मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पालेकर.
माझ्या आधीच्या गोष्टीला ज्यांनी अभिप्राय दिले आणि मला उत्तेजन दिले त्यांचे मनपुर्वक आभार.
एकदा मी आणि माझ्या college च्या मैत्रिणी माझ्या अमरावतीच्या घरी गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात माझी आत्या - आवडाबाई - आली आणि ती पण आम्हाला सामील झाली. आम्ही एका मैत्रिणीच्या लग्नाविषयी बोलत होतो. तेव्हा आत्याने मला म्हटले तुला तुझ्या आईच्या लग्नाची गोष्ट माहिती आहे का? सगळ्यांनी उत्सुकता दाखवल्यावर तिने गोष्ट सुरु केली.
आवडाबाई -- "तुझ्या आजोबांनी तुझ्या आईचे लग्न ठरविले. त्या काळात लहान वयात लग्न होत. तुझी आई सगळ्या मोठी. लग्नाची तयारी सुरु झाली. लग्न तीन दिवसावर आले. मांडवाची तयारी सुरु झाली ओझारकरांच्या वाड्यात.
तेव्हा तुझ्या आजीला पाच का सहा महिन्यांचा मुलगा होता. त्याला पाळण्यात निजवून कामे चालली होती.
आम्ही सगळे लाडू बनवत होतो. तेवढ्यात तुझ्या आजीची किंकाळी ऐकू आली आतमधून. मी धावत गेले. बघते तर काय तुझी आजी रडत होती जोरजोरात. पाल्ण्याटला मुलगा श्वासच घेत नव्हता. अचानक श्वास बंद झाला होता त्याचा. डॉक्टरला बोलाविले. आजोबांना कोर्टातून बोलाविले. डॉक्टरांनी फार प्रयत्न केले. पण दुर्दैवाने ते काही करू शकले नाही. त्या मुलाचा -- म्हणजे तुझ्या आईच्या भावाचा मृत्यू झाला.
काय करावे? सगळे शोकाकुल. तुझ्या आईचे लग्न जिथे ठरविले होते -- मोठे जहागीरदार होते ते -- त्यांनाहि कळविली. ते आले. बराच खल झाला. काही लोक म्हणे लग्न मोडा. काही म्हणाले मुलगा तर फार लहान होता. असे होतच. लग्न होऊ द्या. मुलाचे वडील हो म्हणत होते. पण मुलाचा काका अडला होता. शेवटी लग्न मोडले.
तुझ्या आजोबांवर तर दोन संकटे. एकीकडे मुलगा गेला. आणि दुसिर्कडे मुलीची चिंता. काय करावे. मांडव लागलेला. मुलीचे पुढे काय होणार? कोण करणार लग्न? फार काळजी. फार गंभीर. आशा मुलींची लग्ने होत नसत नंतर. तेव्हा आशा गोष्टी फार असायच्या.
तर कोणीतरी तुझ्या आजोबांना एका प्रसिद्ध स्वामींकडे नेले. आजोबांनी सांगितले त्यांना सगळे. स्वामींनी ध्यान लावले आणि ते म्हणाले. "चांगले झाले मोडले. समजेल तुम्हाला. तुमचा कोणी भाचा आहे का जो इंदोरला असतो? त्याच्याशी करून द्या."
आवडाबाई ने गोष्ट सुरु ठेवली. "तुझ्या आजोबांचा दूरचा भाचा -- म्हणजे माझा भाऊ -- होता इंदोरला. Law शिकायला. तेव्हा आतेघरी मुलगी द्यायचे. झालं आजोबांनी माझ्या वडिलांशी बोलणी केली. सगळे तयार झाले. पण माझा भाऊ, म्हणजे तुझे होणारे वडील, होता इंदोरला. त्याला तार केली -- ताबडतोब निघून ये. तेव्हा फोन नव्हते. त्यामुळे मुलाला काही माहित नाही का बोलावले इतक्या तातडीने. ईकडे मुलगा येणार का नाही हेही माहित नाही.
