रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन मालिका

Submitted by मी_इंदू on 3 February, 2016 - 09:31

मालिका येईल तेव्हा कळेलच कशी आहे .. तोपर्यंत तुम्हाला अशा हॉरर मालिका .. कथा.. कशा वाटतात ? आलेले .. ऐकलेले अनुभव याबद्दल सांगा .
ही मालिका पाहण्याचे आपले हॉरर अनुभव share करा .

पुढील धागा
रात्रीस खेळ चाले १ www.maayboli.com/node/58113

आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अन्जू....जान्हवी ती जान्हवीच गं...! लै भारी !!>> मामा तुमच्या जान्हवीने अल्पविश्रांती घेतलीये. ती येणार परत.
अन्जू, जान्हवीनंतर ठोकळी मामांची आवडती भाची.....नहीssssये मैं क्या सुन रही हूँ।

तिला काय दिसते? ठोकळीच्या ऐवजी नौवारीतली शेवन्ता ? की परकर पोलक्यातली सुसल्या? ( सुषमा) की अण्णा? की बेरी नाना?.>>> छे हो, आणा आणि बेरी नाना नसतील कदाचित?....
कस्से दिसतील ते दोघे साडीत? Wink Wink

कुणीसुद्धा भूत दिसलं नाही. ठोकळीच्या कपाळाला मळवट भरला होता फक्त.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक :p

आज पण सुष्माचं वागणं संशयास्पदच होतं, आधी भरून आलं म्हणून रडते काय, मग छद्मीपणे हसते काय !!

कुणीसुद्धा भूत दिसलं नाही. ठोकळीच्या कपाळाला मळवट भरला होता फक्त.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक <<<<<< ठोकळीचे एक्सप्रेशन बघुन मला तर भिती कमी हसुच जास्त येत होत.....

आणि ति सुशमाला म्हणते हसत रहा हसताना छान दिसतेस... हे वाक्य ती स्वतःच्या चेहर्यावरची एकहि रेशा न हलवता सान्गते तेव्हा मला वाटल कि तिला जाउन सान्गाव कि बाई ग अस तु स्वतः ला पण लागु कर कि....

ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक.... Rofl Rofl Rofl
अरे बाबा त्या ठोकळी नावाच्या सायंटीस्टला कोणीतरी अ‍ॅक्टींग शिकवा रे.. Lol Lol

कुणीसुद्धा भूत दिसलं नाही. ठोकळीच्या कपाळाला मळवट भरला होता फक्त.
ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक <<<<<< ठोकळीचे एक्सप्रेशन बघुन मला तर भिती कमी हसुच जास्त येत होत..... +१

ठोकळी इम्तेहां लेती है
दर्शकों की जान, लेती है

( दोस्ती इम्तेहां लेती हैच्या चालीवर म्हणावे )

काल ठोकळी किचनमध्ये आल्यानंतरचा दत्तीचा अभिनय कम्माल होता. Lol विशेषतः ती छायाबद्दल ठोकळीला सांगत असते तेव्हाचा. हसून हसून पुरेवाट झाली. Rofl

मै तो पैलेच बोल्या था, की वो ठोकळी में भूत्पोटेन्शियल हय !
तिखटाच्या डब्यात डोकं.. परफेक्ट. आजच्या भागात सांगेल पण ती.. निर्विकारपणे..
त्यात काय, चुकून तिखट शोधता शोधता ड्ब्यात पडले !

ठोकळीने तिखटाच्या डब्यात डोकं घातलं बहुतेक....

त्यात काय, चुकून तिखट शोधता शोधता ड्ब्यात पडले !>>

अरे देवा!!!! Rofl ठोक्ळीच्या नावाने चान्गभल!!!!!

Pages