मराठी भाषा प्रेमींचे गटग

Submitted by अजय on 20 April, 2016 - 04:59
ठिकाण/पत्ता: 
संभाजी उद्यान जंगली महाराज रस्ता , पुणे

मायबोलीकरांची गटग नेहमीच होत असतात. इतरही अनेक संस्थळे , ब्लॉगर्स यांचीही गटग चालूच असतात. कालच मायबोली व्यवस्थापनाच्या गटग मध्ये एखादे सर्वसमावेशक गटग असावे असा विचार आला आणि तो उपस्थीत सगळ्यांनाच ( Happy ) आवडलाही.

तर हे गटग सगळ्यांसाठीच खुले आहे. हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्‍या सगळ्यांचे गटग आहे आणि त्यांचे स्वागत आहे.

वेळ : शनिवार ३० एप्रिल दुपारी ५- संध्याकाळी ८ स्थानिक वेळेप्रमाणे
ठिकाणः संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता, पुणे

(वेळ बदलून ५-८ केली आहे. त्या दिवशी ज्याना सुटी नाही त्यांना थोडे सोपे जावे)

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 30, 2016 - 07:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी किंवा सेक्रेटरी , कुणीतरी एक येईल. >>

तुम्ही गेलात तर मराठी भाषा प्रेमींचे गटग होईल. पण सेक्रेटरीला पाठवलं तर ते 'प्रेमींचे गटग' होऊ शकते. आणि प्रेमींच्या गटगला पुण्यात, संभाजीबागे इतकी छान जागा कुठेही सापडणार नाही. तस्मात नेहाला पाठवा.

गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्‍याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही >>> Lol
ह्या बाफचं टायटल ' मराठी प्रेमींच गटग' असच वाचलं जातयं Proud

गटग मधेच डावीकडच्या चवथ्या चेहर्‍याकडे बघून कुणी प्रेमात पडले आणि तिथून पुढे दोघांनी आपले स्वतंत्र गटग केले तर आमची ना नाही >> Lol
>> तर मग ह्याला गटग ऐवजी गुटुर्गु म्हणाव का?>> Lol

रॅशनॅलिस्ट्स, सेक्युलर आणि अनिवासी भारतीय यांच्यामुळे मराठी संस्कृती धोक्यात आली आहे काय? असा एक परिसंवाद हातासर्शी उरकून घेता येईल का?

संभाजी उद्यानातील आडोशाच्या जागा सार्वजनिक करून प्रेमी युगुलांच्या अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी करण्याच्या संस्कृतीरक्ष्कांच्या दबावाला पुणेकर आणि प्रशासन बळी पडले आहे काय...

असा एक उपपरिसंवाद उरकून समतोल देखील साधता येईल.

आभार मानण्याचा कार्यक्रम गंधर्व की सुकांता है निश्चित करण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी. अन्यथा या विषयावरून बाफला टाळे ठोकण्याची पाळी येईल.

गटगला शुभेच्छा
मराठी भाषा प्रेमी असूनही पुणेकर नसल्याने जमणार नाही . तस्मात लोकहो मजा करा , इथे वृत्तांत लिहा Happy

हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्‍या सगळ्यांचे गटग आहे >> अजून कोणाकोणाला बोलावणं आहे?

हे गटग सगळ्यांसाठीच खुले आहे. हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्‍या सगळ्यांचे गटग आहे आणि त्यांचे स्वागत आहे.>>
अजेंडा काय आहे गटगचा?

खूप छान कल्पना आहे आणि मलाही यायला आवडले असते. मस्त आमरस करा आणि खा प्या मज्जा करा.

माबो व्यतिरिक्त इतर संकेत स्थळांवरील मराठी लोकांना यायचे असल्यास त्यांच्यापर्यंत ही जाहीरात कशी काय पोहचेल? नाही पोहचली तर परत हे गटग माबोचेच एक गटग होऊन जाईन.

तर हे गटग सगळ्यांसाठीच खुले आहे. हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्‍या सगळ्यांचे गटग आहे आणि त्यांचे स्वागत आहे.>> इतर कोणत्या संस्थळांना आमंत्रण आहे?

संभाजी बागेत जेवण मॅनेज करणार तुम्ही कापोचे. >> नाही. वादाचे मुद्दे आधीच क्लिअर केलेले बरे असं वाटलं.
पाला इत्यादी ठेवावं तर सामिषाहारी नाराज होतील, मटणपुरी ठेवावं तर अमरीश पुरीची मागणी होईल, आमरस पुरी ठेवावी तर मधुमेही नाराज होतील ...

बघितलंत ? सोप्प का आहे ? सूक्ष्मनियोजन आवश्यक.
शेवटी काय तर भरलेल्या पोटी परंपरेच्या नाड्या ओवून संस्कृतीचे पायजमे शिवणे सोप्पे जाते हेच खरे !!

सई अगदी मनातील बोललिस. माबोकरांना गटग काही नवीन नाही. तरी सुद्धा इतके किंतू परंतू.

ह्यांना इतर संकेत स्थळांवरील मराठी लोक बहुतेक नको आहेत की काय Sad

मिपा व इतर सोशल नेटवर्क्स शी एकत्र ठरवून हे केले होते का? मिपा वरची लिन्क
http://www.misalpav.com/node/35854

(फक्त सुकांताची कुपने माबोकरांना मिळाली का हे एक कुतूहल आहे Happy )

Pages