलियेस.. डोळे निवले गजानन!
दहाव्या फोटोतली पानंसुद्धा सुंदर. तुकतुकीत आणि तेलकट. टिपीकल सदाहरीत झाडाचं द्योतक.
हे फोटो वापरायची परवानगी आहे का?
शेवटचा काय टिकोमा आहे का? फुलांची तोंडं आभाळाकडे आहेत ना? क्लोजप नसल्यामुळे कळत नाहीये नीट. पण टिकोमा वर्षभर हिरवा असतो आणि सहसा उभा वाढतो. जाणकार सांगतीलच.
गजाननराव..... ~ समोर असता
गजाननराव.....
~ समोर असता तुम्ही आता तर...? मी काय केले असते ? बस्स...नजरेने तुम्ही ओळखले असते मला झालेला अतीव आनंद ह्या बहावाच्या खजिन्यामुळे. दोनच दिवसापूर्वी याच विषयावर फ़ेसबुकवरील एका सदस्येसमवेत आनंददायी चर्चा करत होतो....तिथे एकच प्रचित्र होते....तर इथे सारे गावच फ़ुलले आहे....सोनरंगासोबतीने तो हिरवाही असा फ़ुलला आहे जणू बालकवींच्या कवितेमधील रावा.
"लुटून भांडार तिचे प्रयत्ने
आणीन सारी जमवून रत्ने;
सुवर्णरज्जूंत तया गुंफ़ून
सुपद्यमाला स्वकरी करीन....."
कवि माधवानुज यांच्या एका कवितेतील हे एक कडवे....तुम्ही बहाव्याला पाहून एक प्रकारे स्वकरी सुपद्यमाला रचली आहे.....थॅन्क्स फ़ॉर धिस मच जॉय.
(सई चा प्रतिसाददेखील सोनसळीगत देखणा आहे.)
शेवटचा काय टिकोमा आहे का?
शेवटचा काय टिकोमा आहे का? फुलांची तोंडं आभाळाकडे आहेत ना? क्लोजप नसल्यामुळे कळत नाहीये नीट. पण टिकोमा वर्षभर हिरवा असतो आणि सहसा उभा वाढतो. जाणकार सांगतीलच. >>>>>> सई - जबरी निरीक्षण....
ती ही फुले आहेत ------ तबेबुया
Common name: Caribbean Trumpet Tree, Silver Trumpet Tree, Yellow Tabebuia
Botanical name: Tabebuia aurea Family: Bignoniaceae (Jacaranda family)
गजानन - बहावा मस्त टिपला आहे....
सई आणि अशोकमामा - सुंदर प्रतिसाद...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहावा वा मस्त. मला खूप आवडतो.
बहावा वा मस्त. मला खूप आवडतो.
ही प्रचि कुठली आहेत माहीत नाही पण नळ स्टॉपकडुन म्हात्रे पुलाकडे जाताना रस्त्यात बहावा अतिशय मस्त फुललेला असतो.
शशांक.... "जकरंद" चा उल्लेख
शशांक....
"जकरंद" चा उल्लेख आला वरील परिचयात ते आवडले....चटदिशी गुगलरावांची मदत घेतली आणि फॅमिली पाहिलीसुद्धा. त्यात नारिंगी रंगही दिसले....ते फुलेही अशीच आकर्षक....लक्ष वेधून घेणारी.
ते तिकोमाच झाड आमच्या शेजारी
ते तिकोमाच झाड आमच्या शेजारी पंजाबी फॅमिली रहायची त्यांच्या बंगल्याच्या आवारात होत. एखादवेळेस फुलपुडी आली नसेल घरी तर तिकोमाच्या दोन-तीन गुच्छात आमच्या घरची देवपुजा व्हायची. नंतर त्यांनी काढुन टाकल ते झाड.
येस नताशा तो अख्खा दुभाजकच
येस नताशा
तो अख्खा दुभाजकच बहावामय असतो ह्या दिवसात.
त्यातही सुरुवातीला सगळी पानं झडून नुसती झुंबरं आणि आता गच्च हिरव्या पसा-यासकटची झुंबरं असा मोहवून टाकणारा प्रकार आहे.
