मराठी भाषा प्रेमींचे गटग

Submitted by अजय on 20 April, 2016 - 04:59
ठिकाण/पत्ता: 
संभाजी उद्यान जंगली महाराज रस्ता , पुणे

मायबोलीकरांची गटग नेहमीच होत असतात. इतरही अनेक संस्थळे , ब्लॉगर्स यांचीही गटग चालूच असतात. कालच मायबोली व्यवस्थापनाच्या गटग मध्ये एखादे सर्वसमावेशक गटग असावे असा विचार आला आणि तो उपस्थीत सगळ्यांनाच ( Happy ) आवडलाही.

तर हे गटग सगळ्यांसाठीच खुले आहे. हे मायबोलीचे किंवा मायबोलीकरांचे गटग नसून मराठी भाषेवर, संस्कृतीवर प्रेम करणार्‍या सगळ्यांचे गटग आहे आणि त्यांचे स्वागत आहे.

वेळ : शनिवार ३० एप्रिल दुपारी ५- संध्याकाळी ८ स्थानिक वेळेप्रमाणे
ठिकाणः संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता, पुणे

(वेळ बदलून ५-८ केली आहे. त्या दिवशी ज्याना सुटी नाही त्यांना थोडे सोपे जावे)

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 30, 2016 - 07:30 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकांना किती उत्सुकता वृत्तांताची! Lol
गटग झालं. वर नोंदणी केलेल्यातलेही फक्त काही निवडक हुशार मराठी मायबोलीकर आल्याने गटग अगदी खास झाले. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. हास्याची कारंजी उडाली. खूप मजा आली.

मी मोठ्या उत्साहाने ३० एप्रिलला सकाळी १० वाजताच संभाजी उद्यानासमोर पोचलो. पण रस्ता ओलांडून उद्यानाच्या बाजूला पोचेस्तवर रात्रीचे १० वाजले होते. त्यानंतर कुणि तिथे असतील असे वाटले नाही, म्हणजे डावीकडून चौथ्या चेहेर्‍याबरोबर खाजगी, वेगळे गटग करणारे असतील, पण तिथे कसे जायचे?

जाऊ दे, पुढल्या वेळी रिक्षावाल्याला रिक्षा वळवून योग्य बाजूला थांबायला सांगीन.

आशूला अनुमोदन. इतकं छान, निवांत गटग मुद्दाम ठरवून करायचं म्हणलं तरी होणार नाही.

असं सर्वसमावेशक खुलं गटग ठेवून माबोनं पुढाकाराचं पाऊल उचललं, मोकळा दृष्टीकोन ठेवला. ह्याबद्दल माबोचं, वेमांचं कौतुक आणि अभिनंदन. सगळ्या संस्थळांत माबो ज्येष्ठ आहे, त्याला अनुसरून होतं हे.

गटग खासच होतं.
खास म्हणजे किती खास तर जणू अष्टप्रधान मंडळाची मसलत !
नवरत्नांचा दिवाणे-खास मधला दरबार म्हणणार होतो पण आलेल्यातले एक रत्न लिंबूटिंबू होतं त्याला न मोजल्याने अष्टप्रधान असा बदल केला.

(लिंबूटिंबू - हा मराठीतला एक शब्द देखिल आहे फक्त मायबोलीवरचा एक आयडी नव्हे. याची नोंद घ्यावी कृ. ध.)

हा तर काय सांगत होतो.
गटग खासच होतं.
खास म्हणजे किती खास तर सगळ्यांना सगळ्यांचे सगळे बोलणे ऐकू येत होते.

वरती आशूडीने लिहिलंय त्याप्रमाणे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. पण ती 'रसपुर्ण' हा एक शब्द लिहायला (कशी बरे) विसरली.
मी कार्यबाहुल्यामुळे उशीरा पोचलो आणि मग लगेच रस आला. (बर्फ घातलेला नव्हता) त्यामुळे कुणाचाही घसा बसला नाही. म्हणूनही सगळ्यांना सगळ्यांचे सगळे बोलणे ऐकू येत होते.

हा आणि चर्चा रसपुर्ण होती. मजा तर येणारच !

सगळ्यांना सगळ्यांचे सगळे बोलणे ऐकू येत होते राव ! मजा आली.

>>(लिंबूटिंबू - हा मराठीतला एक शब्द देखिल आहे फक्त मायबोलीवरचा एक आयडी नव्हे. याची नोंद घ्यावी कृ. ध.) Lol

हर्पेन Lol

सई, आशूडी>> +१
खरंच निवांत गटग झालं आणि चक्क सगळेच एकमेकांशी बोलत आणि एकमेकांचं ऐकतही होते! Proud

माझं आजचं माबो वय 10 वर्ष 4 दिवस
म्हणजे मायबोलीवर दशकपुर्ती झाली की...
मला आपल्या गटगच्या दिवशीच अकरावं लागलं बहुतेक Proud
आधी माहीत असतं तर साजरं तरी केलं असतं राव !

रसपान झाले हा मजकूर सुटला होता. मेन कोर्स मधे काय होतं ?

रच्याकने , खानपान विषयक गप्पा चालूच आहेत तर हा व्हिडीओ शेअर करावासा वाटला.

जेव्हां मध्यमवर्गीय कुटुंब जेवायला बाहेर जातं..
https://www.facebook.com/ppvabj/videos/540952552743838/

Pages