Submitted by अजय on 20 April, 2016 - 04:59
ठिकाण/पत्ता:
संभाजी उद्यान जंगली महाराज रस्ता , पुणे
मायबोलीकरांची गटग नेहमीच होत असतात. इतरही अनेक संस्थळे , ब्लॉगर्स यांचीही गटग चालूच असतात. कालच मायबोली व्यवस्थापनाच्या गटग मध्ये एखादे सर्वसमावेशक गटग असावे असा विचार आला आणि तो उपस्थीत सगळ्यांनाच ( ) आवडलाही.
तर हे गटग सगळ्यांसाठीच खुले आहे. हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्या सगळ्यांचे गटग आहे आणि त्यांचे स्वागत आहे.
वेळ : शनिवार ३० एप्रिल दुपारी ५- संध्याकाळी ८ स्थानिक वेळेप्रमाणे
ठिकाणः संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता, पुणे
(वेळ बदलून ५-८ केली आहे. त्या दिवशी ज्याना सुटी नाही त्यांना थोडे सोपे जावे)
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 30, 2016 - 07:30 to 10:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्तुत्य कल्पना ! यायला आवडलं
स्तुत्य कल्पना ! यायला आवडलं असतं पण शनिवारी सुट्टी नसते त्यामुळे जमेलसे वाटत नाही.
शुभेच्छा !
छान! यायला आवडलं असतं पण
छान!
यायला आवडलं असतं पण शनिवारी सुट्टी नसते त्यामुळे जमेलसे वाटत नाही.
शुभेच्छा !>>>>>>>>+१
यायला आवडेल. पण नेमकी त्या
यायला आवडेल. पण नेमकी त्या दिवशी किंवा लगेच १-२ दिवसांत परीक्षा ठेवली तर नाही जमायचं.
ऐन वेळी आलं तर चालंल का?
प्रज्ञा९, चालेल. संभाजी
प्रज्ञा९,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चालेल. संभाजी उद्यान आपलंच आहे.
छान कल्पना आहे. जमल्यास हजेरी
छान कल्पना आहे. जमल्यास हजेरी लावणार.
कार्यक्रमाची रुपरेषा इथे देणार का? आय मिन- meet-n-greet आहे की स्पीचेस वगैरे?
प्रेमी गटग म्हणून संभाजी बाग
प्रेमी गटग म्हणून संभाजी बाग असेल तर प्लॅन बी तयार ठेवावा लागेल. हाकललं जाण्याची दाट शक्यता.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सिरीयसली, ठिकाण अगदीच बोर आहे. आणि सुट्ट्यांमधे तिथे जी काही गर्दी असते ती पाहता दुसरीकडे भेटणं बरं पडेल.
हर्पेन , शोभा गटग ची वेळ ५ ते
हर्पेन , शोभा
गटग ची वेळ ५ ते ८-८:३० केली तर ज्याना सुटी नाही त्यांना जास्त सोपे जाईल का? मला ७:३० नंतर मुंबईला जायचे आहे पण गटग सुरु ठेवता येईल.
सनव
सगळ्यांच्या भेटी , गप्पा होतील इतका साधा कार्यक्रम आहे. "स्पीचेस" वगैरे सांगितले तर लोक घाबरून येणारच नाहीत.
आशूडी, तुमच्याकडे प्लॅनबी साठी काही कल्पना आहेत का? गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही.
वेमा, गटग ची वेळ ५ ते ८-८:३०
वेमा,
गटग ची वेळ ५ ते ८-८:३० केली तर >>> मला चालेल. सात सव्वासात पर्यंत पोचता येऊ शकेल. काहीच नाही पेक्षा नक्कीच चांगले.
शिवाय संभाजी बाग असली तरीही दुपारी ४ वाजता उघड्यावर हवा अंमळ गरमच असेल असेही वाटते. त्यामुळे गटग साठी ५ ते ८-८:३० ही वेळ सगळ्यांनाच स्वागतार्ह असायला हरकत नाही.