शशांक, थँक्स! केवळ रंगाची छटा आणि आभाळमुखी फुलं बघून अंदाज बांधला. चक्क बरोबर निघाला
पण टिकोम्याची पण पानगळ होते का? ह्या पिवळ्या छटेला नेमका मराठी शब्द शोधण्यासाठी मधे वाचन वेल्हाळवर मस्त चर्चा झालेली.
अरे आमच्या बावधनमधे सुद्धा
अरे आमच्या बावधनमधे सुद्धा बायप्रास रोड वर काय घोस दिसले होते बहव्याचे!!! मी पुण्याहून मुंबईला निघालो होतो आणि वेळ तिन्हीसांजेची होती. प्रखर उन्हामधे रस्त्याच्या कडेकडेला बहाव्याचे इतके सुंदर तरुन फुलले होते की वह सफर याद रहेगा असे झाले होते. मला ह्याच वेळी माहिती पडले की आमच्या बावधनजवळ एक जुने तळे आहे. बहुतेक राम नगरचा तो भाग असावा. पण तळे फार गोंडस वाटले.
अशोकमामा, मी बहाव्यावरची
अशोकमामा, मी बहाव्यावरची एखादी सुरेख कविता (शोधून मिळतेय का ते!) बघत होतो, पण जमले नाही.
सई, हो वापर ना ही चित्रे.
या शेवटच्या झाडाचे Yellow Tabebuia हे नाव आणि ही झाडे दुर्मीळ होत असल्याचे मला परवा साधनाकडून कळले. याची गुलाबी फुलांचीही एक जात असते असेही कळले.
त्यालाच टिकोमाही म्हणतात का? त्याच्या पिवळ्या रंगातली चमक एकदम हटकेच दिसते हे खरे. मला शेजारी शेजारी याची दोन झाडे माहीत आहेत. त्यातला एक निष्पर्ण तर दुसर्यावर लांबुडकी पाने आणि पानांच्या आकारात सहज मिसळतील अश्या लटकणार्या शेंगाही दिसतात.
सातारा कोल्हापूर महामार्गावरचे विभाजक अशा वेगवेगळ्या सुंदर फुलांच्या झुडुपांनी नटलेले असतात. आणि वेल मेण्टेन्ड वाटतात. मला फार आवडते ती वाट. त्या मार्गावर बहुतेक गुलाबी Tabebuia असावा. पुढच्या वेळी नीट बघेन.
शशांकांनी दिलेल्या माहितीतले ट्रंपेट हे नाव भारी आहे. त्याच्या आणि फुलांच्या आकारावरूच आले असावे.
नताशा, ही प्रचित्रे मुंबईतली आहेत.
प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.
गजानन सुंदर प्रचि मी
गजानन सुंदर प्रचि
मी सर्वप्रथम बहावा बघीतला तो पुण्यातल्या गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या आवारात मला तर त्याचे नाव देखिल माहीत नव्हते तेव्हा.
मनात खोलवर रूतून बसलेला बहावा म्हणजे मुंबईत गोदरेज च्या विक्रोळी च्या आवारात रेल्वेलाईन च्या बाजूला हारीने असलेली झाडे. लोकल गाडीच्या जीव मेटाकुटीला आणणार्या प्रवासात बहाव्याचे दर्शन म्हणजे गात्रांना आनंद देणारा सुखद शिडकावा होता. मी तर व्यवस्थापक गोदरेज कंपनी, विक्रोळी यावर एक पत्र देखिल धाडले होते; आभार प्रदर्शनाचे! पत्राचे उत्तर नाही आले ते सोडा
धन्यवाद गजानन ह्या धाग्याकरता
गजानन , मस्त टिपली आहेत
गजानन , मस्त टिपली आहेत झुंबरं , जीव शांत होतो पाहूनच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुण्यात एन सी एल च्या मार्केट पाशी बहरलेला गुलमोहोर अन त्या बरोबरीनी दिसणारा बहावा आहे. कितीही खराब दिवस गेला तरी हे पाहिल्यावर मन निवलच पाहिजे.
सई ,मलाही पिवळ्या रंगाची विषेशण शोधली होती ते आठवल.
