कपड्यांच्या फॅशन

Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35

कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित , अमेझॉन वर palazzo suits for women म्हणून सर्च कर . काही काही क्लासी डिझाईन्स आहेत.

फ्रन्ट कट असल्यावर साइड कट असेल की नसेल.
मी कुर्ता शिवुन घ्यायचा विचार करतेय. पलाझो रेडीमेड घेइन.

उद्या रिपोर्ट देणे करावे . बोरिवलीचं वेस्ट्साईड मात्र एक्दम बोअर आहे .
नुसता फाफट्पसारा आहे . ऑप्शन्स लिमिटेड.

पलाझो वर फ्रण्ट कट कुर्ते चांगले दिसतात(मला आधे प्रिती झिंटा चा सोल्जर मधला नय्यो नय्यो.... गाण्यातला ड्रेस आठवतो फ्रंट कट म्हटले की.)
काही जणींना सूट होतातही, पण मला स्वतःला साधे लाँग कुर्ते पलाझो वर सूट होणार नाहीत. कुर्ता एकदम उंची चा भास निर्माण करणारा(परफेक्ट स्ट्रेट कट) आणी स्टायलिश हवा, तर सूट होतो.
फ्रंट कट वाले जितक्या जणींना घातलेले पाहिलेय तितक्याना सूट झालेत. बहुधा फ्रंट्+साईड कट होते.

हो हा चांगला आहे.
माझ्याकडे वेगवेगळ्या रंगाचे तीन स्कर्ट्स आहेत.त्यावर चांगला दिसावा म्हणून एक टॉप घेतला होता.
http://www.jabong.com/Lara-Karen-White-Blouse-1455411.html
हे ब्लाऊज फोटोत अजिबात वाटत नाही तितके पारदर्शक आणि टू मच फॉर्मल आहे. हे स्कर्ट्स वर चांगले दिसणार नाही. काळ्या ट्राऊजर वर वापरुन टाकावे लागेल. शिवाय त्याच्या स्टाईल मुळे स्लिप ची पण बोंब झाली आहे.ती नवी विकत आणावी लागेल.
जबोंग वरुन विदेशी ब्रँड जितके घेतले तितके मला झेपले नाहीत.फोटोत वेगळा आणि प्रत्यक्ष कपड्याचा पोत वेगळा(बरेच वेळा खूप जास्त पारदर्शक.)
स्कर्टस साठी एक प्लेन काळा कॉटन आणि/किंवा एक प्लेन पांढरा सॉफ्ट कॉटन शॉर्ट टॉप घेणार आहे.काळा प्लेन व्ही नेक टि शर्ट आहे पण फार सूट होत नाही.

क्रेडिट कार्ड च्या जमलेल्या पॉईंट चे अमॅझॉन व्हाऊचर बनवून हा घेतला.
मला हा रंग खूप आवडला.लाल आहे पण धगधगता लाल नाही.
http://www.amazon.in/gp/product/B0148VWKPE?psc=1&redirect=true&ref_=oh_a...

लयी भारी अनु Happy
आम्ही मेलं पोटात मार खाल्ला नाहीतर नक्की घेतला असता Sad

तिथेच http://www.amazon.in/2DAYs-Women-Stylish-Georgette-Plazzo/dp/B00XPRF17C/... हे सापडल .
फार ट्रान्सस्परन्ट होईल का???

पोटात मार आमीबी खाल्लाय पण ते (थोडे) लपवण्याच्या काही ट्रिका आहेत.
नाहीच लपले तर "चेहरा गोड दिसतो ना...बाकी मरुदे" म्हणून परिधान करायचा असतो तो Happy

स्टॅन चार्ट च्या रिवार्ड पॉइंट च्या पानावर गेले. तिकडे इन्स्टंट रिवार्डस मध्ये ते व्हाऊचर होते. २५० रु चे मिळवायला ९५० पॉईंट चे बलिदान द्यावे लागते.व्हाऊचर मिळाल्यावर मेल येते त्यात जाऊन अ‍ॅड व्हाऊचर अमॅझॉन वर करुन तो मेल मधे मिळालेला कोड टाकणे.

स्वस्ति, पलाझ्झो चांगला दिसतोय. पण माझ्या नजरेला नेहमी कॉटन्/लिनन्/मिक्स कॉटन वाले कपडे जास्त आवडतात. जॉर्जेट चे बॉटम्स जेव्हा घेतले तेव्हा जरा फ्लॉप झाले माझ्यासाठी.

पुण्यात लेडिज फॉर्मल (शर्ट, ट्राउजर, स्कर्ट) शिवणार्‍या टेलरचे नाव्/पत्ता/फोन कुणी सांगु शकेल का?
कर्वे रोड, डेक्कन, फर्ग्युसन रस्ता (प्राधान्य) अन्यथा कॅम्प आणि इतर एरिया पण ओके.
साधारण शिलाई किती असावी/असते? (शर्ट+ट्राऊजर) आणि नुसता स्कर्ट (अंदाज येण्यासाठी विचारते आहे)

वस्ते फॉर्मल चांगला शिवेल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे.
त्याच्याकडे जास्त करुन पब्लिक ला ड्रेस आणि ब्लाऊज देताना पाहिले आहे.

ह्या दोन laces साड्या बनविण्यासाठी घेतल्या आहेत. पण कुठल्या रंगाच्या आणि काय मटेरिअलच्या साड्या घेउ कुणीतरी सांगा. शिफॉन मला अजिबात आवडत नाही. गुलाबी फुलांच्या lace ला काळी प्लेन साडी घ्यायचीये.
laces.jpg
पुण्यात कुठुन घेउ ते पण सुचवा.

Patches_0.jpg
हे पॅचेस लावून टॉप शिवून घ्यायचाय. कुठल्या रंगाचा घेउ ?

ती पहिली हिरवी लेस ऑफ व्हाईट जॉर्जेट्/मार्बल वर मस्त वाटेल असे वाटते.
पांढरा/हिरवा हे कॉम्बिनेशन छान दिसते.
किंवा अगदी फिका बेबी पिंक गुलाबी.
त्यावर पण छान दिसेल.
काळा हिरवा वगैरे मला तरी पचत नाही.हिरवा एकदम फ्लुरोसंट पोपटी असला आणि कॅरी करण्याची हिंमत असली तर काळा हिरवा चांगला दिसतो.

पहिल्या लेस ला मोरपंखी किंवा अनुने सांगितल्याप्रमाणे हिरवा एकदम फ्लुरोसंट पोपटी मस्त दिसेल...
दुसर्‍या लेस ला ऑफ व्हाईट पण चालेल...

एक्झॅक्ट सापडली नाही.पण याच्यात खाली सिमीलर आयटम मध्ये थोड्या सापडतील.
http://www.amazon.in/Moh-fashions-Mohfashions-borders-Laces/dp/B01HEVFJ8...

इबे वर पण सुन्दर आहेत लेसेस.पण महाग आहेत.प्रत्यक्ष कॅम्पात्/पूना लेस ला गेल्यास जरा साडीला लावून अंदाज घेता येईल.

पण कुठल्या रंगाच्या आणि काय मटेरिअलच्या साड्या घेउ कुणीतरी सांगा. शिफॉन मला अजिबात आवडत नाही.>> भागलपूर सिल्कमध्ये बघ. खूप मस्त रंग येतात.

ही भागलपूर सिल्क साडी आहे - 19.01.2013 - 2.jpg

Pages