गटग ची वेळ ५ ते ८-८:३० केली
गटग ची वेळ ५ ते ८-८:३० केली तर>>>>>>>>..येण्याचा प्रयत्न करेन.
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही.>>>>>>>>.:हहगलो:
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>> हे मायबोलीचे किंवा
>> हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्या सगळ्यांचे गटग आहे >> म्हणजे काय? मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम आपण सगळेच करतो म्हणूनच मायबोलीवर आहोत इतकी वर्ष.
अ-मायबोलीकरांना खुले आहे असं म्हणायचंय का?
अ-मायबोलीकरांना खुले आहे असं
अ-मायबोलीकरांना खुले आहे असं म्हणायचंय का? >>> आणि तसे असेल तर अ-मायबोलीकरांनी नोंदणी कशी करायची ?
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही. >>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही >>>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
हे मायबोलीचे किंवा
हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्या सगळ्यांचे गटग आहे >>
जरा कन्फुजिंग वर्डिंग आहे. सरळ सरळ गटग असे संबोधता येईल की. आणि जर हे मायबोलीकरांचे गटग नसेल तर पुण्यात / महाराष्ट्रात असे मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्या सगळ्यांचे गटग आहे असे सांगीतले जाणार आहे का? कसे? आणि जर मराठी संस्कृतीवर प्रेम करणारे १०,००० लोकं आले तर संभाजी बागेची जागा पुरणार आहे का?
डोन्ट गेट मी राँग पण मला उत्सूकता आहे की हेच शब्द नक्की का वापरले आहेत.
मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्यांच्या ह्या गटगला शुभेच्छा.
प्लॅन बी तयार ठेवावा लागेल
प्लॅन बी तयार ठेवावा लागेल >>> ९ परीक्षा नको म्हणतेय आणि तुम्ही प्रश्नपत्रिका काढायला सुचवताय?
डावीकडच्या चवथ्या चेहर्याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही >>>>![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
हे गटग अ-मायबोलीकरांसाठीही
हे गटग अ-मायबोलीकरांसाठीही खुलं आहे. मायबोलीखेरिज इतर संस्थळांवर, ब्लॉगांवर लिहिणार्यांनीही या गटगला आवर्जून हजेरी लावावी, अशी इच्छा आहे.
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या
गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही >> तर मग ह्याला गटग ऐवजी गुटुर्गु म्हणाव का?![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
यायला आवडलं असतं पण तेव्हा
यायला आवडलं असतं पण तेव्हा पुण्यात नसल्याने जमत नाहीये![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ही कल्पना नीट समजली नाही .
ही कल्पना नीट समजली नाही . या गटग चा उद्देश काय आहे?
हे वेगवेगळ्या साइट वर लिहिणारे ब्लॉगर्स, किंवा ऑनलाइन मराठी साहित्य लिहिणार्या - वाचणार्यांसाठी गटग असं काही अपेक्षित आहे का? नुस्तं मराठीप्रेमी म्हटल्याने कन्फ्युजिंग वाटले. या क्रायटेरिआत तर लाखो लोक बसतील की!
डावीकडचा दुसरा चेहरा काही
डावीकडचा दुसरा चेहरा काही गांभीर्य त्यागेना!
दुर्दैवाने त्यादिवशी येथे नाही. आवडले असते.
(अवांतर - वेमासाहेब, काही विनोद आपण आपल्या 'ड्यु आय डी' ने केलेले बरे दिसतील ना?
)
बाकी ब्लॉगर्स आणि संस्थळावरही
बाकी ब्लॉगर्स आणि संस्थळावरही याची जाहिरात करावी लागेल ना? मायबोलीवर लिहीले तर फक्त मायबोलीकरच येतील.