मस्त प्रचि आणि सई, मामांचे
मस्त प्रचि आणि सई, मामांचे प्रतिसाद ... माझ्या इथेही मस्त फुललाय ... तीन चार दिवसात अख्ख झाड पिवळं होईल .... रोज मनसोक्त दर्शन घेतल्याशिवाय चैनच पडत नाही ...
गजानन मस्त फोटो. टिकोमा आणि
गजानन मस्त फोटो.
टिकोमा आणि टॅबेबुईआ वेगळा. वरच्या फोटोत आहे तो टॅबेबुईआ. वर शशांकनी लिहिलय.
मस्तच...
मस्तच...
आहाहा अप्रतिम फोटो
आहाहा अप्रतिम फोटो सर्वच.
डोंबिवलीत पण सध्या सोनमोहर, गुलमोहर, बहावा बहरलेत.
सुंदर फोटो.. अशोक आणि सई,
सुंदर फोटो..
अशोक आणि सई, आपल्या कोल्हापूरात रंकाळा रिक्षा स्टँडजवळ बहाव्याची झाडे आहे, तसा बहावा मी कुठेच बघितला नाही. आणि पिवळा टॅबेबुईया महावीर उद्यानात आहे शिवाय बेळगाव रोडवरही आहे. मातीचा गुण असावा बहुतेक पण खुप तेजस्वी पिवळा रंग आहे त्यांचा.
मस्त वॉलपेपर आलेत
मस्त वॉलपेपर आलेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फार सुंदर आलेत सगळेच फोटो
फार सुंदर आलेत सगळेच फोटो प्रतिसाद ही सगळे माहितीपूर्ण.
दिनेश.... ~ तुम्ही म्हणता तसा
दिनेश....
~ तुम्ही म्हणता तसा बहावा महावीर गार्डन तसेच जिल्हा न्यायायल आवार (कसबा बावडा रोड...सेंट झेव्हिअर्स हायस्कूल परिसर) इथे पाहिला आहे....मात्र रंकाळा रिक्षा स्टॅन्ड आणि एस.टी. बसेस, पाडळकर मार्केट येथील सध्याची गर्दी पाहाता तिथे असलेल्या बहाव्याच्या सौंदर्याकडे कुणाचे कधी (विशेषतः हल्ली) लक्ष जात नाहीच. दम निघतो तिथून बाहेर पडताना.
दिनेश, महावीर गार्डनमधलं
दिनेश, महावीर गार्डनमधलं पाहिलंय. रंकाळ्याजवळचं आता गेल्यावर आवर्जून बघीन. बहर मिळाला नाही तर निदान झाडं तरी.
अप्रतिम प्रचि, मजा आली.
अप्रतिम प्रचि, मजा आली.
सुं द र !!
सुं द र !!
शतःशतः धन्यवाद गजानन!! शब्द
शतःशतः धन्यवाद गजानन!! शब्द नाहीत मनातला आनंद व्यक्त करायला!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनात खोलवर रूतून बसलेला बहावा म्हणजे १० वर्षापूर्वी पर्यंत मालाड पश्चिम द्रुतगती मार्गावर पुष्पा पार्कचे ३-४ व्रुक्ष! सकाळच्या सोनेरी उन्हात चमकणारा तो बहावा बघणे म्हणजे स्वर्गसुख. तेव्हा मला त्याचे नाव माहीत नव्हते.
ते तोडल्यावर बर्याच ठिकाणी १-२ छोटी झाडे बघितली. हल्लीच दोन भरलेली झाडे बोरिवली आणि दहिसर मधे दिसलेत पण भर दिवसाच्य कडकडीत उन्हात अजुन बघायचीत...
व्वाह ! हा असा रणरणत्या
व्वाह ! हा असा रणरणत्या उन्हाला वाकुल्या दाखवत किती भरभरून फुलतो. घोसच्या घोस! विलक्षणच सगळ!
बाकी झाडे कोमेजलेली असतांना हा आपला तुकतुकीत!
मस्तच गजाननजी! छान टिपलाय बहावा!
आमच्या ऑफिसच्या जवळ बसमार्गावर होता… अगदी गुडघ्याएवढ्या उन्चीचा! भर उन्हाळ्यात सगळ्या बाजूंनी झुंबरे लटकलेली! बघतच बसावं त्याच्याकडे...
Pages