माझा भाऊ जेव्हा आला बडनेरा स्टेशन वर तेव्हा तो वरात बहुन चकित. विचारतो कोणाची वरात तर समजले त्याचीच स्वतःची. त्याला तोपर्यंत माहीतच नव्हते. स्टेशन वरून सरळ मांडवात." हे सगळे आठवून आवडाबाईला इतके हसू फुटले कि आम्ही सगळे म्रेत्रिणी हसू लागलो.
आवडा आत्याने पुढे सांगितले. "नंतर समजले कि तुझ्या आईचे ज्या मुलाशी आधी लग्न ठरले होते तो मुलगा काही महिन्या नंतर वारला. तेव्हा सगळ्यांना समजले गुरुजी असे का म्हणाले होते कि लग्न मोडले ते बरे झाले."
ब्रह्मदेवानी ज्या गाठी जोडल्या त्या तुम्ही चुकवू शकत नाही. हे माझ्या आई - वडिलांच्या लग्नामुळे माझ्या डोक्यात बसून राहिले.
गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली.
मामी + १
मामी + १
छान हो पद्माआजी! मजा येत्येय
छान हो पद्माआजी!
मजा येत्येय तुमच्या गोष्टी वाचताना.
दुपारच्या निवांत वेळेत
दुपारच्या निवांत वेळेत माजघरात आज्या, माम्या, मावश्यांच्या गोतावळ्यात बसून गोष्टी ऐकतोय असं वाटतंय. मस्त फीलींग!
अजून येऊ देत>>>>>>>>>>>> अगदी
छान आहे गोष्ट. नवरा मुलगा
छान आहे गोष्ट. नवरा मुलगा विचारतो की वरात कोणाची
असाच गोष्ट चा खजाना उधळ्त
असाच गोष्ट चा खजाना उधळ्त रहा.
गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी
गोष्ट अशी घडली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितली...... छान वाटतंय हो ऐकताना म्हणजे वाचताना .
दुपारच्या निवांत वेळेत
दुपारच्या निवांत वेळेत माजघरात आज्या, माम्या, मावश्यांच्या गोतावळ्यात बसून गोष्टी ऐकतोय असं वाटतंय. मस्त फीलींग!>>>>>>> +१
वाचयाला आवडतंय.
आजीबाई... येऊ देत अजून मस्त
आजीबाई... येऊ देत अजून मस्त मस्त गोष्टी....
गोष्ट सांगणं ही एक कला आहे
गोष्ट सांगणं ही एक कला आहे आणि ती तुम्हाला खाशी अवगत आहे असं दिसतंय.
आम्हाला ही गोष्ट नुसती वाचून इतकी मजा येत असेल तर प्रत्यक्ष तुमच्या भोवती बसून ही किंवा अजून गोष्टी ऐकायला किती मजा येईल याची कल्पना करत बसले मी.
प्लिज अजून लिहा. खूप जवळच्या वाटतात या गोष्टी.
मला माझी आजी आठवली. तीही अशाच
मला माझी आजी आठवली. तीही अशाच गोष्टी सांगते.
मस्त गोष्ट. आज्जीची आठवण आली.
मस्त गोष्ट. आज्जीची आठवण आली.
आहा.. हि पन छान..
आहा.. हि पन छान..
पद्मा आजी , तुमच्या गोष्टी
पद्मा आजी , तुमच्या गोष्टी ऐकून (हो कारण त्या वाचताना ऐकल्या सारख्याच वाटतात) खूप मस्त वाटतेय. मलाही आज्जीची आठवण आली.
पुन्हा एकदा लहान झाले मी. अस
पुन्हा एकदा लहान झाले मी. अस वाटलं कि आजीच्या मांडीवर झोपले आहे मी आणि आज्जी तिची बोट नाजुकपणे माझ्या केसांतून फिरउन मला गोष्ट सांगतेय…
Saadhi pan chan gosta aahe.
Saadhi pan chan gosta aahe.
दुपारच्या निवांत वेळेत
दुपारच्या निवांत वेळेत माजघरात आज्या, माम्या, मावश्यांच्या गोतावळ्यात बसून गोष्टी ऐकतोय असं वाटतंय. मस्त फीलींग!>>>>>अगदी हेच म्हणायचे आहे.
मस्त गोष्ट. आज्जीची आठवण आली.
मस्त गोष्ट. आज्जीची आठवण आली.