मला या गटगमधे आणि बाकी होणार्या मायबोलीच्या गटग मधे फारसा फरक वाटत नाहीये, कारण आपल्या नेहमीच्या मायबोलीच्या गटगमधेही अ-मायबोलीकरपण येतात ना बर्याच वेळा. कुणाचे बेटर हाफ म्हणून किंवा मित्र मैत्रिण म्हणून. तसंच जनरल गप्पा असं स्वरूप आहे की मराठी साहित्य इत्यादीवर चर्चा वगैरे?
भारतात असते तर नक्की आले असते, मजा करा.
अब हम आयेंगे तो ब्लॉगर की
अब हम आयेंगे तो ब्लॉगर की हैसियतसे या मायबोलीकरकी हैसियतसे???
८-९ मेला गटग असतं तर नक्की आले असते. ३० ला शक्य नाहीय.
मजा करा, गटगला शुभेच्छा. पण
मजा करा, गटगला शुभेच्छा.
असं नसणार, जनरल गप्पा, मज्जा असणार. शुभेच्छा.
पण मराठी भाषा प्रेमींचे गटग म्हणजे संभाजी बागेत मंडप टाकून मराठी भाषा कशी वाचवायची यावर बटाटेवडे खात रस निष्पत्ती करत रसभरीत चर्चा करतायत, ठराव पास होतायत अस काही तरी समोर येतंय.
>>मला या गटगमधे आणि बाकी
>>मला या गटगमधे आणि बाकी होणार्या मायबोलीच्या गटग मधे फारसा फरक वाटत नाहीये, कारण आपल्या नेहमीच्या मायबोलीच्या गटगमधेही अ-मायबोलीकरपण येतात ना बर्याच वेळा. कुणाचे बेटर हाफ म्हणून किंवा मित्र मैत्रिण म्हणून>> सहमत. जनरली मायबोलीकर (बाकी संस्थळांशी संबंध, अनुभव नाही) जमले की त्यांचाच एक कल्ट तयार होतो आणि गप्पाही तशाच असतात. त्यामुळे ह्या गटगला बाकी संस्थळांची लोकं आली तर त्यांचेही गृप्स तयार होणारच की. मग पॉईंट काय नक्की?
आशूडी, तुमच्याकडे प्लॅनबी
आशूडी, तुमच्याकडे प्लॅनबी साठी काही कल्पना आहेत का?>> हो, पु.ल. देशपांडे उद्यान खूप छान अशा गटगंसाठो. अर्थात, ठिकाणापेक्षा भेट महत्त्वाची.
वेमा, बायपार्टिसन पॉलिटीक्स्
वेमा,![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बायपार्टिसन पॉलिटीक्स् सारखं काहितरी आहे का? आइल च्या दुसर्या बाजूच्या लोकांनां प्रेमाने हाक?
यायला आवडलं असतं पण फिजीकली येणं जमणार नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अमित,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फिजीकली येणं जमणार नाही >>>
फिजीकली येणं जमणार नाही >>> सशल ८ दिवस आहेत अजून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"बाय" पार्टिसन? हे पुणं आहे. मल्टीपार्टिसन रीच आउट करावे लागेल. आणि संभाजी पार्कात आईल पलीकडच्या लोकांना प्रेमाने हाक मारतानाही सांभाळून.
प्रा . सतीश वाघमारे येरवडा
प्रा . सतीश वाघमारे येरवडा पुणे मोबाईल नंबर , 7276002467 , तुम्हा सर्वांना भेटायला आवडेल .
>> "बाय" पार्टिसन? हे पुणं
>> "बाय" पार्टिसन? हे पुणं आहे. मल्टीपार्टिसन रीच आउट करावे लागेल
मायबोली इनिशियेट करत आहे म्हणून "बाय".
(तो बायनरी वरचा जोक आठवला. There are ten kinds of people in this world. Those who understand binary and those who don't?)
मी किंवा सेक्रेटरी , कुणीतरी
मी किंवा सेक्रेटरी , कुणीतरी एक येईल.
Pages